Old/New Testament
परमेश्वर इस्राएलच्याविरुध्द आहे
12 एफ्राईम त्याचा वेळ वाया घालवीत आहे-इस्राएल दिवसभर “वाऱ्याचा पाठलाग करतो.” लोक अधिकाधिक खोटे बोलतात. ते जास्तीतजास्त चोव्या करतात. त्यांनी अश्शूरशी करार केले आहेत. आणि ते जैतून तेल मिसरला नेत आहेत.
2 परमेश्वर म्हणतो, “माझे इस्राएलशी भांडण आहे. याकोबला त्याच्या कर्मांबद्दल सजा मिळालीच पाहिजे. त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. 3 याकोबने आईच्या गर्भात असल्यापासूनच त्याच्या भावाला फसवायला सुरवात केली. याकोब शक्तिशाली तरुण होता. त्या वेळी तो परमेश्वराविरुध्द लढला. 4 याकोबने देवदूताशी मल्लयुध्द खेळले आणि तो जिंकला तो रडला व त्याने कृपा करण्याची याचना केली. हे बेथेलमध्ये घडले. तेथे तो आमच्याशी बोलला. 5 हो, खरेच, यहोवा सैन्यांचा परमेश्वर आहे. त्याचे नाव यहोवा (परमेश्वर)असे आहे. 6 म्हणून आपल्या परमेश्वराकडे परत या त्याच्याशी निष्ठा ठेवा. योग्य तेज करा. तुमच्या परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा.
7 “याकोब, हा खरा व्यापारी आहे. तो त्याच्या मित्रांनासुध्दा फकवितो त्याचे तराजू सुध्दा खोटे आहेत. 8 एफ्राईम म्हणाला, ‘मी श्रीमंत आहे. मला खरी संपत्ती सापडली आहे. माझे अपराध कोणालाही कळणार नाहीत. कोणालाही माझी पापे समजणार नाहीत.’
9 “पण तुम्ही मिसरमध्ये असल्यापासून, मी परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे. सभामंडपाच्या वेळेप्रमाणे तुम्हाला तंबूत राहायला भाग पाडीन. 10 मी संदेष्ट्यांशी बोललो मी त्यांना पुष्कळ दृष्टांन्त दिले. माझी शिकवण तुम्हाला शिकविण्यासाठी मी त्याना अनेक मार्ग दाखविले. 11 पण गिलादाच्या लोकांनी पाप केले आहे. तेथे पुष्कळ भयानक मूर्ता आहेत. गिल्गालमध्ये लोक बैलांना बळी अर्पण करतात. त्यांच्या अनेक वेदी आहेत. नांगरलेल्या शेतात ज्याप्रमाणे ढेकळांच्या रांगा असतात, त्याप्रमाणे त्यांच्या वेदींच्या रंगाच्या रांगा आहेत.
12 “याकोब अरामला पळून गेला. त्या जागी, इस्राएलने पत्नीसाठी सेवा केली. दुसरी पत्नी मिळावी म्हणून त्याने मेंढ्या पाळल्या. 13 पण परमेश्वराने संदेष्ट्यांच्या उपयोग करून देवाने इस्राएलला सुरक्षित ठेवले. 14 पण एफ्राईम परमेश्वराच्या रागास कारणीभूत झाला एफ्राईमने अनेक लोकांना ठार केले. म्हणून त्याला त्याच्या अपराधांबद्दल शिक्षा होईल. त्याचा प्रभू (परमेश्वर) त्याला अपमान सहन करायला लावील.”
