Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 16

गज्जा नगरात शमशोन

16 एक दिवस शमशोन गज्जा या नगरात गेला. तेथे त्याने एका वेश्येला पाहिले. ती रात्र त्याने तिच्याकडे घालवली. कोणीतरी हे पाहून शमशोन आला असल्याचे गज्जाच्या लोकांना सांगितले. तेव्हा ते त्याला मारायला निघाले. त्या ठिकाणाला वेढा घालून ते शमशोनची वाट पाहात दबा धरुन बसले. शहराच्या वेशीपाशी त्यांनी पूर्ण रात्र काढली गप्प राहून रात्र भर त्यांनी आपला सुगावा लागू दिला नाही. ते एकमेकांना म्हणाले, “उजाडताच आपण त्याला मारु”

पण शमशोन त्या वेश्येकडे मध्यरात्रीपर्यंतच राहिला. अर्ध्या रात्रीच तो उठला. वेशीचे दरवाजे त्याने खिळखिळे केले. ते दरवाजे, त्यांच्या चौकटी आणि अडसर हे सगळे त्याने उचकटून काढले, खांद्यावर टाकले आणि हे सगळे घेऊन तो हेब्रोन जवळच्या डोंगरमाथ्यावर गेला.

शमशोन आणि दलीला

पुढे शमशोन दलीला नामक स्त्रीच्या प्रेमात पडला. ती सोरेक खोऱ्यातील होती.

पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढून घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कसे करायचे ते पाहता येईल. त्याला कह्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अठ्ठावीस पौंड चांदी देऊ.”

मग दलीला शमशोनला म्हणाली, “तुझ्या सामर्थ्याचे रहस्य तरी काय? तुला ठाणबंद करुन हतबल करायचे तरी कसे एखाद्याने?”

शमशोन म्हणाला, “नव्या कोऱ्या, पुरत्या न वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दोऱ्यांनी मला बांधले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघांसारखा दुर्बळ होईन.”

तेव्हा पलिष्टी अधिकाऱ्यांनी दलीलाला सात नव्या प्रत्यंचा आणून दिल्या. त्या अजून पुरत्या वाळल्या देखील नव्हत्या. दलीलाने त्यांनी शमशोनला जखडून टाकले. शेजारच्या खोलीत काही माणसे लपून बसली होती. दलीला शमशोनला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक आता तुला ताब्यात घेणार आहेत.” पण शमशोनने त्या प्रत्यंचा सहजगत्या तोडून टाकल्या जळलेल्या सुतळीची राख पडावी इतक्या सहजपणे त्या गळून पडल्या. अशाप्रकारे पलिष्ट्यांना काही शमशोनच्या सामर्थ्याचे रहस्य समजले नाही.

10 तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “तू माझ्याशी खोटे बोललास. मला फसवलेस, खरे काय ते मला सांग तुला कसे बांधून घालता येईल?”

11 शमशोन म्हणाला, “नव्या, कधीही उपयोगात न आणलेल्या दोरखंडानी मला जखडायला हवे. तसे केले तर मी अगदीच हतबल होऊन जाईन.”

12 तेव्हा दलीलाने नवेकोरे दोरखंड आणून त्याला बांधले. दुसऱ्या खोलीत काही जण लपलेले होतेच. दलीला मोठ्याने म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला पकडायला आले आहेत!” पण याही वेळी शमशोनने ते दोरखंड सुतळीसारखे तटकन तोडून टाकले.

13 यावर ती त्याला म्हणाली, “बघ, पुन्हा तू खोटे बोललास! मला बावळट ठरवलेस. आता तरी सांग तुला जखडून टाकायची युक्ती.”

शमशोनने सांगितले, “माझ्या केसांचे सात पेड करुन ते मागाच्या ताण्यावर करकचून आवळले तरच ते शक्य आहे.”

शमशोनला झोप लागल्यावर दलीलाने हातमाग वापरुन त्याच्या डोक्यावरील सात पेड विणून तिने 14 तंबूची खुंटी ठोकून माग जमिनीवर पक्का रोवला. मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुझा ताबा घ्यायला सज्ज आहेत.” त्यावर शमशोनने खुंटी, माग हे सगळे सहजगत्या उपटून टाकले.

