Old/New Testament
नेत्यांनी इस्राएलला व यहूदाला पाप करायाला भाग पाडले
5 “यायकांनी, इस्राएल राष्ट्रा आणि राजाच्या घराण्यातील लोकांनो, माझे म्हणणे ऐका. कारण हा निवाडा तुमच्यासाठी आहे.
“तुम्ही मिस्पातील सापळ्याप्रमाणे आहात. 2 तुम्ही पुष्कळ वाईट कृत्ये केली आहेत, म्हणून मी तुम्हा साऱ्याना शिक्षा करीन. 3 एफ्राईमला मी ओळखून आहे. इस्राएलची कृत्ये मला महीम आहेत. एफ्राईम, आता, यावेळी तू वश्येप्रमाणे वागत आहेस. इस्राएल पापाने बरबटली आहे. 4 इस्राएलच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या वाईट गोष्टी त्यांना परमेश्वराकडे परत येण्यास अडथळा करतात. ते नेहमी दुसऱ्या दैवतांच्या मागे मागे जाण्याच्या मार्गाचाच विचार करतात. ते परमेश्वराला ओळखत नाहीत. 5 इस्राएलचा अहंकार त्यांच्याविरुध्द पुरावा आहे. म्हणून इस्राएल आणि एफ्राईम त्यांच्या पापांना अडखळतील. त्याच्याबरोबर यहूदाही अडखळेल.
6 “लोकांचे नेते परमेश्वराचा शोध घेतील. ते त्यांच्याबरोबर त्यांच्या ‘मेंढ्या’ व ‘गायी’ घेतील. पण त्यांना परमेश्वर सापडणार नाही. का? कारण त्यांने त्या लोकांचा त्याग केला आहे. 7 ते परमेश्वराशी प्रामाणिक राहात नाहीत. त्यांची मुले परक्यांपासून झालेली आहेत. आता परमेश्वर त्यांचा आणि त्यांच्या देशाचा पून्हा नाश करील”
इस्राएलच्या नाशाचे भविष्य
8 “गिबात शिंग फुंका,
रामात तुतारी फुंका.
बेथ-आवेनमध्ये इषारा द्या.
बन्यामीन, तुझ्यामागे शत्रू लागला आहे.
9 शिक्षेच्या वेळी एफ्राईम ओसाड होईल
ह्या गोष्टी नक्की घडून येतील,
असा खात्रीपूर्वक इषारा मी (परमेश्वर)
इस्राएलच्या घराण्यांना देतो.
10 दुसऱ्यांची मालमत्ता चोरणाव्या
चोरांसारखे यहूदाचे नेते आहेत.
म्हणून मी (परमेश्वर) माझ्या रागाचा
त्यांच्यावर पाण्याप्रमाणे वर्षाव करीन.
11 एफ्राईमला शिक्षा होईल.
द्राक्षांप्रमाणे तो चिरडला व दाबला जाईल. का?
कारण त्याने ओंगळाला अनुसरण्याचे ठरविले.
12 कसर ज्याप्रमाणे कापडाच्या तुकड्याचा नाश करते,
तसाच मी एफ्राईमचा नाश करीन.
लाकडाचा तुकडा सडून नष्ट होता,
तसेच मा यहूदाला नष्ट करीन.
13 एफ्राईमने स्वतःचा आजार व यहूदाने स्वतःची जखम पाहिली. म्हणून मदतीसाठी ते अश्शुरकडे गेले.
त्यांनी सम्राटाला त्यांच्या समस्या सांगितल्या.
पण तो सम्राट तुम्हाला बरे करु शकत नाही.
तो तुमची जखम भरून काढू शकत नाही.
14 का? एफ्राईमच्या दृष्टीने मी सिंहाप्रमाणे होणार आहे.
यहूदा राष्ट्राला मी तरुण सिंहासारखा होणार आहे.
मी, हो मी, त्यांचे फाडून तुकडे तुकडे करीन.
मी त्यांचे हरण करीन.
आणि कोणीही त्यांना माझ्यापासून वाचवू शकणार नाही.
15 लोक त्यांचा अपराध कबूल करे पर्यंत
आणि माझा शोध घेईपर्यंत
मी माझ्या जागी परत जाईन. हो!
त्यांच्या अडचणीच्या वेळी ते माझी कसून शोध करतील.”
परमेश्वराकडे परत येण्याची फळे
6 “चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या!
त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील.
त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.
2 दोन दिवसांनी तो आपल्याला जिवंत करील.
आणि तिसऱ्या दिवशी उठवील
मग आपण त्यांच्याजवळ पाहू शकू.
3 आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊ
या परमेश्वराला समजून घ्यायचा कसून प्रयत्न करू या.