इस्राएलने आपला नाश स्वतःच करून घेतला
13 इस्राएलमध्ये एफ्राईमने स्वतःचे महत्व वाढविले तो बोलत असे व लोक भीतीने थरथर कापत. पण एफ्राईमने पाप केले त्याने बआल देवताला पूजणे सुरु केले. 2 ते इस्राएली अधिकच पाप करतात. ते स्वतःसाठी मूर्ती तयार करतात. कारागिर चमत्कतिपूर्ण चांदीच्या मूर्ती घडवितात व ते लोक त्या मूर्तीशी बोलतात. ते त्या मूर्तीपुढे बळी देतात. सोन्याच्या वासरांचे ते चुंबन घेतात. 3 ह्याच कारणामुळे ते लोक लवकरच अदृश्य होतील. सकाळच्या धुक्याप्रमाणे त्यांची स्थिती होईल. सकाळी धुके थोड्यावेळ दिसते. व लगेच नाहीस होते. इस्राएलींची दशा खळ्यातून उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे होईल. धुराड्यातून निघणारा धूर काही क्षणातच दिसेनासा होतो, तसे त्याचे होईल.
4 “तुम्ही मिसर देशात असल्यापासून मी परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे माझ्याशिवाय दुसरा देव तुम्हाला माहीत नव्हता. ज्याने तुम्हाला वाचविले तो मीच. 5 वाळवंटात, त्या रूक्ष प्रदेशात, मी तुम्हाला ओळखले. 6 मी इस्राएल लोकांना अन्न दिले. त्यांनी ते खाल्ले व ते संतुष्ट झाले,तृप्त झाले. ते गर्विष्ठ झाले आणि ते मलाच विसरले.
7 “म्हणूनच मी त्यांच्याशी सिंहासारखा वागेन. रस्त्यावर दबा धरून बसलेल्या चित्याप्रमाणे मी होईन. 8 जिची पिल्ले तिच्यापासून हिरावून घेतली गेली आहेत अशी अस्वलाची मादी जसा हल्ला करील, तसाच मीही त्याच्यावर तुटून पडेन. मी त्यांच्यावर चढाई करीन. मी त्यांच्या छाती फाडीन. सिंह किंवा इतर हिस्र पशू आपली शिकार जशा फाडून खातात तसेच मी करीन.”
परमेश्वराच्या क्रोधापासून इस्राएलला कोणीही वाचवू शकणार नाही
9 “इस्राएल, मी तुला मदत केली. पण तू माझ्याविरुध्द गेलास म्हणून आता मी तुझा नाश करीन. 10 तुझा राजा कोठे आहे? तुझ्या सर्व नगरांत तो तुला वाचवू शकत नाही. तुझे न्यायाधीश कोठे आहेत? ‘मला राजा व नेते दे’ अशी विनवणी तू केली होतीस. 11 मी रागावलो आणि तुला राजा दिला. माझा क्रोध अधिक भडकताच, मी तुझा राजा काढून घेतला.
12 “एफ्राईमने आपला अपराध लपविण्याचा प्रयत्न केला.
त्याचे पाप म्हणजे गुप्त गोष्ट हे असे
त्याला वाटले पण त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळेल.
13 त्याची शिक्षा प्रसूतिवेदनांप्रमाणे असेल.
तो सुज्ञ मुलगा नसेल
त्याची जन्मवेळ येईल,
तेव्हा तो वाचणार नाही.
14 “मी त्यांना थडग्यापासून वाचवीन मी
त्यांचा मृत्यूपासून बचाव करीन.
मरणा, तुझी रोगराई कोठे आहे?
थडग्या, तुझी शक्ती कोठे गेली?
मला सूड घ्यायचा नाही.
15 इस्राएल त्यांच्या भावांत वाढतो आहे.
पण पूर्वेकडून जोराचा वारा येईल.
परमेश्वराचा वारा वाळवंटाकडून वाहील.
मग इस्राएलची विहीर आटून जाईल.
त्याचा झरा कोरडा पडेल.
वारा इस्राएलच्या खजिन्यातील प्रत्येक मौल्यवान वस्तू काढून घेईल.
16 शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे, का?
कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरविली.
इस्राएली तलवारीला बळी पडतील.
त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल.
त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल.”
परमेश्वराकडे परतणे
14 इस्राएला, तू पडलास. तू परमेश्वराविरुध्द पाप केलेस. पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे, परत ये. 2 तू ज्या गोष्टी बोलणार आहेस, त्याबद्दल विचार कर व परमेश्वराकडे परत ये.
