Old/New Testament
यरुशलेमला शत्रूचा घेराव
6 बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा.
यरुशलेमपासून दूर पळा.
तकोवामध्ये तुतारी फुंका.
बेथ-हक्करेम वर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा.
हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे.
भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.
2 सियोनच्या कन्ये, तू सुंदर कुरणासारखी आहेस.
3 मेंढपाळ आपापले कळप
घेऊन यरुशलेमला येतात.
ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतात.
प्रत्येक मेंढपाळ स्वतःच्या कळपाची काळजी घेतो.
4 “यरुशलेमविरुद्ध् लढण्यास तयार व्हा.
उठा! आपण दुपारी नगरावर हल्ला करु
पण आधीच उशीर होत आहे.
संध्याछाया लांबत आहेत.
5 म्हणून उठा! आपण रात्रीच तिच्यावर हल्ला करु
या व यरुशलेमच्या भक्कम तटबंदीचा नाश करु या.”
6 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो,
“यरुशलेमच्या भोवतालची झाडे कापा
आणि तिच्याविरुद्ध् मोर्चा बांधा.
ह्या नगरीला शिक्षा व्हावीच
ह्या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही.
7 जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते,
तशीच यरुशलेम आपला दुष्टपणा ताजा ठेवते.
मी नेहमीच येथील लूटमार व हिंसाचार याबद्दल ऐकतो.
मी येथे सदोदित पीडा आणी घृणा पाहतो.
8 यरुशलेम, धोक्याचा इशारा ऐक.
जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन,
तुझ्या भूमीचे ओसाड वाळवंट करीन.
येथे कोणीही राहू शकणार नाही.”
9 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो
“इस्राएलमध्ये मागे उरलेल्या
इस्राएली लोकांना गोळा करा.
द्राक्षवेलींवरची उरलेली द्राक्षे तुम्ही जशी गोळा करता,
तसे त्यांना गोळा करा.
द्राक्ष गोळा करणारा जसा प्रत्येक वेल तपासतो,
तशी तुम्ही प्रत्येकाची तपासणी करा.”
10 मी कोणाशी बोलू शकतो?
मी कोणाला इशारा देऊ शकतो?
माझे कोण ऐकेल?
इस्राएलच्या लोकांनी आपले कान बंद करुन घेतले आहेत.
म्हणून ते माझा इशारा ऐकू शकत नाहीत.
लोकांना परमेश्वराची शिकवण आवडत नाही.
त्यांना परमेश्वराचा संदेश ऐकावासा वाटत नाही.
11 पण माझ्यात (यिर्मयात) परमेश्वराचा
राग पूर्ण भरला आहे.
“तो आतल्या आत दाबून धरण्याचा मला आता कंटाळा आला आहे.
रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर, एकत्र जमलेल्या तरुणांवर परमेश्वराचा राग ओत.
पुरुष व त्याची बायको असे दोघही, तसेच सर्व म्हातारे पकडले जातील.
12 त्यांची घरे दुसऱ्यांना दिली जातील.
त्यांची शेते व त्यांच्या बायका दुसऱ्यांना दिल्या जातील.
मी माझा हात उगारीन आणि यहूदातील लोकांना शिक्षा करीन.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
13 “इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे.
अति महत्वाचे व अति सामान्य, सर्व सारखेच आहेत.
संदेष्ट्यांपासून याजकापर्यंत सर्व खोटे बोलतात.
14 माझे लोक अतिशय वाईटरीतीने दुखावले जात आले आहेत.
संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात.
पण ते तर त्या जखमांवर, किरकोळ खरचटल्यावर करतात त्याप्रमाणे इलाज करतात.
ते म्हणतात, ‘ठीक आहे, ठीक आहे.’
पण हे ठीक नाही. [a]
15 संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे.
पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही.
आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही.
म्हणून बाकीच्यांबरोबर त्यांना शिक्षा होईल.
मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा
हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
16 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो:
“चौकात उभे राहा आणि पाहा.
जुना रस्ता कोणता ते विचारा.
चांगल्या रस्त्याची चौकशी करा व चांगल्या रस्त्यावरुन चाला.
