Revised Common Lectionary (Semicontinuous)
9 परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत.
म्हणून माझ्यावर दया कर.
मी इतका दुखी: कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहेत,माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.
10 माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे
माझी वर्षे सुस्कारा टाकण्यात निघून जाणार आहेत.
माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत.
माझी शक्ती मला सोडून जात आहे.
11 माझे शत्रू माझा तिरस्कार करतात
आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात
माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात
तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
12 मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे
लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.
13 लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो.
ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
14 परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तूच माझा देव आहेस.
15 माझे जीवन तुझ्या हाती आहे.
मला माझ्या शत्रूंपासून वाचव.
काही लोक माझा पाठलाग करीत आहेत
त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर.
माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
55 परमेश्रा मी तुझ्या नांवाने हाक मारली परमेश्वरा,
खड्ड्यातून तुझ्या नांवाचा धावा केला.
56 तू माझा आवाज ऐकलास.
तू तुझ्या कानावर हात ठेवले नाहीस.
माझी सुटका करण्याचे तू नाकारले नाहीस.
57 मी धावा करताच तू आलास.
तू मला म्हणालास, “घाबरू नकोस.”
58 परमेश्वरा, तू माझे रक्षण केलेस
तू मला पुनर्जीवन दिलेस.
59 परमेश्वरा, तू माझा त्रास पाहिला आहेस.
आता मला न्याय दे.
60 माझ्या शत्रूंनी मला कसे दुखविले
आणि माझ्याविरुद्ध कसे कट रचले ते तू पाहिले आहेस.
61 त्या शत्रूंनी केलेला माझा अपमान आणि माझ्याविरुध्द आखलेले बेत तू.
परमेश्वरा, ऐकले आहेस.
62 सर्व काळ, शंत्रूचे बोलणे व
विचार माझ्या विरुध्द आहेत.
63 परमेश्वरा, बसता उठता
ते माझी कशी खिल्ली उडवितातत ते पाहा.
64 परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे.
त्यांच्या कार्मांची परत फेड कर.
65 त्यांचे मन कठोर कर.
नंतर त्यांना शाप दे.
66 क्रोधाने त्यांचा पाठलाग कर व त्यांचा नाश कर.
ह्या आकाशाखाली, परमेश्वरा, त्यांचा नाश कर.
येशू पुन्हा आपल्या मरणाविषयी सांगतो(A)
32 ते वर यरूशलेमेच्या रस्त्यावरून जात असता येशू त्यांच्यापुढे चालत होता. त्याचे शिष्य विस्मित झाले होते आणि त्याच्यामागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या बारा शिष्यांना पुन्हा एका बाजूला घेतले आणि स्वतःच्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला. 33 “ऐका! आपण वर येरूशलेमेस जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाची शिक्षा देतील आणि ते त्याला यहूदीतर लोकांच्या हाती देतील. 34 ते त्याची थटृटा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”
2006 by World Bible Translation Center