Revised Common Lectionary (Semicontinuous)
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
23 नंतर इस्राएल मिसरमध्ये आला.
याकोब हामच्या देशातच राहिला.
24 याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले.
ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले.
त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
26 म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि
देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
16 आणखी परमेश्वर म्हणाला, “तू जाऊन इस्राएल लोकांच्या वडीलधाऱ्यांना (पुढाऱ्यांना) एकत्र बोलव आणि त्यांना सांग की तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसाहाक व याकोब यांचा देव ‘याव्हे’ मला दर्शन देऊन माझ्याशी बोलला आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमच्याविषयी विचार केला आहे. 17 आणि मी असे ठरवले आहे की मी तुम्हाला मिसरमध्ये भोगाव्या लागत असलेल्या त्रासापासून सोडवीन व आता कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी अशा वेगवेगव्व्या लोकांच्या ताब्यात असलेल्या देशात घेऊन जाईन. मी तुम्हाला दूधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात नेईन.
18 “ते वडीलधारे (पुढारी) तुझे ऐकतील मग तू व ते वडीलधारे (पुढारी) मिळून तुम्ही मिसरच्या राजाकडे जा व त्याला सांगा, ‘इब्री लोकांचा देव याव्हे आम्हाकडे आला. व त्याने आम्हास वाळवंटात तीन दिवसांचा प्रवास करून जाण्यास व तेथे आमचा देव “याव्हे” यासाठी बळी अर्पण करण्यास सांगितले आहे.’
19 “परंतु मला माहीत आहे कि मिसरचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. केवळ महान सामर्थ्यच तुम्हाला जाऊ देण्यास त्याला भाग पाडील; 20 तेव्हा मग मीच माझे महान सामर्थ्य मिसराविरुद्ध वापरीन; मी त्या देशात महान चमत्कार करीन. मग ते केल्यावर तो तुम्हाला जाऊ देईल; 21 आणि मिसरचे लोक तुम्हा इस्राएल लोकांवर दया करतील असे मी करीन. तेव्हा तुम्ही निघताना मिसरचे लोक तुम्हाला पुष्कळ बक्षिसे व भेट वस्तु देतील.
22 “प्रत्येक इब्री स्त्री म्हणजे इस्राएली स्त्री आपल्या मिसरमधील शेजारणीकडून व आपल्या घरात राहाणाऱ्या मिसरच्या स्त्रीकडून भेट वस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेट वस्तू देतील; तुम्हा लोकांना सोन्याचांदीचे दागिने व उंची कपडे भेट म्हणून मिळतील. मिसरमधून निघताना त्या वस्तू तुम्ही आपल्या मुलांमुलीच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसरच्या लोकांची संपत्ती घ्याल.”
7 मी हे म्हणतो कारण दुष्टपणाची रहस्यमय शक्ति आधीपासूनच जगात काम करीत आहे. पण असा एक आहे जो दुष्टाची रहस्यमय शक्ति थोपवीत आहे. आणि जोपर्यंत ती शक्ति मार्गातून काढून बाजूला टाकली जात नाही, तोपर्यंत तो ती शक्ति थोपवून धरील 8 आणि मग दुष्ट प्रकट होईल. प्रभु येशू त्याला आपल्या मुखातील श्वासाने मारुन टाकील आणि प्रभु जेव्हा त्याच्या येण्याच्या वेळी मोठ्या वैभवाने प्रकट होईल तेव्हा तो त्याचा नाश करील.
9 दुष्टाचे येणे सैतानाच्या सामर्थ्याने होईल आणि त्याच्या येण्याबरोबर खोटे चमत्कार, चिन्हे आणि अद्भुत गोष्टी घडतील. 10 आणि जे नरकाच्या वाटेवर आहेत त्यांच्याविरुद्ध प्रत्येक प्रकारची दुष्टता फसवणूक व्हावी म्हणून तो आणील, कारण त्यांनी सत्यावर प्रेम करण्याचे नाकारले. यासाठी की त्यांचे तारण होणे शक्य व्हावे. 11 आणि या कारणासाठी देवाने त्यांना भ्रम पडेल असे केले. यासाठी की, जे खोटे आहे त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा. 12 आणि त्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर दुष्टतेत आनंद मानला, त्यांना शिक्षा मिळावी.
2006 by World Bible Translation Center