Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 119:97-104

मेम

97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते.
    मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात.
    तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे.
    कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त
    कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून
    दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस
    म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
103 माझ्या तोंडात तुझे शब्द
    मधापेक्षाही गोड आहेत.
104 तुझी शिकवण मला शहाणा करते.
    त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.

गणना 11:1-9

इस्राएल लोक पुन्हा तक्रार करतात

11 मग इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल परत तक्रार करु लागले. ती परमेश्वराने ऐकली व ती ऐकल्यावर त्याचा राग भडकला. परमेश्वरापासूनचा अग्नि त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या कडेचा काही भाग जाळून टाकिला. तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी आरडाओरड केली. मोशेने परमेश्वराला विनंती केली तेव्हा अग्नि शमला. त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्निमुळे छावणीचा भाग जळून गेला.

अधिक वयाचे सत्तर नेते

जे विदेशी इस्राएल लोकाबरोबर राहात होते, त्यांना इतर काही पदार्थ खावेसे वाटू लागले. लवकरच इस्राएल लोकांनी पुन्हा कुरकुर करण्यास सुरवात केली. लोक म्हणाले, “आम्हांला मांस खावयास पाहिजे. मिसरमध्ये असताना खाल्लेल्या माश्यांची आम्हाला आठवण येते; तेथे ते आम्हाला फुकट खावयास मिळत. त्याचप्रमाणे तेथे आम्हाला काकड्या, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण असा चांगला भाजीपाला मिळत आसे. परंतु आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्हाला येथे काही ही खावयास मिळत नाही!” (हा मान्ना लहान धण्यासारखा होता, आणि तो झाडाच्या डिंकासारखा दिसे. लोक तो गोळा करीत, तो उखळात कुटीत, किंवा भांड्यात शिजवीत किंवा दळीत व त्याच्या भाकरी करी. उत्तम तेलात भाजलेल्या गोड पुऱ्या सारखी त्याची चव लागे. रात्री दव पडल्यामुळे जमीन ओली झाल्यावर मान्ना जमिनीवर पडत असे.)

रोमकरांस 16:17-20

17 बंधूजनहो, मी तुम्हांस विंनति करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा व त्यांच्यापासून दूर राहा. 18 असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वतःच्या पोटाची सेवा करतात. आपल्या मधुर व खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करता. 19 त्यांच्यापासून दूर राहा कारण सर्व विश्वास णाऱ्यांना तुंम्ही किती आज्ञाधारक आहात हे माहीत आहे, म्हणून तुम्हाविषयी मी फार आनंदात आहे, परंतु मला तुम्ही जे चांगले त्याविषयी शहाणे आणि वाईटाविषयी भोळे असावे असे वाटते.

20 शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायदळी तुडवील आपल्या

प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांबरोबर असो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center