M’Cheyne Bible Reading Plan
रऊबेनाचे वंशज
5 रऊबेन इस्राएलाचा थोरला मुलगा होता. तेव्हा थोरल्या मुलाला मिळणारे सगळे विशेषाधिकार त्याला मिळायला हवे होते. पण रऊबेनने आपल्या वडीलांच्या पत्नीशीच शरीरसंबंध ठेवले त्यामुळे हे अधिकार योसेफच्या मुलांना दिले गेले. या घराण्याच्या वंशावळीच्या नोंदीत रऊबेनची थोरला मुलगा म्हणून नोंद नाही. यहूदा आपल्या भावंडांपेक्षा पराक्रमी निघाला म्हणून पुढारीपण त्याच्या घराण्यात गेले. मोठ्या मुलाला मिळायचे ते इतर सर्व अधिकार मात्र योसेफाच्या घराण्याला मिळाले.
हनोख, पल्लू, हस्रोन आणि कर्मी हे रऊबेनचे मुलगे.
4 योएलचे वंशज असे: योएलचा मुलगा शमाया. शमायाचा मुलगा गोग. गोगचा शिमी. 5 शिमीचा मुलगा मीखा. मीखाचा मुलगा राया. रायाचा मुलगा बाल. 6 बालचा मुलगा बैरा. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने बैराला आपल्या घरातून पिटाळून लावले. आणि कैद केले. बैरा हा रऊबेनी घराण्याचा अधिकारी पुरुष होता.
7 योएलचे भाऊ आणि त्यांची त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे: ईयेल सर्वांत मोठा, मग जखऱ्या 8 आणि बेला. बेला हा आजाजचा मुलगा. आजाज हा शमाचा मुलगा. शमा योएलचा मुलगा. नबो आणि बाल मौन येथपर्यंत ते अरोएर प्रांतात राहत होते. 9 फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत बेलाच्या लोकांची वस्ती होती. गिलाद प्रांतात आपली गाई-गुरे फार झाल्यामुळे त्यांना या बाजूला सरकावे लागले. 10 शौलच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हग्री लोकांशी लढाई करुन त्यांचा पाडाव केला. त्यांच्याच तंबूत बेलाच्या लोकांनी मुक्काम केला. तेथे राहून त्यांनी गिलादच्या पर्वेकडील सर्व प्रदेश पालथा घातला.
गादचे वंशज
11 रऊबेनी लोकांच्या शेजारीच गाद घराण्यातील लोकांची वस्ती होती. बाशान प्रांतात सलका नगरापर्यंत गाद घराण्यातील लोक राहत होते. 12 योएल हा बाशान मधला पहिला नायक. शाफाम दुसरा. मग यानयने त्याची जागा घेतली. 13 मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे त्यांच्या घराण्यातील सात भाऊ. 14 हे अबीहईलचे वंशज. अबीहईल हूरीचा मुलगा. हूरी यारोहाचा मुलगा आणि यारोहा गिलादचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशायाचा मुलगा. यशीशाया यहदोचा मुलगा. यहदो बूजाचा मुलगा. 15 अही हा अब्दीएलचा मुलगा. अब्दीएल गूनीचा मुलगा. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.
16 गाद घराण्यातील लोक गिलाद प्रांतात राहत होते. बाशान, बाशानच्या आसपासची खेडी, शारोनच्या आसपासची शिवारे एवढ्या भागात थेट सीमेपर्यंत राहत होते.
17 योथाम आणि यराबाम यांच्या काळात या लोकांच्या नावांच्या नोंदी गाद वंशावळीमध्ये केल्या गेलेल्या आहेत. योथाम यहूदाचा आणि यराबाम इस्राएलचा राजा होता.
