Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 26-28

लोकांची मोजणी (गणना) केली

26 मोठ्या आजारानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला: तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.”

त्या वेळी लोकांनी मवाबमधील यार्देन नदीच्या खोऱ्यात तळ दिला होता. तो यरीहोंच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होता. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार लोकांशी बोलले, ते म्हणाले, “वर्षावरील प्रत्येक माणूस तुम्ही मोजा. परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली आहे.”

मिसरमधून आलेल्या इस्राएल लोकांची ही यादी आहे.

जे लोक रऊबेनच्या कुळातून आले (रऊनबेन हा इस्राएलचा (याकोब) पहिला मुलगा होता.)

ती कुळे म्हणजे: हनोखचे हनोखी कूळ,

पल्लूचे पल्लूवी कूळ.

हेस्रोनचे हेस्रोनी कूळ,

कर्मीचे कर्मी कूळ.

रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.

पल्लूचा मुलगा अलियाब. अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला. 10 त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता. 11 परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मेले नाहीत.

12 शिमोनाच्या कुळातलीही काही कुळे

नमुवेलाचे नमुवेली कूळ.

यामीनाचे यामीनी कूळ.

याकीनाचे याकीनी कूळ.

13 जेरहाचे जेरही कूळ.

शौलाचे शौली कूळ.

14 ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते.

15 गाद कुळातून जी कुळे निर्णाण झाली ती अशी:

सफोनाचे सफोनी कूळ.

हग्गीचे हग्गी कूळ.

शूनीचे शूनी कूळ.

16 आजनीचे आजनी कूळ.

एरीचे एरी कूळ.

17 अरोदचे अरोदी कूळ.

अरलीचे अरेली कूळ.

18 गादच्या कूळातील ही कूळे. त्यात एकूण 40,500 पुरुष होते.

19-20 यहुदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशी:

शेलाचे शेलानी कूळ,

पेरेसाचे पेरेसी कूळ,

जेरहाचे जेरही कूळ.

(यहुदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.)

21 पेरेसच्या कुळातील ही कूळे:

हेस्रोनचे हेस्रोनी कूळ,

हामूलचे हामूली कूळ.

22 ही यहुदाच्या कुळातील कुळे. त्यात एकूण 76,500 पुरुष होते.

23 इस्साखारच्या कुळातील काही कुळे अशी:

तोलाचे तोलाई कूळ,

पूवाचे पुवाई कूळ.

24 याशूबचे याशूबी कूळ,

शिम्रोनचे शिम्रोनी कूळ.

25 इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते.

26 जुबुलूनच्या कुळातील कुळे:

सेरेदचे सेरेदी कूळ,

एलोनचे एलोनी कूळ,

याहलेलचे याहलेली कूळ.

27 जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते.

28 योसेफची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली. 29 मनश्शेच्या कुळातील कुळे:

माखीरचे माखीरी कूळ (माखीर गिलादचा बाप होता.)

गिलादचे गिलादी कूळ.

30 गिलादची कूळे होती:

इयेजेराचे इयेजेरी कूळ,

हेलेकचे हेलेकी कूळ.

31 अस्रियेलाचे अस्रियेली कूळ.

शेखेमाचे शेखेमी कूळ.

32 शमीदचे शमीदाई कूळ

व हेफेरचे हेफेरी कूळ.

33 हेफेरचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती-फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.

34 ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण 52,700 पुरुष होते.

35 एफ्राइमच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती:

शूथेलाहाचे शूथेलाही कूळ.

बेकेराचे बेकेरी कूळ

व तहनाचे तहनी कूळ.

36 एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता.

एरानचे कूळ एरानी.

37 ही एफ्राइमच्या कुळातील कुळे: त्यात 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफच्या कुळातील होते.

38 बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती:

बेलाचे बेलाई कूळ.

आशबेलाचे आशबेली कूळ.

अहीरामचे अहीरामी कूळ.

39 शफूफामचे शफूफामी कूळ.

हुफामचे हुफामी कूळ.

