Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 3-4

दावीदाची मुलगे

दावीदाच्या काही मुलांचा जन्म हेब्रोन नगरात झाला. त्यांची यादी अशी:

अम्रोन हा त्यातला थोरला. इज्रेल नगरातील अहीनवाम ही त्याची आई.

दानीएल हा दुसरा. कर्मेल यहूदा येथील अबीगईल ही त्याची आई.

तिसरा मुलगा अबशालोम. गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा हा मुलगा.

हग्गीथचा मुलगा अदोनीया हा चवथा.

अबीटलचा मुलगा शफाट्या हा पाचवा.

दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.

दावीदाच्या या सहा मुलांचा जन्म हेब्रोन येथे झाला.

दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरुशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले. तिथे जन्मलेली दावीदाची मुले खालीलप्रमाणे:

बथशूवाला चार मुलगे झाले. बथशूवा अम्मीएलची मुलगी. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे मुलगे. 6-8 इतर नऊ मुलगे असे: इभार, अलीशामा, एलीफलेट नोगा, नेफेग, याफीय, अलीशामा, एल्यादा, एलीफलेट. ही सर्व दावीदाची मुले. दासीपासून झालेले आणखीही मुलगे त्याला होते. तामार ही दावीदाची मुलगी.

दावीद नंतरचे यहूदाचे राजे

10 शलमोनाचा मुलगा रहाबाम. त्याचा मुलगा अबीया, त्याचा मुलगा आसा. आसाचा मुलगा यहोशाफाट, 11 त्याचा मुलगा योराम, योरामचा मुलगा अहज्या. अहज्याचा योवाश, 12 योवाशचा मुलगा अमस्या, अमस्याचा मुलगा अजऱ्या, त्याचा मुलगा योथाम. 13 योथामचा मुलगा आहाज, त्याचा मुलगा हिज्कीया, त्याचा मुलगा मनश्शे. 14 मनश्शेचा मुलगा आमोन, आमोनचा योशीया.

15 योशीयाचे मुलगे: थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चवथा शल्लूम.

16 यहोयाकीमचे मुलगे: यखन्या आणि त्याचा मुलगा सिद्कीया.

बाबिलोनने यहूदाचा पाडाव केल्यानंतरची दावीदाची वंशावळ

17 यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्याला झालेल्या मुलांची नावे: शलतीएल, 18 मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.

19 पदायाचे मुलगे याप्रमाणे: जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे मुलगे मशुल्लाम आणि हनन्या. या दोघांची बहीण शलोमीथ. 20 जरुब्बाबेलाला आणखीही पाच मुले होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.

21 पलट्या हा हनन्याचा मुलगा आणि पलट्याचा मुलगा यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा मुलगा ओबद्या. ओबद्याचा मुलगा शखन्या.

22 शखन्याचे वंशज याप्रमाणे: शमाया, शमायाला सहा मुलगे: शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट.

23 नाऱ्याला तीन मुलगे: एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.

24 एल्योवेनयला सात मुलगे होते. त्यांची नावे अशी: होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.

यहूदाची आणखी काही घराणी

यहूदाच्या मुलांची नावे अशी:

पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.

शोबालचा मुलगा राया: त्याचा मुलगा यहथ. यहथाची मुले अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.

इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची मुले. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी.

पनुएलाचा मुलगा गदोर आणि एजेरचा मुलगा हूशा ही हूरची मुले.

हूर हा एफ्राथाचा मुलगा आणि एफ्राथा ही बेथलेहेमची संस्थापक होती.

अशूरचा मुलगा तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा. नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे मुलगे झाले. सेरथ, इसहार, एथ्रान आणि कोस हे हेलाचे मुलगे. कोसने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा मुलगा अहरहेल याच्या घराण्यांचा प्रवर्तकही कोसच होता.

याबेस एक फार चांगला माणूस होता. आपल्या भावांपेक्षा तो भला होता. त्याची आई म्हणे, “याचे नाव याबेस ठेवले कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.” 10 याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले.

11 शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा मुलगा महीर. महीरचा मुलगा एष्टोन. 12 बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनची मुले. तहिन्नाचा मुलगा ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.

