Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग चौथा
(स्तोत्रसंहिता 90-106)
देवाचा माणूस मोशे याची प्रार्थना
90 प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
2 देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि
पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा,
तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
3 तूच लोकांना या जगात आणतोस आणि
तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
4 तुझ्यासाठी हजारो वर्षे
म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.
5 तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे.
सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो.
आम्ही गवतासारखे आहोत.
6 गवत सकाळी उगवते आणि
संध्याकाळी ते वाळते व मरणाला टेकते.
13 परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत
ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
14 तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल.
आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
15 तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस.
आता आम्हांला सुखी कर.
16 तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु
शकतोस ते त्यांना बघू दे.
17 देवा, प्रभु, आमच्यावर दया कर.
आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.
32 “हे आकाशा, ऐक मी काय म्हणतो ते.
वसुंधरे ऐक शब्द माझ्या मुखातले.
2 पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव होईल.
तो बोध असेल जमिनीवरुन खळाळणाऱ्या पाण्यासारखा.
हिरवळीवर झिमझिमणाऱ्या पावसासारखा.
झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरींसारखा.
3 घोषणा [a] करीन मी परमेश्वराच्या नावाची.
तुम्हीही परमेश्वराची महती गा!
4 “तो आहे दुर्ग
आणि त्याची कृती परिपूर्ण!
कारण चोखाळतो तो उचित मार्ग!
देवच खरा आणि विश्वासू
न्यायी आणि सरळ.
5 तुम्ही त्याची मुले नाहीत.
तुमची पापे त्याला मळीन करतील.
तुम्ही लबाड आहात.
6 मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो,
परमेश्वराशी असे वागता?
तो तर तुमचा पिता,
निर्माता कर्ता आणि धर्ता तोच.
7 “आठवा पूर्वी काय घडले
ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले
ते ध्यानात आणा आपल्या बापाला विचारा, तो सांगेल.
महाजनांना विचारा, ते सांगतील.
8 परात्पर देवाने लोकांची विभागणी केली, राष्ट्रा राष्ट्रांमध्ये.
प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला.
देवाने इस्राएल सीमा आखल्या.
देवदूतांइतकी राष्ट्रे त्याने बनविली.
9 परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होय.
याकोब परमेश्वराचा आहे.
10 “याकोब (इस्राएल) त्याला सापडला वाळवंटात
भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात.
परमेश्वराने त्याला आपल्या कवेत घेतले
आणि डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळले.
11 इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे.
गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते.
त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते.
पिले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते
आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते.
तसा परमेश्वर इस्राएलला जपतो.
12 परमेश्वरानेच इस्राएलला पुढे आणले.
दुसरा कोणी देव मदतीला नव्हता.
13 परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला.
मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले.
परमेश्वराने त्याला खडकातून मध दिला,
त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.
14 गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी, आणि दूध, पुष्ट मेंढ्या व कोकरे,
बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे,
उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले.
द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यायलात.
18 आपल्या निर्माणकर्त्याचा दुर्गाचा त्यांनी त्याग केला.
जीवनदायी परमेश्वराला ते विसरले.
7 प्रत्येक गोष्टीत स्वतःला तू चांगल्या कामाचा कित्ता असे दाखवून दे. तुझ्या शिक्षणात शुद्धता व गंभीरता असावी. 8 ज्यावर कोणी टीका करू शकत नाही असा चांगल्या बोलण्याचा उपयोग कर. यासाठी की, जे तुला विरोध करतात त्यांनी लज्जित व्हावे.
11 कारण सर्व माणसांना देवाची तारक कृपा प्रगट झाली आहे. 12 ती आम्हाला शिकविते की, आपण अभक्ति व ऐहिक गोष्टींची हाव यांचा नकार करावा आणि या सध्याच्या जगात आपण सुज्ञपणाने व नीतीने वागावे, व देवाप्रती आपली भक्ती प्रकट करावी. 13 आणि आपली धन्य आशा म्हणजे आपला महान देव व आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहावी. 14 त्याने स्वतःला आमच्यासाठी दिले यासाठी की सर्व दुष्टतेपासून त्याने खंडणी भरून आम्हांस सोडवावे व चांगली कृत्ये करण्यासाठी आवेशी असलेले असे जे केवळ आपले लोक त्यांना स्वतःसाठी शुद्ध करावे.
15 या गोष्टीविषयी बोध करीत राहा आणि कडक शब्दात कानउघाडणी करीत राहा आणि हे पूर्ण अधिकाराने कर. कोणीही तुला तुच्छ मानू नये.
2006 by World Bible Translation Center