युध्दनिपुण सैनिक
18 मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून 44,760 शूर सैनिक युध्दाला सज्ज असे होते. लढाईमध्ये ते प्रवीण होते. ढाली, तलवारी ते बाळगून होते. एवढेच नव्हे तर धनुष्य-बाण चालवणेही त्यांना अवगत होते. 19 हगरी, यतूर, नाफीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या. 20 मनश्शे, रऊबेन आणि गाद वंशातील लोक लढाईच्या वेळी देवाची प्रार्थना करीत. देवावर भरवंसा असल्यामुळे ते मदतीची याचना करीत. देव त्यांना साहाय्य करी. त्यामुळे त्यांना हग्री लोकांचा पराभव करता आला. या लोकांबरोबरच्या इत्तर लोकांचाही त्यांनी पाडाव केला. 21 50,000 उंट, 2,50,000 शेळ्यामेंढ्या, 2,000 गाढवे आणि 1,00,000 माणसे एवढे त्यांनी हग्री लोकांकडून बळकावले. 22 बरेच हग्री लोक मारले गेले कारण देवाने रऊबेनींना लढाई जिंकायला मदत केली. यानंतर मनश्शे, रऊबेन आणि गाद लोक हग्री लोकांच्या भूप्रदेशात राहू लागले. बाबिलोन लोकांनी इस्राएलांवर विजय मिळवून त्यांना कैद करुन नेईपर्यंत हे लोक तिथेच राहिले.
23 बाशानपासून बाल-हर्मोन, सनीर आणि हर्मेान डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.
24 मनश्शेच्या अर्ध्या (वंशातील घराण्याचे) प्रमुख पुढीलप्रमाणे: एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व शूर, वीर आणि नामांकित होते. आपापल्या घराण्यांचे ते प्रमुख होते. 25 पण आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या देवाशी त्यांनी गैरवर्तन केले. देवाने ज्यांना नेस्तनाबूत केले होते त्या लोकांच्याच खोट्या देवतांची त्यांनी उपासना केली.
26 इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल याच्या मनात लढाईवर जाण्याची इच्छा जागवली. पूल म्हणजेच तिल्गथ-पिल्नेसर. त्याने मनश्शे, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांशी लढाई केली. त्यांना त्याने ते होते तिथून हुसकावून लावले आणि कैदी केले. पूलने मग त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हा पासून आजतागायत इस्राएलाच्या त्या घराण्यांतील लोक तेथे राहत आहेत.
लेवीचे वंशज
6 गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.
2 अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.
3 अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे मुलगे.
नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनचे मुलगे. 4 एलीएजाराचा मुलगा फिनहास, फिनहासचा अबीशूवा. 5 अबीशूवाचा मुलगा बुक्की. बुक्कीचा मुलगा उज्जी. 6 उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला. 7 मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा. 8 अहीटूबचा मुलगा सादोक. सादोकचा मुलगा अहीमास. 9 अहीमासचा मुलगा अजऱ्या. अजऱ्याचा मुलगा योहानन. 10 योहाननचा, मुलगा अजऱ्या (शलमोनाने यरुशलेममध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.) 11 अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला. 12 अहीटूबचा मुलगा सादोक, सादोकचा मुलगा शल्लूम. 13 शल्लूमचा मुलगा हिल्कीया. हिल्कीयाचा मुलगा अजऱ्या. 14 अजऱ्या म्हणजे सरायाचे वडील. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
15 यहूदा आणि यरुशलेम यांचा परमेश्वराने पाडाव केला तेव्हा यहोसादाकला परागंदा व्हावे लागले. या लोकांना युध्दकैदी म्हणून दुसऱ्या देशात जावे लागले. परमेश्वराने हे सर्व नबुखद्नेस्सरच्या हातून घडवले.
लेवीचे इतर वंशज
16 गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.
17 लिब्री आणि शिमी हे गर्षोमचे मुलगे.
18 अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.
19 महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे.
लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. वडलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
20 गर्षोमचे वंशज असे: गर्षोमचा मुलगा लिब्नी. लिब्नीचा मुलगा यहथ. यहथचा मुलगा जिम्मा. 21 जिम्माचा मुलगा यवाह. यवाहचा इद्दो. इद्दोचा मुलगा जेरह. जेरहचा यात्राय.
