Old/New Testament
भाग पांचवा
((स्तोत्रसंहिता 107-150)
107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
कारण तो चांगला आहे.
त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
2 परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
3 परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.
4 त्यांतले काही वाळवंटात फिरले.
ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते
आणि अशक्त होत होते.
6 नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
7 देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
8 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि
तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
9 देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो.
देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
10 देवाची काही माणसे कैदी होती
आणि काळ्याकुटृ तुरुंगात गजांच्या आडबंद होती.
11 का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले.
त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
12 त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले.
ते अडखळले आणि पडले.
त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
13 ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले.
14 देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोठडीतूनबाहेर काढले,
ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला.
15 त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी
ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या.
16 देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव करायला मदत करतो.
देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो.
देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो.
17 पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात.
आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
18 त्या लोकांनी खायचे नाकारले
आणि ते जवळ जवळ मेले.
19 ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली.
आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले.
20 देवाने आज्ञा केली आणि
त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
21 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तो लोकांसाठी
करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
22 परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा.
परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.
23 काही लोक बोटीतून समुद्रापार जातात.
त्यांचे व्यवसाय त्यांना महासागरापार घेऊन गेले.
24 त्या लोकांनी परमेश्वर काय करु शकतो ते पाहिले.
त्याने समुद्रावर ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यांनी पाहिल्या.
25 देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला,
लाटा उंच उंच जायला लागल्या.
26 लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले
आणि खोल समुद्रात खाली टाकले.
वादळ इतके भयंकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले.
27 ते अडखळत होते आणि प्यायलेल्या माणसासारखे पडत होते.
खलाशी म्हणून असलेले त्यांचे कसब निरुपयोगी होते.
28 ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
29 देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले.
30 समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आनंदित झाले.
देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले.
31 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल
आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
32 देवाची मोठ्या सभेत स्तुती करा.
वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.
33 देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले.
देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
34 देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले.
का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
35 देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले.
देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
36 देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले
आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
37 त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली
आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
38 देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला.
त्यांचे कुटुंब वाढले.
त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
39 अरिष्टे आणि संकटे यांमुळे त्यांची कुटुंब लहान
आणि अशक्त राहिली.
40 देवाने त्यांच्या प्रमुखाला लज्जित केले
आणि ओशाळवाणे वाटायला लावले
आणि त्याला खाली पाहायला लावले.
देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिंडायला लावले.
41 पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली
आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.
42 चांगले लोक हे बघतात आणि आनंदी होतात.
पण दुष्ट लोक ते बघतात आणि काय बोलावे ते त्यांना सुचत नाही.
43 जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील
नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.
दावीदाचे एक स्तुतिगीत.
108 देवा, मी तयार आहे.
मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
2 वीणांनो आणि सतारींनो,
आपण सुर्याला जाग आणू या.
3 परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु.
आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.
4 परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे.
तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
5 देवा, स्वर्गाच्याही वर उंच जा.
सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
6 देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर.
7 देव त्याच्या मंदिरात बोलला,
“मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन.
मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
8 गिलाद आणि मनश्शे माझी असतील.
एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल.
यहुदा माझा राजदंड असेल.
9 मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल.
अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल.
मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद करीन.”
10 मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल?
मला अदोमशी लढायला कोण नेईल?
11 देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस.
पण तू आम्हाला सोडून गेलास.
तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
12 देवा, आम्हाला आमच्या शत्रूंचा पराभव करायला मदत कर.
लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.
13 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो.
देव आमच्या शत्रूंचा पराभव करु शकतो.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
109 देवा, माझ्या प्रार्थनेला
तुझे कान बंद करु नकोस.
2 दुष्ट लोक माझ्याविषयी खोटंनाटं सांगत आहेत.
ते माझ्याबद्दल असत्य गोष्टी सांगत आहेत.
3 लोक माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगत आहेत.
ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत.
4 मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करतात म्हणून देवा,
मी आता तुझी प्रार्थना करतो.
5 मी त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या
पण ते माझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत.
मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करत होते.
6 “माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
ते चुकले आहेत हे सिध्द करण्यासाठी एखादा माणूस शोध.
7 माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे.
माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते.
8 माझ्या शत्रूला लवकर मरु दे.
त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे.
9 माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ
आणि त्याच्या बायकोला विधवा कर.
10 त्यांना त्यांचे घर गमावू दे
आणि त्यांना भिकारी होऊ दे.
11 माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे
आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.
12 माझ्या शत्रूंशी कुणीही दयाळू असू नये असे मला वाटते.
त्याच्या मुलांना कुणी दया दाखवू नये असे मला वाटते.
13 माझ्या शत्रूचा संपूर्ण नाश कर.
पुढच्या पिढीला त्याचे नाव सर्व गोष्टीवरुन काढून टाकू दे.
14 परमेश्वराला माझ्या शत्रूच्या वडिलांच्या पापांची आठवण करुन दिली जाईल असे मला वाटते,
त्याच्या आईची पापे कधीही पुसली जाऊ नयेत असे मला वाटते.
