Old/New Testament
11 “दारयावेश हा मेदी ज्या वर्षी गादीवर बसला, [a] त्या वर्षो मी पारसच्या राजपुत्राच्या (देवदूताच्या) विरुध्द मिखाएलच्या बाजूने लढण्यास उभा राहिलो.
2 “आता दानीएल मी तुला सत्य काय आहे ते सांगतो. पारसमध्ये अजून तीन राजे होतील. मग एक चौथा राजा येईल. हा राजा पारसच्या आधीच्या राजांपेक्षा खूपच धनवान असेल. सत्ता मिळवायला तो संपत्तीचा उपयोग करील तो प्रत्येकाला ग्रीसविरुध्द जायला लावील. 3 मग एक बलवान व शक्तिशाली राजा येईल मोठ्या अधिकाराने तो सत्ता गाजवेल त्याला पाहिजे ते तो करील 4 तो येताच त्याच्या राज्याचे तुकडे पडतील जगाच्या चार भागांत त्याच्या राज्याचे विभाजन होईल.त्या राजाची मुले किंवा नातवंडे ह्यांच्यात त्याचे राज्य विभागले जाणार नाही. त्याच्यासारखी त्याच्या राज्याला सत्ता मिळणार नाही का? कारण त्याचे राज्य हिसकावून घेतले जाईल व इतरांना दिले जाईल.
5 “दक्षिणेचा राजा बलवान होईल पण मग त्याचाच एक सेनापती त्याचा पराभव करील. सेनापती राज्या करू लागेल व तो खूपच सामर्थ्यवान होईल.
6 “मग काही वर्षानी दक्षिणेचा राजा व तो सेनापती एक करार करतील. दक्षिपेच्या राजाची मलगी उत्तरेच्या राजाशी लग्र करील शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून ती असे करील.पण ती व दक्षिणेचा राजा पुरेसे शक्तिशाली नसतील. लोक तिच्याविरुध्द, तिला त्या देशात आणणाऱ्याविरुध्द तसेच अपत्य व तिला मदत करणारा या सर्वाविरुध्द उठतील.
7 “पण तिच्याच कुटुंबातील एकजण (दक्षिणेच्या राजाची)जागा घेईल तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर हल्ला करील. 8 तो त्यांच्या देवतांच्या मूर्तो, धातूच्या मूर्तो आणि सोन्या चांदीच्या किंमती वस्तू घेईल तो त्या वस्तू मिसरला नेईल मग काही वर्षे तो उत्तरेच्या राजाला त्रास देणार नाही, 9 उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राज्यावर हल्ला करील पण त्याचा पराभव होईल व तो आपल्या देशाला परत जाईल.
10 “उत्तरेच्या राजाची मुले युध्दाची तयारी करतील. ते मोठे सैन्य जमवितील जोरदार पुराप्रमाणे ते सैन्य चटकन देश पार करील. दक्षिणेच्या राजाच्या भक्कम किल्ल्यावरसुध्दा ते सैन्य हल्ला करील. 11 मग दक्षिणेचा राजा खूप चिडेल. तो उत्तरेच्या राजावर चालून जाईल. उत्तरेच्या राजाजवळ मोठे सैन्य असूनसुध्दा त्याचा पराभव होईल. 12 उत्तरेच्या सैन्य़ाचा पराभव होईल व त्या सैनिकांना धरून नेतील दक्षिणेच्या राजाला गर्व होईल. तो उत्तरेचे हजारो सैनिक ठार करील.पण त्याचे येस फर काळ टिकणार नाहि 13 उत्तरेचा राजा दुसरे सैन्य जमवेल ते पहिल्या सैन्याहूनही मोठे असेल खूप वर्षानंतर तो हल्ला करील.ते सैन्य प्रचंड असेल.त्याच्याजवळ पुष्कळ शस्त्रास्त्रे असतिल.ते युघ्दाला तयार असेल.