40 बेलाची कुळे होती:

अर्दचे अर्दी कूळ

नामानचे नामानी कूळ.

41 ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती.

42 दानच्या कुळातील कुळे होती:

शूहामचे शूहामी कूळ.

हे कूळे दानच्या कुळातील होते. 43 शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या 64,400 होती.

44 आशेरच्या कुळातील कुळे होती:

इम्नाचे इम्नाई कूळ.

इश्वीचे इश्वी कूळ.

बरीयाचे बरीयाई कूळ.

45 बरीयाच्या कुळातील कुळे होती:

हेबेरचे हेबेराई कूळ.

मलकीएलचे मलकीएली कूळ.

46 (आशेरला सेरा नावाची मुलगी होती) 47 ही सगळे लोक आशेरच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती.

48 नफतालीच्या कुळातील कुळे होती:

यहसेलचे यहसेली कूळ.

गूनीचे गूनी कूळ.

49 येसेरचे येसेरी कूळ

व शिल्लेमचे शिल्लेमी कूळ.

50 ही नफतालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती.

51 म्हणजे इस्राएलमधील एकूण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.

52 परमेश्वर मोशेला म्हणाला, 53 “जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल. 54 मोठ्या कुळाला जास्त जमीन मिळेल आणि लहान कुळाला कमी जमीन मिळेल. त्यांना जी जमीन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या माणसांच्या समप्रमाणात असेल. 55 पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल. 56 प्रत्येक लहान अणि मोठ्या कुळाला जमीन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्या टाकशील.”

57 त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांचीही गणती केली. लेव्याच्या कुळातील कुळे ही होती:

गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ.

कहाथचे कहाथी कूळ

मरारीचे मरारी कूळ.

58 लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती:

लीब्नी कूळ.

हेब्रोनी कूळ.

महली कूळ.

मूशी कूळ.

कोरही कूळ.

अम्राम कोहाथच्या कुळातील होता. 59 अम्रामच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.

60 नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते. 61 पण नादाब व अबीहू मेले. ते मेले कारण त्यांनी परमेश्वराने परवानगी न दिलेल्या अग्नीने अर्पणे केली.

62 लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23,000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही.

63 मोशे आणि याजक एलाजार यांनी ते यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाब येथे होते तेव्हा लोक मोजले. हे यरीहोच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होते. 64 खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते. 65 कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा.

सलाफहादची मुलगी

27 सलाफहाद हेफरचा मुलगा होता. हेफर गिलादचा मुलगा होता. गिलाद माखिरचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. मनश्शे योसेफचा मुलगा होता. सलाफहादला पाच मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. या पाच स्त्रिया दर्शन मंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्राएलचे लोक यांच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या.

त्या पाच मुली म्हणाल्या, “आम्ही वाळवंटातून प्रवास करीत असताना आमचे वडील गेले. त्यांना नैसर्गिक मरण आले. ते कोरहाच्या समूहाला मिळण्यांपैकी नव्हते (कोरह हा परमेश्वराच्या विरुद्ध जाणाऱ्यापैकी होता.) पण आमच्या वडिलांना एकही मुलगा नव्हता. याचा अर्थ असा की आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही. आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही हे योग्य नाही. त्यांचे नाव संपून जाईन कारण त्यांना मुले नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की आमच्या वडिलांच्या भावांना जी जमीन मिळेल त्यातली थोडी आम्हाला द्या.”

तेव्हा मोशेने परमेश्वराला त्याने काय करायला हवे ते विचारले. परमेश्वर त्याला म्हणाला, “सलाफहादच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या भावांना मिळणाऱ्या जमिनीत त्यांचाही वाटा असायला पाहिजे. म्हणून त्यांच्या वडिलांना जी जमीन मिळाली असती ती त्यांना दे.”

“इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: ‘जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो मेला तर त्याच्या मुलींना त्याचे सर्व काही मिळावे. जर त्याला मुलीही नसल्या तर त्याची मिळकत त्याच्या भावांना मिळावी. 10 जर त्याला भाऊही नसला तर त्याच्या वस्तू त्याच्या वडिलांच्या भावाला मिळाव्या. 11 जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याची सगळी मिळकत घरातल्या सगव्व्यात जवळच्या नातेवाईकाला मिळावी.’” इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेशवराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.

यहोशवा नवीन पुढारी झाला

12 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या वाळवंटातील डोंगरावर जा. मी इस्राएल लोकांना जी जमीन देणार आहे ती तुला तेथे दिसेल. 13 तू ही जागा बघितल्यानंतर तू तुझ्या भावाप्रमाणे. अहरोनाप्रमाणे मरशील. 14 जेव्हा लोक त्सीनच्या वाळवंटात पाण्यासाठी रागावले होते तेव्हा तुम्ही दोघांनी. तू आणि अहरोनाने माझ्या आज्ञा पाळायला नकार दिला. तुम्ही मला मान दिला नाही आणि लोकांना मी पवित्र आहे असे दाखवले नाही.” (हे त्सीनच्या वाळवंटात कादेश जवळ मरिबाच्या पाण्याजवळ घडले.)

15 मोशे परमेश्वराला म्हणाला, 16 “लोक काय विचार करतात ते परमेश्वर देवाला कळते. 17 परमेश्वरा, मी प्रार्थना करतो की तू या लोकांसाठी [a] नेता निवडशील.” 18 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा. तो खूप शहाणा [b] आहे. त्याला नवीन नेता कर. 19 त्याला याजक एलाजार आणि इतर लोकांसमोर उभे रहायला सांग आणि नंतर त्याला नेता कर.

20 “लोकांना असे दाखव की तू त्याला नेता करीत आहेस. नंतर सर्व लोक त्याच्या आज्ञा पाळतील. 21 जर यहोशवाला काही निर्णय घ्यायचे असतील तर तो याजक एलाजारकडे जाईल. एलाजार उरीमचा उपयोग करुन परमेशवराचे उत्तर माहीत करुन घेईल. नंतर यहोशवा आणि इस्राएलचे सर्व लोक देवाच्या सांगण्याप्रमाणे करतील. जर तो म्हणेल की, ‘युद्ध करा,’ तर ते युद्ध करतील. आणि त्याने सांगितले की ‘घरी जा’, तर ते घरी जातील.”

22 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. त्याने यहोशवाला एलाजारच्या आणि लोकांच्या पुढे उभे राहाण्यास सांगितले. 23 नंतर मोशेने तो नवीन नेता आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. परमेश्वराने त्याला जसे सांगितले होते तसेच त्याने केले.

रोजची अर्पणे

28 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएल लोकांना ही आज्ञा दे. योग्यवेळी धान्यार्पणे आणि बळी न विसरता मला अर्पण करायला त्यांना सांग. अग्नी बरोबर देण्याची ती अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो. अग्नीबरोबरची अर्पणे त्यांनी परमेश्वराला दिलीच पाहिजेत. त्यांनी रोज एक वर्षाची दोन कोकरे दिली पाहिजेत. ती दोषरहित असली पाहिजेत. एक कोकरू सकाळच्या वेळी आणि दुसरे संधिप्रकाशाच्या वेळी अर्पण करावे. शिवाय आठ कप पीठ पाव कप हीन तेलात मिसळून केलेले धान्यार्पणही द्यावे.” (ही रोजची अर्पणे देणे त्यांनी सीनाय पर्वतावर सुरु केले. ही अग्नी बरोबर दिलेली अर्पणे होती. त्यांचा सुवास परमेश्वराला प्रसन्न करीत असे.) “लोकांनी धान्यार्पणाबरोबरच दिली जाणारी पेयाअर्पणेसुद्धा द्यावीत. त्यांनी एक पाव द्राक्षाचा रस प्रत्येक मेंढी बरोबर द्यावा. हे पेय वेदीवर एका पवित्र जागेवर ओतावे. ती परमेश्वराला द्यावयाची भेट आहे. दुसरी मेंढी संधिप्रकाशाच्या वेळी अर्पणे करावी. ही शिजवलेली असावी हे अर्पण सकाळच्या अर्पणाप्रमाणेच द्यावे. तसेच त्याबरोबरची पेयार्पणेही करावीत. हे होमार्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंद देतो.”

