Revised Common Lectionary (Semicontinuous)
9 परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत.
म्हणून माझ्यावर दया कर.
मी इतका दुखी: कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहेत,माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.
10 माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे
माझी वर्षे सुस्कारा टाकण्यात निघून जाणार आहेत.
माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत.
माझी शक्ती मला सोडून जात आहे.
11 माझे शत्रू माझा तिरस्कार करतात
आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात
माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात
तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
12 मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे
लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.
13 लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो.
ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
14 परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तूच माझा देव आहेस.
15 माझे जीवन तुझ्या हाती आहे.
मला माझ्या शत्रूंपासून वाचव.
काही लोक माझा पाठलाग करीत आहेत
त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर.
माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
13 “आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या!
माझे जे काही होईल ते मला मान्य आहे.
14 मी मलाच संकटात लोटीन
आणि माझ्याच हातात माझेच जीवन धरीन? [a]
15 देवाने मला मारुन टाकले तरी मी देवावरच विश्वास ठेवीन.
पण मी त्याच्या समोर माझा बचाव करीन.
16 आणि देवाने जर मला जिवंत राहू दिले तर ते मी बोलण्याइतका धीट होतो म्हणूनच असेल.
पापी माणूस देवाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही.
17 मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका.
मला नीट सांगू द्या.
18 मी आता माझ्या बचावाला सिध्द् झालो आहे.
मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन.
मला माहीत आहे की मी बरोबर आहे हे मी दाखवून देईन.
19 माझे चुकले आहे असे जर कुणी दाखवून दिले
तर मी गप्प बसेन.
21 कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे. 22 पण जर मी या शरीरातच राहिलो तर त्याचा अर्थ असा की, माझ्या कामाचे फळ, आनंद मी अनुभवीन. मला माहीत नाही की मी काय निवडीन. 23 या दोन पर्यायातून निवडण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आहे. माझी अशी इच्छा आहे की, या जीवनातून जाऊन ख्रिस्ताबरोबर असावे कारण ते फार फार चांगले होईल. 24 पण तुमच्यासाठी या शरीरात राहणे हे माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे. 25 आणि मला याची खात्री असल्याने मला माहीत आहे की मी येथेच राहीन व तुमच्याबरोबर असेन. 26 यासाठी की तुमच्याबरोबर पुन्हा असण्याचा परिणाम म्हणून तुम्हांला अभिमान बाळगण्यास अधिक योग्य कारण मिळेल.
27 पण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या सुवार्तेला योग्य अशा प्रकारे तुम्ही वागा. यासाठी की, जरी मी तुम्हांला येऊन भेटलो किंवा तुमच्यापासून दूर असलो तरी मला तुमच्याविषयी असे ऐकायला मिळो की तुम्ही एका आत्म्यात खंबीर असे उभे आहात, तुम्ही सुवार्तेच्या विश्वासाने, एकजीवाने धडपड करीत आहात. 28 आणि जे तुम्हांला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे हे धैर्य त्यांच्या नाशाचा पुरावा होईल. पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल. आणि हे देवाकडून असेल. 29 कारण, ख्रिस्ताच्या वतीने केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणे एवढेच नव्हे तर त्याच्यासाठी दु:ख भोगणे असा हक्क तुम्हांला देण्यात आलेला आहे. 30 माझ्यामध्ये चाललेले युंद्ध तुम्ही अनुभवलेले आहे आणि पाहिले आहे आताही ते माझ्यामध्ये चालले असल्याचे तुम्ही ऐकत आहात.
2006 by World Bible Translation Center