Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 119:105-112

नून

105 परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे
    माझा मार्ग उजळतात.
106 तुझे नियम चांगले आहेत.
    मी ते पाळायचे वचन देतो आणि मी दिलेले वचन पाळीन.
107 परमेश्वरा, मी खूप काळ दुख: भोगले आहे.
    कृपा करुन आज्ञा दे आणि मला पुन्हा जगू दे.
108 परमेश्वरा, माझ्या स्तुतीचा स्वीकार कर
    आणि मला तुझे नियम शिकव.
109 माझे आयुष्य नेहमीच धोक्यात असते
    पण मी तुझी शिकवण विसरलो नाही.
110 दुष्ट लोक मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
    पण मी तुझ्या आज्ञा मोडल्या नाहीत.
111 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन
    त्यामुळे मला खूप आनंद होतो.
112 मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक
    तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.

अनुवाद 32:1-10

32 “हे आकाशा, ऐक मी काय म्हणतो ते.
    वसुंधरे ऐक शब्द माझ्या मुखातले.
पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव होईल.
    तो बोध असेल जमिनीवरुन खळाळणाऱ्या पाण्यासारखा.
हिरवळीवर झिमझिमणाऱ्या पावसासारखा.
    झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरींसारखा.
घोषणा [a] करीन मी परमेश्वराच्या नावाची.
    तुम्हीही परमेश्वराची महती गा!

“तो आहे दुर्ग
    आणि त्याची कृती परिपूर्ण!
    कारण चोखाळतो तो उचित मार्ग!
देवच खरा आणि विश्वासू
    न्यायी आणि सरळ.
तुम्ही त्याची मुले नाहीत.
    तुमची पापे त्याला मळीन करतील.
    तुम्ही लबाड आहात.
मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो,
    परमेश्वराशी असे वागता?
तो तर तुमचा पिता,
    निर्माता कर्ता आणि धर्ता तोच.

“आठवा पूर्वी काय घडले
    ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले
ते ध्यानात आणा आपल्या बापाला विचारा, तो सांगेल.
    महाजनांना विचारा, ते सांगतील.
परात्पर देवाने लोकांची विभागणी केली, राष्ट्रा राष्ट्रांमध्ये.
    प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला.
देवाने इस्राएल सीमा आखल्या.
    देवदूतांइतकी राष्ट्रे त्याने बनविली.
परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होय.
    याकोब परमेश्वराचा आहे.

10 “याकोब (इस्राएल) त्याला सापडला वाळवंटात
    भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात.
परमेश्वराने त्याला आपल्या कवेत घेतले
    आणि डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळले.

रोमकरांस 15:14-21

पौल त्याच्या कामाविषयी बोलतो

14 माझ्या बंधूंनो, मी तुम्हांविषयी निश्चित आहे की, तुम्ही चांगुलपणाने, ज्ञानाने पूर्ण भरलेले व एकमेकांस बोध करावयास समर्थ आहात. 15 परंतु तुम्हांला धीटपणे काही गोष्टींची आठवण देण्यासाठी लिहिले आहे. मी हे देवाने दिलेल्या देणगीमुळे असे केले. 16 ते हे की, विदेशी लोकांची सेवा करण्यासाठी मी ख्रिस्त येशूचा सेवक व्हावे व देवाच्या सुवार्तेचे याजकपण करावे, अशासाठी परराष्ट्रीय हे देवाला मान्य, पवित्र आत्म्याचे समर्पित असे व्हावे.

17 तर मग मी जो आता ख्रिस्त येशूमध्ये आहे तो देवाशी संबंधित असलेल्या गोष्टींत अभिमान बाळगतो. 18 कारण माझ्या शब्दांनी आणि कृत्यांनी विदेशी लोकांनी आज्ञापालन करावे अशा ज्या गोष्टी ख्रिस्ताने माझ्या करवी घडविल्या नाहीत, त्या सांगणयाचे धैर्य मी करणार नाही. 19 अदभुते, चमत्काराच्या व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी यरुशलेमेपासून इल्लूरिकमाच्या सभोवती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचे पूर्ण केले आहे. 20 जेथे ख्रिस्ताचे नाव सांगितले जात नाही अशा ठिकाणी सुवार्ता सांगण्याची माझी आकांक्षा आहे. यासाठी की मी दुसऱ्याच्या पायावर बांधु नये. 21 परंतु असे लिहिले आहे,

“ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते ऐकतील
    आणि ऐकले नाही ते समजतील.” (A)

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center