Old/New Testament
पवित्र वापरासाठी जमिनीची विभागणी
45 “ज्या वेळी इस्राएली वंशाच्या लोकांसाठी तुम्ही, चिठृ्या टाकून, जमिनीची वाटणी कराल, तेव्हा जमिनीचा काही भाग वेगळा काढाल तो परमेश्वराचा पवित्र भाग असेल. ती जमीन 25,000 हात (8.12 मैल) लांबीची व 20,000 हात (8.12 मैल) लांबीची व 20,000 हात (6.6 मैल) रुंदीची असेल. ती सर्व जमीन पवित्र असेल. 2 जमिनीचा 500 हाताचा (875 फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87 फूट 6 इंच) रुंदीची मोकळी जागा असेल. 3 पवित्र प्रदेश 25,000 हात (8.3 मैल) लाब व 10,000 हात (3.3 मैल) रुंद असेल. मंदिर ह्याच भागात असेल. मंदिराची जागा अती पवित्र जागा मानली जाईल.
4 “परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराजवळ जाणाऱ्या, मंदिरात काम करणाऱ्या सेवकांसाठी, याजकासाठी हा जमिनीचा पवित्र भाग असेल. ती जागा याजकांची घरे व मंदिर यांच्यासाठी असेल. 5 जमिनीचा 25,000 हजार हाताचा (8.3 मैल लांबीचा) व 10,000 हात (3.3 मैल) रुंदीचा भाग हा मंदिरात सेवा करणाऱ्या लेवींसाठी असेल. लेवींची गावेसुद्धा याच भागात वसतील.
6 “गावासाठी तुम्ही 5,000 हात (1.6 मैल) रुंदीचा व 25,000 हजार हात (8.3 मैल) लांबची जागा द्याल. ती पवित्रे प्रदेशाच्या बाजूला असेल. इस्राएलच्या सर्व लोकांसाठी ही जागा असेल. 7 पवित्र प्रदेशाच्या आणि गावाच्या मालकीच्या जमिनीच्या बाजूची जमीन राजसाठी असेल. म्हणजेच पवित्र प्रदेश व गावाच्या मालकीची जमीन या दोन्ही मधील ही जमीन असेल. ती लोकांना दिलेल्या जमिनीएवढीच असेल. ती पश्र्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत पसरलेली असेल. 8 ही जमीन म्हणजे राजाची इस्राएलमधील मालमत्ता असेल. त्यामुळे, यापुढे, राजा माझ्या लोकांना कष्ट देणार नाही उलट इस्राएलांना ते त्यांच्या वंशजांसाठी जमीन देईल.”
9 परमेश्वर, माझा प्रभू, पुढे म्हणतो, “इस्राएलच्या राजांनो, आता पुरे! लोकांशी क्रूरपणाने वागण्याचे सोडून द्या, लोकांची लुबाडणूक करु नका. न्यायाने वागा. सत्कृत्ये करा. माझ्या लोकांना सक्तीने घराबाहेर काढण्याचे सोडून द्या.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
10 “लोकांना फसवू नका. योग्य वजन-मापे वापरा. 11 एफा (कोरडे पदार्थ मोजण्याचे माप) बाथ (द्रव पदार्थ मोजण्याचे माप) सारख्याच आकाराचे असू द्या. ही मापे होमरच्या परिमाणात असली पाहिजेत. म्हणजे एफ व बाथ 1/10 होमर इतक्या मापाची असावीत. 12 शेकेल 20 गेरा एवढा असला पाहिजे. मीना हा 60 शेकेल म्हणजेच 20 शेकेल, 25 शेकेल, 15 शेकेल एवढा असला पाहिजे.
13 “पुढील गोष्टी तुम्ही अर्पण केल्याच पाहिजेत.
प्रत्येक होमर (6 बुशल) गव्हासाठी 1/6 एफ (14 वाडगे) गडू.
प्रत्येक होमर (6 बुशल) जवासाठी 1/6 एफ (14 वाडगे) जव.
14 प्रत्येक कोर (55 गॅलन) ऑलिव्ह तेलासाठी 1/10 बाथ (1/2 गॅलन) ऑलिव्ह तेल.
लक्षात ठेवा: 10 बाथचा एक होमर होतो 10 बाथचा एक कोर होतो
15 आणि इस्राएलच्या चांगल्यातल्या चांगल्या कुरणातील
200 मेंढ्यांच्या कळपातील एक मेंढरु द्यावे.