14 “त्या वेळी खूप लोक दक्षिणेच्या राजाच्याविरुध्दा असतील. युध्द आवडणारे तुमच्यातील काही तुमचेच लोक दक्षिणेच्या राजाविरुध्द बंड करतील.ते विजयी हणार नाहित. पण त्याच्यां अशा वर्तनाने दृष्टान्त ठराण्यास मदत हल. 15 मग उत्तेरचा राजा येऊन तटांना उतार बांधून मजबूत शहर ताब्यात घेईल. दक्षिणेच्या सैन्याला हल्ला परतविण्याचे वळ असणार नाही. दक्षिणेच्या सैन्यातील शक्तिवाम सैनिकसुध्दा उत्तरेचे सैन्य थोपवायला परे पडणार नाहीत.
16 “उत्तरेचा राजा त्याला पाहिजे ते करील त्याला कोणीही अडवू शकणार नाही.सुंदर देशाची सत्ता व नियंत्रण त्याच्या हाती येईल.त्याच्या हाती विध्वंसाचीही शक्ती अल. 17 उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राजाविरुध्द लढण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावण्याचा निश्चय करील. तो दक्षिणेच्या राजाबरोबर एक करार करिल.तो आपाल्या एका मुलीचे लग्न दक्षिणेच्या राजाशी लवून देईल. दक्षिणेच्या राजाचा पराभव करण्यासाठी तो असे करिल, पण त्याच्या बेत यसस्वी होणार नाही. त्याच्या येजनांची त्याला मदत होणार नाही.
18 “मग तो आपला मोर्चा भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीवरील देशांकडे वळवील, तो खूप शहरांचा पराभव करील, पण मग एक सेनापती त्याचा गर्व व बंड यांचा शेवट करील तो उत्तरेच्या राजाची अप्रतिष्ठा करील.
19 “ह्यान्तर उत्तरेचा राजा स्वतःच्या देशातील भक्कम किल्ल्यांत परत जाईल पण तो दुर्बल होईल व पडेल त्याचा अंत होईल.
20 “मग त्यानंतर उत्तरेच्या राजानंतर नवा राजा येईल. ऐश्वर्यात राहता यावे म्हणुन पुरेसा पैसा गोळा करण्यासाठी तो कर वसुली करणाऱ्याला पाठवील पण काही वर्षातच त्या राजाचा नाशा होईल. पण तो लढाईत मरणार नाही.
21 “त्याच्या मागून एक अतिशय क्रूर व तिरस्करणीय माणूस येईल, राजघराण्यातील असण्याची त्याची योग्याता नसेल [b]. 22 तो प्रचंड व शक्तिशाली सैन्यांच्या पराभव करील तो नेत्याचा कराराच्या साहाय्याने पराभव करील. 23 ह्या क्रूर व तिरस्करणीय राजाबरोबर खूप राष्ट्रे करार करतील पण तो खोटे बोलेल व त्यांना फसवील तो मोठी सत्ता मिळवील पण आगधी थोडे लोक त्याला पाठिंबा देतील.
24 “जेव्हा श्रीमंत देशांना सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो क्रूर राजा त्यांच्यावर चढाई करील.वाडवडिलांवर तो अगदी योग्य वेळी हल्ला करील. त्याच्या वाडवडिलांना यश मिळाले नाही,पण त्याला मिळेल.परभूत झालेल्या देशांतील वस्तू लूटून तो आपल्या अनुयायांना देईल.भक्कम शहरांचा पराभव व नाश करण्याचे बेत तो आखेल.त्याला यश मिळेल, पण काही काळापुरतेच.
25 “ह्या क्रूर राजाचे सैन्या मोठे असेल तो त्या सैन्याचा उपयोग त्याचे बळ व शौर्य ह्यांच्या प्रदर्शनासाठी करील व दक्षिणेच्या राजावर हल्ला करील, दक्षणोचा राजा खुप मोठे व शक्तिशाली सैन्य जमवुन युध्दावर जाईल पण त्याच्या विरोधात असलेले लोक कट रचतील आणि दक्षिणेच्या राजाचा पराजय हल. 26 दक्षिणेच्या राजाचे चांगले मित्र समजले जाणारेच त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतील त्याचे सैन्य पराभूत होईल.लढाईत त्याचे पुष्कळ सैनिक मारले जातील. 27 त्या दोन राजांनी एकमेकांना दुखविण्याचा चंगच बांधला असेल. ते एकाच टेबलावर बसून एकमेकांशी खोटे बोलतील. पण यातून कोणाचाच फायदा होणार नाही. का? कारण देवाने त्यांच्या शेवटाची वेळ निशिचत केली आहे.
