Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 112:1-9

112 परमेश्वराची स्तुती करा.

जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील.
    त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.
त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील.
    चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.
त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल
    आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील.
चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो.
    देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते.
    माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते.
तो माणूस कधीही पडणार नाही.
    चांगला माणूस सदैव आठवणीत राहील.
त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही.
    त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही.
    तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
तो माणूस सहजपणे गरीबांना वस्तू देतो
    आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो.

स्तोत्रसंहिता 112:10

10 दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात.
    ते रागाने त्यांचे दांत खातील आणि
    नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.

यशया 29:1-12

यरूशलेमबद्दल देवाचे प्रेम

29 देव म्हणतो, “अरीएलकडे पाहा. तेथे दाविदाने तळ ठोकला होता. त्या शहराची सुटी वर्षानुवर्षे सुरूच आहे. मी अरीएलला शिक्षा केली आहे. त्यामुळे ते शहर दु:ख व शोक यांनी भरून गेले आहे. पण तरीसुध्दा ते माझे अरीएल आहे.

“अरीएल, मी तुझ्यासभोवती सैनिक ठेवले आहेत. मी तुझ्याविरूध्द् मोर्चे बांधले आहेत. तुझा पराभव झाला, तुला जमीनदोस्त केले गेले. आता भुताप्रमाणे जमिनीतून येणारा तुझा आवाज मी ऐकतो. तुझे शब्द, धुळीतून आल्याप्रमाणे येतात.”

धुळीच्या कणांप्रमाणे खूप परके येथे आहेत. ते क्रूर लोक, वाऱ्यावर उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे आहेत. सर्वशक्तिमान परमेश्वराने भूकंप, मेघगर्जना व मोठा गडगडाट यांच्याद्वारे तुला शिक्षा केली. तेव्हा सगळीकडे वादळे, वावटळी व सर्वनाशक आग पसरली होती. अनेक राष्ट्रे अरीएलविरूध्द् लढली. ते सर्व रात्रीच्या दु:स्वप्नासारखे होते. सैन्यांनी अरीएलला वेढा घातला आणि शिक्षा केली. पण त्या सैन्यांनाही ते स्वप्नासारखेच वाटेल. त्यांना पाहिजे असलेले मिळणार नाही. उपाशी माणसाने अन्नाबद्दलचे स्वप्न पाहावे तसेच ते असेल.जेंव्हा असा माणूस जागा होतो तेंव्हा तो भुकेलेलाच असतो.तहानलेल्याने पाण्याचे स्वप्न पाहावे तसेच ते असेल.तोजागा झाला तरी त्याची तहान भागलेली नसते. सियोनविरूध्द् लढणाऱ्या राष्ट्रांची अशीच स्थिती आहे. त्या राष्ट्रांना जे हवे आहे ते मिळणार नाही.

तुम्ही विस्मित
    व आश्चर्यचकीत व्हा.
तुम्ही धुंद व्हाल पण मद्याने नव्हे.
    तुम्ही झोक जाऊन पडाल पण दारूने नव्हे.
10 परमेश्वर तुम्हाला झोपेची गुंगी आणील.
    परमेश्वर तुमचे डोळे मिटेल. (संदेष्टे हेच तुमचे डोळे आहेत)
    परमेश्वर तुमची डोकी झाकील. (संदेष्टे हेच तुमची डोकी आहेत.)

11 हे असे घडेल असे मी तुम्हाला सांगतो पण तुम्हाला माझे म्हणणे कळणार नाही. माझे शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाप्रमाणे आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्याला वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे. मी ते उघडू शकत नाही.” 12 किंवा तुम्ही असे पुस्तक वाचता न येणाऱ्याला देऊन त्यास ते वाचायला सांगू शकता. तो म्हणेल, “मला वाचता येत नसल्याने मी हे पुस्तक वाचू शकत नाही.”

याकोब 3:13-18

खरे शहाणपण

13 तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे. 14 पण जर तुमच्या ह्रदयात कटूरता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. कारण तसे करणे म्हणजे खोटेपणाच्या आड सत्य लपविण्यासारखे आहे. 15 कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून, स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे. अधार्मिक आणि सैतानी आहे. 16 कारण जेथे मत्सर व स्वार्थी ध्येये आढळतात तेथे अव्यवस्थितपणा व सर्व प्रकारचे वाईट व्यवहारही आढळतात. 17 पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शांतिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते. 18 जे लोक शांततेच्या मार्गाने शांति स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ, नीतिपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center