Revised Common Lectionary (Semicontinuous)
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
16 देवाने त्या देशात दुष्काळ आणला.
लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.
17 पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले.
योसेफ गुलामा सारखा विकला गेला.
18 त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले.
त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.
19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला.
परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द् झाले.
20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले.
राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुरुंगातून बाहेर काढले.
21 त्याने योसेफाला आपल्या घराचा मुख्य नेमले.
योसेफाने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
22 योसेफाने इतर प्रमुखांना सूचना दिल्या.
योसेफाने वृध्दांना शिकवले.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
एसावाचे वंशज
36 एसाव (म्हणजे “अदोम”) याची वंशावळ 2 एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे-एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हित्ती याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा 3 आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ. 4 एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते. 5 आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले.
6-8 याकोब व एसाव यांच्या कुटुंबांची एवढी वाढ झाली की कनान देश सर्वांना पुरेनासा झाला म्हणून एसाव आपला भाऊ याकोब याजपासून बाजूला निघाला; तो आपल्या बायका, मुले, मुली तसेच सर्व नोकर चाकर, गाईगुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळवलेली धनसंपत्ती व मालमत्ता हे सर्व घेऊन सेईर या डोंगराळ प्रदेशाकडे गेला.
इफिस व अखया (करिंथ) येथे अपुल्लो
24 अपुल्लो नावाचा एक यहूदी होता. तो आलेक्सांद्र येथे जन्मला होता. तो उच्च शिक्षिंत होता. तो इफिस येथे आला. त्याला पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान होते. 25 देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता. 26 नंतर तो यहूदी लोकांच्या सभास्थानात धैर्याने बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी त्याला बोलताना ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला एका बाजूला घेतले. आणि देवाच्या मार्गाविषयी अधिक अचूक रीतीने त्याला स्पष्ट करुन सांगितले.
27 अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्याला उत्तेजन दिले. आणि तेथील येशूच्या अनुयायांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे (येशूवर) विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली. 28 जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांना फार जोरदारपणे पराभूत केले. आणि पवित्र शास्त्राच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.
2006 by World Bible Translation Center