Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाची प्रार्थना
86 मी गरीब, असहाय्य माणूस आहे.
परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
2 परमेश्वरा मी तुझा भक्त आहे.
कृपा करुन माझे रक्षण कर.
मी तुझा सेवक आहे.
तू माझा देव आहेस.
माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला वाचव.
3 माझ्या प्रभु, माझ्यावर दया कर
मी दिवसभर तुझी प्रार्थना करीत आहे.
4 प्रभु, माझे जीवन तुझ्या हाती दिले आहे.
मला सुखी कर, मी तुझा सेवक आहे.
5 प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस.
तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.
6 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
दयेसाठी माझी प्रार्थना ऐक.
7 परमेश्वरा, मी तुझी संकट काळात प्रार्थना करीत आहे.
तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे.
8 देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही.
तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही.
9 प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत.
ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.
10 देवा, तू महान आहेस.
तू अद्भुत गोष्टी करतोस.
तू आणि फक्त तूच देव आहेस.
3 त्याला सांग ‘प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो:
“‘मिसरचा राजा, फारो, मी तुझ्याविरुद्ध आहे.
तू नाईल नदीकिनारी पडून राहणारा प्रचंड समुद्रातला राक्षस आहेस.
तू म्हणतोस, “ही माझी नदी आहे!
मी ही नदी निर्मिली”
4-5 “‘पण मी तुझ्या जबड्यात गळ अडकवीन.
नाईल नदीतील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील.
मी तुला आणि त्या माशांना नदीतून ओढून बाहेर काढीन
व जमिनीवर टाकीन.
तेथून तुम्हाला कोणी उचलणार नाही
वा पुरणार नाही.
मी तुम्हाला पक्षी व हिंस्र पशू यांच्या स्वाधीन करीन.
तुम्ही त्यांचे भक्ष्य व्हाल.
6 मगच मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना
कळून येईल की मीच परमेश्वर आहे.
“‘मी ह्या गोष्टी का करीन.?
कारण इस्राएलचे लोक मिसरवर अवलंबून होते.
पण मिसर म्हणजे गवताचे कमकुवत पाते होता.
7 इस्राएलचे लोक मिसरवर विसंबले.
पण मिसरने फक्त त्यांचे हात आणि खांदे विंधले.
ते तुझ्या आधारावर राहिले.
पण तू त्यांची पाठ मोडून पिरगळलीस.’”
53 येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी फार विरोध करु लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारु लागले. 54 तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सावजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले.
परुश्यांसारखे होऊ नका
12 आणि म्हणून हजारो लोकांचा समुदाय जमला होता. इतके लोक जमले होते की, ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला: “परुश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे जे ढोंग आहे त्याविषयी जपा. 2 उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही. 3 यास्तव जे काही तुम्ही अंधारत बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि जे काही तुम्ही कोणाच्या कानात एकांतात सांगाल ते घराच्या छपरावरुन घोषित केले जाईल.”
2006 by World Bible Translation Center