28 “पुष्कळ संपत्तीसह उत्तरेचा राजा आपल्या देशात परत जाईल मग पवित्र कराराच्याविरुध्द वाईट गोष्टी करण्याचे तो ठरवील.त्याच्या बेताप्रमा सर्व गोष्टी करील व मग आपल्या देशात परत जाईल.
29 “योग्य वेळ येताच पुन्हा, उत्तरेचा राजा, दक्षिणेच्या राजावर, स्वारी करील.पण या वेळि? पूर्वप्रमाणे, त्याला यश मिळणार नाह? 30 कित्तीमची गलबते येऊन उत्तरेच्या राजाविरुध्द लढतील. ती गलबते येताना पाहून तो घाबरेल मग तो मागे वळेल व आपला राग पवित्र करारावर काढील तो मागे फिरेल व ज्या लोकांना पवित्र कराराला अनुसरायचे सोजडून दिले आहे, त्यांना तो मदत करील. 31 यरुशलेमच्या मंदिरात भयानक कृत्ये करण्यासाठी उत्तरेचा राजा सैन्या पाठवील ते सैन्य लोकांना नित्याचे होमार्पण अर्पणे करू देणार नाहीत.मग तो काह? तरी खरखरच भयंकर कत्य करतील विनाशास कारणीभत हणारी भयंकर गोष्ट ते स्थापन करतील.
32 “पवित्र कराराला अनुसरण्याचे सोडून दिलेल्या यहुद्यांना उत्तरेचा राजा खोटे नाटे सांगून आणि गोड बोलून फसवील. ते यहूदी तर त्याहून वाईट पाप करतील.पण जे यहूदी देवाला जाणतात व देवाच्या आज्ञा पाळतात ते यहूदी वलवान ह? तील ते हल्ला परतवितील.
33 “सुज्ञ यहूदी पुष्कळ लोकाना शिकवतील आणि इतर लोकांना घडणाऱ्या गोष्टी समजावून सांगतील पण त्यांच्या पैकी काहीजणांना सुध्दा छळ सोसावा लागेल. अशा काहना तलवारीने मारले जाईल, काहना जाळण्यात येईल, किंवा तूरूंगात टाकण्यात येईल. काहिंची घरे आणि वस्तु काढून घेण्यात येनील. 34 ह्या यहुद्यांचा पाडाव होत असताना त्यांना फारच थोडी मदत मिळेल.पण अशा सुज्ञ यहूद्यांना भेटायला येणारे पुष्कळ यहुदी हे ढोंगीच असतील. 35 काही सुज्ञ यहूदी चुका करतील व पडतील पण छळ झालाच पाहिजे. का? कारण त्यामुळे ते अखेरच्या क्षणापर्यंत अधिक सामर्थ्यशाली, अधिक शुद्ध आणि निर्दोष होतील मग, योग्य वेळी, अंताचा काळ येईल।
स्वतःचीच स्तुती करणारा राजा
36 “उत्तरेचा राजा त्याला पाहिजे ते करील. तो स्वतःबद्दल बढाया मारील. तो स्वतः करील. व स्वतःला देवापेक्षा सुध्दा चांगले समजेल कोणीही ऐकल्या नसतील अशा गोष्टी तो सांगेल. देवांच्या देवाविरुध्द तो अशा गोष्टी सांगेल.सर्व वाईट घडेपर्यंत त्याला यश मिळेल.देवाने घडविण्याचे ठराविलेले घडेलच.
37 “उत्तरेचा राजा त्याच्या वडिलांनी पूजलेल्या देवांची पर्वा करणार नाही. बायका पूजत असलेल्या देवताच्या मूर्तीचीही तो तमा बाळगणार नाही. तो कोणत्याच देवाला मानणार नाही. त्याउलट, तो स्वतःची स्तुती करील आणि स्वतःचे महत्व देवतांपेक्षा जास्त वाढवील. 38 उत्तरेचा राजा कोणत्याच देवताची पूजा करणार नाही पण तो सत्तेची पूजा करील. सत्ता आणि बळ हेच त्याचे देव असतील. त्याच्या वाडवडिलांना त्याच्याप्रमाणे सत्तेचा लोभ नव्हता. तो सत्तेच्या देवाची सोने चांदी किंमती रत्ने आणि नजराणे ह्यांनी पूजा करतो.