पहाट येते हे जसे आपल्याला माहीत आहे,
हेही आपल्याला माहीत आहे.
जमिनीला पाणी पुरविणाव्या वसंतातील
पावसाप्रमाणे परमेश्वर येईल.”
लोक निष्ठावान नाहीत
4 “एफ्राईम व यहूदा, मी तुमचे काय करावे बरे?
तुमची निष्ठा सकाळच्या धूक्याप्रमाणे आहे.
प्रातःकाळीच नाहीशा होणाऱ्या
दवाप्रमाणे तुमची निष्ठा आहे.
5 मी संदेष्ट्यांचा उपयोग करुन
लोकांसाठी नियम केले.
माझ्या आज्ञेप्रमाणे लोकांना ठार मारले गेले.
त्या निर्णयांतून चांगल्या गोष्टी निर्माण होतील.
6 का? कारण मला निष्ठावंत प्रेम पाहिजे,
बळी नको.
लोकांनी होमार्पणे आणण्यापेक्षा,
परमेश्वराला जाणून घ्यावे असे मला वाटते.
7 पण लोकांनी आदामासारखाच करार मोडला
त्यांच्या देशातच त्यांनी माझा विश्वासघात केला.
8 गिलाद दुष्कर्मे करणाव्यांची नगरी आहे.
लोकांनी दुसऱ्यांना फसविले व ठार मारले.
9 लुटारू ज्याप्रमाणे कोणावर तरी हल्ला
करण्यासाठी वाट बघत लपून बसतात,
त्याचप्रमाणे धर्मगुरु शेखमला जाणाव्या रस्त्यावर वाटसंरूची वाट बघतात.
त्यांनी दुष्कृर्त्ये केली आहेत.
10 इस्राएलमध्ये भयंकर गोष्ट मी पाहीली आहे.
एफ्राईम परमेश्वाशी निष्ठावान नाही
इस्राएल पापाने बरबटली आहे.
11 यहूदा, तुझ्यासाठी सुगीची वेळ ठेवलेली आहे.
माझ्या लोकांना मी कैदेतून परत आणीन, तेव्हा ती वेळ येईल.”
7 “मी इस्राएलला बरे करीन.
मगच लोकांना एफ्राईमच्या पापाविषयी कळून येईल.
लोकांना शोमरोनाचा खोटेपणाही समजेल.
त्या नगरीत ये जा करणाऱ्या चोरांबद्दलही लोकांना समजेल.
2 मी त्याचे अपराध लक्षात ठेवीन, असे त्या लोकांना वाटत नाही.
त्याची दुष्कृत्ये सगळीकडे पसरली आहेत.
मला त्यांची पापे स्पष्ट दिसू शकतात.
3 त्यांची दुष्कृत्ये त्यांत्या राजाला आनंद देतात.
त्यांची दैवते त्यांच्या नेत्यांना खूश करतात.
4 रोटीवाला रोट्या बनविण्यासाठी
कणीक मळतो तो रोटी भट्टीत ठेवतो
रोटी फुगत असताना तो आच मोठी ठेवत नाही.
पण इस्राएलचे लोक तसे नाहीत.
ते त्यांची आच नेहमीच मोठी ठेवतात.
5 आमच्या राजाच्या दिवशी, ते आच जास्त मोठी करतात.
ते पेयांच्या मेजवान्या देतात.
मद्याच्या गरमीने नेत्यांना मळमळते.
मग राजाही परमेश्वराच्या निंदकांत सामील होतो.
6 लोक कट रचतात.
त्यांची मने तापलेल्या भट्टीप्रमाणे उत्तेजित होऊन जळतात.
त्यांच्या मनातील खळबळ रात्रभर जळत राहाते.
आणि सकाळी ती अतितप्त विस्तवाप्रमाणे होते.
7 ते तापलेल्या भट्टीप्रमाणे आहेत.
त्यांनी त्यांच्या राज्यकर्त्यांचा नाश केला.
त्यांचे सर्व राजे पडले
पण एकानेही मदतीसाठी मला हाक मारली नाही.”
इस्राएलचा नाश केला जाणार आहे, हे इस्राएलला ठाऊक नाही
8 “एफ्राईम राष्ट्राबरोबर मिसळतो
तो दोन्हीकडून न भाजलेल्या भाकरीप्रमाणे आहे.
9 परके एफ्राईमची शक्ती नष्ट करतात.
पण एफ्राईमला ते कळत नाही.
त्याच्यावर पिकलेले केस पसरले आहेत.
पण ते त्याला माहीत नाही.
10 एफ्राईमचा गर्व त्यांच्याविरुध्द
बोलतो लोकांना खूपच अडचणी आहेत,
तेरी ते परमेश्वराकडे, त्यांच्या परमेश्वराकडे परत जात नाहीत.
