Revised Common Lectionary (Semicontinuous)
118 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा.
त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
2 इस्राएल, म्हण
“त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा.
मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि
केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता
तो कोनाशिला झाला.
23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे
आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे.
आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
25 लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराने आपला उध्दार केला. [a]
26 परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा.”
याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.
27 परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो.
बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.”
28 परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो.
तुझी स्तुती करतो.
29 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.
येशू यरुशलेममध्ये राजासारखा प्रवेश करतो(A)
21 येशू व त्याचे शिष्य यरुशलेमजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर बेथफगे या जागी थांबले. येशूने त्याच्या दोन शिष्यांना 2 असे सांगून पाठविले की, “तुमच्या समोर असलेल्या गावात जा. तुम्ही गावात शिराल तेव्हा एक गाढवी बांधून ठेवलेली व तिच्या जवळ एक शिंगरु असलेले तुम्हांला आढळेल. ती दोन्ही गाढवे सोडून माझ्याकडे घेऊन या. 3 जर कोणी तुम्हांला विचारले की, ही गाढवे कशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की, ‘येशूला यांची गरज आहे. तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.’”
4 हे यासाठी घडले की संदेष्ट्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे:
5 “सोयोनेच्या कन्येला सांग, पाहा,
‘तुझा राजा तुझ्याकडे येत आहे!
तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे,
होय शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर.’” (B)
6 त्याचे शिष्य गेले आणि जसे येशूने सांगितले होते तसे त्यांनी केले. 7 शिष्यांनी गाढवी व शिंगरू येशूकडे आणले. त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. 8 पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे येशूसाठी वाटेवर अंथरले. दुसऱ्या काही लोकांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. 9 काही लोक येशूच्या पुढे चालू लागले. काही लोक येशूच्या मागून चालू लागले. ते लोक मोठ्याने जयघोष करु लागले,
स्वर्गीय देवाला होसान्ना!”
10 जेव्हा येशूने यरूशलेमेमध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर ढवळून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?”
11 जमाव उत्तर देत होता, “हा येशू संदेष्टा आहे, तो गालील प्रांतातील नासरेथचा आहे.”
देवाचा सेवक खरोखरच देवावर अवलंबून आहे
4 परमेश्वर, माझ्या प्रभूने, मला शिकविण्याची क्षमता दिली. तेव्हा आता या दु:खी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवितो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो. 5 परमेश्वर, माझा प्रभू, मला शिकायला मदत करतो आणि मीही त्याच्याविरूध्द् कधी गेलो नाही. मी त्याला अनुसरण्याचे सोडणार नाही. 6 मी त्या लोकांना मला मारू देईन. मी माझ्या दाढीचे केस त्यांना ओढू देईन. ते जेव्हा माझी निंदा करतील आणि माझ्या तोंडावर थुकंतील तेव्हा मी माझे तोंड लपविणार नाही. 7 परमेश्वर माझा प्रभु मला मदत करील. म्हणूनच लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही. मी भक्कम होईन. माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे.
8 परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी निष्पाप आहे हे तो जाणतो, म्हणून मी अपराधी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मी चुकत आहे असे कोणाला सिध्द् करावेसे वाटत असेल तर त्याने माझ्याकडे यावे. आपण परीक्षा पाहू. 9 पण लक्षात ठेवा, माझा प्रभु मला मदत करतो. म्हणून कोणीही मला पापी ठरवू शकणार नाही. ते सर्व लोक जीर्ण जुन्या वस्त्राप्रमाणे होतील. कसर त्यांना खाईल.
9 परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत.
म्हणून माझ्यावर दया कर.
मी इतका दुखी: कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहेत,माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.
10 माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे
माझी वर्षे सुस्कारा टाकण्यात निघून जाणार आहेत.
माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत.
माझी शक्ती मला सोडून जात आहे.
11 माझे शत्रू माझा तिरस्कार करतात
आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात
माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात
तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
12 मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे
लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.
13 लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो.
ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
14 परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तूच माझा देव आहेस.