15 तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “माझ्यावर तुझे प्रेम आहे असे म्हणतोस आणि एवढाही विश्वास टाकत नाहीस ना? आपले गुपित तू फोडायला तयार नाहीस. माझी फजिती करायची ही तुझी तिसरी वेळ तुझ्या प्रचंड सामर्थ्याचे गुपित तू अजूनही मला सांगितलेले नाहीस.” 16 तिने मग त्याच्या मागे लकडाच लावला. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे मरण बरे असे त्याला वाटू लागले. 17 शेवटी त्याने तिला सर्व काही सांगून टाकले. तो म्हणाला, “आजतागायत कधीही माझे केस कापलेले नाहीत. माझ्या जन्माआधीच मला परमेश्वराला वाहिलेले आहे. तेव्हा आता माझे मुंडन केले तर माझा शक्तिपात होईल व मी चार चौघांसारखा सामान्य होईन.”

18 आता त्याने खरंच आपले मन मोकळे केले आहे हे दलीलाच्या लक्षात आले. म्हणून पलिष्टी अधिकाऱ्यांना तिने निरोप पाठवला, “आता शमशोनने आपले रहस्य मला नक्की सांगितले आहे.” तेव्हा ते आले. येताना तिला वचन केलेले पैसेही घेऊन आले.

19 आपल्या मांडीवर पडल्या पडल्या शमशोनला झोप लागली आहे याची खात्री पटल्यावर तिने एकाला बोलावले. त्याच्या कडून शमशोनच्या डोक्यावरील सात बटांचे तिने मुंडन करवले. अशा रितीने तिने त्याला अगदी हतबल करुन टाकले. शमशोन गलितगात्र आणि पराभवास योग्य झाला. त्याची शक्ती त्याला सोडून गेली. 20 मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला जेरबंद करायला आले आहेत.” तेव्हा तो जागा झाला. त्याला वाटले, “पूर्वीप्रमाणेच याही वेळी मी माझी सुटका करुन घेऊ शकेन.” पण परमेश्वर आपल्याला सोडून गेला आहे याची त्याला कल्पना नव्हती.

21 मग पलिष्ट्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले. तो निसटून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरूंगात ठेवले व जात्यावर धान्य दळायला लावले. 22 परंतु शमशोनचे केस पुन्हा वाढू लागले.

23 पलिष्ट्यांचे अधिकारी मोठा आनंदोत्सव साजरा करायला एकदा एकत्र जमले. आपला देव दागोन याच्या प्रीत्यर्थ ते मोठा यज्ञ करणार होते. कारण त्यांना वाटत होते की शमशोन या शत्रूचा पाडाव करायला त्यांच्या ह्या दैवताने त्यांना मदत केली होती. 24 शमशोनची दशा पाहून ते त्यांच्या दैवताची स्तुती करु लागले. ते म्हणाले.

“याने आमच्या देशाचा नाश केला
    आमची पुष्कळ माणसे मारली
परंतु आमच्या देवाच्या मदतीनेच
    आम्ही त्याला ताब्यात घेऊ शकलो.”

25 उत्सवाच्या ठिकाणी मौजमजा करण्यात लोक दंग होते. ते म्हणाले, “शमशोनला समोर आणा. त्याची थोडी चेष्टा करु.” तेव्हा शमशोनला तुरुंगातून बाहेर काढले आणि लोक आपली करमणूक करुन घेऊ लागले. देवळातील खांबांमध्ये त्यांनी त्याला उभे केले होते. 26 एका सेवकाने शमशोनचे हात घटृ धरुन ठेवले होते. शमशोन त्याला म्हणाला, “या देवळाला आधार देणाऱ्या दोन खांबामध्ये मला उभे कर. म्हणजे मला हातानी चाचपडून पाहता येईल. त्यांना रेलून मला उभे राहता येईल.”