ते मदतीसाठी त्याच्याकडे पाहात नाहीत.
11 म्हणजेच एफ्राईम मूर्ख पारव्याप्रमाणे बेअक्कल झाला आहे.
लोकांनी मदतीसाठी मिसरला हाक मारली.
ते मदत मागायला अश्शूरकडे गेले.
12 ते मदतीसाठी त्या देशांकडे जातात खरे,
पण मी त्यांना सापळ्यात पकडीन.
मी माझे जाळे त्यांच्यावर फेकीन,
आणि जाळ्यात अडकलेल्या आकाशातील पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन.
त्यांच्या करारांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन.
13 ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे.
त्यांनी माझा त्याग केला.
त्यांनी माझी आज्ञा पाळण्यांस नकार दिला म्हणून त्यांचा नाश होईल.
मी त्या लोकांचे रक्षण केले पण ते माझ्याविरुध्द खोटे बोलतात.
14 मनापासून ते मला कधीही बोलावीत नाहीत.
हो! ते त्यांच्या बिछान्यात रडतात
आणि धान्य व नवीन मद्य मागताना ते स्वतःला माझ्यापासून अलगच करतात
मनाने ते माझ्यापासून दूर गेले आहेत.
15 मी त्यांना शिकवण दिली आणि त्यांचे हात बळकट केले.
पण त्यांनी माझ्याविरुध्द दुष्ट बेत रचले आहेत.
16 ते मोडक्या धनूष्याप्रमाणे आहेत.
त्यांनी दिशा बदलल्या पण ते परत माझ्याकडे आले नाहीत.
त्यांचे नेते त्यांच्या सामर्थ्याबद्दल बढाई मारतात.
पण ते तलवारीच्या वाराने मारले जातील.
मग मिसरचे लोक त्यांना हसतील.
मूर्तिपूजेने इस्राएलला नाशाकडे नेले
8 “रणशिंग फुंकून इषारा द्या परमेश्वराच्या घरावरील गरुडाप्रमाणे व्हा. इस्राएल लोकांनी माझा करार मोडला आहे त्यांनी माझे नियम पाळले नाहीत 2 ‘परमेश्वर, आम्ही इस्राएलमधील लोक तुला ओळखतो’ असे ते किंचाळून मला म्हणतात. 3 पण इस्राएलने चांगल्या गोष्टी नाकारल्या म्हणून शत्रू त्याचा पाठलाग करतात. 4 इस्राएल लोकांनी त्यांचा राजा निवडला, पण सल्ला विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले नाहीत. इस्राएल लोकांनी नेते निवडले, पण मी ओळखत असणाऱ्या लोकांची निवड त्यांनी केली नही. इस्राएल लोकांनी त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचा उपयोग स्वतःसाठी मर्ती तयार करण्याकंरिता केला. म्हणून त्यांचा नाश होईल. 5-6 शोमरोन, तुझे वासरू परमेश्वराने नाकारले आहे. परमेश्वर म्हणतो, ‘मी इस्राएल लोकांवर रागावलो आहे.’ इस्राएलच्या लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा केली जाईल काही कामगारांनी ते पुतळे घडविले ते काही परमेश्वर नाहीत. शोमरोनच्या वासराचे तुकडे तुकडे केले जातील 7 इस्राएल लोकांनी मूर्खपणा केला. तो वाऱ्याला पेरण्याप्रमाणे होता. म्हणून त्यांच्यावर संकटे येतील-ते वावटळीचे पीक निर्माण करतील. शेतांत पीक वाढेल, पण त्यापासून अन्न मिळणार नाही. जर काही पिकलेच, तर परकेच ते खाऊन टाकतील.
8 “कोणालाही नको असलेल्या ताटासारखा इस्राएल असल्यामुळे त्याचा नाश केला गेला.
इस्राएलला दूर फेकण्यात आले.
म्हणून इस्राएल लोक इतर राष्ट्रांत विखुरले गेले.
9 एफ्राईम त्याच्या ‘प्रेमिकाकडे’ गेला.
रानटी गाढवाप्रमाणे तो अश्शूरकडे भटकला गेला.
10 इस्राएल लोक इतर राष्ट्रांतील आपल्या ‘प्रियकरांकडे’ गेले.
पण मी इस्राएलींना एकत्र गोळा करीन.
पण त्या सामर्थ्यवान राजाच्या ओझ्यामुळे
त्यांना थोडासा त्रास झालाच पाहिजे.
इस्राएल देवाला विसरून मूर्तीना पुजतो
11 “एफ्राईमने पुष्कळ वेद्या
बांधून पापच केले.
त्या वेद्या एफ्राईमच्या पापाच्या वेद्या बनल्या आहेत.