“त्याला सांग की आमचे पाप धुवून टाक आम्ही करीत
असलेल्या चांगल्या गोष्टीं चा स्वीकार कर.
आम्ही आमच्या ओठांद्वारे तुझी स्तुती करू.
3 अश्शूर आम्हाला वाचविणार नाही.
आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही.
आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना
‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का?
कारण अनाथांवर करुणा करणारा
तूच एकमेव आहेस.”
परमेश्वर इस्राएलला क्षमा करील
4 परमेश्वर म्हणतो,
“त्यानी माझा त्याग केली तरी मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल क्षमा करीन.
मी मोकळेपणाने त्यांच्यावर प्रेम करीन.
आता मी त्यांच्यावर रागावलो नाही.
5 मी इस्राएलासाठी दहिवराप्रमाणे होईन.
इस्राएल लिलीप्रमाणे फुलेल,
लबानोनमधील गंधसरूंप्रमाणे तो फोफावेल.
6 त्याच्या फांद्यांचा विस्तार होईल
व तो जैतुनाच्या सुंदर वृक्षाप्रमाणे होईल.
लंबानोनमधील गंधसरूंच्या गंधाप्रमाणे
त्याचा सुवास असेल.
7 इस्राएलचे लोक, पुन्हा,
माझ्या सुराक्षितेत राहातील ते धान्याप्रमाणे
वाढतील ते वेलीप्रमाणे विस्तारतील.
ते लबानोनमधील द्राक्षारसाप्रमाणे होतील.”
परमेश्वर इस्राएलला मूर्ती बद्दल ताकीद देतो
8 “एफ्राईम, माझा (परमेश्वराचा) मूर्तीशी काहीही संबंध असणार नाही,
तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा मीच एकमीच आहे.
फक्त मीच तुमच्यावर लक्ष ठेवतो, मी सदाहरित देवदारूसारखा आहे.
माझ्यामुळे तुम्हाला फळ मिळते.”
अखेरचा सल्ला
9 शहाण्या माणसाला या गोष्टी समजतात.
चलाख माणसाने या गोष्टी शिकाव्या
परमेश्वराचे मार्ग योग्य आहेत.
त्यामुळे सज्जन जगतील
व दुर्जन मरतील.
योहान स्वर्ग पाहतो
4 तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, “इकडे ये, आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.” 2 त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर सिंहासन होते. कोणी एक त्यावर बसलेले होते. 3 त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि सिंहासनाभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते.
4 सिंहासनाभोवती चोवीस आसने होती, आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुगुट असलेले चोवीस वडील बसले होते. 5 सिंहासनापासून विजा व भिन्न आवाज निघत होते. शिवाय गडगडाट निघत होते. सिंहासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते. 6 तसेच सिंहासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते.
मध्यभागी, सिंहासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते डोळ्यांनी भरले होते. पुढे डोळा, मागे डोळे. 7 पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता. दुसरा बैलासारखा होता. तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता. आणि चवथा उडत्या गरुडासारखा होता. 8 त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते. व त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखाखालीसुद्धा डोळे होते. दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते:
“पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभु देव सर्वसमर्थ
जो होता, जो आहे, आणि जो येणार आहे.”
9 जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी सिंहासनावर बसलेल्याचा गौरव, सन्मान व उपकारस्तुति करीत होते आणि व जो सिंहासनावर बसलेला होता तो अनंतकाळपर्यंत जगत राहणारा आहे, 10 तेव्हा तेव्हा जो सिंहासनावर बसला होता आणि अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्यासमोर चोवीस वडील पाया पडत होते आणि त्याची उपासना करीत होते. ते आपले मुगुट सिंहासनासमोर ठेवत होते. व म्हणत होते की:
11 “आमचा प्रभु आणि देव!
तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करुन घेण्यास योग्य आहेस.
तू सर्व काही तयार केलेस
तुला वाटत होते म्हणून सर्व काही अस्तित्वात आले आणि करण्यात आले.”
2006 by World Bible Translation Center