Old/New Testament
36 “तेव्हा बसालेल व अहलियाब यांनी आणि परमेशवराने ज्या इतर कारागिरांना ह्या कामाच्या कसबाचे ज्ञान व समज दिली आहे त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्र मंडपाचे हे बांधकाम करावे.”
2 नंतर बसालेल व अहिलियाब यांना आणि ज्या कारागिरांना परमेश्वराने विशेष कसब व ज्ञान दिले होते त्यांना मोशेने बोलावले, ह्या कामात मदत व सेवा करण्याची त्या लोकांची इच्छा होती म्हणून तेही खुषीने आले. 3 इस्राएल लोकांची जी जी अर्पणे आणली होती त्यांचा देवाचे पवित्रस्थान बांधण्यासाठी त्यांनी उपयोग केला. रोज सकाळी इस्राएल लोकांनी अर्पणे आणणे चालूच ठेवले. 4 शेवटी मग सर्व कसबी कारागीर पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले व म्हणाले, 5 “लोकांनी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हाला ह्या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करवयास लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!”
6 तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम सोडला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अधिक अर्पणे आणू नयेत.” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणावयास बंदी घालण्यात आली. 7 लोकांनी हे काम पूर्ण करण्याकरता लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक साहित्य अर्पण केले होते!
पवित्र निवास मंडप
8 मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली. 9 प्रत्येक पडद्याचे मोजमाप सारखेच होते म्हणजे तो चौदावार-गज-लांब व दोन वार-गज-रुंद असे होते. 10 त्या कारागिरांनी त्यापैकी पांच पडदे जोडून एक भाग व दुसरे पांच पडदे जोडून दुसरा भाग असे दोन भाग तयार केले. 11 नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निव्व्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवर ही तशीच बिरडी केली. 12 त्यानी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती. 13 नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याच्या पन्नास गोल कड्या केल्या; त्या कड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वाचा मिळून अखंड पवित्र निवास मंडप तयार झाला.
14 नंतर पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला. 15 ह्या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे पंधरा वार लांब व दोन वार रुंद होते. 16 त्या कारागिरांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला. 17 नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेकटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली. 18 हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेच्या पन्नास गोल कड्या केल्या. 19 मग त्यांनी पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या. मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहाशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
20 मग पवित्र निवास मंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फव्व्या तयार केल्या. 21 प्रत्येक फळी पंधरा फूट लांब व सत्तावीस इंच रुंद होती. 22 त्यांनी प्रत्येक फळीच्या दोन बाजूला दोन कुसे केली व उभ्या आडव्या तुकड्यांनी त्या दोन फव्व्या एकासारख्याच केल्या. 23 त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस लावण्यासाठी वीस फव्व्या केल्या; 24 मग त्या वीस फळयांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या, एका फळी खाली दोन म्हणजे प्रत्येक कुसाखाली एक याप्रमाणे त्या केल्या. 25 त्याचप्रमाणे पवित्र निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळया केल्या. 26 त्यांनी त्या वीस फव्व्यासाठी एकेका फळीखाली दोन या प्रमाणे चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या. 27 पवित्र निवास मंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फव्व्या. 28 आणि त्याचप्रमाणे निवास मंडपाच्या कोपऱ्यासाठी दोन फव्व्या त्यांनी केल्या. 29 ह्या फव्व्या खालच्या बाजूला जोडलेल्या होत्या आणि वरच्या भागी एकत्र गोल कडीला त्या अडकवल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यासाठी त्यांनी अशाच फव्व्या केल्या. 30 तेव्हा पवित्र निवास मंडपाच्या पश्चिमबाजूस एकूण आठ फव्व्या व प्रत्येक फळी खाली चांदीच्या दोन खुर्च्या अशा सोळा खुर्च्या झाल्या.
31 त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले-पवित्र निवास मंडपाच्या एका बाजूच्या फव्व्यासाठी पाच, 32 दुसऱ्या बाजूच्या फव्व्यासाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच; 33 आणि त्यांनी फव्व्याच्या भध्याभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोंचेल असा केला. 34 त्या फव्व्या त्यांनी सोन्याने मढविल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले.
35 मग त्यांनी निव्व्या जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करूब दुतांची चित्रे शिवून घेतली, 36 आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढविले; 37 मग त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनविला. 38 व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच खुर्च्या बनविल्या.
