); Genesis 22:15-18 (God’s blessing promised again); 1 Thessalonians 4:9-12 (How to love one another) (Marathi Bible: Easy-to-Read Version)
Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र
47 लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा.
तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा.
2 सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे.
तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.
3 त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली.
त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.
4 देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली.
त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.
5 परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात
आपल्या सिंहासनाकडे जातो.
6 देवाचे गुणगान करा.
आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
7 देव सर्व जगाचा राजा आहे.
त्याच्या स्तुतिपर गाणे गा.
8 देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो.
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
9 देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात.
सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत.
देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे. [a]
15 नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली. 16 तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी तुझ्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचा बळी द्यावयांस मागे पुढे न पाहता तयार झालास म्हणून मी परमेश्वर स्वतःची शपथ घेऊन तुला वचन देती की 17 मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझी वाढ करीन; मी तुला असंख्य वंशज देईन; तुझी संतती आकाशातील ताऱ्याइतकी, समुद्रकिनाऱ्यावरील वाळू इतकी होईल असे मी करीन; आणि तुझी संतती आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करुन त्यांना जिंकेल. 18 पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र तुझ्या वंशजाद्वारे आशीर्वाद पावेल; तू माझ्या सर्व आज्ञा पाळल्यास म्हणून मी हे करीन.”
9 आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे. 10 आणि हे खरे पाहता, जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदोनियाभर प्रीती करीत आहात. परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांस कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा.
11 आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची, आणि आपल्या स्वतःच्या हातांनी काम करण्याची इच्छा करा. 12 यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की, तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
2006 by World Bible Translation Center