Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमल” या चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.
69 देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव.
पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.
2 इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही.
मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे.
मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत.
मी आता लवकरच बुडणार आहे.
3 मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे.
माझा घसा दुखत आहे.
मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत
तुझ्या मदतीची वाट पाहिली.
4 मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत.
ते विनाकारण माझा तिरस्कार करतात.
माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात.
माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात.
मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले
आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.
5 देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे.
मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.
30 मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन.
मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन.
31 यामुळे देव आनंदित होईल.
एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.
32 गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात.
या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.
33 परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो
परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात.
34 देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी,
समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्व त्याची स्तुती करा.
35 परमेश्वर सियोनाला वाचवेल.
परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील.
ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील.
36 त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल.
ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.
अभिषेकाचे तेल
22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 23 “उत्तमात उत्तम मसाले घे; अधिकृत मापाप्रमाणे बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे सहा पौंड म्हणजेच अडीचशे शेकेल सुंगधी दालचिनी, बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल सुंगधी बच. 24 आणि बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतुनाचे तेल घे.
25 “व या सर्वाच्या मिश्रणाने अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर; 26 हे पवित्र तेल दर्शन मंडपावर व आज्ञापटाच्या कोशावर ओतून त्यांना पवित्र कर; या गोष्टींना विशेष महत्व आहे हे यावरून दिसून येईल. 27 तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी, 28 तसेच होमवेदी व तिचे सर्वसामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यांसर्वावर तेल ओतावे. 29 त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमेश्वराला परमपवित्र होतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.
30 “अहरोन व त्याच्या मुलांना तेलाचा अभिषेक कर म्हणजे ते पवित्र होतील. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; 31 इस्राएल लोकांना तू सांग की अभिषेकाचे तेल पवित्र आहे, पिढ्यान्पिढ्या ते केवळ माझ्यासाठीच वापरावे. 32 ह्या तेलाचा, ते साधे सुवासिक तेल असल्यासारखा कोणीही वापर करु नये; हे पवित्र तेल ज्याप्रकारे तयार केले तसे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्हालाही ते अगदी पवित्रच वाटले पाहिजे. 33 ह्या पवित्र तेलासारखे सुवासिक तेल जर कोणी तयार करील किंवा ते कोणा परकीयाला देईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
धूप
34 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधा बिरूजा व शुद्ध धूप आणावेस. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात; 35 आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून त्यांचे सुवासिक धूप द्रव्य तयार करावे; तसेच त्यात मीठमिसळावे म्हणजे ते मिश्रण केलेल धूप द्रव्य शुद्ध व पवित्र होईल. 36 त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शन मंडपात पवित्र करारापुढे ठेवावे; ह्याच कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन; हे चूर्ण तुम्ही परमपवित्र लेखाचे. 37 या धूपद्रव्याचा फक्त परमेश्वरासाठीच उपयोग करावा; त्याच्या सारखे दुसरे धूप द्रव्य तुम्ही करु नये. 38 सुवासाचा आनंद घ्यावा म्हणून कोणी आपल्या स्वतःसाठी असे धूप द्रव्य तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
2 जेव्हा लोकांनी पौलाला हिब्रू भोषत बोलताना ऐकले तेव्हा ते अधिकच शांत झाले. पौल म्हणाला,
3 “मी एक यहूदी आहे. आणि किलिकीया प्रांतातील तार्स येथे माझा जन्म झाला. परंतु याच शहरात मी लहानाचा मोठा झालो, आपल्या पूर्वजांच्या नियमांचे सविस्तर शिक्षण मी गमालीएल यांच्या पायाजवळ बसून घेतले. जसे तुम्ही आज देवाविषयीच्या आवेशाने भरलेल आहात तसाच मी देखील देवाविषयीच्या आवेशाने भरलेला होतो. 4 या मार्गाचा (ख्रिस्ती चळवळीचा) पुरस्कार करणाऱ्यांचा मी त्यांच्या मरणापर्यंत छळ केला. मी स्त्री व पुरुषांना अटक करुन तुंरुंगात टाकले.
5 “याची मुख्य याजक व धर्मसभेचे सर्व वडीलजन साक्ष देतील. त्यांच्याकडून दिमिष्कातील त्यांच्या बंधुजनांच्या नावाने मी पत्रे घेतली. आणि तेथे ह्या मार्गांचे (ख्रिस्ती) जे लोक होते, त्यांना कैदी म्हणून यरुशलेमास घेऊन येणार होतो, यसाठी की त्यांना शिक्षा व्हावी.
पौल त्याचा पालट झाला हे सांगतो
6 “तेव्ह? असे झाले की, मी प्रवास करीत दिमिष्क शहराजवळ आलो असताना दुपारच्या वेळी माइयाभोवती आकाशातून लख्ख प्रकाश पडला. 7 मी जमिनीवर पडलो. आणि मी एक वाणी माइयाशी बोलताना ऐकली, ‘शौला, शौला, माझा छळ तू का करतोस?’
8 “मी उत्तर दिले, ‘प्रभु, तू कोण आहेस?’ तो मला म्हणाला, ‘तू ज्याचा छळ करीत आहेस तो नासरेथचा येशू मी आहे.’ 9 जे माझ्याबरोबर होते त्यांनी प्रकाश पाहिला, पण जो आवाज माझ्याशी बोतल होता तो त्यांना ऐकू आला नाही.
10 “मी म्हणालो, ‘प्रभु मी काय करु?’ आणि प्रभु मला म्हणाला, ‘ऊठ आणि दिमिष्कात जा. तेथे तुला जे काम नेमून देण्यात आले आहे ते सांगण्यात येईल.’ 11 त्या प्रकाशामुळे मला काही दिसेनासे झाले. तेव्हा माइया सोबत्यांनी मला हाताला धरुन नेले आणि मी दिमिष्कला पोहोंचलो.
12 “नियमशास्त्राचे भक्तिभावाने पालन करणारा हनन्या नावाचा एक मनुष्य होता. तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याबद्दल चांगले बोलत. 13 तो माइयाकडे आला, आणि माइयाजवळ उभा राहून तो म्हणाला, ‘बंधु शौल, तू पुन्हा पाहू लागशील!’ आणि त्याच घटकेला मला दिसू लागले.
14 “तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या (वाडवडिलांच्या) देवाने तुला निवडले आहे, यासाठी की त्याची इच्छा तुला कळावी. त्या धार्मिकाला तू पहावेस. आणि त्याच्या तोंडचे शब्द तुला ऐकायला मिळावेत. 15 कारण तू जे काही पाहिलेस आणि ऐकलेस, याविषयी तू त्याचा सर्वांसमोर साक्षीदार होशील. 16 मग आता, कशाची वाट पाहतोस? ऊठ, आणि बाप्तिस्मा घे व तुझी पाप धुवून टाक. येशूवर विश्वास ठेवून हे कर.’
2006 by World Bible Translation Center