M’Cheyne Bible Reading Plan
नाबोथचा द्राक्षमळा
21 अहाब राजाचा राजवाडा शोमरोनमध्ये होता. त्याच्या महालाशेजारी एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ नावाच्या माणसाचा होता. नाबोथचा द्राक्षमळा. 2 एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.”
3 नाबोथ म्हणाला, “माझी जमीन मी देणार नाही. ती माझ्या कुटुंबाचे वतन आहे.”
4 तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथवर रागावलेला होता. ईज्रेलचा हा माणूस जे बोलला ते त्याला आवडले नाही. नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमीन मी तुम्हाला देणार नाहीं.” अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकराले.
5 अहाबची पत्नी ईजबेल त्याच्याजवळ गेली. त्याला म्हणाली, “तुम्ही असे खिन्र का? तुम्ही जेवत का नाही?”
6 अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या नाबोथला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला. त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्याला सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.”
7 ईजबेल त्याला म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलचे राजे आहात. उठा, काही तरी खा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. त्याचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.”
8 ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबची सही केली. अहाबचा शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडीलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली. 9 पत्रातला मजकूर असा होता:
“एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांना एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल. 10 नाबोथबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या माणसांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांनी ठेचून मारा.”
11 इज्रेलमधल्या वयाने आणि मानाने वडिलधाऱ्या (पुढ्याऱ्यांनी) अशा मंडळींनी ही आज्ञा मानली. 12 त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्या दिवशी सर्व लोकांना सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले. 13 मग, नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे असे दोन माणसांनी सांगितले. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. 14 मग त्या प्रतिष्ठित माणसांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता.
15 ईजबेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबला म्हणाली, “नाबोथ मेला. आता तुम्हाला हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता” 16 यावर अहाबने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला.
17 यावेळी परमेश्वर एलीयाशी बोलला. (एलीया हा तिश्बी येथील संदेष्टा) परमेश्वर म्हणाला, 18 “शोमरोनमधल्या राजा अहाबकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो त्या मळ्यावर कब्जा करायला तिथे गेला आहे. 19 अहाबला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.’”
20 तेव्हा एलीया अहाबकडे गेला. अहाबने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, “तुला मी पुन्हा सापडलो. तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस.”
एलीया म्हणाला, “हो, तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस. 21 तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, ‘मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना ठार करीन. 22 नबाटाचा मुलगा यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांनाही पाप करायला लावलेस.’ 23 शिवाय परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी बायको ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेल मध्ये कुत्री तुटून पडतील. 24 तुझ्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल.’”
25 अहाबने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची बायको ईजबेल हिने त्याला हे सर्व करायला लावले. 26 अहाबने आणखी एक पातक केले ते म्हणजे त्या लाकडी ठोकळ्यांची, मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांना दिला.
27 एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता.
28 परमेश्वर एलीया संदेष्ट्याला म्हणाला, 29 “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपपर्यंत मी त्याला संकटात लोटणार नाही. त्याचा मुलगा राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”
देवाला संतोषविणारे जीवन
4 बंधूंनो, मला आता तुम्हाला काही इतर गोष्टीविषयी सांगायचे आहे; प्रभु येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही तुम्हाला विनंति करतो व बोध करतो की, देवाला कसे संतोषवायचे याचे शिक्षण तुम्हांला आमच्याकडून जसे मिळाले, तसे तुम्ही खरोखरच जगत आहात, आणि तुम्ही ते जास्तीत जास्त करा. 2 कारण तुम्हांला हे माहीत आहे की, प्रभु येशूच्या अधिकाराने कोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांस दिल्या होत्या. 3 आणि हेच देवाला पाहिजे आहे. तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे. तुम्ही जारकर्मपासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे. 4 त्याची अशी इच्छा आहे की, तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा मिळविण्यास शिकावे. [a] 5 आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही त्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे. 6 त्याची हीसुद्धा इच्छा आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या बंधूचा याबाबतीत गैरफायदा घेऊ नये. कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की, प्रभु या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे. 7 कारण देवाने आम्हाला अमंगळ जीवनासाठी नव्हे, तर शुद्ध जीवनासाठी बोलाविले होते. 8 म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो, तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो.