आज्ञापटाचा कोश
37 मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला; तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होता. 2 त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढविला आणि त्याच्या सभोवती सोन्याचा काठ केला. 3 त्याने सोन्याच्या चार कड्या केल्या व त्या चारी कोपऱ्यांना लावल्या पेटी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग झाला प्रत्येक बाजूला दोन कड्या होत्या. 4 मग कोश वाहून नेण्याकरता त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करुन ते शुद्ध सोन्याने मढविले. 5 ते दांडे कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले. 6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते पंचेचाळीस इंच लांब व सत्तावीस इंच रुंद होते. 7 मग त्याने सोने घडवून दयासनाच्या दोन्ही टोकासाठी दोन करुब दूत बनविले. 8 त्याने एक करूब दूत एका टोकासाठी व दुसरा करूब दूत दुसऱ्या टोकासाठी बनवून असे जडविले की करुब दूत व दयासन हे सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून बनविलेले दिसू लागले 9 करुबांचे पंख वर आकाशाकडे पसरवलेले होते व त्या पंखांनी दयासन झाकले होते; करुब दूतांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती.
पवित्र (विशेष) मेज
10 त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते छत्तीस इंच लांब, अठरा इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होते. 11 त्याने ते शुद्ध सोन्याने मढविले व त्याच्या सभोवती सोन्याचा काठ केला; 12 आणि त्याने त्याच्यासाठी तीन इंच रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा काठ केला. 13 त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या करुन त्याच्या पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या. 14 ह्या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या. 15 मग मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले; 16 नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, चमचे, धूपपात्रे व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे व सुरया ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली.
दीपवृक्ष
17 मग त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या फुलासारख्या वाट्या, त्याच्या कव्व्या व पाकव्व्या ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली. 18 त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या. 19 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, कव्व्या व पाकव्व्यासहित होत्या. 20 दीपवृक्षाच्या दांड्याला आणखी चार, बदामाच्या फुलांसारखी फुले, कव्व्या पाकव्व्या होत्या. 21 ह्या दीपवृक्षावर दांड्याच्या एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या; जेथे शाखा मुख्य दांड्याला जोडलेली होती त्या प्रत्येक जोडाखाली कव्व्या व पाकव्व्यासहित एक फूल होते. 22 शाखा व फूले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडविलेला होता. 23 ह्या दीपावृक्षावर त्याने सात दिवे बनविले; मग त्याने दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली. 24 हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे चौतीस किलोग्रम शुद्ध सोन्याची त्याने बनविली.
धूप जाळावयाची वेदी
25 मग त्याने बाभळीच्या लाकडाची एक चौरस वेदी केली; ती अठरा इंच लांब, अठरा इंच रुंद व छत्तीस इंच उंच होती; वेदीवर प्रत्येक कोपऱ्याला एक याप्रमाणे चार शिंगे होती. ती वेदीला अशी जोडली होती की वेदी व शिंगे एका अखंड तुकड्याची बनविलेली दिसत होती. 26 त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू व तिची शिंगे सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा काठ केला; 27 त्या काठाच्याखाली तिच्या दोन्ही बाजूस, त्याने वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता सोन्याच्या दोन दोन गोल कड्या केल्या. 28 त्याने बाभळीच्या लोकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले.
29 नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल तसेच सुगंधी शुद्ध धूप सुंगधीलोक बनवितात त्या प्रमाणे बनविला.
होमार्पणाकरता वेदी
38 मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनविली; ती साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद व साडेचार फूट उंच अशी केली. 2 त्याने तिच्या प्रत्येक कोपऱ्यास एक याप्रमाणे चार शिंगे बनविली व ती कोपऱ्यांना अशी जोडली की वेदी व शिंगे एकाच अखंड तुकड्यांची बनविलेली दिसू लागली; त्याने ती पितळेने मढविली. 3 मग त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, कांटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनविली. 4 मग त्याने वेदीसाठी पितळेची पडद्यासारखी जाळी बनविली व ती वेदी भोवतीच्या काठाखाली अशी बसवली की ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली. 5 मग त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार गोल कड्या केल्या; त्यांच्यात दांडे घालून वेदी वाहून नेण्याकरता त्या उपयोगी होत्या. 6 मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढविले. 7 वेदी उचलून वाहून नेण्याकरता तिच्या बांजूच्या गोल कड्यात त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूस फव्व्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली.
8 दर्शन मंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्त्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.
