Revised Common Lectionary (Semicontinuous)
149 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा.
ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा.
2 इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या.
सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या.
3 त्या लोकांना डफाच्या आणि
वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.
4 परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे.
देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.
5 देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा.
झोपी गेल्यावरही आनंदी राहा.
6 लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या
आणि त्यांना त्यांच्या तलवारी हातात घेऊ द्या.
7 त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या.
त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या.
8 देवाचे लोक त्या राजांना आणि
महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील.
9 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील.
देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात.
परमेश्वराचे गुणगान करा.
शेती-पशूमध्ये मरीची पीडा
9 नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलाण्यास सांगितले, “इस्राएलांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे!’ 2 तू जर त्यांना जाण्यापासून सतत असाच अडवीत राहशील व त्यांना जाऊ देणार नाहीस. 3 तर शेतावरील पशूंविरुद्ध परमेश्वर आपल्या सामर्थ्याचा वापर करील. परमेश्वर तुझे घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरे यांना भयंकर आजाराने त्रस्त करील. 4 परंतु तो इस्राएल लोकांच्या व मिसरच्या लोकांच्या पशूत भेद करील; इस्राएल लोकांच्या पशूपैकी एकही पशू मरणार नाही. 5 याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. ह्या देशात उद्या हे सर्व घडून येईल.”
6 दुसऱ्या दिवशी सकाळी मिसरमधील शेतीवरील सर्व पशू मेले. परंतु इस्राएल लोकांच्या मालकीच्या पशूंपैकी एकही मेला नाही. 7 इस्राएल लोकांच्या पशूपैकी एखादा मेला काय हे पाहण्यासाठी फारोने माणसे पाठवली. परंतु त्यांच्या पशूंपैकी एकही मेला नाही. तरीपण फारो हट्ट व कठीण मनाचाच राहिला. त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
करिंथ येथील ख्रिस्ती लोकांविषयी पौलाचे प्रेम
11 मी स्वतःच मूर्ख झालो पण तसे होण्यास तुम्ही मला भाग पाडले तुमच्याकडून माझी प्रशंसा व्हावयाची होती. जरी मी काही नसलो तरी अतिश्रष्ठ प्रेषितांपेक्षा मी कमी नव्हतो. 12 प्रेषितांची चिन्हे ही आहेतः चिन्हे, चमत्कार, अदभुत कृत्ये ही खरोखरच सर्व सहनशीलतेने मी तुम्हांमध्ये केली. 13 कारण मी तुम्हांला भार झालो नाही, ही गोष्ट सोडली तर, इतर मंडळ्यापेक्षा ही गोष्ट सोडली तर तुम्ही कशात उणे आहात? या चुकीबद्दल मला क्षमा करा.
14 पाहा, आता तिसऱ्यांदा तुम्हाकडे येण्यासाठी मी तयार आहे. आणि मी तुम्हांला भार होणार नाही. कारण मी तुमची संपत्ती मिळवायला येणार नाही. तर तुम्हांला मिळवण्यासाठी येणार आहे. शेवटी मुलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी बचत करायची नसते तर आईवडिलांनी मुलांसाठी बचत करायची असते. 15 म्हणून मी फार आनंदाने माझ्याकडे जे काही आहे, ते तुमच्यासाठी खर्च करीन आणि स्वतःदेखील खर्ची पडेन. जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल?
16 तर असो, मी चतुर असल्याने, मी तुमच्यासाठी ओझे झालो नाही, तर मी तुम्हांला चकविले व पकडले, असे खुशाल म्हणा. 17 ज्यांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्यातील कोणाकडून तरी मी तुम्हांपासून काही फायदा घेतला आहे का? 18 मी तीताला तुमच्याकडे जाण्यास विनंति केली आणि मी त्याच्याबरोबर भावाला पाठविले. तीताने तुम्हांपासून काही फायदा करुन घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने जगत नाही काय? एका आत्म्याने एकाच मार्गाने चाललो नाही काय?
19 तुम्ही असा विचार करीत आहा काय की आम्ही आमचे समर्थन तुमच्यासमोर करीत आहोत? ख्रिस्तामध्ये असल्याप्रमाणे आम्ही देवासमोर बोलत आहोत. आणि प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुम्हांला बळकट करण्यासाठी. 20 कारण मला भय वाटते की, मी आल्यावर कदाचित जसे मी इच्छितो तसे तुम्ही मला आढळणार नाही. आणि जसे तुम्ही इच्छित नाही तसा असलेला मी तुम्हांस आढळेन. म्हणजे कदाचित भांडणे, मत्सर, राग, कलह, चहाड्या, कुजबूज रुसणे, अव्यवस्था ही दिसून येतील. 21 म्हणजे मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुम्हाजवळ नीच करील. आणि ज्यांनी पूर्वी पाप केले होते आणि आपण केलेल्या जारकर्माचा, अशुद्धपणाचा, व कामातुरपणाचा त्याग केला नाही, व त्यांच्याबद्दल पश्र्चात्ताप केला नाही, अशा अनेकांसाठी मला शोक करावा लागेल.
2006 by World Bible Translation Center