22 कहाथचे वंशज असे: कहाथचा मुलगा अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा मुलगा अस्सीर. 23 अस्सीरचा मुलगा एलकाना आणि एलकानाचा मुलगा एब्यासाफ. एब्यासाफचा मुलगा अस्सीर. 24 अस्सीरचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.
25 अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे मुलगे. 26 एलकानाचा मुलगा सोफय. सोफयचा मुलगा नहथ. 27 नहथचा मुलगा अलीयाब. अलीयाबचा यरोहाम. यरोहामचा एलकाना. एलकानाचा मुलगा शमुवेल. 28 थोरला योएल आणि त्याच्या पाठीवरचा अबीया हे शमुवेलचे मुलगे.
29 मरारीचे मुलगे याप्रमाणे: मरारीचा मुलगा महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा मुलगा शिमी. शिमीचा उज्जा. 30 उज्जाचा मुलगा शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
मंदिरातील गायक
31 कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली. 32 पवित्र निवास मंडपात हे लोक गायनसेवा करीत. यरुशलेममध्ये शलमोनाने परमेश्वराचे मंदिर उभारले तोपर्यंत त्यांनी ही सेवा केली. आपल्या कामाच्या नियमानुसार ते वागत.
33 गायनसेवा करणाऱ्यांची नावे अशी:
कहाथ घराण्यातील वंशज: हेमान हा गवई. हा योएलचा मुलगा. योएल शमुवेलचा मुलगा. 34 समुवेल एलकानाचा मुलगा. एलकाना यरोहामचा मुलगा. यरोहाम अलीएलचा मुलगा. अलीएल तोहाचा मुलगा. 35 तोहा सूफचा मुलगा. सूफ एलकानाचा मुलगा. एलकाना महथचा मुलगा. महथ अमासयचा मुलगा. 36 अमासय एलकानाचा मुलगा. एलकाना योएलचा मुलगा. योएल अजऱ्याचा मुलगा. अजऱ्या सफन्याचा मुलगा. 37 सफन्या तहथचा मुलगा. तहथ अस्सीरचा मुलगा. अस्सीर एव्यासाफचा मुलगा. एव्यासाफ कोरहचा मुलगा. 38 कोरह इसहारचा मुलगा. इसहार कहाथचा मुलगा. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा मुलगा.
39 आसाफ हेमानचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा मुलगा. बरेख्या शिमाचा मुलगा. 40 शिमा मिखाएलचा मुलगा. मिखाएल बासेया याचा मुलगा. बासेया मल्कीया याचा मुलगा. 41 मल्कीया एथनीचा मुलगा, एथनी जेरहचा मुलगा जेरह हा अदाया याचा मुलगा. 42 अदाया एतानाचा मुलगा. एथाना हा जिम्मा याचा मुलगा. जिम्मा शिमीचा मुलगा. 43 शिमी यहथ याचा मुलगा. यहथ हा गर्षोम याचा मुलगा. गर्षोम लेवीचा मुलगा.
44 मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा मुलगा. किशी अब्दीचा मुलगा. अब्दी मल्लूखचा मुलगा. 45 मल्लूख हशब्याचा मुलगा. हशब्या अमस्याचा मुलगा. अमस्या हा हिल्कीया याचा मुलगा. 46 हिल्कीया अमसीचा मुलगा. अमसी बानीचा मुलगा. बानी शेमर याचा मुलगा. 47 शेमेर महलीचा मुलगा. महली मूशीचा मुलगा, मूशी मरारीचा मुलगा मरारी हा लेवीचा मुलगा.
48 हेमान आणि आसाफ यांचे नातलग हे लेवी घराण्यातील होते. मंदिराच्या पवित्र निवासमंडपात काम करायला लेवींची निवड झाली होती. पवित्र निवासमंडप म्हणजे देवाचे घरच. 49 होम करायच्या आणि धूप जाळायच्या वेदींवर धूप जाळायची परवानगी मात्र फक्त अहरोनच्या वंशजातील लोकांनाच होती. अहरोनचे हे वंशज देवाच्या अत्यंत पवित्र गाभाऱ्यात नेमलेले सर्व काम करत. इस्राएली लोकांना प्रायश्र्चित्त देऊन शुध्द करण्याचे समारंभही ते करत. मोशे याने सांगितलेले नियम आणि विधी ते पाळत. मोशे देवाचा सेवक होता.