9 आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे. 10 आणि हे खरे पाहता, जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदोनियाभर प्रीती करीत आहात. परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांस कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा.
11 आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची, आणि आपल्या स्वतःच्या हातांनी काम करण्याची इच्छा करा. 12 यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की, तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
प्रभूचे येणे
13 बंधूंनो, तुम्हाला हे माहीत असावे अशी माझी इच्छा आहे, जे मेलेले आहेत, अशांसाठी इतरांसारखे दु:ख करु नये. कारण इतरांना आशा नाही. 14 कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसेच देवही येशूबरोबर, त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवून मेलेले आहेत, त्यांना त्याप्रमाणे परत जिवंत करील.
15 आता आम्ही जे तुम्हांला सांगत आहोत तो एक संदेश आहे. जे आम्ही जिवंत आहोत, ते आम्ही प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेपर्यंत तग धरु. जे मेलेले आहेत त्यांच्या अगोदर आम्ही निश्चितच जाणार नाही. 16 कारण, जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या कर्ण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल, तेव्हा, प्रभु स्वतः स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील. 17 मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर ढगात वर घेतले जातील. आणि अशा प्रकारे आम्ही प्रभूबरोबर सदासर्वकाळ राहू. 18 म्हणून या शब्दांनी एकमेकाचे समाधान करा.
सोन्याची मूर्तो व तापलेली भट्टी
3 नबुखद्नेस्सर राजाने एक सोन्याची मुर्तो केली होती. ती 90 फूट [a] उंचीची व 9 फूट [b] रूंदीची होती. नंतर त्याने ती दुरा नावाच्या सपाट प्रदेशात स्थापिली. हा सपाट प्रदेश बाबेल परगण्यात होता. 2 मग राजाने प्रांताधिकारी, मुलकी अधिकारी, राज्यपाल, सल्लागार, कोषाधिकारी, न्यायाधीश, राज्याचे कारभारी व राज्याच्या इतर सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना एकत्र बोलाविले त्या सर्वांनी मुर्तोच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत्र जमावे अशी राजाची इच्छा होती.
3 म्हणून ते सर्वजण येऊन नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या मुर्तोसमोर उभे राहिले. 4 तेव्हा राजाच्या वतीने घोषणा करणारा मोठ्याने म्हणाला, “निरनिराव्व्या राष्ट्रांतून आलेल्या व वेगवेगव्व्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, लक्षपूर्वक ऐका! तुम्हाला पुढील आज्ञा करण्यात येत आहे: 5 सर्व प्रकारच्या वाद्यांचा आवाज ऐकताच तुम्ही नतमस्तक झाले पाहिजे. शिंगे, बासरी, सतार अलगुजे वीणा, तंबोरा ह्या व इतर वाद्यांचा आवाज ऐकताच, तुम्ही सोन्याच्या मूर्तोची पूजा केली पाहिजे. नबुखद्नेस्सर राजाने तिची स्थापना केली आहे. 6 जर कोणी नतमस्तक होऊन मूर्तोची पूजा करण्याचे टाळले तर त्याला अतितप्त भट्टीत ताबडतोब फेकून देण्यात येईल.”
7 त्यामुळे शिंग, बासरी, सतार, अलगुजे, तंबोरा ह्यांचा व इतर वाद्यांचा आवाज ऐकताच सर्वांनी नतमस्तक होऊन मूर्तीची पूजा केली. सर्व लोक, राष्ट्रे सर्व, भाषक ह्यांनी नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तोची पूजा केली.
8 ह्यांनंतर काही खास्दी राजाकडे येऊन यहूद्यांविरुध्द तक्रार करू लागले. 9 ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “राजा चिरंजीव होवो! 10 राजा शींग, बासरी, सतार, अलगुजे,वीणा, तंबोरा ह्या व इतर सर्व वाद्यांचा आवाज ऐकताच प्रत्येकाने नतमस्तक होऊन सोन्याच्या मूर्तोची पूजा करण्याची आज्ञा तू दिली होतीस. 11 आणि तू असेही म्हणाला होतास की जो कोणी असे करणार नाही त्याला तापलेल्या भट्टीत टाकून देण्यात येईल. 12 पण राजा काही यहूद्यांनी तुझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले. त्यांना तू बाबेल परगण्याचे मुख्य अधिकारी म्हणून नेमलेस, शद्रख, मेशख, अबेद्नगो हेच ते यहूदी होत. ते तुझ्या दैवताला पूजत नाहीत. तू स्थापलेल्या मर्तोपुढे नतमस्तक होऊन, त्यांनी मूर्तोची पूजा केली नाही.”