तुम्ही असे केल्यास तुमचा तुम्हाला विश्वास सापडेल.
पण तुम्ही लोक म्हणाला आहात की, ‘आम्ही चांगल्या रस्त्यावरुन चालणार नाही.’
17 तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी रखवालदार निवडले.
मी त्यांना सांगितले, ‘रणशिंगाचा आवाज ऐका.’
पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकणार नाही.’
18 तेव्हा सर्व राष्ट्रांनो, ऐका!
त्या देशातील लोकांनो, लक्ष द्या.
19 पृथ्वीवरच्या लोकांनो, ऐका!
यहुदातील लोकांवर मी अरिष्ट आणणार आहे.
का? कारण त्यांनी हेतूपूर्वक दुष्कृत्ये केली.
माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष केले,
माझ्या आज्ञांचे पालन करण्याचे नाकारले.”
20 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही शेबाहून माझ्यासाठी धूप कशाला आणता?
दूरवरच्या देशातून सुगंधी काड्या कशाला आणता?
तुम्ही आणलेल्या ह्या अग्नीत अर्पण करण्याच्या गोष्टी मला आनंदित करीत नाहीत.
तुमचे यज्ञ मला संतुष्ट करीत नाहीत.”
21 मग परमेश्वर पुढे असे म्हणतो:
“मी यहूदाच्या लोकांपुढे अडचणी निर्माण करीन.
त्या वाटेत असलेल्या दगडाप्रमाणे असतील.
वाटेतल्या दगडाला अडखळून लोक पडतात, त्याप्रमाणे वडील व मुले अडखळून पडतील.
मित्र आणि शेजारी मरतील.”
22 परमेश्वर पुढे असे म्हणतो:
“उत्तरेकडून सैन्य येत आहे.
पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.
23 त्या सैनिकांजवळ धनुष्यबाण आहेत.
ते क्रूर आहेत. त्यांना दया माहीत नाही.
ते खूप शक्तिशाली आहेत.
ते घोड्यावर स्वार होऊन येतात, तेव्हा समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज येतो.
ते युद्धाच्या तयारीने येत आहेत.
सियोनच्या कन्ये, ते सैन्य तुझ्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे.
24 त्या सैन्याची बातमी आम्ही ऐकली आहे.
आम्ही भीतीने गर्भगळीत झालो आहोत.
आम्ही अडचणीत सापडलो आहोत असे वाटते.
प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे.
25 बाहेर शेतात जाऊ नका.
रस्त्यावर जाऊ नका.
का? कारण शत्रूजवळ तलवारी आहेत
आणि सगळीकडे धोका आहे.
26 माझ्या लोकांनो, शोकवस्त्रे घाला.
राखेत लोळा.
मृतांसाठी आक्रोश करा.
एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत करा.
कारण नाश करणारा अगदी
लवकरच आपल्याकडे येईल.
27 “यिर्मया, मी (देवाने) तुला धातू
पारखणाऱ्याप्रमाणे केले आहे.
तू माझ्या लोकांची परीक्षा कर
आणि ते कसे जगतात त्यावर नजर ठेव.
28 माझे लोक माझ्याविरुद्ध् गेले आहेत
आणि ते दुराग्रही आहेत.
ते लोकांबद्दल खोट्या गोष्टी बोलतात.
ते सर्व दुष्ट आहेत.
ते गंजलेल्या व कलंकित झालेल्या जस्त वा लोखंडाप्रमाणे आहेत.
29 चांदी शुद्ध् करणाऱ्या कारागिराप्रमाणे ते आहेत.
फुंकणीने जोरात फुंकताच विस्तवाचा जाळ झाला
आणि त्यातून शिसे बाहेर आले. [b]
चांदी शुध्द् करण्याच्या प्रयत्नात
त्या कारागिराने आपला वेळ वाया घालविला.
त्याचप्रमाणे माझ्या लोकांमधून
दुष्टपणा काढला गेला नाही.
30 माझ्या लोकांना, ‘टाकाऊ चांदी’ असे म्हटले जाईल.
देवाने त्यांचा स्वीकार केला नाही म्हणून
त्यांना हे नाव दिले जाईल.”
