Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर व मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
123 देवा, मी वर बघून तुझी प्रार्थना करतो.
तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.
2 गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी
मालकावर अवलंबून असतात.
3 त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो.
आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
4 परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा.
खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो.
५गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला.
ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.
16 तेव्हा परमेश्वराने न्यायाधीश म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची नेमणूक केली. हे नेते इस्राएलांचा ताबा घेणाऱ्या शत्रुंपासून त्यांची सुटका करीत. 17 इस्राएल लोक या न्यायाधीशांनाही जुमानीतनासे झाले. आपल्या परमेश्वराशी इस्राएल लोक निष्ठावंत राहिले नाहीत ते इतर दैवतांच्या भजनी लागले. [a] पूर्वी या इस्राएल लोकांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळत असत. पण आता त्यांच्या वागणुकीत बदल झाला आणि परमेश्वराने सांगितलेला मार्ग त्यांनी सोडून दिला.
18 अनेकदा शत्रु इस्राएलांचा जाच करत. अशावेळी ते मदतीलाठी परमेश्वराचा धावा करीत आणि तेव्हा त्यांची दया येऊन परमेश्वर त्यांच्या सुटकेसाठी न्यायाधीशाला पाठवी. परमेश्वर या न्यायाधीशांच्या बरोबर होता. म्हणून इस्राएल लोकांचे दरवेळी शत्रूंपासून रक्षण झाले. 19 पण प्रत्येक न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर ते पुन्हा पुन्हा पापाकडे झुकत आणि अन्य दैवतांची उपासना करत आणि त्यांची सेवा करत असत. त्यांच्या पूर्वजांपेक्षाही ते अधिक वाईट वागत असत. त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे आपल्या दुर्वतनात फरक करायला त्यांनी नकार दिला.
20 तेव्हा परमेश्वराचा इस्राएल लोकांवर अतिशय संताप झाला व तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी माझे ऐकले नाही. 21 तेव्हा मी यापुढे त्यांच्या शत्रूंचा पराभव करुन इस्राएल लोकांचा मार्ग मोकळा करत जाणार नाही. यहोशवा वारला तेव्हा जी राष्ट्रे या भूमीत होती त्यांना मी येथेच राहू देईन. 22 इस्राएल लोकांच्या कसोटीसाठी मी या राष्ट्रांचा वापर करीन. आपल्या पूर्वजांप्रमाणे आताचे इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळतात का ते बघू.” 23 तेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्या त्या ठिकाणी राहू दिले. त्यांना तो देश लगेच सोडून जायची बळजबरी केली नाही. त्यांचा पराभव करायला परमेश्वराने यहोशवाच्या सैन्याला साहाय्य केले नाही.
8 चौथ्या देवदूताने त्याची वाटी सूर्यावर ओतली. सूर्याला लोकांना अग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती. 9 भयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप दिले की ज्याला या संकटांवर ताबा आहे. पण लोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले.
10 पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्र्वापदाच्या सिंहासनावर ओतली. आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दु:खामुळे लोक त्यांच्या जिभा चावत होते. 11 लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले. कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आले होते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चात्ताप करण्याचे नाकारले.
12 सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला. 13 तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेर आले. श्र्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले. 14 हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मे आहेत. ते चमत्कार करतात, हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसमर्थ देवाच्या महान दिवशी लढाईसाठी एकत्र जमवतात.
15 “पाहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील, आणि आपले कपडे तयार ठेवतो तो धन्य.”
16 मग दुष्ट आत्म्यांनी हर्मगिदोन [a] नावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.
17 मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला, “हे पूर्ण झाले आहे.” 18 मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवर असल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता. 19 महान शहर तीन विभागात विभागले गेले. राष्ट्रांतील शहरे नष्ट झाली. आणि देव महान बाबेलला विसरला नव्हता. त्याने त्यांच्या भयंकर रागाच्या द्राक्षारसाचा पेला बाबेलला दिला. 20 प्रत्येक बेट नाहीसे झाले. आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले. 21 लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येक गारा 100 पौंड [b] वजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण ही पीडा खरोखरच महाभयंकर होती.
2006 by World Bible Translation Center