“ही खास अर्पणे धान्यार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे यासाठी आहेत. ह्यामुळे लोकांची शुद्धता होते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
16 “ह्या देशातील, प्रत्येकजण, राजाकरिता, या गोष्टी अर्पण करील. 17 पण विशेष पवित्र दिवसांसाठी राजाने आवश्यक त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. सण, अमावस्या, शब्बाथ ह्या दिवसांसाठी आणि इस्राएलच्या खास सणांसाठी राजाने होमार्पणे, धान्यार्पणे व पेयार्पणे ह्यांची सोय केली पाहिजे. इस्राएलच्या शुद्धतेसाठी असलेली पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे व शांत्यर्पणेसुद्धा राजाने दिली पाहिजेत.”
18 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, मंदिराच्या शुद्धतेसाठी तुम्ही निर्दोष गोऱ्हा द्यावा. 19 याजक पापार्पणातील काही रक्त मंदिराच्या दाराच्या चौकटीच्या खांबावर, वेटीच्या कंगोऱ्याच्या टोंकावर आणि आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर शिंपडतील. 20 कोणाही माणसाच्या हातून नकळत वा माहीत नसल्याने पाप घडले असेल म्हणून महिन्याच्या सातव्या दिवशी तुम्ही मघाशी सांगितले तसे करावे. म्हणजे मंदिर शुद्ध होईल.
वल्हांडणाच्या सणातील अर्पणे
21 “पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडणाचा सण साजरा केला पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण ह्यावेळेसच सुरु होतो. तो सात दिवस चालतो. 22 त्या वेळी, राजा स्वतःकरिता आणि इस्राएलच्या लोकांकरिता पापार्पण म्हणून बैल देईल. 23 सणाच्या सात दिवसात राजा सात निर्दोष बैल व सात निर्दोष मेंढे ह्यांचे देवाला हवन करील. राजा प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सात बैल अर्पण करील. तसेच पापार्पण म्हणून रोज एक बोकड देईल. 24 राजा प्रत्येक बैलाबरोबर एक एफ (1/2 बुशेल) जव धान्यार्पण म्हणून देईल. प्रत्येक मेंढ्याबरोबर पण तो एक एफ (1/2 बुशेल) जव देईल. प्रत्येक एफ धान्याबरोबर राजाने एक हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे. 25 मंडपाच्या सणाच्या सात दिवसात राजाने असेच सर्व अर्पण करावे. हा सण सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. त्या वेळची पापार्पण, होमार्पण, धान्यार्पण आणि तेलार्पण ही अर्पणे असतील.”
राजा आणि सण
46 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “आंतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसांत बंद असेल. पण शब्बाथ व अमावस्या ह्या दिवशी ते उघडले जाईल. 2 राजा, त्या दाराच्या द्वारमंडपापासून आता जाऊन दाराच्या खांबाशी उभा राहील. मग याजक त्याच्यासाठी होमार्मण व शांत्यर्पण करील. राजा दाराच्या उंबऱ्यात उपासना करील मग तो बाहेर जाईल. पण दार संध्याकाळशिवाय बंद होणार नाही. 3 देशातील लोकही शब्बाथ व नवचंद्रदिनी ह्या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करतील.
4 “शब्बाथच्या दिवशी राजा होमार्पण करील. त्याने सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा हे दिलेच पाहिजेत. 5 त्याने मेंढ्याबरोबर एक एफ (1/2 बुशेल) धान्य दिले पाहिजे. कोकरांबरोबर त्याने शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. प्रत्येक एक एक (1/2 बुशेल) धान्याबरोबर त्याने 1 हीन (1 गॅलन) तेल दिले पाहिजे.
6 “नवचंद्रदिनी पहिल्या दिवशी त्याने एक निर्दोष गोऱ्हा दिला पाहिजे. तसेच त्याने सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा द्यावा. 7 त्याने बैल व मेंढा ह्यांच्याबरोबर प्रत्येकी एक एफ (1/2 बुशेल) धान्य द्यावे. कोकरांबरोबर त्याने, त्याला शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. मात्र प्रत्येक एफ बोरबर (1/2 बुशेल बरोबर) 1 हीन (गॅलन) तेल द्यावे.