यिर्मयाचे मंदिरातील प्रवचन
7 यिर्मयासाठी परमेश्वराचा संदेश: 2 “यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दाराजवळ उभा राहा आणि हा उपदेश कर:
“‘यहूदातील सर्व लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. देवाची पूजा करण्यासाठी आत येणाऱ्या सर्व लोकांनो, ऐका! 3 परमेश्वर हा इस्राएलच्या लोकांचा देव आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो तुमची जगण्याची पद्ध् बदला आणि सत्कृत्ये करा. तुम्ही असे केल्यास मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन [c] 4 काही लोक खोटे बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका. ते म्हणतात “हे परमेश्वराचे मंदिर आहे. परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर.” 5 तुम्ही तुमचा जीवनमार्ग बदललात आणि सत्कृत्ये केलीत तर मी तुम्हाला येथे राहू देईन. तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक असले पाहिजे. 6 तुम्ही अपरिचिताशीसुध्दा प्रामाणिकपणे वागले पाहिजे. विधवांसाठी आणि अनाथांसाठी तुम्ही योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. निरपराध्यांना मारु नका. दुसऱ्या देवांना अनुसरु नका. का? कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा नाश करतील. 7 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात, तर मी तुम्हाला येथे राहू देईन. मी ही भूमी कायमची तुमच्या पूर्वजांना दिली.
8 “‘पण तुम्ही ज्या लबाड्यांवर विश्वास ठेवत आहात, त्या लबाड्या कवडीमोलाच्या आहेत. 9 तुम्ही चोरी आणि खून कराल का? तुम्ही व्यभिचाराचे पाप कराल का? तुम्ही दुसऱ्यांवर खोटे आरोप कराल का? तुम्ही बआल देवाची पूजा कराल का? तुम्हाला माहीत नसणाऱ्या इतर दैवतांना अनुसराल का? 10 तुम्ही ही अशी पापे केलीत तर तुम्ही माझ्या नावाच्या या घरात माझ्यासमोर उभे राहू शकाल असे तुम्हाला वाटते का? अशा भयंकर गोष्टी करुन तुम्ही माझ्यासमोर उभे राहून म्हणू शकाल का “आम्ही सुरक्षित आहोत?” 11 हे मंदिर माझ्या नावाचे आहे. तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का? मी तुमच्यावर नजर ठेवून आहे.’” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
12 “‘यहूदातील लोकांनो, आता तुम्ही शीलो गावात जा. माझ्या नावाचे पहिले घर मी जेथे बांधले, तेथे जा. इस्राएलमधील लोकांनीसुध्दा दुष्कृत्ये केली. त्याबद्दल मी काय केले, ते जाऊन पाहा. [d] 13 इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत होता. हा परमेश्वराचा संदेश आहे! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हाला बोलाविले, पण तुम्ही ओ दिली नाही. 14 म्हणून, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते यरुशलेममधील माझ्या नावाचे घर मी नष्ट करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन. 15 एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर फेकले, तसे मी तुम्हाला फेकीन.’
16 “यिर्मया, तुला सांगतो, यहूदाच्या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस. त्यांच्यासाठी याचना व आळवणी करु नकोस. त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. तू त्यांच्याकरिता केलेली प्रार्थना मी ऐकणार नाही. 17 ते लोक यहूदांच्या गावांतून काय करीत आहेत, हे तू पाहतोस, हे मला माहीत आहे. यरुशलेमच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसू शकते. 18 यहूदातील लोक काय करीत आहेत ते पाहा. मुले लाकडे गोळा करतात. वडील त्याचा उपयोग सरपण म्हणून करतात. ते विस्तव पेटवितात. बायका स्वर्गातील राणीला अर्पण करण्यासाठी भाकर तयार करतात. यहूदातील हे लोक इतर दैवतांची पूजा करताना दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेय ओततात. ते मला संताप आणण्यासाठी हे करतात. 19 पण यहूदातील लोक खरोखर ज्याला दुखवीत आहेत, तो मी नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते फक्त स्वतःला दुखवीत आहेत. ते स्वतःलाच लज्जित करीत आहेत.”
