Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

New Testament in a Year

Read the New Testament from start to finish, from Matthew to Revelation.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 करिंथकरांस 7:1-19

विवाहाविषयी

आता, तुम्ही ज्याविषयी आपणा त्यासंबंधाने: एखाद्या मनुष्याने एखाद्या स्त्रीला स्पर्श न करणे हे त्याच्यासाठी चांगले आहे, परंतु जारकर्माचा मोह टाळण्यासाठी, प्रत्येक पुरुषाला त्याची स्वतःची पत्नी असावी. व प्रत्येक स्त्रीला तिचा स्वतःचा पती असावा. पतीने त्याच्या पत्नीला पत्नी म्हणून तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीने तिच्या पतीला पतीचा हक्क द्यावा. पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो तिच्या पतील आहे. विषयसुखासाठी एकमेकाला वचित करु नका, तुम्हालां प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा. आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुम्च्यात आत्मसंयमन नसल्याने मोहात पाडू नये. परंतु मी हे तुम्हांला सवलत म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नव्हे. मला असे वाटते की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतःचे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे. परंतु जे अविवाहित व विधवा आहेत त्यांना मी म्हणेन की, माझ्यासारखीचराहिली तर ते त्यांना बरे.

9-10 आता जे विवाहित आहेत त्यांना मी आज्ञा देतो. मी ती आज्ञा देत नसून प्रभु देत आहे. पत्नीने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचे पाहू नये. 11 पण जर ती वेगळे राहते तर तिने लग्न न करताच राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा. आणि पतीने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊ नये.

12 आता इतरासाठी सांगतो, आणि हे मी सांगत आहे, प्रभु नाही: जर एखाद्या ख्रिस्ती बांधवाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल, आणि त्याच्याबरोबर राहण्यास ती राजी असेल तर त्याने तिला सोडचिठ्ठी देऊ नये. 13 आणि एखाद्या स्त्रीचा नवरा जर विश्वास ठेवणारा नसेल आणि तो तिच्याबरोबर राहण्यास राजी असेल तर तिने त्याला सोडचिठ्ठी देऊ नये, 14 कारण विश्वास न ठेवणाऱ्या पतीचे त्याच्या ख्रिस्ती पत्नीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे पवित्रीकरण झाले आहे आणि विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीचे त्या ख्रिस्ती पतीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे त्यांचे नाते देवाच्या दृष्टीनेही कायदेशीर आहे. नाहीतर तुमची मुले अशुद्ध झाली असती, परंतु आता ती पवित्र आहेत.

15 तरीही विश्वास न ठेवणारा वेगळा होत असेल तर त्याने वेगळे व्हावे. याबाबतीत ख्रिस्ती बंधु किंवा बहीण यांना मोकळीक आहे. देवाने आपल्याला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे. 16 कारण पत्नी, तू तुइया विश्वास न ठेवणाऱ्या पतीला तारु शकशील हे तुला कसे माहीत? किंवा पती, तू आपल्या विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीला तारशील हे तुला कसे माहीत?

देवाने पाचारण केल्याप्रमाणे राहा

17 फक्त, देवाने प्रत्येकाला जसे नेमले आहे आणि देवाने जसे प्रत्येकाला पाचारण केले आहे त्याप्रमाणे त्याने राहावे. आणि अशी मी सर्व मंडळ्यांना आज्ञा करतो. 18 एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता न झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये. 19 सुंता म्हणजे काही नाही व सुंता न होणे म्हणजेही काही नाही. तर देवाची आज्ञा पाळणे यात सर्व काही आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center