Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर व मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
123 देवा, मी वर बघून तुझी प्रार्थना करतो.
तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.
2 गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी
मालकावर अवलंबून असतात.
3 त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो.
आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
4 परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा.
खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो.
५गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला.
ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.
आज्ञाभंग आणि पराभव
6 मग यहोशवाने सर्वाना घरी जायला सांगितले. तेव्हा सर्व वंशांचे लोक आपापल्या वतनाचा ताबा घ्यायाला परतले. 7 यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मृत्यूनंतर. वडीलधारी मंडळी जिवंत असे पर्यंत इस्राएलचे लोक परमेश्वराची उपासना करत होते. या वृध्द मंडळीनी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या होत्या. 8 परमेश्वराचा सेवक नूनपुत्र यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन वाराला. 9 इस्राएल लोकांनी त्याचे दफन केले. तिम्नाथ-हेरेस येथे, गाश डोंगराच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्याला मिळालेल्या जमिनीत त्याला त्यांनी पुरले.
10 जुन्या पिढीतील सर्व मृत्यू पावल्यानंतर नवीन पिढी पुढे आली. त्यांना परमेश्वराविषयी आणि परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी काय केले याविषयी काहीही माहिती नव्हती. 11 तेव्हा या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशी दृष्कृत्ये केली आणि बआल या दैवताच्या भजनी लागले. हे निंद्य कृत्य करताना त्यांना परमेश्वराने पाहिले. 12 परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणले होते. आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराची उपासना केली होती. पण आता या इस्राएल लोकांनी परमेश्वराचे अनुसरण करण्याचे सोडून दिले होते. आणि त्यांच्या अवती भोवतीच्या लोकांच्या खोट्या दैवतांची पूजा करायला सुरुवात केली होती. याचा परमेश्वराला संताप आला. 13 इस्राएल लोकांनी आता परमेश्वराला सोडून बआल आणि अष्टारोथ यांची उपासना करायला सुरुवात केली.
14 परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाल्यामुळे त्यांच्यावर शत्रू चाल करुन येऊ लागला व त्यांना लुटू लागला. भोवताली राहणाऱ्या शत्रूंकडून ते पराभूत होऊ लागले. इस्राएल लोकांना शत्रूपासून आपले रक्षण करता येईना. 15 लढाईत त्यांना नेहमी अपयश येऊ लागले. परमेश्वराची साथ आता त्यांना नसल्यामुळे ते पराजित होऊ लागले. त्यांच्या भोवती राहणाऱ्या लोकांच्या दैवतांची सेवा केल्यास इस्राएल लोकांना पराभव पत्करावा लागेल हे परमेश्वराने आधीच बजावले होते.
16 मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्या ओता.”
2 पहिला देवदूत गेला आणि त्याने जमिनीवर त्याची वाटी ओतली. तेव्हा सर्व लोकांना ज्यांच्यावर श्र्वापदाचे चिन्ह होते आणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते त्यांना अतिशय कुरुप आणि वेदना देणारे फोड आले.
3 दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा, मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातील प्रत्येक जीवधारी प्राणी मेले,
4 तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्या व झरे रक्तमय झाले. 5 मग मी पाण्याच्या देवदूताला हे बोलताना ऐकले:
“केवळ तूच एक आहेस,
जो तू आहेस आणि जो तू होतास.
तू पवित्र आहेस. जे न्याय तू दिलेस ते योग्य दिलेस.
6 लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले.
तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले आता
तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस.
कारण ते याच पात्रतेचे आहेत.”
7 त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की,
“होय, प्रभु देवा सर्वसमर्था,
तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.”
2006 by World Bible Translation Center