20 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी ह्या जागेवर माझा राग काढीन. मी माणसांना, प्राण्यांना, रानातील झाडांना आणि पिकांना शिक्षा करीन. माझा राग तप्त अग्नीप्रमाणे असेल. कोणीही तो विझवू शकणार नाही.”
परमेश्वराला बळींपेक्षा आज्ञापालन हवे आहे
21 सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलचा देव म्हणतो, “जा आणि तुम्हाला हवी तितकी होमार्पणे करा. तुम्हाला पाहिजे तितके यज्ञ द्या. त्या यज्ञ दिलेल्या पशूंचे मांस तुम्हीच खा. 22 मी तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले. मी त्यांच्याशी बोललो. पण अर्पण करण्याच्या गोष्टींबद्दल व बळींबद्दल मी त्यांना आज्ञा दिली नाही. 23 मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. ‘माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी माणसे व्हाल. मी आज्ञा करीन ते करा म्हणजे तुमचे भले होईल.’
24 “पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते दुराग्रही होते आणि त्यांना पाहिजे त्याच गोष्टी त्यांनी केल्या. ते सज्जन झाले नाहीत. उलट जास्तच दुष्ट झाले. पुढे येण्याऐवजी ते मागे गेले. 25 तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजपावेतो मी माझे सेवक तुमच्याकडे पाठविले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठविले. 26 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते खूप दुराग्रही होते. त्यांनी त्यांच्या वडिलांपेक्षा वाईट कृत्ये केली.
27 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या सर्व गोष्टी सांग पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना बोलाविलेस तरी ते तुला ओ देणार नाहीत. 28 म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस. ह्या राष्ट्रांने परमेश्वराच्या म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्या राष्ट्रांतील लोकांनी देवाची शिकवण ऐकली नाही. त्यांना खरी शिकवण माहीत नाही.
संहाराची दरी
29 “यिर्मया, तुझे केस कापून दूर फेकून दे. [e] उजाड डोंगरमाथ्यावर जा आणि रड. का? परमेश्वराने माणसांच्या ह्या पिढीला नाकारले आहे. परमेश्वराने ह्या लोकांकडे पाठ फिरविली आहे. रागाच्या भरात तो त्यांना शिक्षा करील. 30 हे असे कर कारण यहूदाच्या लोकांना पापे करताना मी पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी त्यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. मी त्या मूर्तीचा तिरस्कार करतो. माझ्या नावाच्या मंदिरात त्यांनी त्या मूर्ती स्थापिल्या आहेत. त्यांनी माझे घर ‘अपवित्र’ केले आहे. 31 यहूदाच्या लोकांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्या ठिकाणी लोक स्वतःच्या मुलामुलींना ठार मारतात आणि दैवताला अर्पण करण्यासाठी म्हणून जाळतात. अशी आज्ञा मी कधीही दिलेली नाही. असे काही माझ्या मनातही कधी आलेले नाही. 32 म्हणून मी तुम्हाला ताकीद देतो. असे दिवस येत आहेत.” हा परमेश्वराचा संदेश आहे, “लोक ह्या जागेला पुन्हा कधीही तोफेत वा बेन हिन्नोमची दरी असे म्हणणार नाहीत, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. असे नाव देण्याचे कारण हेच की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील. 33 मग बाकी मृत शरीरे उघडीच जमिनीवर पडतील आणि गिधाडांचे भक्ष्य होतील. वन्य पशू ती शरीरे खातील. त्या गिधाडांना अथवा वन्य पशूंना हाकलायला तेथे कोणीही जिवंत राहणार नाही. 34 यहूदाच्या गावांतील व यरुशलेमच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. यहूदात किंवा यरुशलेममध्ये पुन्हा कधीही वधू वरांचा शब्द उमटणार नाही. ती भूमी ओसाड वाळवंट होईल.”
8 हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे: “त्या वेळी, लोक यहूदाच्या राजाची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरुशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील. ते ती हाडे चंद्र सूर्य तारे यांच्या खाली जमिनीवर पसरती. यरुशलेमच्या लोकांना चंद्र सूर्य तारे यांच्यावर प्रेम करायला, त्यांना अनुसरायला, त्यांचा सल्ला घ्यायला आणि त्यांची पूजा करायला आवडते. कोणीही ती हाडे गोळा करुन परत पुरणार नाही. ती हाडे जमिनीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.
