Revised Common Lectionary (Semicontinuous)
95 चला, परमेश्वराची स्तुती करु या.
जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
2 परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या.
त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.
3 का? कारण परमेश्वर मोठा देव आहे,
इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.
4 सगळ्यांत खोल दऱ्या आणि
सर्वांत उंच पर्वत परमेश्वराचे आहेत.
5 महासागरही त्याचाच आहे-त्यानेच तो निर्मिर्ण केला.
देवाने स्वःतच्या हाताने वाळवंट निर्माण केले.
6 चला, आपण त्याची वाकून उपासना करु या.
ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.
7 तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे.
आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेंढरे होऊ.
8 देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात
जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.
9 तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली,
त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
10 मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो
आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे.
त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.
11 म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की
ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”
27 शनिवारी काही लोक अन्न गोळा करावयास बाहेर गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही. 28 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार? 29 पाहा तुम्ही विसावा घ्यावा यासाठी परमेश्वराने शब्बाथ दिवस बनविला आहे; म्हणून शुक्रवारी परमेश्वर तुम्हाला दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा शब्बाथ दिवशी तुम्ही आहात तेथे बसून विसावा घ्यावा.” 30 म्हणून मग लोक शब्बाथ दिवशी विसावा घेऊ लागले.
31 लोक त्या विशेष अन्नाला “मान्ना” म्हणू लागले; ते धण्यासारखे पांढऱ्या रंगाचे होते त्याची चव मध घालून केलेल्या सपाट पोळी सारखी होती. 32 मोशे म्हणाला, “परमेश्वराने सांगितले, ‘या अन्नातील आठवाट्या म्हणजे एक ओमर इतके किंवा एका एफाचा दहावा भाग इतके अन्न तुमच्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवा म्हणजे मग तुम्हाला मिसर देशातून काढून नेल्यावर मी तुम्हाला रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.’”
33 तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, “एक मोठ्या तोंडाचे खोल भांडे घे आणि त्यात आठवाट्या म्हणजे एक ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी देव तो आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव.” 34 मग अहरोनाने, परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञे प्रमाणे केले. अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटा पुढे मान्ना भरलेले ते भांडे ठेवले. 35 इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे म्हणजे वस्ती असलेल्या देशाला पोहोंचेपर्यंत म्हणजे कनान देशाच्या सरहद्दीला पोहोंचेपर्यंत, खात होते.
येशू शोमरोनी स्त्रीशी बोलतो
4 परुश्यांनी हे ऐकले की, येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करुन घेत आहे. 2 (परंतु खरे पहता, येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, तर त्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत.) परुश्यांनी आपणांविषयी ऐकले आहे हे येशूला समजले. 3 म्हणून येशू यहूदीयातून निघून परत गालील प्रांतात गेला. 4 गालीलाकडे जाताना येशूला शोमरोन प्रांतातून जावे लागले.
5 शोमरोनातील सूखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे. 6 याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहीरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती.
2006 by World Bible Translation Center