15 परमेश्वराला त्या पापांची सदैव आठवण राहील अशी मी आशा करतो.
आणि तो लोकांवर माझ्या शत्रूला पूर्णपणे विसरुन जायची शक्ती देईल अशी मी आशा करतो.
16 का? कारण त्या दुष्ट माणसाने कधीही काहीही चांगले केले नाही,
त्याने कधीच कुणावर प्रेम केले नाही.
त्याने गरीब, असहाय्य लोकांचे आयुष्य कष्टी केले.
17 त्या दुष्ट माणसाला दुसऱ्या लोकांचे वाईट कर
असे सांगायला आवडायचे म्हणून त्या वाईट गोष्टी त्या माणसालाच होऊ दे.
तो दुष्ट माणूस लोकांचे भले होवो
असे कधीही म्हणाला नाही, म्हणून त्याचेही भले होऊ देऊ नकोस.
18 शाप हेच त्याचे कपडे असू दे.
शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे.
शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.
19 शाप त्या दुष्ट माणसांच्या शरीराभोवती गुंडाळण्याचे वस्त्र असू दे,
आणि शापच त्यांच्या कमरे भोवतीचा पट्टा असू दे.”
20 परमेश्वर या सगळ्या गोष्टी माझ्या शत्रूंच्या बाबतीत करील अशी मी आशा करतो.
जे लोक मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत,
त्या सर्वांना परमेश्वर या गोष्टी करेल अशी मी आशा करतो.
21 परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस म्हणून
तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल अशा रीतीने मला वागव.
माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे म्हणून मला वाचव.
22 मी फक्त एक गरीब, असहाय्य माणूस आहे.
मी खरोखरच दुखी: आहे आणि माझे ह्रदयविदीर्ण झाले आहे.
23 दिवसाच्या शेवटी येणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य संपले आहे असे मला वाटते.
कुणीतरी झटकून टाकलेल्या किड्याप्राणे मी आहे असे मला वाटते.
24 मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडघ्यातली शक्ती क्षीण झाली आहे.
माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे.
25 वाईट लोक माझा अपमान करतात.
ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.
26 परमेश्वरा, देवा, मला मदत कर.
तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर.
27 नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल.
तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल.
28 ते वाईट लोक मला शाप देतात.
परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस.
त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईन.
29 माझ्या शत्रूंना लाज आण.
त्यांना त्यांची लाजच अंगरख्या प्रमाणे घालायला लाव.
30 मी परमेश्वराला धन्यवाद दिले.
खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली.
31 का? कारण परमेश्वर असहाय्य लोकांच्या मदतीसाठी उभा राहातो
जे लोक त्यांना ठार मारायची शिक्षा देतात त्यांच्यापासून देव त्यांना वाचवतो.
ख्रिस्ताचे प्रेषित
4 एखाद्या व्यक्तीने आम्हाविषयी अशा प्रकारे समजावे: ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी. 2 आणखी असे की, जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे. 3 पण तुम्हांकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा याबद्दल मला काही वाटत नाही, किंवा मी माझा स्वतःचादेखील न्याय करीत नाही. 4 कारण माझी विवेकबुद्धी शुद्ध आहे, पण त्यामुळे मी निर्दोष ठरत नाही. प्रभु हाच माझा न्यायनिवाडा करतो. 5 म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभु येईपर्यंत न्यायनिवाडा करु नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतः करणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
6 बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरीता व अपुल्लोसाकरीता लागू केल्या आहेत. यासाठी की “पवित्र शास्त्र सांगते त्यापलीकडे जाऊ नका,” हे आमच्या उदाहरणावरुन तुम्ही शिकावे व तुम्ही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करु नये. 7 कोण म्हणतो की तू दुसऱ्यापेक्षा चांगला आहेस? आणि तुझ्याजवळ असे काय आहे जे तुला मिळाले नाही? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
8 तुम्हांला असे वाटते की, तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हांला असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही खरोखरच राजे होता, यासाठी की आम्ही तुमच्यासह राजे झालो असतो. 9 कारण मला वाटते की देवाने आम्हांला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जाहीर प्रदर्शनसारखे झालो आहोत. 10 आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये किती हुशार आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही किती बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत! 11 अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, फाटकेतुटके कपडे घातलेले, ठोसे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत. 12 आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, 13 जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद दतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.
14 मी तुम्हांला हे लाजविण्यासाठी लिहित नाही: तर उलट मी तुम्हांला माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करुन देतो, 15 कारण जरी तुम्हांला खिस्तामध्ये दहा हजार पालक असले तरी पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगे मी तुम्हांला जन्म दिला आहे, 16 यास्तव मी तुम्हांला बोध करतो की, माझे अनुकरण करा. 17 यासाठीच तिमथ्याला तुमच्याकडे पाठविले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी त्यांना सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवितो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणूकीची आठवण करुन देईल.
18 पण जणू काय मी तुमच्याकडे येणारच नव्हतो, म्हणून काही जण गर्वाने फुगले होते. 19 तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले वक्ते आहेत हे नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत, हे मला समजेल. 20 कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते. 21 तुम्हांला कोणते पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हांला शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे की, प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?
2006 by World Bible Translation Center