Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 27

दावीदाचे स्तोत्र.

27 परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस.
    मला कुणाचीही भीती बाळगायला नको.
परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे.
    म्हणून मी कुणालाही भीत नाही.
माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील
    ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील.
माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन
    माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील.
परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही.
    युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही.
का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.

मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे.
    मला हे मागायचे आहे,
“मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे
    मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन
    आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन.”

मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील.
    तो मला त्याच्या तंबूत लपवेल
    तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे.
    परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन.
मी बळी देताना आनंदाने ओरडेन.
    मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन, वाद्ये वाजवीन.

परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे.
    माझ्याशी दयेने वाग.
परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे.
    मला अगदी माझ्या ह्रदयातून तुझ्याशी बोलायचे आहे.
    परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.
परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस.
    तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस.
मला मदत कर! मला दूर लोटू नकोस.
    मला सोडू नकोस, देवा तूच माझा तारणारा आहेस.
10 माझे आईवडील मला सोडून गेले.
    परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले.
11 परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव.
    मला योग्य गोष्टी करायला शिकव.
12 मला माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनाटे सांगितले.
    मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले.
13 मला खरोखरच असा विश्वास वाटतो की
    मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल.
14 परमेश्वराच्या मदतीची वाट बघ.
    सामर्थ्यवान आणि धीट हो
    व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.

यशया 26:7-15

प्रामाणिकपणा हे सज्जनांचे ब्रीद असते.
    सज्जन सत्याच्या सरळ मार्गाने जातात,
आणि देवा तू तो मार्ग सुकर
    व सुलभ करतोस.
पण परमेश्वरा, तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत.
    आमचे आत्मे तुला व तुझ्या नांवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात.
प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे,
    आणि प्रत्येक पहाटेबरोबर माझ्यातील आत्मा तुझ्याशी समरस होऊ इच्छितो.
जेव्हा तू न्याय देशील तेव्हा
    लोकांना जगण्याचा योग्य मार्ग सापडेल.
10 पापी माणसावर तू फक्त दयाच करीत राहिलास
    तर तो कधीच सत्कृत्य करायला शिकणार नाही.
वाईट माणूस चांगल्या लोकांत राहिला तरी वाईट गोष्टीच करील:
    दुष्टाला परमेश्वराची महानता कदाचित कधीच कळणार नाही.
11 पण परमेश्वरा, तू त्यांना शिक्षा करण्यास तयार हो.
    नक्कीच ते हे पाहातील नाही का?
परमेश्वरा, तुझ्या लोकांबद्दल असलेले
    तुझे भक्कम प्रेम तू पाप्यांना दाखव.
मग ते नक्कीच खजील होतील.
    तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच
    आगीत भस्मसात होतील.
12 परमेश्वरा, आम्ही तडीस नेलेल्या सर्व गोष्टी
    तूच आमच्यासाठी केल्या आहेस तेव्हा आम्हाला शांती दे.

देव त्यांच्या लोकांना नवजीवन देईल

13 परमेश्वरा, तू आमचा देव आहेस.
    पूर्वी आम्ही इतर भोंदू देवांना
अनुसरलो आम्ही त्यांना जवळ केले.
    पण आता लोकांनी फक्त तुझेच नाव घ्यावे असे आम्हाला वाटते.
14 ते मृत देव जीवंत होणार नाहीत.
    त्यांची भुते आता उठणार नाहीत.
तू त्यांचा नाश करायचे ठरविलेस
    आणि त्यांची आठवण देणाऱ्या सर्व खाणाखुणा तू नष्ट केल्यास.
15 तुझ्या आवडत्या राष्ट्राला
    तू मदत केलीस.
इतर लोकांना त्या राष्ट्राचा
    पराभव करण्यापासून थांबविलेस.

प्रेषितांचीं कृत्यें 2:37-42

37 जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना फार फार दु:ख झाले. त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले, “आम्ही काय करावे?”

38 पेत्र त्यांना म्हणाला, “तुमची ह्रदये व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 39 हे अभिवचन तुम्हांसाठी आहे, हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांनासुद्धा आहे. प्रभु आपला देव, ज्यांना स्वतःकडे बोलावितो अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे.”

40 पेत्राने दुसऱ्या पुष्कळ शब्दांत त्यांना सावधान केले; त्याने त्यांना विनवणी केली, “ह्या युगाच्या दुष्टाई पासून स्वतःचा बचाव करा!” 41 मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये तीन हजार लोकांची भर पडली.

विश्वासणाऱ्यांचा सहभाग

42 सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत. ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत. ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center