27 देवळात बायका-पुरुष सगळ्यांची एकच गर्दी उसळली होती. पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे हजर होते. शिवाय छपरावर तीन एक हजार माणसे होती. सर्वजण शमशोनची गंमत पाहण्यात दंग होते. 28 तेव्हा शमशोनने देवाचा धावा केला. तो म्हणाला, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी आठवण कर एकदा, फक्त एकदाच माझी शक्ती मला परत दे. माझे डोळे फोडल्याबद्दल शिक्षा म्हणून एकदाच या पलिष्ट्यांना मला धडा शिकवू दे.” 29 एवढे म्हणून देवळाच्या मधोमध असलेले ते दोन खांब शमशोनने धरले. पूर्ण देवळाचा डोलारा या दोन स्तंभांवर उभा होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्या स्तंभांना त्याने जोराचा रेटा दिला. 30 “या पलिष्ट्यांच्या बरोबरच माझीही अखेर होईल.” एवढे म्हणून त्याने जबरदस्त ताकद लावली. त्याबरोबर पूर्ण देऊळ जमीनदोस्त झाले. अधिकाऱ्यांसह सर्व माणसे त्याखाली सापडली. जिवंतपणी मारली त्यापेक्षा कितीतरीपट माणसे शमशोनने अशाप्रकारे मरता मरता मारली.

31 शमशोनचे भाऊ बंद आणि घरातील सर्व परिवार तेथे जमा झाला. त्याचा मृतदेह त्यांनी घेतला आणि त्याच्या वडीलांच्या कबरीतच त्याचाही अंत्यसंस्कार केला. सरा आणि अष्टावोल यांच्या दरम्यान हे कबरस्थान आहे. शमशोनाने वीस वर्षे इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.

प्रेषितांचीं कृत्यें 20

पौल मासेदिनिया व ग्रीसला जातो

20 जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलाविले आणि त्यांना उत्तेजत दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. आणि तो मासेदोनियाला निघाला. मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला. मग पौल ग्रीसला आला. त्या ठिकाणी तो तीन माहिने राहिला.

पौल सूरियाला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरविले. त्याच्याबरोबर काही लोक होते ते असे: बिरुया शहराच्या पुरर्ाचा मुलगा सोपत्र. थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते. ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस येथे आमची वाट पाहू लागली. बखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.

पौलाची त्रोवसला शेवटची भेट

मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी [a] एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला. वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते. युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, जेव्हा त्याला उचलले, तेव्हा तो मेलेला आढळला.

10 पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्याला आपल्या हातांनी कवेत धरुन म्हणाला, “चिंता करु नका! त्याच्यात अजून जीव आहे.” 11 मग पौल वर गेला. त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली. पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला. 12 त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.

त्रोवसापासून मिलेतापर्यंत प्रवास

13 तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे. 14 जेव्हा आम्हांला तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्याला जहजात घेतले, आणि आम्ही मितुलेनाला गेलो. 15 दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुले नाहून निघालो व खियासमोर आलो. मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेतला आलो. 16 कारण पौलाने ठरविले होते की इफिस येथे थांबायचे नाही. आशियात त्याला जास्त वेळ थांबायचे नव्हते. तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणसाठी त्याला यरुशलेम येथे राहावयास हवे होते.

पौल इफिस येथील वडीलजनंशी बोलतो

17 मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.

18 जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हांना माहीत आहे. 19 मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली. यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. 20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हांला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हांना माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. 21 पश्चाताप करुन देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली.

22 “आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरुशलेमला चाललो आहे, आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. 23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो 24 मी माइया जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभु येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे-ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.

25 “राच्याची करीत ज्या लोकांत मी फिरलो त्या तुम्हांतील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे. 26 म्हणून मी तुम्हांला जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही. 28 तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हांला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. 29 मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाहीत. 30 तुमच्यामधूनसुद्धा लोक उठतील, चुकीचे असे तुम्हांला शिकवून आपल्या मागे घेऊन जातील. 31 यासाठी सावध राहा. तुम्हांतील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रु आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.

32 “आणि आता मी तुम्हांला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे. 33 मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. 34 मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हांला चांगले माहीत आहे. 35 अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करुन मदत केली पाहिजे. व प्रभु येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.’”

36 आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. 37 तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. 38 ते पुन्हा त्याला कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दु:ख झाले, मग ते त्याला जहाजापर्चंत निरोप देण्यास गेले.

