Revised Common Lectionary (Semicontinuous)
114 इस्राएलने मिसर देश सोडला.
याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
2 यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले.
3 लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला.
यार्देन नदी वळली आणि पळाली.
4 पर्वत मेंढ्यांसारखा नाचला.
टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.
5 लाल समुद्रा, तू का पळून गेलास?
यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?
6 पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात?
आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?
7 पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या
देवासमोर थरथर कापली.
8 देवानेच खडकातून पाणी वहायला लावले.
देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.
योनाने देवाची प्रार्थना
2 माशाच्या पोटात असतानाच योनाने त्याच्या परमेश्वर देवाची प्रार्थना केली तो म्हणाला,
2 “मी फार मोठ्या संकटात सापडलो होतो.
मी मदतीसाठी परमेश्वराला हाक मारली,
आणि त्याने मला ओ दिली.
जेव्हा मी खोल थडग्यात होतो तेव्हा,
हे परमेश्वर, मी तुझी आळवणी केली
आणि तू माझा आवाज ऐकलास.
3 “तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड
लाटा माझ्याभोवती पाणी होते.
4 मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’
तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.
5 “समुद्राच्या पाण्याने मला वेढले
पाण्याने माझे तोंड बुडाले
आणि मी श्वासोच्छवास करु शकत नव्हतो
मी खाली खूप खोल समुद्रात गेलो
माझ्या डोक्याभोवती समुद्रशेवाळ गुंडाळले गेले.
6 मी समुद्रतळाशी, पर्वताच्या पायथ्याशी होतो
मला कायमचे असे बंदिवासात राहावे
लागणार असेच मला वाटले पण माझ्या परमेश्वर देवाने
मला थडग्यातून बाहेर काढले परमेश्वरा,
तू मला नवजीवन दिलेस!
7 “माझ्या आत्म्याने सर्व आशा सोडून दिल्या होत्या
पण मग मला परमेश्वराचे स्मरण झाले परमेश्वरा,
मी तुझी प्रार्थना केली
आणि तुझ्या पवित्र मंदिरात ती तू ऐकलीस.
8 “काहीजण निरुपयोगी मूर्तीची पूजा करतात
पण ते पूतळे त्यांना कधीच मदत करीत नाहीत.
9 फक्त परमेश्वरा मुळेच तारण मिळते,
हे परमेश्वरा, मी तुला यज्ञ अर्पण करीन
मी तुझे स्तवन करीन आणि कृतज्ञता व्यक्त करीन
मी तुला नवस बोलेन आणि तो फेडेन.”
10 मग परमेश्वर माशाशी बोलला आणि माशाने उलटी करून योनालाकोरड्या भूमीवर टाकले.
यहूदी लोक येशूकडे पुरावा मागतात(A)
38 काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”
39 येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी प्रामाणीक नाहीत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हांला मिळणार नाही. 40 कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. 41 जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील, तुमच्याविरूद्ध साक्ष देतील आणि तुम्हांला दोष देतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक येथे आहे.
42 “न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणी [a] या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली. आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.
2006 by World Bible Translation Center