Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
13 परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस?
तू मला कायमचाच विसरणार आहेस का?
किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस? [a]
2 तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू!
माझ्या ह्रदयातले हे दुख: मी किती काळ सोसू?
माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?
3 परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ.
माझ्या प्रश्नांचे उत्तर दे.
मला उत्तर कळू दे.
नाही तर मी मरुन जाईन.
4 जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला”
माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल.
5 परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली.
तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
6 मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो
कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.
परमेश्वराची स्तुती
18 परमेश्वरा तुझ्यासारखा दुसरा देव नाही.
पापी लोकांनाही तू क्षमा करतोस.
तुझ्या वाचलेल्या लोकांनाही तू क्षमा करतोस.
परमेश्वर अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणारा नाही.
का? कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.
19 तो परत येईल व आमचे सांत्वन करील.
तो आमच्या पापांचा चुराडा करील आणि आमची पापे खोल समुद्रात फेकून देईल.
20 हे देवा, याकोबशी प्रामाणिक राहा.
अब्रहामबद्दल तुला असलेले खरे प्रेम दाखव.
फार पूर्वी तू आमच्या पूर्वजांना दिलेले वचन पाळ.
2 ऐका! मी पौल, तुम्हांला सांगत आहे की, जर सुंता करुन घेऊन तुम्ही नियमशास्त्राकडे वळला तर ख्रिस्त तुमच्यासाठी कोणत्याही किंमतीचा नाही. 3 सुंता करुन घेणाऱ्या प्रत्येक माणसाल मी पुन्हा एकदा जाहीर करतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे, 4 तुमच्यापैकी जे नियमशास्त्राने नीतिमान ठरु पाहतात, त्यांचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध तुटला आहे. देवाच्या दयेच्या बाहेर आता तुम्ही आहात. 5 आम्ही तर आत्म्याने विश्वासाकडून न्यायीपणाच्या आशेची वाट पाहात आहोत. 6 कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांना काही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.
2006 by World Bible Translation Center