Old/New Testament
33 चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा.
न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
2 वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा.
दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा.
3 त्याच्यासाठी नवे गाणे गा.
आनंदी होउन चांगल्या रीतीने वाजवा.
4 देवाचा शब्द खरा असतो तो जे काही करतो
त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता.
5 देवाला चांगलुपणा आणि न्यायी वृत्ती आवडते.
परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरुन टाकली.
6 परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली
देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या.
7 देवाने समुद्रातील पाणी एका ठिकाणी आणले.
तो समुद्राला त्याच्या जागेवर ठेवतो.
8 पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे
आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.
9 का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात.
आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
10 राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे
तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो.
11 परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो
त्याच्या योजना पिढ्यानपिढ्या चांगल्या असतात.
12 ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत.
देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.
13 परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले.
त्याला सर्व लोक दिसले.
14 त्याने त्याच्या सिंहासनावरुन
पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले.
15 देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले.
प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते.
16 राजा त्याच्या स्वःतच्या सामर्थ्याने सुरक्षित राहू शकत नाही.
शूर सैनिक त्याच्या स्वःतच्या शक्तीमुळे सुरक्षित राहू शकत नाही.
17 घोडे युध्दात विजय मिळवू शकत नाहीत.
त्यांची शक्ती तुम्हाला पळून जायला मदत करु शकत नाही.
18 परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो.
जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
19 देव त्यांना मरणापासून वाचवतो ते भुकेले असतील
तेव्हा त्यांना तो शक्ती देतो.
20 म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू.
तो आपली मदत आणि ढाल आहे.
21 देव आपल्याला आनंदी करतो.
आम्ही त्याच्या पवित्र नावावर खरोखरच विश्वास ठेवतो.
22 परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो
म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव.
दावीदाचे स्तोत्र दावीद अबिमलेखापुढे वेड्यासारखा वागला तेव्हा त्याने दावीदाला हाकलून दिले. अशा रीतीने दावीद त्याला सोडून गेला
34 मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन.
माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
2 विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा
माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो.
3 देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला.
आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या.
4 मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले.
मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.
5 देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल
लाज वाटून घेऊ नका.
6 या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली
आणि परमेश्वराने माझे ऐकले.
त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
7 परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो.
परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
8 परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे
ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल.
9 परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे.
परमेश्वराच्या भक्तांसाठी सुरक्षित अशी दुसरी जागा नाही.
10 शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील.
परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील.
11 मुलांनो माझे ऐका आणि
मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन.
12 जर एखाद्याचे जीवनावर प्रेम असेल
आणि त्याला जर खूप आणि चांगले जगायचे असेल तर,
13 त्याने वाईट गोष्टी बोलायला नकोत.
त्याने खोटे बोलायला नको.
14 वाईट कृत्ये करणे सोडून द्या.
चांगली कृत्ये करा.
शांतीसाठी काम करा.
शांती मिळे पर्यंत तिच्या मागे धावा.
15 परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो.
तो त्यांची प्रार्थना ऐकतो.
16 परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे.
तो त्यांचा सर्वनाश करतो.
17 परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल.
तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल.
18 काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात.
परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो.
तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो. [a]
19 चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील.
परंतु परमेश्वर त्यांना त्यांच्या प्रत्येक संकटातून वाचवतो.
20 परमेश्वर त्यांच्या सर्व हाडांचे रक्षण करेल.
त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.
21 परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या
माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.
22 परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो.
ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.
यहूदी लोक पौलावर दोष ठेवतात
24 पाच दिवसांनतर हनन्या कैसरिया येथे गेला. हनन्या मुख्य याजक होता. हनन्याने आपल्याबरोबर काही यहूदी वडीलजन आणि तिर्तुल्ल नावाचा वकील यांना कैसरिया येथे नेले; त्यांनी राज्यपालापुढे पौलावरिल दोषारोप सादर केले. 2 जेव्हा पौलाला आत नेण्यात आले तेव्हा तिर्तुल्ल याने पौलावरील आरोप सांगण्यास सुरुवात केली.
तो म्हणाला, “फेलिक्स महाराज, तुमच्यामुळे आम्हांला फार शांतता लाभली असून, तुमच्या दूरदृष्टीमुळे जरुर असलेल्या सुधारणासुद्धा या देशात झाल्या आहेत. 3 फेलिक्स महाराज, आम्ही हे सर्व प्रकारांनी व सर्व ठिकाणी हे कृतज्ञतेने मान्य करतो. 4 परंतु तुमचा अधिक वेळ न घेता, आम्ही जे काही तुम्हांला थोडक्यात सांगतो, ते ऐकून घेण्याची कृपा करावी, ही विनंती करतो. 5 हा मनुष्य त्रास देणारा आहे, जगात सगळीकडे यहूदी लोकांना त्याने त्रास दिलेला आहे. तो नासरेथकराच्या पंथाचा पुढारी आहे. 6-7 त्याने देवाचे मंदिर विटाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याला धरले [a] 8 या गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे तुम्ही ठरवू शकता. त्याला काही प्रश्न विचारा.” 9 इतर यहूदी लोकांनी याला मान्यता दिली व सांगितले की, “हे सर्व खरे आहे!”
