Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी गित्तीथ सुरावर [a] बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
8 परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे.
तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करुन दिला आहे.
2 मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू
येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.
3 परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो.
आणि मला आश्चर्य वाटते.
4 लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात?
तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस?
लोक [b] तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत?
तू त्यांची दखल तरी का घेतोस?
5 परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात.
तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.
6 तू लोकांना तू निर्माण केलेल्या
सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.
7 लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.
8 ते आकाशातल्या पक्ष्यांवर
आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.
9 परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.
12 “ईयोब, तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला
आणि दिवसाला सुरु व्हायला सांगितलेस का?
13 ईयोब, तू कधी तरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून
दुष्ट लोकांना त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का?
14 पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात.
दिवसाच्या प्रकाशात ह्या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात.
ओल्या मातीवर उमटलेल्या ठशाप्रमाणे त्या जागा दिसतात.
15 दुष्ट लोकांना दिवसाचा प्रकाश आवडत नाही.
प्रकाश दैदीप्यमान असतो तेव्हा त्यांना त्यांच्या वाईट गोष्टी करता येत नाहीत.
16 “ईयोब, सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का?
समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?
17 ईयोब, मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का?
काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का?
18 ईयोब, ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का?
तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.
19 “ईयोब, प्रकाश कुठून येतो?
काळोख कुठून येतो?
20 ईयोब, तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का?
तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?
21 ईयोब, तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील.
तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना? [a]
12 आणि या कारणांमुळे मीसुद्धा दु:ख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.
13 माझ्याकडून ऐकून घेतलेल्या सत्य शिक्षणाचा गाभा दृढ धर. आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडणाऱ्या विश्वासाने व प्रीतीने ते कर. 14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
2006 by World Bible Translation Center