39 “हा उत्तरेचा राजा ह्या परक्या देवाच्या साहाय्याने भक्कम गडावर हल्ला करील. त्याला साथ देणाऱ्या परकीय राजांना तो जास्त मान देईल. पुष्कळ लोकांवर तो राज्य करतील. त्या बदल्यात तो त्यांच्याकडून पैसा वसूल करील.
40 “अंतकाळी, दक्षिणेचा राजा उत्तरेच्या राजाशी लढेल. उत्तरेचा राजा त्याच्यावर चढाई करील. तो रथ घोडेस्वार आणि मोठमोठी गलबते घेऊन येईल व चढाई करील. तो पुराच्या लोढ्यांप्रमाणे येईल. 41 उत्तरेच्या राजा सुंदर देशावर हल्ला करील. तो खूप देशांचा पराभव करील. पण अदोम, मवाब व अम्मोनचे नेते त्याच्या तावडीतून सुटतील. 42 पुष्कळ देशांना तो आपले बळ दाखवील. तो किती बलवान आहे, हे मिसरलासुध्दा कळेल. 43 मिसरचा सोन्या चांदीचा खजिना व सर्व संपत्ती त्याला मिळेल. लूबी व कूशी त्याला मानतील (त्याची आज्ञा पाळतील). 44 पण उत्तरेच्या राजाला पूर्व व उत्तर दिशेकडून ऐकलेल्या बातम्यांनी भीती वाटेल व रागही येईल. व तो अनेक राष्ट्रांचासंपूर्ण नाश करण्यासाठी निघेल. 45 तो आपला तंबू संदर पवित्र पर्वत आणि समुद्र यांच्यामध्ये उभा करील. पण अखेर, वाईट राजा मरेल त्याच्या अतंकाळी त्याला मदत करायला त्याच्याजवळ कोणीही नसेल.
12 “दुष्टान्तातील माणूस म्हणाला, त्या वेळी, महान राजपुत्र (देवदूत) मिखाएल उभा राहील. मिखाएल तुझ्या लोकांचा, यहूद्यांचा प्रमुख आहे, तेव्हा खूप संकटाचा काळ असेल. पृथ्वीवर राष्ट्र निर्माण झाल्यापासून असा काळ कधी आला नसेल, पण दानीएल, त्या वेळी तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे जीवनाच्या ग्रंथात नोंदविली गेली असतील, ते सर्व वाचतील. 2 पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल. 3 ज्ञानी आकाशाप्रमाणे तेजाने चमकून उठतील ज्या ज्ञानी लोकांनी इतरांना योग्य जीवनमार्ग शिकविला, ते सदासर्वकाळ ताऱ्यांप्रमाणे चमकतील.
4 “पण, दानीएला, तू हा संदेश गुप्त ठेव तू खाते बंद करून टाक अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजेस. खूप लोक इकडे तिकडे सत्यज्ञानाचा शोध घेतील आणि सत्यज्ञान वाढेल.”
5 मग मला, दानीएलला दोन दुसरी माणसे दिसली एक नदीकाठी माझ्याजवळ उभा होता आणि दुसरा पैलथडीला उभा होता. 6 तागाची वस्त्रे परिधान केलेला माणस नदीच्या पाण्यावर उभा होता. त्या दोघांतला एक त्याला म्हणाला, “ह्या विस्मयकारक गोष्टी खऱ्या व्हायला किती काळ लागेल?”
7 तागाचे कपडे परिधान केलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या राहिलेल्या माणसाने आपले, उजवा व डावा दोन्ही हात स्वर्गाकडे उंचावले आणि त्याने चिरंतर देवाची शपथ घेऊऩ वचन देताना मी ऐकले, तो म्हणाला “तो काळ, एक वेळ, अनेक वेळा, (अ) आणि अर्धा [c] वेळेचा असेल. पवित्र लोकांच्या शक्तीचा बीमोड केला जाईल आणि मग या सर्व गोष्टी अखेरीला खऱ्या ठरतील.”