यिर्मया 29

बाबेलमधील यहूदी कैद्यांना पत्र

29 बाबेलमध्ये राहणाऱ्या यहूदी कैद्यांना यिर्मयाने एक पत्र पाठविले. त्यांने ते पत्र वडीलधारी (नेते) याजक, संदेष्टे आणि बाबेलमध्ये राहणाऱ्या इतर सर्व लोकांना पाठविले. ह्या सर्वजणांना नबुखद्नेस्सरने यरुशलेममधून बाबेलला आणले होते. (राजा यकन्या, राजमाता, अधिकारी, यहूदाचे व यरुशलेमचे नेते, सुतार व लोहार ह्यांना यरुशलेममधून नेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठविले) सिद्कीयाने एलासा व गमऱ्या यांना नबुखद्नेस्सर राजाकडे पाठविले. सिद्कीया यहूदाचा राजा होता. एलासा शाफानचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा होता, यिर्मयाने, बाबेलला नेण्यासाठी, या दोघांजवळ, पत्र दिले. पत्रातील मजकूर असा होता.

यरुशलेममधून कैद करुन ज्या लोकांना यरुशलेमहून बाबेलला नेले आहे त्या सर्व लोकांना सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे सांगतो “घरे बांधून त्यात राहा. तेथे वस्ती करा बागा लावा आणि तुम्ही पिकविलेले खा. लग्न करा. तुम्हाला मुलेबाळे होऊ द्या. तुमच्या मुलांचीही लग्ने होऊ द्या. म्हणजे त्यांनाही संतती होईल. तुम्हाला खूप संतती होऊ द्या. तुमची संख्या बाबेलमध्ये वाढू द्या. तुम्ही अल्पसंख्यक राहून नका. मी तुम्हाला ज्या शहरांत पाठविले आहे, त्या शहरांचा फायदा करा. तुम्ही राहत असलेल्या शहराच्या भल्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. का? कारण त्या शहरात शांतता नांदत असेल तर तुम्हालाही शांती मिळेल.” सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “तुमचे संदेष्टे आणि जादू करणारे लोक ह्यांच्याकडून फसू नका. त्यांना पडलेली स्वप्ने ऐकू नका. ते खोटा उपदेश करीत आहेत, व तो संदेश असून तो मी पाठविल्याचे सांगत आहेत. पण मी त्यांना पाठविलेला नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

10 परमेश्वर असे म्हणतो, “सत्तर वर्षापर्यंत बाबेल सामर्थ्यशाली राहील. त्यानंतर बाबेलमध्ये राहणाऱ्या तुम्हा लोकांकडे मी येईन. तुम्हाला यरुशलेमला परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन. 11 तुमच्याविषयीच्या योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो.” हा परमेश्वराचा संदेश आहे “तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दु:खविण्याचा माझा बेत नाही. तुम्हाला आशा आणि उज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. 12 मग तुम्ही माझा धावा कराल. माझ्याकडे याल. माझी प्रार्थना कराल. मग मी तुमच्या हाकेला ओ देईन. 13 तुम्ही मला शोधाल आणि तुम्ही जेव्हा मनापासून मला शोधाल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन. 14 मी स्वतःला तुमच्याकडून सापडवून घेईल.” हा परमेश्वराचा संदेश आहे “मी तुमची कैदेतून सुटका करीन. मी तुम्हाला ही जागा सोडायला लावली आता मी तुम्हाला ज्या ज्या राष्ट्रांत आणि प्रदेशात पाठविले होते तेथून गोळा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “आणि जेथून तुम्हाला मी कैदी म्हणून पकडून दूर नेण्यास भाग पाडले होते त्या जागी परत आणीन.”

15 “आम्हाला बाबेलमध्ये परमेश्वराने संदेष्टे दिले असे कदाचित् तुम्ही म्हणू शकाल.” 16 पण बाबेलमध्ये ज्यांना आणले गेले नाही, त्या तुमच्या आप्तांविषयी परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. ह्या गोष्टी दावीदाच्या सिंहासनावर आता बसलेल्या राजासाठी व यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांसाठी आहेत. 17 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांविरुद्ध मी लढाई उपासमार व रोगराई या आपत्ती पाठवीन. मी त्यांची स्थिती, खाण्यास अयोग्य असलेल्या नासक्या अंजिरासारखी करीन. 18 मी अजूनही यरुशलेममध्ये राहत असलेल्या लोकांचा लढाई, उपासमार व भयंकर रोगराई ह्यांनी पाठपुरावा करीन. ह्यामुळे लोकांची जी स्थिती होईल ती जगातील राज्यांचा भीतीने थरकाप उडवेल. ज्या राष्ट्रांत जायला त्यांना मी भाग पाडीन, तेथे तेथे त्यांच्याकडे एक शाप म्हणून पाहिले जाईल. ह्या लोकांची स्थिती पाहून ते विस्मयाने सुस्कारे सोडतील. 19 यरुशलेममधील लोकांनी माझे ऐकले नाही, म्हणून मी असे घडवून आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे “मी माझा संदेश पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाठविला. माझा संदेश देण्यासाठी मी माझ्या सेवकांना, माझ्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्या लोकांनी ऐकले नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 20 “तुम्ही कैदी आहात. मी तुम्हाला बळजबरीने यरुशलेम सोडायला लावले व बाबेलला पाठविले. म्हणून परमेश्वराचा संदेश ऐका.”

