Revised Common Lectionary (Semicontinuous)
आलेफ
119 शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत.
ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
2 जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत.
ते परमेश्वराच्या आज्ञा मनापासून पाळतात.
3 ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत.
ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.
4 परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास
आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
5 परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.
6 तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन
तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
7 मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि
न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन.
8 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन.
तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस.
इस्राएलांचे आपल्या भूमीत पुनरागमन
30 “मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांमध्ये हद्दपार करील. तेव्हा तुम्हांला या सर्व गोष्टींची आठवण होईल. 2 तेव्हा तुम्ही तुमचे वंशज तुमचा देव परमेश्वर ह्याचा धावा कराल. त्याला मनःपूर्वक शरण जाल. आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे नीट पालन कराल. 3-4 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल, आणि तो तुम्हांला मुक्त करील. तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करुन टाकली होती तेथून तो तुम्हाला परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात! 5 पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हांला मिळेल. पूर्वी कधी नव्हती एवढी तुमची लोकसंख्या वाढेल. 6 तुमचा देव परमेश्वर तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना आपल्याकडे वळवील आणि त्याच्यावर तुम्ही मनःपूर्वक प्रेम कराल व सुखाने जगाल.
7 “मग त्या संकटांनी तुमचा देव परमेश्वर तुमच्या शत्रूंना जेरीला आणील. कारण ते तुमचा द्वेष करुन तुम्हाला अडचणीत आणायचा प्रयत्न करतील. 8 आणि तुम्ही पुन्हा परमेश्वराचे ऐकाल. आज मी देत असलेल्या सर्व आज्ञा तुम्ही पाळाल. 9 मी तुम्हाला सर्व कार्यात यश देईल. त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर संतती होईल. गायांना भरपूर वासरे होतील. शेतात भरघोसपीक येईल. तुमचा देव परमेश्वर तुमचे भले करील. तुमच्या पूर्वजांप्रमाणेच तुमचे कल्याण करण्यात त्याला आनंद वाटेल.
देवाची आज्ञा आणि माणसांनी बनवलेले नियम(A)
15 तेव्हा यरूशलेमाहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, 2 “तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”
3 येशूने उत्तर दिले, “आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? 4 कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख’ [a] आणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, ‘त्याला जिवे मारावे.’ [b] 5 पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, तुला जे काही दिल्याने तुझा जो फायदा झाला असता, ते मी देवाला अर्पण केले आहे 6 ते देवाचे नियम मोडीत आहेत. आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. 7 अहो ढोंग्यानो, तुम्हांविषयी यशया संदेष्ट्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो.
8 ‘हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात
पण त्यांचे ह्रदय माझ्यापासून दूर आहे.
9 आणि ते माणसाचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात
आणि व्यर्थच माझी उपासना करतात.’” (B)
2006 by World Bible Translation Center