Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी गित्तीथ सुरावर [a] बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
8 परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे.
तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करुन दिला आहे.
2 मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू
येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.
3 परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो.
आणि मला आश्चर्य वाटते.
4 लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात?
तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस?
लोक [b] तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत?
तू त्यांची दखल तरी का घेतोस?
5 परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात.
तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.
6 तू लोकांना तू निर्माण केलेल्या
सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.
7 लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.
8 ते आकाशातल्या पक्ष्यांवर
आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.
9 परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.
मोशे आपल्या लोकांस मदत करतो
11 मोशे वाढत जाऊन एक तरूण माणूस झाला. तेव्हा आपल्या इब्री लोकांस फार कष्टाची कामे करावयास भाग पाडले जात आहे हे त्याने पहिले. एके दिवशी एक मिसरचा माणूस इब्री माणसास मारत असताना त्याने पाहिले. 12 तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसरच्या माणसाला जिवे मारले व वाळूत पुरुन टाकले.
13 दुसऱ्या दिवशी दोन इब्री माणसे मारामारी करत होती. मोशेने पहिले की त्यांच्यामधील एक दोषी आहे. मोशे त्याला म्हणाला, “तू आपल्या शेजाऱ्याला का मारत आहेस?”
14 त्या माणसाने उत्तर दिले, “तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? मला सांग! तू काल [a] जसे त्या मिसरच्या माणसाला जिवे मारलेस, तसे मला मारावयास पाहातोस काय?”
तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वतःशीच म्हणाला, “मी काय केले ते आता सर्वाना माहीत झाले आहे.”
15 मोशेन काय केले हे फारोला समजले तेव्हा त्याने त्याला जिवे मारावयाचे ठरवले. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ थांबला.
देवाचे गौरव
33 देवाच्या बूद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे. 34 पवित्र शास्त्र सांगते.
“प्रभूचे मन कोणाला माहीत आहे
किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” (A)
35 “प्रथम कोणी काही त्याला दिले
का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?” (B)
36 कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्या द्वारे अस्तित्वात आहेत. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन.
2006 by World Bible Translation Center