15 माझे जीवन तुझ्या हाती आहे.
मला माझ्या शत्रूंपासून वाचव.
काही लोक माझा पाठलाग करीत आहेत
त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर.
माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
ख्रिस्ताकडून निस्वार्थी होण्याचे शिका
5 ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या.
6 जरी तो देवाच्या स्वरुपाचा होता,
तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही.
7 उलट त्याने सर्व काही सोडून दोल,
आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले
व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला.
8 त्याने स्वतःला नम्र केले.
आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला.
होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला.
9 म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले,
व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले.
10 यासाठी की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहेत
त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत.
11 व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की,
“येशू खिस्त हा देव पिता आहे.”
यहूदा येशूचा शत्रु होतो(A)
14 बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. 15 यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली. 16 तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.
येशू वल्हांडण सणाचे भोजन खातो(B)
17 बेखमीर भाकारीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “वल्हांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत. वल्हांडण सणाचे जेवण कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”
18 येशू म्हणाला, “ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, ‘गुरूजी म्हणतातः माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा करणार आहे.’” 19 येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले.
20 संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला. 21 जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो: तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”
22 ते खूप दु:खी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येक जण त्याला विचारु लागला, “तो मी नाही ना प्रभु?”
23 मग येशूने उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात हात घालतो तोच माझा विश्वासघात करील. 24 जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा मनुष्याच्या पुत्राचा शेवट होईल, पण जो त्याचा विश्वासघात करील त्याच्याविषयी मला दु:ख वाटते! तो जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.”
25 मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “तो मी आहे का, गुरूजी?”
येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे (म्हणजे होय तो तूच आहेस.”)
प्रभु भोजन(C)
26 ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले. आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “हे घ्या आणी खा. हे माझे शरीर आहे.”
27 नंतर येशूने द्राक्षारसाचा प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातील प्यावे. कारण हे माझे रक्त आहे, 28 हे नवा करार प्रस्थापित करते. ते पुष्कळ लोकांकरिता ओतले जात आहे. यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी. 29 मी तुम्हांला सांगतो: माझ्या पित्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षारस पिणार नाही.”
30 मग त्यांनी वल्हांडणाचे गीत गाईले. नंतर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.
येशू म्हणतो त्याचे शिष्य त्याला सोडून जातील(D)
31 येशूने सांगितले, “आज रात्रीच तुमच्या मनात माझ्याविषयी शंकाकुशंका येतील आणि माझ्यावरील तुमचा विश्वास उडेल. पवित्र शास्त्रात असे लिहेले आहे:
‘मी मेंढपाळाचा वध करीन,
कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’ (E)
32 पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन.”
33 उत्तर देताना पेत्र म्हणाला, “इतर सर्वांचा जरी तुमच्याविषयी गोंधळ झाला तरी माझा कधीही होणार नाही!”
34 येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो: तू मला ओळखत नाहीस असे आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वा तू तीन वेळा म्हणशील.”
35 पेत्र म्हणाला, “तुम्हांला ओळखीत नाही असे मी कधीही म्हणणार नाही. मग मला तुमच्याबरोबर मरावे लागले तरी हरकत नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा असेच म्हणाले.
येशू एकटाच प्रार्थना करतो(F)
36 नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.” 37 येशूने पेत्र आणि दोन जब्दीचे पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू मनातून फार दु:खी व व्याकूळ होऊ लागला. 38 येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझे दु:ख मला इतके झाले आहे की, ते मला मारून टाकील. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
39 तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दु:खाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 40 मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांना माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? 41 आपण परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा. आणि प्रार्थना करीत राहा. यासाठी की तुम्ही मोहात पडू नये. जे योग्य आहे ते तुमचा आत्मा करू इच्छितो, पण तुमचे शरीर अशक्त आहे.”
42 नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दु:खाचा हा प्याला पिणे मला अटळच आहे तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”
43 नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्याला आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. 44 नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि त्याने प्रार्थना केली. तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा हेच शब्द उच्चारले.
