Revised Common Lectionary (Semicontinuous)
37 तू दुष्टांवर चिडू नकोस.
वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करु नकोस.
2 वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या
आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.
3 तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास
तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
4 परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे
तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.
5 परमेश्वरावर अवलंबून राहा.
त्याच्यावर विश्वास ठेव.
आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.
6 परमेश्वर तुझा चांगुलपणा
आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तळपू देईल.
7 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा
दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
8 रागावू नकोस, संताप करुन घेऊ नकोस.
तुला स्वत:ला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस.
9 का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे.
परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
10 थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत.
तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.
11 विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
आणि ते शांती व समाधानात जगतील.
12 दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात.
13 परंतु आपला प्रभु त्या दुष्टांना हसतो.
त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.
14 दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात.
त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे.
15 परंतु त्यांचे धनुष्य मोडेल
व त्यांच्या तलवारी त्यांच्याच छातीत घुसतील.
16 मूठभर चांगले लोक वाईटांच्या
जमावापेक्षा चांगले असतात.
17 का? कारण दुष्टांचा नाश होईल
आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेतो.
धान्याचे खळे
3 काही दिवसांनी रूथची सासू नामी रूथला म्हणाली, “मुली, आता मला तुझ्यासाठी नवरा आणि चांगले घर शोधून काढायला हवें. त्यातच तुझे भले आहे. 2 बवाज त्यासाठी योग्य आहे तो आपला जवळचा आप्तच [a] आहे. त्याच्याकडच्या कामकरी बायकांबरोबर तू काम केले आहेस. आज रात्री तो खळ्यात मळणीसाठी मुक्कामाला असेल. 3 त न्हाऊन माखून तयार हो. चांगले ठेवणीतले कपडे घाल आणि रात्री खव्व्यावर जा. बवाजचे जेवणखाण होईपर्यंत त्याच्या नजरेला पडू नको. 4 जेवण झाल्यावर तो विश्रांती घ्यायला आडवा होईल. लक्ष असू दे म्हणजे तो कुठे आहे ते तुला कळेल. तेव्हा तू पुढे हो आणि त्याच्या पायावरचे पांधरूण काढून [b] तिथेच त्याच्याजवळ पड लगेच काय करायचे ते तोच मग तुला सांगेल.”
5 तेव्हा रूथने सासूच्या म्हणण्याप्रमाणे वागायचे कबूल केले.
6 ती खव्व्याकडे गेली. सासूने सांगितले होते त्याप्रमाणे वागली. 7 जेवणखाण झाल्यावर बवाज समाधानाने सुस्तावला. धान्याच्या राशीजवळच झोपायला गेला. तेव्हा अजिबात चाहूल लागू न देता रूथ तिथे गेली आणि त्याच्या पायावरचे पांघरूण तिने दूर सारले. मग त्याच्या पायाशी पडून राहिली.
8 मध्यरात्रीच्या सुमाराला बवाज झोपेतच कुशीवर वळला आणि जागा झाला. आपल्या पायाजवळ एका बाईला पाहून तो डचकला. 9 ती कोण, काय हे त्याने विचारले.
ती म्हणाली, “मी रूथ तुमची दासी. तुम्ही आपले पंख माझ्यावर पसरा [c] तुम्हीच माझे त्राते [d] आहात.”
10 तेव्हा बवाज म्हणाला, “परमेश्वर तुझे भले करो. माझ्यावर तुझ्या प्रेमाची पाखर तू घातली आहेस. तू नामीशी आधी वागलीस त्यापेक्षाही भलेपणाने तू माझ्याशी वागते आहेस. तू तूझ्या जोगा गरीब, श्रीमंत अशा कोणत्याही तरूण मनुष्याबरोबर गेली असतीस. पण तू तसे केले नाहीस. 11 तेव्हा आता घाबरू नकोस. तू म्हणशील तसे मी करतो. तू एक चांगली बाई आहेस हे गावातील लोकांना ठाऊक आहे. 12 शिवाय, मी तुमचा जवळचा नातलग आहे हेही खरे. पण माझ्याहीपेक्षा जवळचा असा तुमचा एक आप्त आहे. 13 आजची रात्र तू इथेच राहा. तो तुला मदत करतो का ते मी सकाळी त्याला विचारून बघतो. तो तयार झाला तर उत्तमच. पण त्याने नकार दिला तर परमेश्वरची शपथ मी तुझ्याशी लग्न करीन. अलीमलेखची गेलेली जमीन तुम्हाला परत मिळवून देईन [e] तेव्हा सकाळपर्यंत इथेच थांब.”
13 त्यानंतर बवाजने रूथशी लग्न केले. तिला परमेश्वराच्या दयेने दिवस राहून मुलगा झाला. 14 गावातील बायका नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा. [a] दिला तो इस्राएलमध्ये किर्तिवंत होईल. 15 तुमचे तो पुनरूज्जीवन करेल वृध्दापकाळी तो तुमची काळजी घेईल तुझ्या सुनेमुळे हे झाले तिने तुला हा मुलगा दिला तिचे तुझ्यावर प्रेम आहे. सात मुलांपेक्षाही तिची थोरवी आधिक आहे.
16 नामीने बाळाला घेतले, आपल्या कुशीत घेतले. त्याचे संगोपन केले. 17 शेजाऱ्यांनी त्याचे नाव ठेवले. बायका म्हणाल्या, “नामीलाच हा मुलगा झाला आहे.” मग शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. ओबेद इशायचा पिता झाला. इशाय राजा दावीदचा पिता झाला.
रूथ आणि बवाजची वंशावळ
18 पेरेसची वंशावळ खालील प्रमाणे:
हस्तोनचा पिता पेरेस.
19 हेस्तोन रामचा पिता.
राम अम्मीनादाबचा पिता.
20 अम्मीनादाब नहशोनचा पिता.
नहशोन सल्मोनचा पिता.
21 सल्मोन बवाजचा पिता.
बवाज ओबेदचा पिता.
22 ओबेद इशायचा पिता.
इशाय दावीदचा पिता.
येशू लोकांना शिकवितो आणि रोग्यांस बरे करतो(A)
17 तो त्यांच्याबरोबर खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला होता. व यहूदीया, यरुशलेम, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते. 18 ते तेथे त्याचे ऐकण्यास व त्यांच्या रोगापासून बरे होण्यास आले होते. व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधींपासून मुक्त करण्यात आले. 19 सगळा लोकसमुदाय त्याला स्पर्श करु पाहत होता. कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते व ते सर्वांना बरे करीत होते.
20 येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला,
“जे तुम्ही गरीब आहात ते तुम्ही आशीर्वादित आहात
कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
21 तुम्ही जे भुकेले ते आशीर्वादित आहात
कारण तुम्ही तृप्त व्हाल.
आता तुम्ही जे रडता ते तुम्ही आशीर्वादित आहात
कारण तुम्ही हसाल.
22 “जेव्हा लोक तुमचा द्धेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील आणि तुमचा अपमान करतील, जेव्हा तुमचे नाव ते वाईट समजतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल. 23 त्या दिवशी तुम्ही आनंद करा. आनंदाने उड्या मारा कारण स्वर्गात तुमचे बक्षीस मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुध्दा तसेच केले.
24 “पण श्रीमंतानो, तुम्हांला दु:ख होवो
कारण तुम्हांला अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.
25 जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हांला दु:ख होवो,
कारण तुम्ही भुकेले व्हाल.
जे आता हसतात त्यांना दु:ख होवो
कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.
26 “जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हांला दु:ख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.
2006 by World Bible Translation Center