3 “मी यहूदातील लोकांना सक्तीने त्यांची घरे व त्यांचा देश सोडायला लावीन. लोकांना परक्या प्रदेशात नेले जाईल. यहूदातील जे दुष्टलोक युध्दात मारले गेले नाहीत, त्यांना आपण मारले गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल,” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
पाप आणि शिक्षा
4 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना हे सांग: ‘परमेश्वर असे म्हणतो:
“‘माणूस जमिनीवर पडल्यास
पुन्हा उठतो
व जर माणूस चुकीच्या मार्गाने गेला
तर फिरुन मागे येतो, हे तुम्हाला माहीत आहे.
5 यहूदाचे लोक चुकीच्या मार्गाने गेले (जगले)
पण यरुशलेममधील लोक चुकीच्या मार्गाने सतत का जात आहेत?
ते त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.
ते वळून परत येण्याचे नाकारतात.
6 मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे.
ते योग्य ते बोलत नाहीत.
त्यांना त्यांच्या पापाबद्दल पश्र्चाताप वाटत नाही.
त्यांनी केलेल्या वाईट कर्मांचा ते विचार करीत नाहीत.
विचार केल्याशिवाय ते गोष्टी करतात.
युद्धात दौडणाऱ्या घोड्यांसारखे ते आहेत.
7 आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा वेळेची
योग्य जाणीव असते.
करकोचे, पारवे, निळवी व सारस ह्यांना
नवीन घरट्यात केव्हा जायचे ते समजते.
पण माझ्या लोकांना, देवाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते कळत नाही.
8 “‘“आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत!” असे तुम्ही म्हणत राहता.
पण ते खरे नाही, का? कारण लेखक लेखण्यांच्या साहाय्याने खोटे बोलले आहेत.
9 त्या “शहाण्या लोकांनी” परमेश्वराची शिकवण ऐकण्याचे नाकारले
म्हणूनच ते अजिबात खरे शहाणे नाहीत.
ते “शहाणे लोक” सापळ्यात सापडले गेले.
त्यांना धक्का बसला. त्यांची अप्रतिष्ठा झाली.
10 म्हणून मी त्यांच्या बायका दुसऱ्यांना देईन.
त्यांची शेते नव्या मालकांना देईन.
इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे.
अती महत्वाचे व अति सामान्य सर्व सारखेच आहेत.
संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत सर्व खोटे बोलतात.
11 माझे लोक अतिशय वाईट रीतीने दुखावले जात आले आहेत.
संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात
पण ते तर त्या जखमांवर, किरकोळ खरचटल्यावर करतात, त्याप्रमाणे इलाज करतात.
ते म्हणतात, ‘ठीक आहे. ठीक आहेत.’
पण हे ठीक नाही.
12 संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे.
पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही.
आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही.
म्हणून बाकीच्यांबरोबर त्यांना शिक्षा होईल.
मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील.
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
13 “मी त्यांची फळे व पिके काढून घेईन.
मग तेथे सुगीचा हंगाम होणार नाही.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“वेलींवर एकही द्राक्ष नसेल.
अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल.
एवढेच नाही तर झाडांची पानेही सुकतील व गळतील.
मी त्यांना दिलेल्या गोष्टी काढून घेईन. [f]
14 “आपण येथे नुसतेच का बसलो आहोत?
या भक्कम शहराकडे पळून जाऊ या,
जर परमेश्वर आपला देव, आपल्याला मारणारच असेल तर आपण तेथेच मरु या.
आपण परमेश्वराविरुद्ध वागून पाप केले.
म्हणून देवाने आपल्याला विषारी पाणी प्यायला दिले.
15 आम्ही शांतीची आशा केली
पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही.
तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले
पण अरिष्टच आले.
16 दानच्या कुळाच्या मालकीच्या भूमीवरुन
येणाऱ्या शत्रूंच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज आम्ही ऐकतो.
त्यांच्या खुरांच्या दणदणाटाने जमीन हादरते.
ते ही भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा
नाश करण्यासाठी आले आहेत.
