Revised Common Lectionary (Semicontinuous)
आलेफ
119 शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत.
ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
2 जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत.
ते परमेश्वराच्या आज्ञा मनापासून पाळतात.
3 ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत.
ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.
4 परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास
आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
5 परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.
6 तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन
तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
7 मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि
न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन.
8 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन.
तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस.
इसहाक अबीमलेखाशी खोटे बोलतो
26 पूर्वी अब्राहामाच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्टकाळ आताही पडला; तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरात गेला. 2 परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात जाऊ नकोस; तर मी सांगितलेल्या देशातच राहा; 3 तू तेथे राहा आणि मी तेथे तुझ्याबरोबर असेन; मी तुला आशीर्वादित करीन; ही सर्व भूमी मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन; तुझा बाप अब्राहाम याला मी जे जे देण्याचे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन. 4 मी तुमची संतनी आकाशातील ताऱ्यांइतकी करीन आणि हे सर्व देश मी तुमच्या वंशजांस देईन; तुमच्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मी आशीर्वादीत करीन; 5 कारण तुझा बाप अब्राहाम याने माझ्या आज्ञा, नियम व कायदे पाळले आणि मी सांगितलेल्या गोष्टी केल्या.”
परिक्षा देवापासून येत नाही
12 धन्य तो पुरूष जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल, तेव्हा त्याला विजेत्याचा मुगूट मिळेल. तो मुगुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे. 13 कोणीही, जेव्हा तो परीक्षेत पडतो, तेव्हा असे म्हणू नये की, “हे संकट देवाने माझ्यावर आणले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही. 14 तर प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो. तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो. 15 मनात वासना निर्माण झाली की, तिच्या पोटी पापाचा जन्म होतो व पापाची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा ते मरणाला जन्म देते.
16 माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका.
2006 by World Bible Translation Center