अहरोनचे वंशज
50 अहरोनचे वंशज पुढीलप्रमाणे: अहरोनचा मुलगा एलाजार. एलाजारचा मुलगा फिनहास. फिनहासचा मुलगा अबीशूवा. 51 अबीशूवाचा मुलगा बुक्की. बुक्कीचा मुलगा उज्जी. उज्जीचा मुलगा जरह्या. 52 जरह्याचा मुलगा मरायोथ. मरायोथचा मुलगा अमऱ्या. अमऱ्याचा मुलगा अहीटूब. 53 अहीटूबचा मुलगा सादोक आणि सादोकचा मुलगा अहीमास.
लेवी कुटुंबांची घरे
54 अहरोनचे वंशज राहत त्या ठिकाणांची माहिती अशी. त्यांना दिलेल्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या वसत्या उभारल्या. कहथ कुटुंबांना त्या जमिनीतील पहिला वाटा मिळाला. 55 हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासचे शिवार त्यांना मिळाले. 56 त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफून्नेचा मुलगा कालेब याला मिळाली. 57 अहरोनच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखोरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा, 58 हीलेन, दबीर, 59 आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली. 60 बन्यामीनच्या वंशातील लोकांना गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली.
कहथच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
61 कहथच्या उरलेल्या काही वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
62 गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
64 ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली. 65 यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठया टाकून, लेवी वंशजांना ती ती नगरे देण्यात आली.
66 एफ्राईमच्या वंशजांनी काही नगरे कहाथच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली. 67 त्यांना शखेम नगर मिळाले. शखेम हे आश्रयनगर होय. गेजेर, 68 यकमाम, बेथ-होरोन, 69 अयालोन आणि गथ-रिम्मोन हीही नगरे आसपासच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. एफ्राईमच्या डोंगराळ भागातील ही गावे होत. 70 मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे शिवारांसकट कहाथच्या वंशाच्या लोकांना दिली.
इतर लेवी कुटुंबांना मिळालेली घरे
71 गर्षोमच्या वंशजांना बाशानमधील गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या शिवारासकट, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
72-73 त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या शिवारासकट इस्साखारच्या वंशजांकडून मिळाली.
74-75 माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, शिवारासकट, आशेर घराण्याकडून गार्षोन कुटुंबांना मिळाली.
76 गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही शिवारासकट नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोन वंशाला मिळाली.
77 आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या घराण्याकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
78-79 या खेरीज मरारींना वाळवंटातील बेसेर, याजा, कदेमोथ, मेफाथ ही नगरे भोवतालच्या शिवारांसकट, रऊबेनी लोकांकडून मिळाली. हे रऊबेनी यार्देन नदीच्या पूर्वेला, यरीहोजवळ, राहत असत.
80-81 मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलादमधील रामोथ, महनाइम, हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या शिवारासकट मिळाली.
ख्रिस्ताचे अर्पण आम्हाला परिपूर्ण करते
10 कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची केवळ एक छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरुप नव्हे, म्हणून देवाची उपासना करण्यासाठी जे त्याच्याजवळ येतात त्यांना नियमशास्त्र त्याच अर्पणांमुळे जी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा केली जातात, ते कदापि परिपूर्ण करू शकत नाही. 2 जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे, कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते. 3 पण त्याऐवजी ते यज्ञ दरवर्षी पापांची आठवण करून देतात. 4 कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे शक्य नाही.
5 म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला,
“तुला यज्ञ किंवा अर्पणे नको होती,
पण तू माझ्यासाठी शरीर तयार केले.
6 होमार्पणांनी व पापार्पणांनी
तुला आनंद वाटला नाही.
7 मग मी म्हणालो, ‘हा मी आहे!
