Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

New Testament in a Year

Read the New Testament from start to finish, from Matthew to Revelation.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
मार्क 9:1-29

येशू त्या लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”

मोशे व एलीयाबरोबर येशू(A)

सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटालाशुभ्र करता येणार नाहीत, अशी होती. एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रगट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते.

पेत्र येशूला म्हणाला, “गुरूजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणांसाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्याला समजेना कारण ते भयभीत झाले होते.

मग एक मेघ आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली. मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”

आणि एकाएकी त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही.

ते डोंगरावरून खाली येत असता येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठेपर्यत कोंणालाही सांगू नका.”

10 म्हणून त्यांनी ही गोष्ट त्यांच्यातच ठेवली, परंतु ते मेलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते. 11 त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?”

12 तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी आला पाहिजे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दु:खे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे? 13 मी तुम्हांला सांगतो, एलीया आधीच आला आहे आणि जसे त्याच्याविषयी लिहिले आहे तसे, त्यांनी त्यांना पाहिजे तसे त्याचे केले.”

येशू एका आजारी मुलाला बरे करतो(B)

14 नंतर ते उरलेल्या शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांना त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय दिसला आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्यांच्याशी वाद घालीत होते. 15 सर्व लोक येशूला पाहताच आश्यर्यचकित झाले आणि ते त्याला वंदन करण्यासाठी धावले.

16 येशूने त्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?”

17 लोकांतील एकाने त्याला उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणकडे आणले. त्याला अशुद्ध आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही. 18 आणि जेव्हा तो त्याला धरतो तेव्हा त्याला खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्याला काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”

19 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक विश्वास ठेवीत नाही. मी तुमचे कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.”

20 नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळवटून टाकले, तो जमिनीवर पडला आणि तोंडाला फेस आला आणि तो लोळू लागला.

21 नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?”

वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे. 22 पुष्कळदा ठार करण्यासाठी तो त्याला अग्नीत किंवा पाण्यात टाकीत असे. परंतु आपण काही करत असाल तर आम्हांवर दया करा. आणि आम्हांला मदत करा.”

23 येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास तुम्हांला काही तरी करणे शक्य असेल तर, परंतु जो विश्वास ठेवतो त्या मनुष्याला सर्व काही शक्य असते.”

24 तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास धरतो, माझा अविश्वास घालवण्यास मदत करा.”

25 येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावात येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे याला मुके बहिरे करणाऱ्या आत्म्या मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”

26 नंतर तो अशुद्ध आत्मा किंचाळला व मुलाला अगदी पिळवटून बाहेर निघाला. मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांना वाटले, तो मेला. 27 परंतु येशूने त्याला हातास धरून त्याच्या पायावर उभे केले. आणि मुलगा उभा राहिला.

28 नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?”

29 येशू त्यांना म्हणाला, “ही असली भुते प्रार्थनेशिवाय व उपासावाचून दुसऱ्या कशाने निघणे शक्य नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center