45 यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विश्रांतिच घेत आहात का? ऐका! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाण्याची वेळ आली आहे. 46 उठा! आपल्याला निघालेच पाहिजे. हा पाहा, मला धरून शत्रूंच्या हाती देणारा येत आहे.”
येशूला अटक होते(G)
47 येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक, लोकांचे वडीलजन यांनी त्यांना पाठविले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते. 48 येशूला विश्वासघाताने धरून लोकांच्या हाती देणारा यहूदा याने हाच येशू आहे याविषयी एक खूण सांगितली होती. यहूदा म्हणाला, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच येशू होय; त्याला तुम्ही धरा,” 49 मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
50 येशू त्याला म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर!”
मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्याला धरले. 51 हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने प्रमुख याजकाच्या नोकराचा कान कापला.
52 येशू त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात. 53 मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या बारापेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हांला कळत नाही काय? 54 परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिले असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”
55 यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, “जसा मी कोणी गुन्हेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज मंदिरात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही. 56 परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
यहूदी पूढाऱ्यांपुढे येशू(H)
57 त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते. 58 पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे मुख्य याजकाच्या आवारापर्यंत गेला आणि काय होते ते पाहण्यासाठी नोकरांसोबत बसला.
59 येशूला मरणदंड द्यावा म्हणून मूख्य याजक आणि सर्व यहूदी सभा त्याच्याविरूद्ध काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले. 60 पुष्कळ लोक पुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली, 61 “हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे मंदिर मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.”
62 तेव्हा प्रमुख याजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरूद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?”
63 पण येशूने काहीच उत्तर दिले नाही.
परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?”
64 येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हांला सांगतो: ह्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही ढगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल.”
65 जेव्हा प्रमुख याजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध दुर्भाषण केले आहे! आम्हांला आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. ह्याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले! 66 तुम्हांला काय वाटते?”
यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे.”
67 तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्याला मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. 68 ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?”
आपण येशूला ओळखतो हे सांगायला पेत्र घाबरतो(I)
69 यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. प्रमुख याजकाच्या दासीपैंकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालीलच्या येशूबरोबर होतास.”
70 पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही!”
71 मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.”
72 पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारतांना, म्हणाला, “मी त्याला ओळखत नाही!”
73 काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्याला म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हांला माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हांला स्पष्ट दिसून येते.”
74 मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवाला. 75 नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दु:खतिशयाने रडला.
येशूला राज्यपाल पिलाताकडे नेतात(J)
27 जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला. आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. 2 त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
यहूदाची आत्महत्या(K)
3 त्याच वेळेला, यहूदा, जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता, त्याने पाहिले की, त्यांनी येशूला जिवे मारण्याचे ठरविले आहे, तेव्हा त्याने जे केले होते त्याचे त्याला वाईट वाटले. म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक व वडिलांना परत दिली. 4 तो म्हणाला, “मी पाप केले आहे, मी एका निष्पाप मनुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले.”
यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हांला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”
5 तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.
6 मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे मंदिराच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमाविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.”
7 म्हणून त्यांनी त्या पैशांनी कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेण्याचे ठरविले. यरूशलेमला भेट देण्यासाठी येणाऱ्या माणसांना मरण आले तर त्यांना पुरण्यासाठी त्या शेताचा उपयोग करता येईल. 8 त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात. 9 अशा रीतीने यिर्मया संदेष्ट्याचे बोल खरे ठरले. ते असे:
“त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली हे पैसे यहूदी लोकांनी त्याच्या (येशूच्या) जिवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले. 10 मला प्रभु परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेतले.” [a]
राज्यपाल पिलात येशूला प्रश्न विचारतो(L)
11 राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
12 पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
13 म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”
14 परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही. आणि पिलात आश्चर्यचकित झाला.
येशूला मुक्त करण्याचा पिलाताचा अयशस्वी प्रयत्न(M)
15 वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती. 16 त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बरब्बा [b] होते.