Paul Defends Himself Before Felix
10 जेव्हा राज्यपालाने पौलाला बोलण्यास खुणावले, तेव्हा पौल म्हणाला, “फेलिक्स महाराज, बरीच वर्षे या देशाचे न्यायाधीश म्हणून आपण काम करीत आहात, म्हणून मला आपणा समोर स्वतःचा बचाव करायला आनंद वाटत आहे. 11 यरुशलेम येथे उपासनेसाठी जाऊन मला बारोपेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत, ही गोष्ट खरी आहे की नाही, हे आपण पडताळून पाहू शकता 12 मी मंदिरात कोणाशी वाद घालताना, सभास्थातात किंवा बाहेर कोठे कोणाला चिथावून देताना या लोकांना आढळलो नाही. 13 हे लोक माझ्यावर जो आरोप ठेवीत आहेत, तो त्यांना तुमच्यासमोर सिद्ध करता येणार नाही.
14 “मात्र मी हे आपल्यसमोर कबूल करतो: या मार्गाने (ख्रिस्ती मार्गाने) जाऊन मी आपल्या वाडवडिलांच्या देवाची उपासना करतो त्या मार्गाला हे लोक पंथ म्हणतात. जे काही नियमशास्त्रात सांगितले आहे आणि जे काही आमच्या संदेष्ट्यानी सांगितलेले आहे, त्या सर्वांवर मी विश्वास ठेवतो. 15 आणि धार्मिकांचे व वाईटांचेही मरणातून पुन्हा उठणे होणार आहे, ही गोष्ट हे लोकही माइयाबरोबर मानतील अशी मी देवामध्ये आशा बाळगतो. 16 यासाठी देवापुढे आणि मनुष्यांपुढे आपला विवेक शुद्ध असावा याचा मी नेहमी आटोकाट प्रयत्न करीत असतो.
17 “अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर माइया लोकांतील गरीबांना दान देऊन यरुशलेममध्ये स्वतःसाठी अर्पण करावे म्हणून मी मंदिरात जाऊन हा विधी करीत असताना, शुद्धीकरण झालेला असा मी त्यांस आढळलो. 18 तेथे मी कसलाही जमाव केला नव्हता अगर दंगा ही केला नव्हता 19 पण आशियातील काही लोक तेथे हजर होते. 20 जर त्यांना माइयाविरुद्ध काही म्हणायचे असेल, तर त्यांनी आपणांपुढे हजर होऊन मला दोषलावावा. किंवा मी जेव्हा धर्मसभेपुढे उभा राहिलो, त्यावेळी माइयामध्ये काही चूक त्यांना आढळली असेल, तर त्यांनी तसे सांगावे. 21 मी या लोकांमध्ये उभे राहून मोठ्याने म्हणालो की, ‘मेलेल्यांतून पुन्हा उठण्याच्या प्रश्नावरुन माझा न्यायनिवाडा होत आहे.’ या एका गोष्टीशिवाय दुसरा आरोप माइयावर करायचा असेल तर यांनी तसे सांगावे.”
22 फेलिक्सला (ख्रिस्ती) मार्गाविषयी चांगली माहिती असल्याने त्याने सुनावणी थांबवली. फेलिक्स म्हणाला, “जेव्हा लुसिया सरदार येथे येईल, तेव्हा तुझ्या प्रकरणाचा काय निर्णय घ्यायचा ते मी ठरवीन.” 23 मग फेलिक्सने शतधिपतीला आज्ञा केली की, पौलाला पहाऱ्यात ठेवावे, परंतु त्याला थोडी मोकळीक देण्यात यावी. आणि असाही हुकूम केला की, त्याच्या मित्रांना त्याची गरज भागविण्यास मना करु नये.
पौल फेलिक्स व त्याच्या पत्नीशी बोलतो
24 काही दिवसांनंतर फेलिक्स आपली पत्नी द्रुसिल्ला हिच्याबरोबर आला. ती एक यहूदी स्त्री होती. फेलिक्सने पौलाला बोलावणे पाठविले. आणि त्याने येशू ख्रिस्तावरील विश्वासाबाबत पौलाचे बोलणे ऐकून घेतले. 25 परंतु जेव्हा पौलाने धार्मिकपणा, आत्मसंयमन, आणि होणाऱ्या न्यायाविषयी सांगितले. तेव्हा फेलिक्सला भीति वाटली. तो पौलाला म्हणाला, “आता तू जा, परत वेळ मिळाला म्हणजे मी तुला बोलावीन.” 26 यावेळी पौल त्याला पैसे देऊ करील असे त्याला वाटत होते म्हणून फेलिक्स त्याला वरचेवर बोलावणे पाठवत असे आणि त्याच्याशी बोलत असे.
27 दोन वर्षे झाल्यावर फेलिक्सच्या जागी पुर्क्य फेस्त हा राज्यपाल झाला. आणि यहूदी लोकांचे मन मोडण्याची फेलिक्सची इच्छा नव्हती, म्हणून त्याने जाण्यापूर्वी पौलाला तुरुंगातच ठवले.
2006 by World Bible Translation Center