शब्बाथची अर्पणे

“शब्बाथच्या वेळी तुम्ही एक वर्षाच्या दोन मेंढ्या दिल्या पाहिजेत. त्या दोषरहित असाव्यात. तुम्ही 16 कप पीठ हीन तेलात मिसळून केलेले धान्याचे अर्पण आणि पेयाचे अर्पणही दिले पाहिजे. 10 विश्रांतीच्या दिवसाचे हे खास अर्पण आहे. रोज देण्यात येणारे अर्पण आणि पेयार्पणा व्यतीरिक्त हे अर्पण आहे.”

महिन्याच्या सभा

11 “प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात. 12 प्रत्येक बैलाबरोबर तुम्ही 24 कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. आणि मेंढ्याबरोबर 16 कप पीठ हीन तेलात मिसळून द्या. 13 प्रत्येक मेंढीबरोबर आठ कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. ही अग्नीबरोबर द्यायची अर्पणे असतील. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो. 14 तसेच प्रत्येक बैलाबरोबर 2 हिन द्राक्षारस, 1 1/2 हिन द्राक्षारस प्रत्येक मेंढ्याबरोबर आणि 1 हिन प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करा. ही होमार्पणे प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्याला अर्पण केली पाहिजेत. 15 प्रत्येक दिवशी करण्यात येणाऱ्या अर्पणा व्यतिरिक्त तुम्ही 1 बकरा परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. तो पापार्पण म्हणून द्यावा.

वल्हांडण

16 “परमेश्वराचा वल्हांडण महिन्याच्या 14 व्या दिवशी असेल. 17 बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या 15 व्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय (यीस्ट) केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता. 18 या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही कुठलेही काम करायचे नाही. 19 तुम्ही परमेश्वराला होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत. 20-21 या बरोबरच 24 कप पीठ तेलात मिसळून केलेले धान्यार्पण प्रत्येक बैलाबरोबर, 16 कप पीठ मेंढ्याबरोबर व आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर द्या. 22 तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हाला शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल. 23 ही अर्पणे नेहमीच्या सकाळच्या अर्पणाव्यतिरिक्त करायची आहेत.

24 “त्याचबरोबर सात दिवस दररोज ही होमार्पणे आणि पेयार्पणे तुम्ही परमेश्वराला दिली पाहिजेत. त्यांच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होईल. ही अर्पणे म्हणजे लोकांचे अन्न असेल. ही अर्पणे नेहमीच्या होमार्पणाव्यतिरिक्त असतील.

25 “नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही एक खास सभा घ्याल. तुम्ही त्या दिवशी काहीही काम करणार नाही.

सप्ताहांचा सण

26 “पहिल्या फळाच्या हंगामाच्या सणाला (सप्ताहांचा सण) परमेश्वराला धान्यार्पणे देण्यासाठी नवीन धान्य वापरा. त्यावेळी तुम्ही एक खास सभाही बोलवा त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही. 27 तुम्ही होमार्पणे द्यावे. अग्नीबरोबर दिलेली ही अर्पणे असतील. तुम्ही दोन बैल, एक मेंढा व 1 वर्षाची साकोकरे अर्पण करा. हि सर्व दोषरहित असावीत. 28 तुम्ही प्रत्येक बैलाबरोबर 24 कप पीठ तेलात मिसळून द्यावे. 16 कप पीठ मेंढ्याबरोबर 29 व आठ कप पीठ प्रत्येक कोकऱ्या बरोबर द्यावे. 30 स्वतःला शुद्ध करण्यासाठी तुम्ही एक बकरा बळी द्या. 31 रोजच्या होमार्पणाशिवाय व धान्यर्पणाशिवाय तुम्ही ही अर्पणे द्या. प्राणी आणि पेय दोषरहित आहेत याची खात्री करा.