8 “राजाने पूर्वद्वाराच्या द्वारमंडपापासून मंदिरात ये-जा केली पाहिजे.
9 “खास सणांच्या वेळी देशातील लोक परमेश्वरापाशी येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. प्रत्येकाने सरळ दिशेनेच गेले पाहिजे. 10 जेव्हा लोक आत जातील, तेव्हा राजा आता जाईल व जेव्हा लोक बाहेर येतील, तेव्हा राजा बाहेर येईल.
11 “सणांच्या आणि विशेष सभांच्या वेळी, गोह्याबरोबर 1 एफ (1/2 बुशेल) धान्य दिलेच पाहिजे. तसेच प्रत्येक मेंढ्याबरोबरही 1 एफ (1/2 बुशेल) धान्य द्यायला हवे. कोकराबरोबर राजाने इच्छेप्रमाणे द्यावे मात्र 1 एफ (1/2 बुशेल) धान्याबरोबर 1 हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे.
12 “जेव्हा राजा स्वसंतोष अर्पण परमेश्वरासाठी करील (कदाचित् ते होमार्पण असेल वा कदाचित् शांत्यर्पण असेल किंवा स्वसंतोषदर्शक असेल.) तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडले जाईल. मग शब्बाथच्या दिवसाप्रमाणे तो अर्पण करील. तो जाताच, दार लावून घेण्यात येईल.
प्रतिदिवसाची अर्पणे
13 “परमेश्वराला होमार्पण म्हणून रोज तुम्ही एक वर्षांचे निर्दोष कोकरु द्यावे, रोज सकाळी ते द्यावे. 14 आणखी रोज सकाळी कोकराबरोबर तुम्ही धान्यार्पण अर्पण करावे, तुम्ही त्यासाठी 1/6 एफ (14 वाडगे) पीठ व हे पीठ चांगले भिजण्यासाठी 1/3 हीन (1 गॅलन) तेल द्यावे. हे परमेश्वरासाठी रोज करावयाचे धान्यार्पण असेल. 15 होमार्पणासाठी लोक कोकरु, धान्यार्पण व तेल रोज सकाळी कायम देतील.”
राजाच्या वारसाहक्कासंबंधी नियम
16 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “जर राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा भाग, भेट म्हणून आपल्या एखाद्या मुलाला दिला, तर तो त्या मुलाच्या मालकीचा होईल. ती त्याची मालमत्ता होईल. 17 पण राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग, आपल्या एखाद्या गुलामाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत [a] तो त्या गुलामाचा होईल. व त्यानंतर तो राजाला परत मिळेल. फक्त राजाची मुलेच राजाकडून मिळालेला भेट ठेवू शकतील. 18 राजा कोणाही माणसाची जमीन घेणार नाही अथवा कोणालाही सक्तीने जमीन सोडायला लावणार नाही. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना दिला पाहिजे. म्हणजे माझ्या लोकांना सक्तीने जमीन सोडावी लागणार नाही.”
खास स्वयंपाकघरे
19 मग त्या माणसाने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. तेथे अगदी पश्र्चिमेला जागा असलेली मला दिसली. 20 तो माणूस मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवितील, धान्यार्पणे भाजतील. का? कारण मग त्यांना हा पदार्थ बाहेरच्या अंगणात नेण्याची जरुरी नाही. जेथे सामान्य लोक असतात, तेथे त्यांना ह्या पवित्र गोष्टी न्याव्या लागणार नाहीत.”
21 मग मला त्या माणसाने बाहेरच्या पटांगणात आणले. त्याने मला पटांगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. प्रत्येक कोपऱ्यात एक छोटासा चौक होता. 22 चारी कोपऱ्यात लहान चौक होते. प्रत्येक चौक 40 हात (70 फूट) लांब व 30 हात (52 फूट 6 इंच) रुंद होता. चारी कोपरे सारख्या मापाचे होते. 23 चारी चौकांच्या भोवताली विटांची भिंत होती. त्या भिंतीत स्वयंपाकासाठी जागा केलेली होती. 24 तो माणूस मला म्हणाला, “ह्या येथे मंदिराचे सेवक लोकांकरिता बळी दिलेल्या प्राण्यांचा पदार्थ शिजवितील.”