17 म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? कुविख्यात बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?” 18 लोकांनी इर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले.
19 न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दु:ख सहन करावे लागले आहे.”
20 पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळविले.
21 पिलात म्हणाला, “माझ्यासमोर बराब्बा व येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?”
लोकांनी उत्तर दिले. “बरब्बा.”
22 पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?”
सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
23 पिलाताने विचारले, “का? मी त्याला जिवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केला आहे?”
परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
24 लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”
25 सर्व लोक ओरडून म्हणू लागले, “याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही व आमची मुले भोगायला तयार आहोत.”
26 मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.
पिलाताचे शिपाई येशूची थट्टा करतात(N)
27 नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यापालाच्या वाड्यात घेऊन आले. ते सर्व घोळक्याने येशूभोवती जमले. 28 त्यांनी येशूचे कपडे काढले व त्याला लाल किरमिजी झगा घातला. 29 काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले. ते म्हणू लागले, “यहूद्याचा राजा चिरायू होवो!” 30 नंतर शिपाई येशूवर थुंकले. त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले. 31 येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले. मग ते त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी घेऊन गेले.
येशूला वधस्तंभावर खिळून मारतात(O)
32 शिपाई येशूला शहराबाहेर घेऊन चालले होते. तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूचा वधस्तंभ वाहायला लावले. तो कुरेने या गावचा असून त्याचे नाव शिमोन होते. 33 जेव्हा ते गुलगुथा (“म्हणजे कवटीची जागा”) नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले. 34 तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
35 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. 36 शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले. 37 येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू-यहूद्यांचा राजा.”
38 येशूच्या दोन्ही बाजूंना दोन लुटारु खिळण्यात आले होते. 39 जवळून जाणारे लोक येशूची निंदा करु लागले. ते डोकी हलवू लागले. 40 आणि म्हणू लागले, “तू म्हणालास की, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभे करीन.’ आता स्वतःचा बचाव कर, जर तू खरोखरच देवाचा पूत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.”
41 तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, वडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले. 42 ते म्हणू लागले, “याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वतःचा बचाव करू शकत नाही. लोक म्हणतात की, हा इस्राएल (यहूदी) लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल, तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू! 43 याचा देवावर विश्वास आहे, जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला वाचवावे. तो स्वतः असे म्हणत असे, ‘मी देवाचा पुत्र आहे.’”
44 तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर देखील येशूविषयी वाईट गोष्टी बोलू लागले.
येशूचे मरण(P)
45 दुपारनंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला. 46 सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकत्नी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
47 जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे एकले. ते म्हणू लागले, “तो एलीयाला हाक मारीत आहे!”
48 एक जण लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला. 49 परंतु दुसरे काही लोक म्हणु लागले, “थांबा, एलीया येऊन त्याला वाचवितो काय, हे आम्हांला पाहायचे आहे.”
50 पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला.
51 त्याचवेळी, येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले. 52 कबरी उघडल्या, आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते, ते उठविले गेले. 53 ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यरूशलेमामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले.
54 सेनाधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता.”
55 तेथे बऱ्याच स्त्रिया वधस्तंपासून काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करण्यासाठी या स्त्रिया गालीलाहून त्याच्यामागून आल्या होत्या. 56 मरीया मग्दालिया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई तेथे होत्या.
येशूला पुरतात(Q)
57 संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमथाईचा होता व येशूचा अनुयायी होता. 58 योसेफ पिलाताकडे गेला. आणि त्याने त्याचे शरीर मागितले. पिलाताने येशूचे शरीर योसेफाला देण्याचा हुकूम शिपायांना केला. 59 नंतर योसेफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन तागाच्या कपड्यात ते गुंडाळले. 60 मग योसेफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरेच्या तोंडवर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली. या गोष्टी केल्यानंतर योसेफ निघून गेला. 61 मरीया मग्दालिया, आणि मरीया नावाची दुसरी स्त्री कबरेभोवती बसल्या होत्या.