मार्क 8

येशू चार हजारांपेक्षा अधिक लोकांना जेवू घालतो(A)

त्या दिवसात आणखी एका वेळी लोकांचा मोठा समुदाय जमला. त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांस बोलाविले आणि त्यांना म्हणाला, “मला या लोकांचा कळवळा येतो कारण तीन दिवसांपासून ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. मी जर त्यांना उपाशी घरी पाठविले तर ते रस्त्यातच शुद्ध हरपून पडतील. त्यांच्यातील काही फार दुरून आले आहेत.”

त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “या निर्जन जागी एवढ्या लोकांना पुरतील इतक्या भाकरी कोण मिळवू शकेल काय?”

येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”

शिष्य म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत.”

नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या. नंतर त्यानी त्या लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते मग त्याने त्यावर आभार मानले व त्यांना तेही वाढावयास दिले.

लोक जेवुन तृप्त झाले. उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या. तेथे सुमारे चार हजार पुरुष होते. नंतर त्याने त्यांना घरी पाठवले. 10 आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला व दल्मनुथा प्रांतात आला.

परूशी येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात(B)

11 मग परूशी आले व त्याला प्रश्न विचारू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याला स्वर्गातून चिन्ह मागितले. 12 आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांस सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.” 13 नंतर त्याने त्यांना सोडले व तो नावेत जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला.

येशू यहूदी पुढाऱ्यांविरुद्ध इशारा देतो(C)

14 शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते. एका भाकरीशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. 15 येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.”

16 मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तसे बोलला की काय?”

17 ते काय बोलतात हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हांला समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? 18 तुमचे डोळे आंधळे आहेत काय? तुमचे कान बहिरे आहेत काय? आपल्याकडे पुरेशा भाकरी नसताना मी काय केले हे तुम्हांला आठवत नाही काय? 19 पाच हजारांसाठी मी पाच भाकरी मोडल्या तेव्हा जे खाल्ले गेले नाही अशा भाकरींच्या किती टोपल्या तुम्ही गोळा केल्या ते आठवा.”

शिष्यांनी उत्तर दिले, “बारा टोपल्या.”

20 “चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?”

शिष्यांनी उत्तर दिले, “सात टोपल्या.”

21 मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हांला समजत नाही काय?”

येशू बेथसैदा येथील आंधळ्याला बरे करतो

22 ते बेथसैदा येथे आले आणि काही जणांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व येशूने त्याला स्पर्श करावा अशी विनंति केली. 23 मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यात थुंकला व त्याच्यावर हात ठेवून त्याने विचारले, “तुला काही दिसते काय?”

24 त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसतात व सभोवताली झाडे चालत असल्यासारखी दिसतात.”

25 नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दृष्टी आली. त्याला सर्व काही स्पष्ट दिसु लागले 26 येशूने त्याला, “त्या गावात पाऊलदेखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले.

पेत्र म्हणतो की येशू हा रिव्रस्त आहे(D)

27 मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पै कैसरीयाच्या आसपासच्या खेड्यात गेले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांस विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?”

28 त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही जण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहा असे म्हणतात.”

29 मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हांला मी कोण आहे असे वाटते?”

पेत्राने उत्तर दिले, “तू रिव्रस्त आहेस.”

30 येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.”

येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(E)

31 तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:ख भोगावे. वडील, मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे. 32 त्याने हे स्पष्टपणे सांगितले,

तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्याला दटावू लागला. 33 परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना माझ्यापुढून निघून जा. देवाच्या गोष्टीविषयी तुला काही वाटत नाही. तुझे लक्ष देवाच्या गोष्टीकडे लागलेले नाही, तर फक्त मानवाच्या दृष्टिकोणातून महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे आहे.”

34 नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलाविले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा. आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे. 35 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जिवाला मुकेल व जो कोणी माइयासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. 36 मनुष्याने सर्व जग मिळविले व जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? 37 जिवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? 38 या व्यभिचारी आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center