Revised Common Lectionary (Semicontinuous)
बेथ
9 तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल?
तू दिलेली शिकवण आचरणात आणून.
10 मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो.
देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
11 मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का?
म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.
12 परमेश्वरा, तुझे कल्याण असो
मला तुझे नियम शिकव.
13 मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.
14 तुझ्या कराराचा अभ्यास करणे
मला इतर कशाही पेक्षा आवडते.
15 मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन.
मी तुझी जीवन जगण्याची पध्द्त आचरेन.
16 मला तुझे नियम आवडतात.
मी तुझे शब्द विसरणार नाही.
ज्ञानाचे ऐका
2 मुला, मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा स्वीकार कर. माझ्या आज्ञा लक्षात ठेव. 2 ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. 3 ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव. 4 ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे. 5 जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील.
6 परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते. 7 तो चांगल्या आणि प्रामाणिक माणसांना मदत करतो. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी तो ढालीसारखा आहे. 8 जे लोक इतरांशी न्यायाने वागतात त्यांचे तो रक्षण करतो. त्याच्या पवित्र लोकांचे तो रक्षण करतो.
9 म्हणून परमेश्वर तुला त्याचे ज्ञान देईल. नंतर तुला चांगल्या न्यायाच्या आणि योग्य गोष्टी कळतील. 10 ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल.
11 ज्ञान तुझे रक्षण करील. आणि समज तुला सांभाळेल. 12 ज्ञान आणि समज तुला दुष्ट लोकांसारखे चुकीचे जीवन जगण्यापासून परावृत्त करतील. ते लोक बोलतानाही दुष्टपणा करतात. 13 त्यांनी चांगुलपणा सोडला आणि आता ते पापाच्या अंधकारात राहात आहेत. 14 त्यांना चूक करण्यात आनंद वाटतो. आणि त्यांना पापाचे वाईट मार्ग आनंदित करतात. 15 त्या लोकांवर विश्वास टाकणे शक्य नाही. ते खोटं बोलतात आणि फसवतात. पण तुझे ज्ञान आणि तुझी समज तुला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवेल.
येशू घटस्फोटाविषयी शिकवतो(A)
19 येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालीलातून निघून गेला. आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहूदा प्रांतात गेला. 2 तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे गेला आणि तेथील अनेक आजरी लोकांना येशूने बरे केले.
3 काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी द्यावी काय?
4 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, [a] 5 आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आईवडिलांना सोडिल व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’a 6 म्हणून दोन व्यक्ति या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तिने त्यांना वेगळे करू नये.”
7 परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सोडचिठ्टी लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?”
8 येशूने उत्तर दिले, “तुम्ही दावाची शिकवण मानण्यास नकार दिल्याने तुमच्या पत्नींना सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सोडचिठ्ठी देण्याची मोकळीक नव्हती. 9 मी तुम्हांसा सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.”
10 मग त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.”
11 येशूने उत्तर दिले, “लग्नाविषयीची अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येक मनुष्याला शक्य होणार नाही. परंतू काही जणांना देवाने ही शिकवण ग्रहण करण्यास संमति दिली आहे. 12 काही लोकांची लग्न न करण्याची कारणे निराळी असू शकतील. जन्मापासूनच काही माणसे अशी असतात की, ती मुलांना जन्म देऊ शकत नाहीत. इतर काही माणसांनी काही जणांना तसे बनविलेले असते तर आणखी काही माणसांनी स्वर्गाच्या राज्याकरिता लग्न करने सोडून दिले आहे, परंतू ज्याला लग्न करणे शक्य होईल, त्या मनुष्याने लग्नाविषयी ही शिकवण मान्य करावी.”
2006 by World Bible Translation Center