13 अथनिएल आणि सराया ही कनाजची मुले. हथथ आणि म्योनोथाय ही अथनिएलची मुले. 14 म्योनोथायने अफ्राला जन्म दिला.

आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीमचा संस्थापक. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.

15 यफुन्ने याचा मुलगा कालेब. कालेबची मुले म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा मुलगा कनज.

16 जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलचे मुलगे.

17-18 एज्राचे मुलगे येथेर व मरद, येफेर व यालोन. मिर्याम, शम्माय आणि इश्बह ही मरदाची मुले. इश्बहचा मुलगा एष्टमोवा. मरदची बायको मिसरची होती. तिने येरेद, हेबेर आणि यकूथीएल यांना जन्म दिला. येरेदचा मुलगा गदोर. सोखोचे वडील हेबेर. आणि यकूथीएल हे जानोहाचे वडील. ही बिथ्याची मुले. बिथ्या ही फारोची मुलगी. ही मिसरची असून मरदची बायको होती.

19 मरदची बायको ही नहमची बहीण होती. मरदची ही बायको यहूदाकडील होती. मरदच्या बायकोच्या मुलांनी कईला आणि एष्टमोवा यांना जन्म दिला. कईला गार्मी लोकांपैकी होता आणि एष्टमोवा माकाथी होता. 20 अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनचे मुलगे.

इशीचे मुलगे जोहेथ आणि बेन-जोहेथ.

21-22 यहूदाचा मुलगा शेला. एर, लादा, कोजेबा योकीम, योवाश आणि साराफ ही शेलाची संतती. एर हा लेखाचा पिता. लादा मारेशाचा आणि बेथ-अश्बेच्या विणकर घराण्यांचा संस्थापक योवाश आणि साराफ यांनी मवाबी बायकांशी लग्ने केली. त्यानंतर ते बेथलहेमला परतले. या घराण्याच्या या नोंदी फार जुन्या आहेत. 23 शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.

शिमोनाची संतती

24 नमुवेल, यामीन, यारिब, जेरह, शौल हे शिमोनचे मुलगे. 25 शौलचा मुलगा शल्लूम. शल्लूमचा मुलगा मिबसाम. मिबसामचा मुलगा मिश्मा.

26 मिश्माचा मुलगा हम्मूएल. हम्मूएलचा मुलगा जक्कूर. जक्कूरचा मुलगा शिमी. 27 शिमीला सोळा मुलगे आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फार मुले बाळे झाली नाहीत. त्यांची (कुदुंबे) मर्यादितच होती. यहूदातील इतर काही घराण्यांप्रमाणे त्यांचा विस्तार नव्हता.

28 शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल, 29 बिल्हा, असेम, तोलाद, 30 बथुवेल, हर्मा सिकलाग, 31 बेथमर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदराजा होईपर्यंत त्यांची तेथे वस्ती होती. 32 एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे. 33 बालापर्यंत पसरलेल्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.

34-38 त्यांच्या घराण्यातील वडिलधाऱ्या मंडळींच्या नावांची यादी अशी आहे: मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा मुलगा योशा, योएल, येहू (योशिब्याचा मुलगा) सरायाचा मुलगा योशिब्या, असिएलचा मुलगा सराया, एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल, बनाया, जीजा हा शिफीचा मुलगा. शिफी हा अल्लोनचा मुलगा, अल्लोन यदायाचा मुलगा, यदाया शिम्रीचा मुलगा, आणि शिम्री शमायाचा मुलगा.

या सर्वांच्या कुटुंबांचा विस्तार चांगला झाला. 39 ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या गुरोमेंढरांना चरायला कुरण हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले. 40 त्यांना चांगली गवताळ कुरणे मिळाली. तेथील जमीन विस्तीर्ण होती. ही भूमी शांत व स्वस्थ होती. हामचे वंशज पूर्वी या भागात राहत असत. 41 हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ही हकीकत. ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनीलोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले.

42 शिमोनच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर गेली. इशीचे मुलगे पलटया, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिमोनी लोकांनी त्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या लोकांशी चकमकी केल्या. 43 काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हा पासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.