नियमशास्त्राच्या गुंडाळ्यामध्ये माझ्याबद्दल लिहून ठेवले आहे, देवा,
तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’” (A)
8 पहिल्याने तो म्हणाला, “तुला यज्ञांनी, अर्पणांनी, होमार्पणांनी व पापार्पणांनी संतोष वाटत नाही.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे आवश्यक ठरतात रतीदेखील.) 9 मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” अशा रीतीने त्याने दुसरी व्यवस्था करण्यासाठी पहिली रद्द केली. 10 देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करण्यात आलो.
11 प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो. 12 परंतु आपल्या पापांसाठी येशूने त्याच्या देहाचे एकमेव अर्पण केले. कारण ते सर्वकाळासाठी चांगले होते. तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे. 13 आणि आता त्याच्या शत्रूला त्याच्या पायाखाली घालीपर्यंत तो वाट पाहत आहे. 14 कारण अनंतकाळच्या त्याने केलेल्या एका यज्ञाच्या द्वारे त्याने ज्यांना शुद्ध केले, त्यांना परिपूर्ण केले.
15 पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,
16 “त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करीन, अ
से प्रभु म्हणतो,
मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात ठेवीन
आणि ते त्यांच्या मनावर लिहीन.” (B)
17 मग तो म्हणतो,
“आणि मी त्यांची पापे
व नियमविरहित कृत्ये कधीही आठवणार नाही.” (C)
18 जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाच्या आणखी अर्पणाची आवश्यकता भासणार नाही.
देवाच्या जवळ या
19 म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो. 20 त्याच्या शरीराद्वारे, त्याने उघडलेल्या नवीन आणि जिवंत अशा मार्गामुळे आपण न भीता परमपवित्र स्थानात पाऊल ठेवू शकतो. 21 आणि देवाच्या घराण्यावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे. 22 म्हणून आपण आपली मळीन विवेकबद्धि शुद्ध करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने आपण विश्वास, आश्वासन तसेच तळमळ यांनी भरलेल्या अंतःकरणाने देवाच्या जवळ जाऊ. 23 आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
Help Each Other Be Strong
24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ. 25 आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तजेन देऊ या, आणि तो दिवस [a] जवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याची अधिकच गरज आहे.
ख्रिस्तापासून दूर जाऊ नका
26 सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. 27 पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही. 28 जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मारतात. 29 तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा! 30 कारण त्याला ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.” [b] पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.” [c] 31 जीवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे.
तुम्ही आपला आनंद व धैर्य गमावू नका
32 ते पूर्वीचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता, तेव्हा तुम्ही भयंकर दु:खे सोसली. 33 काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले. 34 एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही मदत केली. त्यांच्या दु:खात सहभागी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
35 म्हणून तुमच्यामध्ये जो टृढ विश्वास होता तो सोडू नका. कारण त्यापासून तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. 36 तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हांला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रतिफळ मिळावे. 37 आता अगदी थोडक्या अवधीनंतर,
“जो येणारा आहे, तो येईल,
तो उशीर लावणार नाही.
38 परंतु माझा धार्मिक पुरुष
विश्वासाने वाचेल
आणि जर तो पाठ फिरवील तर
माझ्या जिवाला संतोष होणार नाही.” (D)
39 पंरतु पाठ फिरवून नष्ट झालेल्यांपैकी आपण नाही, तर आपल्या जिवाचे तारण साधून विश्वास बागळणाऱ्यांपैकी आहोत.
मौजमजा आवडणाऱ्या बायका
4 शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानच्या गायींनो, मी काय म्हणतो ते ऐका! तुम्ही गरिबांना दुखविता! त्यांना चिरडून टाकत! तुम्ही तुमच्या नवऱ्यांना तुमच्यासाठी “मद्य आणण्यास सांगता!”
2 परमेश्वराने, माझ्या प्रभूने शपथ घेतली आहे. त्याने त्याच्या पवित्र्याची शपथ घेऊन सांगितले की तुमच्यावर संकटे येतील. माशांचा गळ टाकून ते तुमच्या मुलांना नेतील. 3 तुमच्या नगरीचा नाश होईल. तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल तुम्ही तुमच्या मृत बाळांना ढिगांत फेकाल.
