Revised Common Lectionary (Semicontinuous)
वाव
41 परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव.
कबूल केल्याप्रमाणे तू मला वाचव.
42 त्यावेळी ज्या लोकांनी माझा पाणउतारा केला होता त्यांना द्यायला माझ्याजवळ उत्तर असेल.
परमेवरा, तू सांगतोस त्या गोष्टींवर माझा खरोखरच विश्वास आहे.
43 मला नेहमी तुझ्या खऱ्या शिकवणी बद्दल बोलू दे.
परमेश्वरा, मी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
44 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या शिकवणुकी प्रमाणे चालेन.
45 म्हणजे मी मुक्त होईन का?
कारण मी तुझे नियम पाळायचा आटोकाट प्रयत्न करतो.
46 मी तुझ्या कराराबद्दल राजांजवळ बोलेन
आणि ते मला शरमिंदे करणार नाहीत.
47 मला तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायला आवडते.
परमेश्वरा, मला त्या आज्ञा आवडतात.
48 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञांची स्तुती करतो.
मला त्या आवडतात आणि मी त्यांचा अभ्यास करीन.
38 याजक अहरोनने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता. 39 अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो 123 वर्षाचा होता.
8 जर तुम्ही पवित्र शास्त्रातील महान आज्ञा “आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखीच प्रीति करा” पाळता तर तुम्ही योग्य करता. 9 पण जर तुम्ही पक्षपात करता, तर तुम्ही पाप करता आणि नियम मोडण्याचा दोष तुमच्यावर येतो.
10 कारण जर कोणी संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करतो पण एका नियमाबाबतीत चुकतो, तर तो संपूर्ण नियमशास्त्राबाबतीत दोषी ठरतो. 11 कारण “व्यभिचार करू नको” असे जो म्हणाला, तो असे सुद्धा म्हणाला की, “खून करू नको.” म्हणून जर तुम्ही व्यभिचार करीत नाही पण खून करतो तर तुम्ही नियमशास्त्र मोडता.
12 अशा लोकांसारखे बोला व वागा की, ज्यांचा न्याय अशा नियमांमुळे होणार आहे की, ज्यामुळे स्वातंत्र्य मिळेल. 13 जो दयाळूपणे वागला नसेल त्याचा न्यायही देव त्याच्यावर दया न दाखविताच करील. पण दया न्यायावर विजय मिळविते!
2006 by World Bible Translation Center