इब्री लोकांस 9

जुन्या कराराप्रमाणे उपासना

पहिल्या करारात उपासनेसंबंधी काही नियम होते आणि मनुष्यांनी बनविलेले एक पवित्रस्थान होते. कारण दीपस्तंभ व अर्पणाच्या विशेष भाकरी ठेवण्यासाठी पहिल्या मंडपामध्ये एक मेज ठेवण्यात आला होता. हा जो पहिला मंडप होता त्याला पवित्र स्थान असे म्हणतात. दुसऱ्या पडद्यामागे एक खोली (मंडप) होती, त्याला परमपवित्रस्थान म्हणत [a] त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी होती. आणि कराराची पेटी (कोष). [b] ही पेटी (कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत (कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या. या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावर [c] सावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.

या व्यवस्थेनुसार याजकगण आपल्या कर्तव्यकर्मासाठी पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत. पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या खोलीत (मंडपात) जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वतःसाठी (स्वतःच्या पापांसाठी) व लोकांच्या अज्ञानाच्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे.

याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही. हे सर्व आजच्या काळात प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्याला वाहिलेली अर्पणे यामुळे उपासकाची सदसदविवेकबुद्धि परिपूर्ण होऊ शकत नाही. 10 हे विधी केवळ बाह्य बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत.

नव्या करारामप्रमणे उपासना

11 पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा मुख्य याजक म्हणून आला आहे. तो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता अशा महान तसेच सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा मंडपामध्ये, या निर्मितीमधील, 12 बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वतःच एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे तारण मिळवून दिले.

13 कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख त्यांच्यावर शिंपडले तर त्याची अपवित्र शरीरे शुद्ध होतात, 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सदाजीवी आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे डागविरहित आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धि शुद्ध करील. आशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.

15 पहिल्या काळात ज्या चुका झाल्या, त्या चुकांपासून सुटका व्हावी म्हणून देव आपल्या वचनानुसार अनंतकालच्या वतनासाठी ज्या लोकांना बोलावितो, त्यांच्याकरिता ख्रिस्त हा नवीन कराराचा मध्यस्थ झाला आहे.

16 जेथे मृत्यूपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाराचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते. 17 कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही. 18 म्हणून रक्त सांडल्याशिवाय पहिला करारदेखील अंमलात आला नव्हता. 19 कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमीजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले. 20 तो म्हणाला, “जो करार पाळण्याची देवाने तुम्हाला आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे.” 21 त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंवर ते रक्त शिंपडले. 22 खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ प्रत्येक गोष्ट रक्ताने धुतलीच पाहिजे आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही.

ख्रिस्ताचे अर्पण पाप नाहीसे करते

23 म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात. 24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.

25 जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही. 26 तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे.

27 आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते, 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.

आमोस 3

इस्राएलला ताकीद

इस्राएलच्या लोकांनो, संदेश ऐका! परमेश्वराने तुमच्याबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या मी मिसरमधून ज्या घराण्यांना (इस्राएलला) आणले, त्यांच्याबद्दल हा संदेश आहे. “पृथ्वीच्या पाठीवर पुष्कळ घराणी आहेत पण मी फक्त तुमच्याच घराण्याला खास संबंध ठेवण्यासाठी निवडले पण तुम्ही माझ्याविरुध्द गेलात. म्हणून तुमच्या सर्व पापांसाठी मी तुम्हाला शिक्षा करीन.”

इस्राएलच्या शिक्षेचे कारण

दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय
    ते एकमेकांबरोबर चालू शकणार नाहीत.
शिकार मिळाल्यावरच
    जंगलातील सिंह गर्जना करील.
जर सिंहाचा बछडा, त्याच्या गुहेत गुरगुरत असेल,
    तर त्याचा अर्थ त्याने काहीतरी पकडले आहे.
जाळ्यात दाणे नसतील तर,
    पक्षी जाळ्यात जाणार नाही
आणि सापळ्याचे दार बंद झाले,
    तर तो सापळा पक्ष्याला पकडणारच.
जर इषाऱ्याची रणशिंगे फुंकली गेली,
    तर लोक भीतीने थरथर कापणारच.
जेव्हा नगरीवर संकट येते,
    तेव्हा परमेश्वर त्याला कारणीभूत असतो.