येशूच्या कबरेवर पहारा
62 त्या दिवसाला तयारीचा दिवस [c] म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परुशी पिलाताकडे गेले. 63 ते म्हणाले, “महाराज, तो लबाड मनुष्य (येशू) जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी मरण पावल्यानंतर तीन दिवसांनी परत उठेन.’ 64 म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याचा हुकुम द्या. (कारण) त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांना सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”
65 पिलात म्हणाला, “तुम्ही शिपाई घेऊ शकता. जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.” 66 म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला. आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.
राज्यपाल पिलात येशूला प्रश्न विचारतो(A)
11 राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
12 पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
13 म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”
14 परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही. आणि पिलात आश्चर्यचकित झाला.
येशूला मुक्त करण्याचा पिलाताचा अयशस्वी प्रयत्न(B)
15 वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती. 16 त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बरब्बा [a] होते.
17 म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? कुविख्यात बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?” 18 लोकांनी इर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले.
19 न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दु:ख सहन करावे लागले आहे.”
20 पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळविले.
21 पिलात म्हणाला, “माझ्यासमोर बराब्बा व येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?”
लोकांनी उत्तर दिले. “बरब्बा.”
22 पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?”
सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
23 पिलाताने विचारले, “का? मी त्याला जिवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केला आहे?”
परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
24 लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”
25 सर्व लोक ओरडून म्हणू लागले, “याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही व आमची मुले भोगायला तयार आहोत.”
26 मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.
पिलाताचे शिपाई येशूची थट्टा करतात(C)
27 नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यापालाच्या वाड्यात घेऊन आले. ते सर्व घोळक्याने येशूभोवती जमले. 28 त्यांनी येशूचे कपडे काढले व त्याला लाल किरमिजी झगा घातला. 29 काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले. ते म्हणू लागले, “यहूद्याचा राजा चिरायू होवो!” 30 नंतर शिपाई येशूवर थुंकले. त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले. 31 येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले. मग ते त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी घेऊन गेले.
येशूला वधस्तंभावर खिळून मारतात(D)
32 शिपाई येशूला शहराबाहेर घेऊन चालले होते. तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूचा वधस्तंभ वाहायला लावले. तो कुरेने या गावचा असून त्याचे नाव शिमोन होते. 33 जेव्हा ते गुलगुथा (“म्हणजे कवटीची जागा”) नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले. 34 तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
35 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. 36 शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले. 37 येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू-यहूद्यांचा राजा.”
38 येशूच्या दोन्ही बाजूंना दोन लुटारु खिळण्यात आले होते. 39 जवळून जाणारे लोक येशूची निंदा करु लागले. ते डोकी हलवू लागले. 40 आणि म्हणू लागले, “तू म्हणालास की, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभे करीन.’ आता स्वतःचा बचाव कर, जर तू खरोखरच देवाचा पूत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.”
41 तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, वडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले. 42 ते म्हणू लागले, “याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वतःचा बचाव करू शकत नाही. लोक म्हणतात की, हा इस्राएल (यहूदी) लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल, तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू! 43 याचा देवावर विश्वास आहे, जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला वाचवावे. तो स्वतः असे म्हणत असे, ‘मी देवाचा पुत्र आहे.’”
44 तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर देखील येशूविषयी वाईट गोष्टी बोलू लागले.
येशूचे मरण(E)
45 दुपारनंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला. 46 सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकत्नी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
47 जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे एकले. ते म्हणू लागले, “तो एलीयाला हाक मारीत आहे!”
48 एक जण लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला. 49 परंतु दुसरे काही लोक म्हणु लागले, “थांबा, एलीया येऊन त्याला वाचवितो काय, हे आम्हांला पाहायचे आहे.”
50 पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला.
51 त्याचवेळी, येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले. 52 कबरी उघडल्या, आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते, ते उठविले गेले. 53 ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यरूशलेमामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले.
54 सेनाधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता.”
2006 by World Bible Translation Center