परमेश्वर असे म्हणतो. 4 “बेथेलला जा आणि पाप करा गिल्गालला [a] जाऊन आणखी पापे करा. सकाळी यज्ञ करा. तीन दिवसाच्या सुट्टीसाठी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा. 5 खमिराची आभार-अर्पणे द्या. अनिर्बंध इच्छा अर्पणांबद्दल प्रत्येकाला सांगा. इस्राएल, तुला ह्या गोष्टी करायला आवडते. मग जा आणि हे सर्वकर!” परमेश्वर असे म्हणतो.
6 “तुम्ही माझ्याकडे यावे म्हणून मी खूप प्रयत्न केले. मी तुम्हाला अन्न दिले नाही. तुमच्या कोणत्याही गावात अन्न नव्हते. पण तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
7 “कापणीच्या हंगामाच्या तीन महिने आधीच मी पाऊस थांबविला. म्हणून पीक वाढलेच नाही मग मी एका गावात पाऊस पडू दिला पण दुसऱ्या भागातील जमीन अतिशय कोरडी झाली. 8 म्हणून दोन-तीन गावांतील लोक दुसऱ्या एका गावाकडे पाण्यासाठी धडपडत गेले. पण प्रत्येकाला पुरेल एवढे पाणीच नव्हते. पण तरीसुध्दा मदत मागायला तुम्ही माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
9 “उष्णता व रोग ह्यांनी मी तुमची पिके मारली. मी तुमच्या बागांचा व द्राक्षमळ्यांचा नाश केला. टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे फस्त केली. पण तरीही तुम्ही मदतीसाठी माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर ह्या गोष्टी बोलला.
10 “मिसरला मी पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली. तुमच्यावर पाठविली. तुमच्या तरुणांना मी तलवारीने मारले. मी तुमचे घोडे काढून घेतले. मी तुमच्या तळांवर प्रेतांची दुर्गंधी पसरविली. पण तरीसुध्दा मदत मागायला तुम्ही माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर हे सर्व बोलला आहे.
11 “सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला. तसाच मी तुमचा नाश केला; आगीत ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती. पण तरीही तुम्ही मदत मागायला माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
12 “म्हणून, इस्राएल, मी तुझ्याबाबत पुढील गोष्टी करीन. मी तुझ्याशी असेच वागेन. इस्राएल, तुझ्या परमेश्वराला भेटण्यास सज्ज हो!”
13 मी कोण आहे? पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव!
मी तुमच्या मनाची निर्मिती केली.
मीच लोकांना कसे बोलायचे ते शिकविले.
मीच पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो.
मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे?
माझे नाव याव्हे मी सैन्याचा परमेश्वर आहे.
148 परमेश्वराची स्तुती करा.
स्वर्गातल्या देवदूतांनो
स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा.
ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा.
आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा.
का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती
त्या सदैव राहाव्यात म्हणून केली.
देवाने कधीही न संपणारे नियम केले.
7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा.
महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
8 देवाने अग्नी आणि गारा, बर्फ
आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे
आणि देवदार वृक्ष निर्मिले.
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि
पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले.
त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या.
देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा.
त्याच्या नावाला सदैव मान द्या.
स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील.
लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील.
लोक इस्राएलची स्तुती करतील.
हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो.
परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र
149 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा.
ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा.
2 इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या.
सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या.
3 त्या लोकांना डफाच्या आणि
वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.
4 परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे.
देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.
5 देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा.
झोपी गेल्यावरही आनंदी राहा.
6 लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या
आणि त्यांना त्यांच्या तलवारी हातात घेऊ द्या.
7 त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या.
त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या.
8 देवाचे लोक त्या राजांना आणि
महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील.
9 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील.
देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात.
परमेश्वराचे गुणगान करा.
150 परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
2 देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा.
त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.
3 तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा.
सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.
4 डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा.
तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.
5 जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा.
झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.
6 प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती कर.
2006 by World Bible Translation Center