प्रभू माझा परमेश्वर कदाचित् काही करायचे निश्चित करील, पण तसे करण्यापूर्वी, तो, आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना सागेल. सिंहाने डरकाळी फोडल्यास लोक भयभीत होतील व परमेश्वर बोलताच, संदेष्टे संदेश देतील.

9-10 अश्दोद व मिसर यांच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर या तेथे तुम्हाला भयंकर गोंधळ पाहायला मिळेल का? कारण लोकांना योग्य आचरण माहीत नाही. ते दुसऱ्यांशी क्रूरपणे वागले. दुसऱ्यांच्या वस्तू घेऊन त्यांनी त्यां उंच मनोऱ्यात लपवून ठेवल्या युध्दात लुटलेल्या वस्तूंनी त्यांचे खजिने भरून गेले आहेत.”

11 म्हणून परमेशवर म्हणतो, “त्या देशावर शत्रू चालून येईल तो तुमचे सामर्थ्य हिरावून घेईल. तुम्ही तुमच्या उंच मनोऱ्यांमध्ये लपविलेल्या वस्तू तो घेईल.”

12 परमेश्वर म्हणतो,

“जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला,
    तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील.
पण तो मेंढीचा
    काही भागच वाचवू शकेल.
तो कदाचित् मेंढीचे दोन पाय
    वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल.
त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत.
    शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा
    किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”

13 माझा प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर देव पुढील गोष्टी सांगतो: “याकोबच्या वंशजांना (इस्राएलला) ह्या गोष्टींबद्दल ताकीद द्या. 14 इस्राएलने पाप केले व त्याबद्दल त्यांना शिक्षा करीन. मी बेथेलच्या वेदी नष्ट करीन. वेदीची शिगे तोडली जातील व ती मातीत पडतील. 15 हिवाळी महाल उन्हाव्व्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पूष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

स्तोत्रसंहिता 146-147

146 परमेश्वराची स्तुती करा.
    माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन.
    मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका.
    लोकांवर विश्वास टाकू नका.
    का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते
    आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात.
    ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
    परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या.
    परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
जे लोक दु:खी कष्टी आहेत.
    त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो.
    तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो.
    संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो.
परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो.
    परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10 परमेश्वर सदैव राज्य करील
    सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील

परमेश्वराची स्तुती करा.

147 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
    आपल्या देवाचे गुणगान करा.
    त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे.
परमेश्वराने यरुशलेम बांधले,
    इस्राएलाच्या ज्या लोकांना कैदी म्हणून नेले होते.
    त्यांना देवाने परत आणले.
देव त्यांच्या विदीर्ण ह्रदयावर फुंकर घालतो
    आणि त्यांच्या जखमांना मलम पट्टी करतो.
देव तारे मोजतो आणि
    त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते.
आपला प्रभु खूप मोठा आहे.
    तो फार शक्तीवान आहे.
    त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.
परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो.
    परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.
परमेश्वराला धन्यावाद द्या.
    आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा.
देव ढगांनी आकाश भरुन टाकतो.
    देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो.
    देव डोंगरावर गवत उगवतो.
देव प्राण्यांना अन्न देतो,
    देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो.
10 युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक
    त्याला आनंद देत नाहीत.
11 जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो.
    जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.
12 यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर.
    सियोन तुझ्या देवाची स्तुती कर.
13 यरुशलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो
    आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो.
14 देवाने तुझ्या देशात शांती आणली.
    म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही.
    आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे.
15 देव पृथ्वीला आज्ञा करतो
    आणि ती त्या आज्ञा त्वरित पाळते.
16 जमीन लोकरी सारखी संपूर्ण पांढरी होई पर्यंत देव हिमवर्षाव करतो.
    देव गोठलेले बर्फ धुळीसारखे हवेत उडू देतो.
17 देव, आकाशतून दगडाप्रमाणे गारांचावर्षाव करतो.
    तो जी थंडी पाठवतो तिचा सामना कुणीही करु शकत नाही.
18 नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात.
    बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते.

19 देवाने याकोबाला (इस्राएल) त्याची आज्ञा दिली.
    देवाने इस्राएलला त्याचे नियम दिले.
20 देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही.
    देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत.

परमेश्वराची स्तुती करा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center