Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे मास्कील तो गुहेत असतानाची प्रार्थना.
142 मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन.
मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
2 मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन.
मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन.
3 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे
मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे.
पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.
4 मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत.
पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही.
मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.
5 म्हणून मी परमेश्वराकडे मदतीची याचना करतो.
परमेश्वरा, तूच माझी सुरक्षित जागा आहेस तूच मला जगू देऊ शकतोस.
6 परमेश्वरा, माझी प्रार्थना
ऐक मला तुझी फार गरज आहे.
जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव.
ते लोक मला फार भारी आहेत.
7 हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर,
म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन.
चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील
कारण तू माझी काळजी घेतलीस.
शोमरोन आणि इस्राएल यांना करावयाची शिक्षा
1 मीखाला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. योथाम, आहाज व हिज्कीया यांच्या काळात हे घडले. हे सर्व यहूदाचे राजे होते. मीखा मोरेशेथचा होता. मीखाने शोमरोन व यरुशलेम यांच्याविषयी पुढील दृष्टांन्त पाहिले.
2 सर्व लोकांनो ऐका!
जग आणि त्यावरील प्रत्येकाने, ऐका!
माझा प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून येईल.
तुमच्याविरुध्दचा साक्षीदार म्हणून तो येईल.
3 पाहा परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे.
पृथ्वीवरील उच्चस्थाने तुडविण्यासाठी तो येत आहे.
4 विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते,
तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील.
दऱ्या दुभंगतील आणि उंच टेकड्यावरुन
वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे वाहू लागतील.
5 का? ह्याला कारण याकोबचे पाप,
तसेच इस्राएल राष्ट्राची दुष्कर्मे आहेत.
शोमरोन, पापाचे कारण
याकोबने पाप करण्याचे कारण काय?
त्याला कारणीभूत आहे शोमरोन.
यहूदात उच्चस्थान कोठे आहे?
यरुशलेममध्ये.
देवाला संतोषविणारे जीवन
4 बंधूंनो, मला आता तुम्हाला काही इतर गोष्टीविषयी सांगायचे आहे; प्रभु येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही तुम्हाला विनंति करतो व बोध करतो की, देवाला कसे संतोषवायचे याचे शिक्षण तुम्हांला आमच्याकडून जसे मिळाले, तसे तुम्ही खरोखरच जगत आहात, आणि तुम्ही ते जास्तीत जास्त करा. 2 कारण तुम्हांला हे माहीत आहे की, प्रभु येशूच्या अधिकाराने कोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांस दिल्या होत्या. 3 आणि हेच देवाला पाहिजे आहे. तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे. तुम्ही जारकर्मपासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे. 4 त्याची अशी इच्छा आहे की, तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा मिळविण्यास शिकावे. [a] 5 आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही त्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे. 6 त्याची हीसुद्धा इच्छा आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या बंधूचा याबाबतीत गैरफायदा घेऊ नये. कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की, प्रभु या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे. 7 कारण देवाने आम्हाला अमंगळ जीवनासाठी नव्हे, तर शुद्ध जीवनासाठी बोलाविले होते. 8 म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो, तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो.
2006 by World Bible Translation Center