Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाची प्रार्थना.
17 परमेश्वरा, न्यायासाठी,
प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
माझी खरी प्रार्थना ऐक.
2 तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील.
तू सत्य बघू शकतोस.
3 तू माझ्या ह्रदयात खोलवर पाहिलेस.
तू रात्रभर माझ्या बरोबर होतास
तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही.
मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.
4 एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक
मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.
5 मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो.
माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.
6 देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा
तू मला ओ दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.
7 देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस.
ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.
15 मी न्यायासाठी प्रार्थना केली, म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन
आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.
इस्राएल घरी परत येईल
14 पुढील काळात, परमेश्वर याकोबाला प्रेमाची पुन्हा प्रचिती देईल. तो इस्राएली लोकांची पुन्हा निवड करील. तो त्यांना त्यांची जमीन परत देईल. यहुद्यां व्यतिरिक्त अन्य लोक त्यांना येऊन मिळतील. ते एकत्र होतील आणि त्यांचा एकच वंश याकोबाचा वंश होईल. 2 इतर राष्ट्रे इस्राएलला त्याची जमीन परत देतील, इतर राष्ट्रांतील स्त्री पुरूष इस्राएलचे गुलाम होतील. पूर्वी ह्याच लोकांनी इस्राएलच्या प्रजेला गुलाम होण्यास भाग पाडले होते. पण आता इस्राएलच त्यांचा पराभव करील व त्यांच्यावर राज्य करील.
फिलिप्पैच्या ख्रिस्ती लोकांचे पौल आभार मानतो
10 मी प्रभूमध्ये खूपच आनंदित झालो कारण शेवटी तुमची माझ्याबद्दलची काळजी जागृत झाली. अर्थात तुम्ही नेहमीच माझी काळजी घेतली. परंतु ती दाखविण्याची संधी तुम्हांला मिळाली नाही. 11 मी हे गरजेपोटी बोलतो असे नाही कारण आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे. 12 गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो. कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपूरेपणात राहण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे. 13 जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकतो.
14 तरीही माझ्या संकटकाळात तुम्ही साहाय्य केलेत हे चांगले केले. 15 तुम्हा फिलिप्पैकरांना माहीत आहे की, सुवार्ता सांगण्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी मासेदोनिया सोडले, तेव्हा तुमच्याशिवाय कोणत्याही मंडळीने माझ्याशी देवाणघेवाण केली नाही.
2006 by World Bible Translation Center