12 मी एफ्राईमसाठी जरी 10,000 नियम लिहिले,
पण एफ्राईमने ते परक्यासाठी असल्याप्रमाणे मानले.
13 इस्राएलींना बळी देणे आवडते.
ते मांसाचा नैवेद्य दाखवून ते खातात.
परमेश्वर त्यांनी दिलेले बळी स्वीकारीत नाही.
त्याला त्यांची पापे स्मरतात.
म्हणून तो त्यांना शिक्षा करील.
कैदी म्हणून त्यांना मिसरला नेण्यात येईल.
14 इस्राएलने राजवाडे बांधले.
पण तो आपल्या कर्त्याला विसरला आता यहूदा गढ्या बांधतो आहे.
पण मी यहूदातील गावाला आग लावीन
आणि ती आग त्या गढ्यांना बेचिराख करील!”
इफिस येथील मंडळीला
2 “इफिस येथील मंडळीच्या दूताला हे लिही:
“जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोनेरी दीपसमयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेतः
2 “तू काय करतोस ते मला माहीत आहे. तू खूप काम करतोस व धीर धरतोस हे मला माहीत आहे. मला हे माहीत आहे की दुष्ट मनुष्यांचा तू स्वीकार करीत नाहीस आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची कसोटी तू घेतलेली आहेस आणि ते खोटे आहेत हे तुला समजले आहे. 3 माझ्या नावासाठी तू धीर धरलास, माझ्या नावामुळे तू दु:ख सोसलेस आहे आणि तू थकला नाहीस.
4 “तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तू तुझी पहिली प्रीति सोडली आहेस. 5 ज्या उंचीवरुन तू पडलास ते लक्षात आण! पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी दीपसमई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. 6 पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाईतांचा [a] कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करितो.
7 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे (फळ) खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे.
स्मुर्णा येथील मंडळीला
8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही:
“जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जीवनात आला.
9 “मला तुमचे क्लेश आणि गरीबी माहीत आहे. तरीही तुम्ही श्रीमंत आहात! ज्या वाईट गाष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत, ते सैतानाची सभा आहेत. 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरु नकोस. मी तुला सांगतो, तुम्हांपैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकतील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हांला जीवनाचा मुगुट देईन.
11 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजा होणारच नाही.
पर्गम येथील मंडळीला
12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही:
“ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत, 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझ्या नावात दृढ आहात. अंतिपाच्या काळामध्येसुद्धा माझ्यावर तुमचा असलेला विश्वास तुम्ही नाकारला नाही. अंतिपा माझा विश्वासू साक्षीदार होता. तो तुमच्या शहरात मारला गेला. सैतान जेथे राहतो असे ते तुमचे शहर आहे.
14 “तरीही तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात. बलामाने बालाकाला इस्राएल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकविले. त्या लोकांनी लैंगिक पापे करुन आणि मूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले. 15 त्याचप्रमाणे निकलाईताची शिकवण आचरणारे तुमच्यामध्येसुद्धा काहीजण आहेत. 16 म्हणून पश्चात्ताप करा! नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.
17 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
“जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्या मान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड (खडा) देईन ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईल त्यालाच ते समजेल.
थुवतीरा येथील मंडळीला
18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही:
“देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या पितळासारखे आहेत.
19 “मला तुमची कामे, तुमचे प्रेम आणि विश्वास, तुमची सेवा आणि धीर माहीत आहे. आणि तुम्ही पहिल्यापेक्षा आता जास्त करीत आहात हे माहीत आहे. 20 तरीसुद्धा तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीसमोर ठेवलेले अन्न खावयास मोहविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करु देता. 21 मी तिला तिच्या अनैतिक लेंगिक पापाविषयी पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे. परंतु ती तसे करायला तयार नाही.
22 “म्हणून मी तिला दु:खाच्या बिछान्यावर खिळवीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचाराचे पाप करतात त्यांना भयंकर दु:ख भोगावयास लावीन. जर ती तिच्या मार्गापासून पश्र्चात्ताप पावली नाही 23 तर मी तिच्या अनुयायांना ठार मारुन टाकीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी तो आहे जो अंतःकरणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचा मोबदला देईन.
24 “पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आजरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्या तुम्ही सैतानाची म्हणविलेली खोल गुपिते जाणली नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही. 25 मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्याला धरुन राहा.
26 “जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. 27 तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार गाजवील मातीच्या भांड्यासारखा तो त्यांचा चुराडा करील. जसा पित्याकडून मला अधिकार प्राप्त झाला आहे, check add footnote 28 तसा मीसुद्धा त्याला पहाटेचा तारा देईन. 29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
2006 by World Bible Translation Center