Revised Common Lectionary (Semicontinuous)
2 इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत?
ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?
2 त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी
आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.
3 ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुद्ध उभे राहू
आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”
4 परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा
त्या लोकांना हसतो.
5-6 देव रागावला आहे आणि तो
त्या लोकांनाच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली
तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.”
यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.
7 आता मी तुम्हाला परमेश्वराच्या कराराविषयी सांगतो
परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो!
आणि तू माझा मुलगा झालास.
8 जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन
या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
9 लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा [a] नाश करते
तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू शकशील.”
10 म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा
राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.
11 परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा.
12 तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा.
तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात.
पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे.
तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.
20 तेव्हा एलीया अहाबकडे गेला. अहाबने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, “तुला मी पुन्हा सापडलो. तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस.”
एलीया म्हणाला, “हो, तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस. 21 तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, ‘मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना ठार करीन. 22 नबाटाचा मुलगा यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांनाही पाप करायला लावलेस.’ 23 शिवाय परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी बायको ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेल मध्ये कुत्री तुटून पडतील. 24 तुझ्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल.’”
25 अहाबने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची बायको ईजबेल हिने त्याला हे सर्व करायला लावले. 26 अहाबने आणखी एक पातक केले ते म्हणजे त्या लाकडी ठोकळ्यांची, मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांना दिला.
27 एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता.
28 परमेश्वर एलीया संदेष्ट्याला म्हणाला, 29 “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपपर्यंत मी त्याला संकटात लोटणार नाही. त्याचा मुलगा राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”
9 ते डोंगरावरून खाली येत असता येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठेपर्यत कोंणालाही सांगू नका.”
10 म्हणून त्यांनी ही गोष्ट त्यांच्यातच ठेवली, परंतु ते मेलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते. 11 त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?”
12 तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी आला पाहिजे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दु:खे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे? 13 मी तुम्हांला सांगतो, एलीया आधीच आला आहे आणि जसे त्याच्याविषयी लिहिले आहे तसे, त्यांनी त्यांना पाहिजे तसे त्याचे केले.”
2006 by World Bible Translation Center