21 कोयालाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया यांच्याविषयी सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “ह्या दोघांनी तुम्हाला खोटा संदेश दिला आहे व तो संदेश माझ्याकडून आला असे त्यांनी सांगितले. पण ते खोटे बोलले. मी त्या दोघा संदेष्ट्यांना, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन आणि बाबेलचे कैदी असलेल्या तुम्हा सर्व लोकांसमोर तो त्यांना ठार करील 22 यहूदी कैदी दुसऱ्याचे वाईट चिंततांना त्या दोघांच्या नावाचा उदाहरण म्हणून उपयोग करतील. ते म्हणतील, ‘सिद्कीया व अहाब यांच्याप्रमाणे परमेश्वर तुमचे वाईट करो! बाबेलच्या राजाने त्या दोघांना जाळले.’ 23 त्या दोघा संदेष्ट्यांनी इस्राएलमध्ये फार वाईट कृत्ये केली. शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर त्यांनी व्यभिचार केला. त्यांनी खोटे सांगितले आणि माझा संदेश खोटे असल्याचे लोकांना सांगितले मी त्यांना ह्या गोष्टी करायला सांगितल्या नव्हत्या त्यांनी काय केले आहे, ते मला माहीत आहे मी त्याला साक्षी आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

शमायाला देवाचा संदेश

24 शमायालासुद्धा संदेश दे. शमाया नेहेलमी घराण्यातील आहे. 25 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “शमाया, तू यरुशलेममधील सर्व लोकांना पत्रे पाठविलीस. मासेयाचा मुलगा याजक सफन्या ह्यासही तू पत्रे पाठविलीस. तू सर्व याजकांनाही पत्रे पाठविलीस. परमेश्वराची परवानगी न घेता, स्वतःच्या नावाने तू पत्रे पाठविलीस. 26 शमाया, सफन्याला पाठविलेल्या पत्रात तू असे लिहितोस ‘सफन्या, परमेश्वराने तुला यहोयदाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. परमेश्वराच्या मंदिराचा तू उत्तराधिकारी आहेस. जो कोणी वेड्याप्रमाणे [a] वागेल, वा संदेष्टा असल्याचे भासवेल, त्याला तू अटक करावेस. तू त्या माणसाचे पाय लाकडाच्या खोड्यात अडकवून त्याच्या गळ्यात लोखंडाची बेडी घालावी. 27 हल्ली यिर्मया आपण संदेष्टा असल्याचे दाखवीत आहे. मग तू त्याला अटक का केले नाहीस? 28 यिर्मयाने बाबेलमध्ये आम्हाला असा संदेश पाठविला तुम्हाला बाबेलमध्ये बराच काळ राहावे लागेल, म्हणून घरे बांधा, वस्ती करा, बागा लावा व स्वतः पिकविलेले खा.’”

29 याजक सफन्याने हे पत्र संदेष्टा यिर्मयाला वाचून दाखविले. 30 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला तो असा: 31 “यिर्मया, बाबेलमध्ये असलेल्या सर्व कैद्यांना पुढील निरोप पाठव नेहेलमी घराण्यातील शमाया ह्या माणसाबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘शमायाने तुम्हाला उपदेश केला. पण मी त्याला पाठविलेले नाही. शमायाने तुम्हाला खोटे सांगून त्यावर विश्वास ठेवायला लावले. 32 शमाया असे वागला म्हणून परमेश्वर म्हणतो की मी नेहेलमी घराण्यातील शमायाला लवकरच शिक्षा करीन. मी त्याच्या घराण्याचा सर्वनाश करीन. मी माझ्या लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी करीन, त्यात त्याचा वाटा असणार नाही.’” हा परमेश्वराचा संदेश आहे “‘शमायाने लोकांना परमेश्वराविरुद्ध पढविले म्हणून मी त्याला शिक्षा करीन.’”

