Revised Common Lectionary (Semicontinuous)
146 परमेश्वराची स्तुती करा.
माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
2 मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन.
मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
3 तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका.
लोकांवर विश्वास टाकू नका.
का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
4 लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते
आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
5 पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात.
ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या.
परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
7 जे लोक दु:खी कष्टी आहेत.
त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो.
तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
8 परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो.
संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो.
परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
9 परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो.
परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10 परमेश्वर सदैव राज्य करील
सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील
परमेश्वराची स्तुती करा.
देव खूप संयमी आहे
14 “बराच वेळ मी काही बोललो नाही.
मी संयम ठेवला आणि गप्प राहिलो.
पण आता प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मी मोठ्याने ओरडेन.
मी खूप जोराने व मोठ्याने श्वासोच्छवास करीन.
15 मी टेकड्या आणि पर्वत नष्ट करीन.
तेथे वाढणारी सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन.
मी नद्यांच्या जागी कोरडी जमीन निर्माण करीन.
तळी आटवीन.
16 आंधळ्यांना कधीही माहीत नसलेल्या मार्गाने मी घेऊन जाईन.
पूर्वी कधीही ते गेले नव्हते अशा स्थळी मी त्यांना नेईन.
मी त्यांच्यासाठी अंधार प्रकाशात बदलीन.
खडबडीत जमीन गुळगुळीत करीन.
मी कबूल केलेल्या गोष्टी करीन.
मी माझ्या लोकांचा त्याग करणार नाही.
17 पण काही लोकांनी मला अनुसरायचे थांबविले आहे,
त्यांच्याजवळ सोन्याने मढविलेल्या मूर्ती आहेत.
ते त्यांना म्हणतात, ‘तुम्हीच आमचे देव आहात.’
ते त्या खोट्या देवांवर विश्वास ठेवतात,
पण त्या लोकांची निराशा होईल.
देवाचे म्हणणे ऐकण्यास इस्राएलचा नकार
18 “तुम्ही बहिऱ्यांनी माझे म्हणणे ऐकावे.
आंधळ्यांनी नजर उचलून मला पाहावे.
19 ह्या सर्व जगात, सर्वात आंधळा माझा सेवक आहे.
मी ज्याला जगात पाठवितो तो माझा दूत सर्वात बहिरा आहे.
माझा स्वतःचा माणूस परमेश्वराचा सेवक सर्वांत अधिक आंधळा आहे.
20 माझ्या सेवकाने काय करायला हवे ते त्याला दिसते
पण ते माझी आज्ञा पाळत नाही.
तो कानाने ऐकू शकतो
पण माझे म्हणणे ऐकण्यायचे तो नाकारतो.”
21 सेवकाने चांगले व्हावे व परमेश्वराच्या अद्भुत शिकवणुकीचा
परमेश्वराच्या प्रामाणिकपणाखातर आदर करावा असे परमेश्वराला वाटते.
9 या कारणासाठी, आम्हीसुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की:
तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे. 10 यासाठी की, त्याला योग्य असे तुम्ही चालावे. आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा; आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे; 11 त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हांला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे.
12 आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हांला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. 13 देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. 14 पुत्राद्वारे आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली.
2006 by World Bible Translation Center