13 नबुखद्नेस्सरला राग आला. त्याने शद्रख, मेशख व अबेद्नगो यांना बोलविणे पाठविले. मग त्यांना राजापुढे आणण्यात आले. 14 नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, शद्रख, मेशख, अबेद्नगो, तुम्ही माझ्या दैवताला पूजत नाही हे खरे आहे का? मी स्थापलेल्या सोन्याच्या मूर्तोची नतमस्तक होऊन तुम्ही पूजा केली नाही, हेही खरे का? 15 तुम्ही शिंगे, बासरी, सतार, अलगुजे,वीणा,तंबोरा ह्यांचा व इतर वाद्यांचा आवाज ऐकताच नतमस्तक होऊन सोन्याच्या मूर्तोची पूजा केली पाहिजे. मी घडविलेल्या मूर्तोची पूजा करण्यास तुम्ही तयार असाल तर चांगलेच आहे. पण तुम्ही पूजा केली नाही तर तुम्हाला ताबडतोब तापलेल्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणताच देव तुमची सुटका करू शकणार नाही.
16 शद्रख, मेशख व अबेद्नगो राजाला म्हणाले, “नबुखद्नेस्सर, ह्या गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. 17 जर तू आम्हाला भट्टीत टाकलेस, तर आम्ही उपासना करीत असलेला देव आमचे रक्षण करू शकतो आणि त्याची इच्छा असल्यास तो तुझ्यापासून आमचा बचावही करू शकतो. 18 पण जरी देवाने आम्हाला वाचविले नाही, तरी हे राजा,आम्ही तुझ्या दैवतांना आम्ही भजणार नाही, हे लक्षात ठेव तू स्थापलेल्या सोन्याच्या मूर्तोची आम्ही पूजा करणार नाही.”
19 मग नबुखद्नेस्सराला खूप राग आला. त्याने शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्याकडे तुच्छतेने पाहिले. त्याने भट्टी नेहमीपेक्षा सातपट तापविण्याची आज्ञा दिली. 20 मग नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्यातील काही बलवान सैनिकांना शद्रख, मेशख व अबेद्नगो यांना बांधण्याचा हुकूम केला आणि त्यांना त्या तिघांना तापलेल्या भट्टीत टाकायला सांगितले.
21 मग त्या तिघाना बांधून भट्टीत टाकण्यात आले. त्यानी अंगरखे, विजारी, टोप्या आणि इतर कपडे घातलेले होते. 22 राजा हुकूम देतेवेळी अतिशय रागावला असल्याने त्यांनी घाईघाईन भट्टी तापविली भट्टीची आच एवढी होती की तिच्या ज्वाळांनी बलवान सैनिक मेले. शद्रख मेशख, व अबेद्नगो यांना टाकण्यासाठी ते भट्टीजवळ गेले तेव्हाच ते ज्वाळांनी भाजून मेले. 23 शद्रख, मेशख, अबेद्नगो भट्टीत पडले. त्यांना अगदी घट्ट बांधले होते.
24 मग नबुखद्नेस्सरने एड्ढदम उडी मारली. तो आश्चर्यचकीत झाला. त्याने आपल्या सल्लागारांना विचारले, “आपण तिघांनाच बांधले आणि तिघांनाच भट्टीत टाकले खरे ना?”
सल्लागार उत्तरले, “हो महाराज!”
25 मग राजा म्हणाला, “पाहा! मला अग्नीमध्ये चार माणसे चालताना दिसतात. ते बांधलेले नाहीत व जळलेलेही नाहीत. चौथा देवदूताप्रमाणे [c] दिसत आहे.”
26 मग नबुखद्नेस्सर तापलेल्या भट्टीच्या तोंडाजवळ गेला. तो ओरडला, “शद्रख, मेशख, अबेद्नगो, बाहेर या. परात्पर देवाच्या सेवकांनो, इकडे या.”