मार्क 15

राज्यपाल पिलात येशूला प्रश्न करतो(A)

15 पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी एक योजना आखली, त्यांनी येशूला बांधले आणि पिलाताच्या ताब्यात दिले.

पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”

येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.”

मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले. मग पिलाताने त्याला पुन्हा प्रश्न विचारला, “तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते किती तरी गोष्टीविषयी तुझ्यावर आरोप ठेवीत आहेत!”

पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले.

पिलात येशूला मुक्त करण्याचा अय़शस्वी प्रयत्न करतो(B)

वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्याला पिलात रिवाजा प्रमाणे लोकांसाठी सोडत असे. बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. या लोकांनी दंगलीमध्ये खून केला होता.

लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले. पिलाताने विचारले, “तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” 10 पिलात असे म्हणाला कारण त्याला माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते. 11 परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांना चिथावले.

12 परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, “तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”

13 ते पुन्हा मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”

14 पिलाताने पुन्हा विचारले, “का? त्याने कोणता गुन्हा केला आहे?”

ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, “ला वधस्तंभावर खिळा!”

15 पिलाताला लोकांना खूष करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारुन वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.

16 शिपायांनी येशूला राज्यपालाच्या राजवाड्यात, ज्याला प्रयटोरियम म्हणतात तेथे नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलाविली. 17 त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झागा घातला व काट्यांचा मुगुट करुन त्याला घातला. 18 ते त्याला मुजरा करु लागले आणि म्हणू लागले, “हूद्यांच्या राजाचा जयजयकार असो.” 19 त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले. त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्याला नमन केले. 20 त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरुन जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्याला घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्याला बाहेर घेऊन गेले.

येशूला वधस्तंभावर जिवे मारतात(C)

21 वाटेत त्यांना कुरेने येथील शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो अलेक्सांद्र व रुफ यांचा पिता होता व आपल्या शेतातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्याला जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले. 22 आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे (कवटीची जागा) म्हटलेल्या ठिकाणी आणले. 23 त्यांनी त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस दिला परंतु त्याने तो घेतला नाही. 24 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले.

25 त्यांनी त्याला वधस्तंभांवर खिळले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. 26 आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “ यहूद्याचा राजा.” असा लिहिला होता. 27 त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजविकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते. 28 [a]

29 जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, “अरे! मंदिर पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना! 30 वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वतःचा बचाव कर.”

31 तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकाला म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही! 32 या मशीहाला, इस्त्राएलाचा राजा रिव्रस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू” आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.

येशूचे मरण(D)

33 दुपारची वेळ झाली. सगळ्या भूमीवर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. 34 मग तीन वाजता रिव्रस्त मोठ्याने आरोळी मारुन म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे, “माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास?”

35 जवळ उभे असलेल्या काही जणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “ऐका, तो एलीयाला बोलवीत आहे.”

36 एक जण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडूवून भरला. काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, “थांबा! एलीया येऊन त्याला खाली उतरवितो की काय हे आपण पाहू.”

37 मग मोठ्याने आरोळी मारुन येशूने प्राण सोडला.

38 तेव्हा मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले. 39 येशूच्या पुढे उभे अलेल्या सेनाधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, “खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.”

40 तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरुन पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब आणि योसे यांची आई मरीया व सलोमी या होत्या. 41 येशू जेव्हा गालीलात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्या मागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेपर्यंत आलेल्या इतर अनेक स्रियाही होत्या.

येशूला पुरतात(E)

42 त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता. 43 योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.

44 येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलाविले आणि त्याना विचारले. येशूला मरुन बराच वेळ झाला की काय? 45 सेनाधिकाऱ्याकडून त्याने अहवाल ऐकला, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले.

46 मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले. आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्याला तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर धोंड बसविली. 47 येशूला कोठे ठेवले हे मरीया मग्दालिया आणि योसेची आई मरीया हे सर्व बघत होत्या येशूला कुठे ठेवले, हे त्यांनी पाहिले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center