येशू आमचा साहाय्यकर्ता
2 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करु नये यासाठी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे, पण जर एखादा पाप करतो तर पित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे. 2 तो अर्पण आहे जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो.
3 जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर हाच मार्ग आहे ज्याविषयी आम्हाला खात्री आहे की, आम्ही देवाला खऱ्या अर्थाने ओळखले आहे. 4 जो असे म्हणतो की, “मी देवाला ओळखतो!” आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे; आणि त्याच्यामध्ये सत्य नाही. 5 पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो, तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे. हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की, आम्ही देवामध्ये आहोत. 6 मी देवामध्ये राहतो असे जो म्हणतो, त्याने जसा येशू जगला तसे जगले पाहिजे.
इतर लोकांवर प्रेम करा अशी देवाने आज्ञा दिली
7 प्रिय मित्रांनो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही तर जुनीच आज्ञा लिहीत आहे, जी तुम्हांला सुरुवातीपासूनच देण्यात आली होती. 8 ती जुनी आज्ञा म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकला आहे तीच आज्ञा आहे. शिवाय नवीन आज्ञेप्रमाणे मी तिजविषयी लिहीतो कारण या गोष्टीविषयीचे सत्य ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये दर्शविण्यात आली. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे.
9 जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजूनसुद्धा अंधारात आहे. 10 जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते, जी एखाद्याला पापात पडण्यास भाग पाडते. 11 पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळत नाही. कारण अंधारामुळे तो आंधळा झालेला आहे.
12 प्रिय मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
कारण ख्रिस्तामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे.
13 वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो
कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो,
मी तुम्हांला लिहीत आहे,
कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे.
14 मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
कारण तुम्हांला पिता माहीत आहे.
वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले,
कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे.
त्याची तुम्हांला ओळख झाली आहे.
तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले,
कारण तुम्ही सशक्त आहात;
देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते,
कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.
15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करु नका. जर कोणी जगावर प्रेम करतो, तर पित्याविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम नाही. 16 कारण जगात जे सर्व काही आहे, ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना, व संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंतकाळपर्यंत जगेल.
ख्रिस्ताच्या शंत्रूंना अनुसरु नका
18 माझ्या मुलांनो, शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताही पुष्कळ ख्रिस्तविरोधी दिसू लागले आहेत. त्यामुळेच आम्हाला कळते की, शेवट जवळ आला आहे. 19 ते आमच्यातूनच बाहेर निघाले, पण ते खऱ्या अर्थाने आमच्यातील नव्हतेच, मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर ते आमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की, त्यांना आम्हांला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचा नव्हता.
20 पण जो पवित्र असा ख्रिस्त याने तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. 21 मी तुम्हांला सत्य माहीत नाही म्हणून लिहीत नाही पण तुम्हांला ते माहीत आहे कारण सत्यापासून कोणतेच असत्य येत नाही.
22 येशू हा ख्रिस्त नाही असे म्हणणारा खोटा नाही काय? असा मनुष्य ख्रिस्तविरोधी आहे. तो पिता आणि पुत्र या दोघांनाही नाकारतो. 23 जो पुत्राचा नाकार करतो त्याला पिताही नसतो, पण जो पुत्राला मानतो त्याला पिताही असतो.
24 तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे, त्यामध्येच राहा, सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्ही राहाल, तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. 25 आणि देवाने आम्हांला जे देण्याचे अभिवचन दिले आहे: ते म्हणजे अनंतकाळचे जीवन होय.
26 जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे. 27 पण तुमच्याबाबतीत म्हटले तर, ज्या (पवित्र व्यक्तीकडून) तुम्हांला अभिषेक करण्यात आला तो तुमच्यामध्ये राहतो. म्हणून दुसऱ्या कोणी तुम्हांला शिकवावे याची गरज नाही. त्याऐवजी ज्या आत्म्यासह तुमचा अभिषेक (पवित्र व्यक्तीकडून) झाला या सर्व गोष्टीविषयी तो तुम्हांला शिकवितो आणि लक्षात ठेवा की, तो खरा आहे आणि खोटा मुळीच नाही. जसे त्याने तुम्हाला जे करण्यास शिकविले आहे तसे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा.
28 म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हांला दृढविश्वास मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही. 29 जर तुम्हांला माहीत आहे की, ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हाला कळेल.
2006 by World Bible Translation Center