पवित्र निवास मंडपाभोक्तीचे अंगण
9 मग त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची पन्नास वार लांबीची एक कनात त्याने केली. 10 तिला वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबाचा आधार दिलेला होता; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. 11 अंगणाच्या उत्तर बाजूलाही पन्नास वार लांबीची पडद्यांची कनात होती व तीही वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबावर आधारलेली होती; खाबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
12 अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पंचवीस वार लांबीची कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा खुर्च्या होत्या; ह्या खांबाच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;
13 पूर्वेकडील रुंदीची बाजू पंचवीस वार लांब होती; 14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला साडे सात वार लांबीची कनात होती; तिच्या करता तीन खांब व तीन खुर्च्या होत्या; 15 अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. 16 अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते. 17 खांबाच्या खुर्च्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढविली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.
18 अंगणाच्या फाटकाचा पडदा निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर नक्षी विणलेली होती; तो दहा वार लांब व अडीच वार उंच होता; ही उंची अंगणाच्या सभोवतीच्या कनातीच्या उंचीइतकी होती. 19 तो पडदा पितळेच्या चार खुर्च्या असलेल्या चार खांबावर अधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनविलेल्या होत्या; खांबाची वरची टोके चांदीने मढविली होती. 20 पवित्र निवास मंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.
21 मोशेने लेवी लोकांना, पवित्र निवास मंडप म्हणजे कराराचा मंडप तयार करण्याकरता लागलेल्या सर्व सामानाची यादी करण्यास सांगितले होते; अहरोनाचा मुलगा इथामर त्याच्यावर ती जबाबदारी प्रमुख म्हणून सोपविलेली होती.
22 ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहुदा वंशातील हराचा नातू म्हणजे उरीचा मुलगा बसालेल याने बनविल्या; 23 तसेच त्याला मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निव्व्या, व जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढण्याचा कामात तरबेज होता.
24 लोकांनी पवित्रस्थानाकरता परमेश्वराला अर्पण केलेले सोने सुमारे दोन टनाहून जास्त होते. [a]
25 लोकांपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी पावणेचार टनाहून [b] अधिक होती. 26 वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि प्रत्येकाला एक बेका चांदी (म्हणजे पवित्र स्थानाच्या अधिकृत मापाप्रमाणे “अर्धा शेकेल” चांदी) कर म्हणून द्यावी लागली. 27 त्यांनी ती चांदी पवित्रस्थानाकरिता शंभर खुर्च्या व अंतरपटाच्या खुर्च्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक खुर्चीसाठी पंचाहत्तर पौंड चांदी [c] वापरली. 28 बाकची पन्नास पौंड चांदी [d] आकड्या बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.
29 साडे सव्वीस टनाहून अधिक [e] पितळ परमेश्वरासाठी देण्यात आले. 30 त्या पितळेचा दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील खुर्च्या, वेदी तिची उपकरणे व तिची जाळी ह्या करता; 31 त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या खुर्च्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या खुर्च्या, तसेच पवित्र निवास मंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.
येशू धार्मिक पुढाऱ्यांवर टीका करतो(A)
23 मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला, 2 “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत. 3 म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा. पण ते जसे करतात तसे करू नका. मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. 4 वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व ते ओझे लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.
5 “ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात. ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या [a] मोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांब झगे घालतात. 6 मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. 7 बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना गुरुजी म्हणावे असे त्यांना वाटते.
8 “परंतु तुम्ही स्वतःला ‘गुरूजी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. 9 आणि जगातील कोणालाही ‘पिता’ म्हणू नका. कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. 10 तुम्ही स्वतःला ‘मालक’ म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. 11 तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. 12 जो स्वतःला मोठा समजेल त्याला कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल.
13 “अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, हाय, हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवीत नाहीत. तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. 14 [b]
15 “परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही समुद्र व जमिनीवरून प्रवास करून एक तरी शिष्य मिळतो का ते पाहाता आणि तुम्हांला तो मिळतो तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याप्रमाणे नरकपुत्रासारखे करून टाकता.
16 “तुम्हांला दु:ख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, ‘जर एखादा मंदिराच्या नावाने शपथ घेतो तर त्याने ती पाळलीच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नाही, पण जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे.’ 17 तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि मंदिर यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे? मंदिर त्या सोन्याला पवित्र बनविते.
18 “आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यात काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर त्याने ती शपथ पाळलीच पहिजे. 19 तुम्ही आंधळे आहात. तुम्हांला काही दिसत नाही व कळत नाही! अर्पण मोठे की वेदी मोठी? वेदीमुळे अर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी. 20 म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. 21 तसेच जो मंदिराची शपथ घेतो तो मंदिर व त्यात राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. 22 जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.
2006 by World Bible Translation Center