8 मी उत्तर ऐकले पण मला त्याचा अर्थ खरोखरच कळला नाही म्हणून मी विचारले “महाराज, ह्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्यावर काय होईल.?”
9 तो म्हणाला, “दानीएला तू तुझ्या जीवनाकडे लक्ष दे. संदेश गुप्त ठेवलेला आहे. अंताच्या क्षणापर्यंत तो गुप्तच राहील. 10 पुष्कळ लोकांना शुध्द केले जाईल ते स्वतःला स्वच्छ करतील. पण दुष्ट दुष्टच राहातील. त्यांना ह्या गोष्टी समजणार नाहीत पण सुज्ञांना सर्व समजेल.
11 “नित्याची होमार्पणे करणे बंद होईल. ह्या वेळेपासून ती भयंकर नाश करणारी गोष्टी घेडेपर्यंतचा काळ हा 1,290 दिवसांचा असेल. 12 जो वाट पाहील आणि 1,335 दिवसांच्या अखेरपर्यंत पोहोचेल, तो खूप सुखी होईल.
13 “दानीएल, तुझ्याबद्दल सांगायचे झाले तर, जा आणि शेवटपर्यंत तुझे जीवन जग. तुला विश्रांती मिळेल आणि अखेरील तू मृत्युलोकांतून उठशील आणि तुला तुझा हिस्सा मिळेल.”
1 येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा भाऊ असलेल्या यहूदाकडून, देवाने ज्या तुम्हांला पाचारण केले आहे त्यांस, देवपिता तुमच्यावर प्रीती करतो व येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुरक्षित ठेवले जात आहात.
2 देवाची करुणा, शांति आणि प्रीती तुम्हांला अधिकाधिक लाभो.
जे चुका करतात त्यांना देव शिक्षा करील
3 प्रिय मित्रांनो, जरी मली तुम्हांला आपल्या समाईक तारणाविषयी लिहिण्याची आतुरतेने तयारी करीत होतो तरी एका गोष्टीविषयी मला लिहावेसे वाटते. ते म्हणजे देवाने आपल्या संतांना, एकदा दिलेला विश्वास टिकविण्यासाठी लढत राहा. 4 याचे कारण ज्यांच्याविषयी पवित्र शास्त्रात फार पूर्वीच लिहिले आहे की अशी माणसे तुमच्यात चोरुन शिरली आहेत, ते अधार्मिक लोक आहेत. अनीतीने वागण्यासाठी देवाची दया हे निमित आहे असे ते मानतात. आणि आमचा प्रभु व एकमेव धनी अशा प्रभु येशू ख्रिस्ताला ते मानत नाहीत. जी शिक्षेसाठी यापूर्वीच नेमलेली होती, अशी ही माणसे आहेत.
5 जरी तुम्हांला या गोष्टी माहीत असल्या तरी मला तुम्हांला आठवण करुन द्यावीशी वाटते की, ज्या प्रभूने आपल्या लोकांना एकदा इजिप्त देशातून सोडवून आणल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारले; अशांचा त्याने नंतर नाश केला, 6 तसेच ज्या देवदूतांनी आपली सार्वभौम सत्ता टिकवली नाही, परंतु आपली रहाण्याची जागा सोडून दिली, त्यांची देखील तुम्हाला आठवण करुन द्यायला पाहिजे. देवाने त्यांना सर्वकालच्या बंधनांनी जखडून काळोखात ठेवले यासाठी की शेवटच्या महान दिवशी त्यांचा न्याय करता यावा. 7 त्याचप्रमाणे, या देवदूतांसारखीच सदोम व गमोरा आणि त्या शहराच्या आसपासच्या नगरांनी लैंगिक अनीतीचे आचरण केले आणि अस्वभाविक लैंगिक संबंधांच्या मागे ती लागली. अनंतकाळच्या अग्निच्या शिक्षेसाठी ती राखून ठेवली आहेत. एक उदाहरण म्हणून ती आपल्यासमोर ठेवली आहेत. 8 अगदी तशाच प्रकारे, हे लोक जे तुमच्या गटात आले ते स्वप्नांनी बहकले व त्यांनी आपली शरीरे विटाळली आहेत. ते प्रभूचा अधिकार बाजूला ठेवतात व ते गौरवी थोरामोठ्यांविरुद्ध (देवदूतांविरुद्ध) निंदानालस्तीची भाषा वापरतात. 9 मीखाएल जो मुख्य देवदूत, याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाबरोबर वाद घातला तेव्हा त्यानेसुद्धा त्याच्याविरुद्ध अपमानस्पद आरोप करण्याचे धाडस केले नाही. तो फक्त म्हणाला, “प्रभू तुला धमकावो.”
