Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे मास्कील.
78 लोकहो! माझी शिकवण ऐका,
मी काय सांगतो ते ऐका!
2 मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन.
मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन.
3 आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे.
आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
4 आणि आम्ही ती विसरणार नाही.
आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील.
आम्ही परमेश्वराची स्तुती करु
आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू.
12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात देवाने
त्यांच्या वाडवडिलांना त्याची महान शक्ती दाखवली.
13 देवाने लाल समुद्र दुभंगला आणि लोकांना पलिकडे नेले.
पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते.
14 देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा
व रात्री अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
15 देवाने वाळवंटात पाषाण फोडला
त्याने लोकांना पृथ्वीच्या गर्भातून पाणी दिले.
16 देवाने खडकातून नदीसारखे
खळखळणारे पाणी बाहेर आणले.
17 मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो,
“मीच परमेश्वर तुमचा देव आहे.
मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो.
तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो.
18 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या
तर पूर्ण भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे शांती
तुमच्याकडे आली असती,
समुद्राच्या परत परत येणाऱ्या लाटांप्रमाणे चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा
तुमच्याकडे आल्या असत्या.
19 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या
तर वाळूच्या कणांप्रमाणे खूप संतती तुम्हाला झाली असती
आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले
गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते.”
20 माझ्या लोकांनो, बाबेल सोडा,
खास्दयापांसून पळा, ही वार्ता लोकांना आनंदाने सांगा.
जगातील दूरदूरच्या ठिकाणी
ही बातमी पोहोचवा.
लोकांना सांगा,
“परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याची सुटका केली.
21 परमेश्वराने त्याच्या लोकांना वाळवंटातून पार नेले
पण ते तहानलेले राहिले नाहीत का?
कारण देवाने आपल्या माणसांसाठी खडकातून पाणी वाहायला लावले.
त्याने खडक फोडला
आणि पाणी बाहेर वाहू लागले.”
तुम्ही न्यायाधीश नाही
11 बंधूंनो, एकमेकांविरुद्ध वाईट बोलण्याचे थांबवा, जो त्याच्या भावाविरुद्ध बोलतो किंवा जो त्याच्या भावाचा न्याय करतो तो नियमशास्त्राविरुद्ध बोलतो. आणि तो नियमशास्त्राचा न्याय करतो. आणि जर तुम्ही नियम शास्त्राचा न्याय करता तर तुम्ही नियमशास्त्र जे सांगते ते करीत नाही व तुम्ही न्यायाधीश आहात. 12 नियमशास्त्र देणारा न्यायाधीश फक्त एकच आहे. फक्त देवच तारण करण्यास व नाश करण्यास समर्थ आहे. तू जो तुझ्या शेजाऱ्याचा न्याय करतोस तो तू स्वतःला कोण समजतोस?
देवाला तुमच्या जीवनाची योजना करू द्या
13 ऐक, तू म्हणतोस, “आज किंवा उद्या आपण या शहरी किंवा त्या शहरी जाऊ व तेथे आपण एक वर्ष घालवू आणि आपण तेथे व्यापार करू व पैसा कमवू.” 14 तुला हे देखील माहीत नाही की, उद्या तुझे काय होईल. अखेर तुझे जीवन तरी काय आहे? कारण थोड्या काळपर्यंत दिसणारे आणि मग अदृष्य होणारे असे धुके तुम्ही आहात. 15 त्याऐवजी, तुम्ही नेहमी असे म्हणा, “जर प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि आपण हे किंवा ते करू.” 16 पण तुम्ही तर घमेंड बाळगता आणि बढाई मारता आणि अशी बढाई मारणे वाईट आहे.
2006 by World Bible Translation Center