ते नगराचा व त्यात राहणाऱ्या सर्व लोकांना
नाश करण्यासाठी आले आहेत.
17 “यहूदाच्या लोकांनो, मी विषारी सर्प तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवीत आहे.
त्यांना आवरणे अशक्य आहे.
ते तुम्हाला दंश करतील.”
हा देवाकडून आलेला संदेश आहे.
18 देवा मी फार दु:खी आहे.
मी फार घाबरलो आहे.
19 माझ्या लोकांचे रडणे ऐक.
ह्या देशात सगळीकडे लोक मदतीसाठी आक्रोश करीत आहेत.
ते म्हणतात, “परमेश्वर अजून सियोनला आहे का?
सियोनचा राजा अजून तेथेच आहे का?”
पण देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांनी परक्या कवडीमोलाच्या मूर्तीची पूजा केली.
त्याने मला खूप राग आला.
त्यांनी असे का केले?”
20 लोक म्हणतात,
“सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा गेला,
आणि तरीही आम्हाला वाचवण्यात आले नाही.”
21 माझे लोक दुखावले म्हणजे मी दुखावलो.
मी दु:खातिरेकाने बोलू शकत नाही.
22 गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे.
तेथे नक्कीच वैद्य आहे.
मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?
इतर लोकांबरोबर राहण्याचे काही नियम
5 वडील माणसाला कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्याला बोध कर. 2 तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागीव.
3 ज्या विधवा खरोखरच निराधार आहेत त्यांची काळजी घे. 4 पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांची काळजी घेऊन आपला धर्म प्रत्यक्षात आणावा आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबांची परतफेड करावी. कारण हे देवाला मान्य आहे. 5 जी स्त्री खरी विधवा आहे, व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिची आशा देवावर असते व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत असते. 6 पण जी विधवा चैनीत राहते, ती जरी जिवंत असेल तरी ती खरोखर मेलेली आहे. 7 म्हणून लोकांना याविषयी निक्षन सांग, यासाठी की, कोणालाही त्यांच्याकडे दोष दाखविण्यास वाव राहणार नाही. 8 पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.
9 एखादी विधवा जी कमीत कमी साठ वर्षांची असेल, जिला सोडचिठ्ठी देण्यात आली नाही व जिचे दुसऱ्यांदा लग्न झाले नाही, अशाच स्त्रियांची विधवा म्हणून नोंद घ्यावी. 10 चांगले काम करण्याबद्दल तिचा नावलौकिक असेल व तिने मुलाबाळांना वाढवल असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, संताचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, तिचा विधवांच्या खास यादीत समावेश करावा.
11 पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे. कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते. 12 आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचे मूळ वचन मोडलेले असते. 13 आणखी, त्या आळशी, त्या आळशी बनतात व घरोघरी फिरतात. त्या आळशी बनतात एवढेच नाही तर इतर लोकांच्या भानगडीत स्वतःला गुरफटून घेतात व इतरांविषयी खोटनाटे बोलतात. ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात. 14 यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्ने करावीत. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या शत्रूला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये. 15 मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.
16 जर एखाद्या विश्वासणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा स्त्रिया असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी [a] व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या खरोखरच विधवा आहेत त्यांना ते मदत करु शकतील.
More About Elders and Other Matters
17 जे वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या योग्यतेचे समजावे, विशेषतः जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना. 18 कारण पवित्र शास्त्र म्हणने, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको. [b] आणि मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.” [c]
19 दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय वडिलावरील आरोप दाखल करु नकोस. 20 जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
21 देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करु नको.
22 देवाच्या सेवेसाठी नियुक्ती करण्याठी कोणावरही घाईने हात न ठेवण्याची सवय कर. इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
23 नुसतेच पाणी पिण्याचे थांबव आणि तुझ्या पचनासाठी व वारंवारच्या दुखण्यासाठी द्राक्षारसाचा वापर कर.
24 काही लोकांची पापे स्पष्ट आहेत. व ती त्यांच्याअगोदर न्यायालयात जातात पण दुसऱ्या लोकांची पापे त्यांच्या मागून जातात. 25 त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुध्दा कायमची लपविता येत नाहीत.
2006 by World Bible Translation Center