10 पण हे लोक, ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात. आणि जनावरासारखे केवळ मूळ स्वभावाला अनुसरुन जे काही त्यांना समजते. अगदी त्याच गोष्टीमुळे ते नाश पावतात. 11 या लोकांसाठी हे फार वाइट आहे! काईनाने जो मार्ग धरला तोच यांनी धरलेला आहे. आपला फायदा व्हावा म्हणून ते बलामाप्रमाणे गोंधळून मोकाट धावत सुटले आहेत आणि कोरहाच्या बंडाळीत भाग घेणाऱ्या लोकांचा नाश झाला तसाच या लोकांचा देखील नाश होत आहे.
12 हे लोक तुमच्या भातामध्ये दडलेले धोकादायक खडे, असल्यासारखे आहेत. ते खुशाल तुमच्याबरोबर जेवणखाणे करतात, ते फक्त स्वतःच चरत राहाणारे असे मेंढपाळ आहेत, ते पाणी नसलेल्या ढगांसारखे असून ते वाऱ्यामुळे वाहवत जातात. ते लोक म्हणजे हिवाळ्यातील फळहीन व समूळ उपटली गेलेली आणि दोनदा मेलेली झाडे आहेत. 13 ते लोक आपल्या लज्जास्पद कामामुळे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहेत, ते जणू काळ्याकुटृ अंधारात दडलेले तारे असे आहेत.
14 हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य यानेसुद्धा या लोकांविषयी असेच भाकीत केले आहे: “पाहा हजारो पवित्र देवदूतांसह प्रभु येत आहे. 15 तो अखिल जगातील लोकांचा न्याय करील आणि सर्व लोकांना त्यांनी केलेल्या अधर्माच्या कामासाठी आणि देवाची चाड न बाळगणाऱ्या पापी लोकांनी त्याच्याविरुद्ध जे कठोर, वाईट शब्द आपल्या तोंडावाटे काढले त्याकरीता तो त्यांना दोषी ठरवील.”
16 हे लोक कुरकुर करणारे व दोष दाखविणारे आहेत, ते आपल्या वासनांप्रमाणे चालणारे आणि आपल्या तोंडाने बढाया मारणारे लोक आहेत, ते आपल्या फायद्यासाठी इतरांशी तोंडपूजेपणा करतात.
सावधानतेचा इशारा आणि करावयाच्या गोष्टी
17 पण, तुम्ही प्रियजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेले शब्द आठवा. 18 त्यांनी सांगितले, “काळाच्या शेवटी देवाविषयी थट्टेने बोलणारे लोक असतील, ते त्यांच्या स्वतःच्याच अधार्मिक इच्छांच्या मागे जातील.” 19 असे लोक फूट पाडतात. ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे चालतात. त्यांना आत्मा नाही.
20 पण तुम्ही प्रिय मित्रांनो, आपल्यापवित्र शिकविण्यात आलेल्या विश्वासात परस्परांना आध्यात्मिक रीतीने बळकट करा. पवित्र आत्म्याने युक्त होऊन प्रार्थना करा. 21 आणि तुम्हांला अनंतकाळच्या जीवनात घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत, देवाच्या प्रीतीत स्वतःला राखा.
22 विश्वासात डळमळीत असलेल्या लोकांवर दया करा. 23 त्यांना अग्नीतून ओढून काढून वाचवा. पण दया दाखविण्याच्या वेळी काळजी घ्या. आणि त्यांच्या दैहिक पापामुळे मळीन झालेल्या कपड्यांचा तिरस्कार करा.
देवाची स्तुति करा
24 आता, तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे, त्याला आणि आपले तारण करणारा जो 25 एकच देव आहे, त्याला आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, मान, पराक्रम आणि अधिकार काल, आज आणि अनंतकाळ असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center