मग ती तिघे आगीतून बाहेर आले. 27 ते बाहेर येताच, प्रांताधिकारी, मुलकी अधिकारी, राजाचे सल्लागार राज्यपाल ह्यांनी त्यांच्याभोवती गर्दो केली. आगीने शद्रख, मेशख व अबेद्नगो जळाले नाही हे त्यांनी पाहिले होते. त्याचे अंग, केस किंवा वस्त्रे काहीच जळाले नव्हते. एवढेच नव्हे तर ते आगीत असूनसुध्दा त्यांच्या अंगाला जळकट वास येत नव्हता.
28 मग नबुखद्नेस्सर म्हणाला शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्या देवाचे स्तवन करा.त्याने देवदूताला पाठवून आपल्या सेवकांचे आगीपासून रक्षण केले. ह्या तिघांनी आपल्या देवावर निष्ठा ठेवली त्यांनी माझा हुकूम मानला नाही आणि दुसऱ्या दैवताला भजण्या-पूजण्याऐवजी ते मरण्यास तयार झाले. 29 म्हणून मी आता असा नियम करतो की शद्रख, मेशख व अबेद्नगो यांच्या देवाच्याविरुध्द बोलणाऱ्याचे मग तो कोठल्याही राष्ट्राचा वा कोठलीही भाषा बोलणारा असो, तुक़डे तुकडे करण्यात येतील. व त्याच्या घराची राखरांगोळी करण्यात येईल. दुसरा कोठलेही दैवत आपल्या माणसांना असे वाचवू शकणार नाही. 30 मग राजाने त्या तिघांना बाबेल परगण्यात आणखी महत्वाची पदे दिली.
भाग पांचवा
((स्तोत्रसंहिता 107-150)
107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
कारण तो चांगला आहे.
त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
2 परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
3 परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.
4 त्यांतले काही वाळवंटात फिरले.
ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते
आणि अशक्त होत होते.
6 नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
7 देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
8 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि
तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
9 देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो.
देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
10 देवाची काही माणसे कैदी होती
आणि काळ्याकुटृ तुरुंगात गजांच्या आडबंद होती.
11 का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले.
त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
12 त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले.
ते अडखळले आणि पडले.
त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
13 ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले.
14 देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोठडीतूनबाहेर काढले,
ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला.
15 त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी
ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या.
16 देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव करायला मदत करतो.
देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो.
देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो.
17 पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात.
आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
18 त्या लोकांनी खायचे नाकारले
आणि ते जवळ जवळ मेले.
19 ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली.
आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले.
20 देवाने आज्ञा केली आणि
त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
21 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तो लोकांसाठी
करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
22 परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा.
परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.
23 काही लोक बोटीतून समुद्रापार जातात.
त्यांचे व्यवसाय त्यांना महासागरापार घेऊन गेले.
24 त्या लोकांनी परमेश्वर काय करु शकतो ते पाहिले.
त्याने समुद्रावर ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यांनी पाहिल्या.
25 देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला,
लाटा उंच उंच जायला लागल्या.
26 लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले
आणि खोल समुद्रात खाली टाकले.
वादळ इतके भयंकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले.
27 ते अडखळत होते आणि प्यायलेल्या माणसासारखे पडत होते.
खलाशी म्हणून असलेले त्यांचे कसब निरुपयोगी होते.
28 ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
29 देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले.
30 समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आनंदित झाले.
देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले.
31 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल
आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
32 देवाची मोठ्या सभेत स्तुती करा.
वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.
33 देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले.
देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
34 देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले.
का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
35 देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले.
देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
36 देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले
आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
37 त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली
आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
38 देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला.
त्यांचे कुटुंब वाढले.
त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
39 अरिष्टे आणि संकटे यांमुळे त्यांची कुटुंब लहान
आणि अशक्त राहिली.
40 देवाने त्यांच्या प्रमुखाला लज्जित केले
आणि ओशाळवाणे वाटायला लावले
आणि त्याला खाली पाहायला लावले.
देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिंडायला लावले.
41 पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली
आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.
42 चांगले लोक हे बघतात आणि आनंदी होतात.
पण दुष्ट लोक ते बघतात आणि काय बोलावे ते त्यांना सुचत नाही.
43 जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील
नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.
2006 by World Bible Translation Center