Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 21

अज्ञात व्यक्तीची हत्या

21 “तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि मारेकऱ्याचा पत्ता लागला नाही तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे. मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक गाय निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी. मग तिला वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी त्या गायीची मान कापावी. लेवी वंशातील याजकांनी या वेळी तिथे असावे. (आपली सेवा करुन घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांना आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.) त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील माणसांनी, गाय मारल्यावर तिच्या मानेतून वाहणाऱ्या रक्ताने आपले हात धुवावे. व म्हणावे ‘या व्यक्तीला आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही. परमेश्वरा तू इस्राएलाल वाचवलं आहेस. आम्हाला तू आपलस केल आहेस. आमचा उद्धार केला आहेस. आम्हाला शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हाला दोषी धरु नकोस. असे केले असता त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचे पाप या लोकांना लागणार नाही.’ याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य ते करुन तुम्ही आपल्यामधून या पापाचा निचरा करा.

युद्धकैदी स्त्रिया

10 “शत्रूशी युद्ध करायला गेल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्याच्या सैनिकांना बंदीवान कराल. 11 तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्याशी लग्न करावे असे एखाद्याला वाटेल. 12 तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी. 13 तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल. 14 पुढे त्याला ती आवडली नाही तर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिची विक्री करु नये. तिला गुलाम म्हणूनही त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.

ज्येष्ठ मुलगा

15 “एखाद्याला दोन बायका असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल. 16 अशा परिस्थितीत, आपल्या मालमत्तेची वाटणी करताना ज्येष्ठ मुलाच्या वाटणीचे, आवडतीच्या मुलाला देऊ नये. 17 त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा नावडतीचा मुलगा असला तरी स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्याला दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.

बंडखोर मुलगा

18 “एखाद्याचा मुलगा हट्टी अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा निघतो. शिक्षा केली तरी काही फरक पडत नाही. 19 अशावेळी आईवडलांनी त्याला गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावा. 20 त्यांनी सांगावे की, हा उद्दाम आहे. आमचे ऐकत नाही. तसेच तो खादाड व मद्यपी आहे. 21 यावर त्या गावातील माणसांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.

गुन्हेगारांची झाडावर टांगलेली प्रेते

22 “एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल. अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील. 23 तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याचदिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या त्या मृतदेहाला देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.

स्तोत्रसंहिता 108-109

दावीदाचे एक स्तुतिगीत.

108 देवा, मी तयार आहे.
    मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
वीणांनो आणि सतारींनो,
    आपण सुर्याला जाग आणू या.
परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु.
    आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.
परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे.
    तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
देवा, स्वर्गाच्याही वर उंच जा.
    सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
    आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर.

देव त्याच्या मंदिरात बोलला,
    “मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन.
    मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
गिलाद आणि मनश्शे माझी असतील.
    एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल.
    यहुदा माझा राजदंड असेल.
मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल.
    अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल.
    मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद करीन.”

10 मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल?
    मला अदोमशी लढायला कोण नेईल?
11 देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस.
    पण तू आम्हाला सोडून गेलास.
    तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
12 देवा, आम्हाला आमच्या शत्रूंचा पराभव करायला मदत कर.
    लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.
13 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो.
    देव आमच्या शत्रूंचा पराभव करु शकतो.

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

109 देवा, माझ्या प्रार्थनेला
    तुझे कान बंद करु नकोस.
दुष्ट लोक माझ्याविषयी खोटंनाटं सांगत आहेत.
    ते माझ्याबद्दल असत्य गोष्टी सांगत आहेत.
लोक माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगत आहेत.
    ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत.
मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करतात म्हणून देवा,
    मी आता तुझी प्रार्थना करतो.
मी त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या
    पण ते माझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत.
    मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करत होते.

“माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
    ते चुकले आहेत हे सिध्द करण्यासाठी एखादा माणूस शोध.
माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे.
    माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते.
माझ्या शत्रूला लवकर मरु दे.
    त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे.
माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ
    आणि त्याच्या बायकोला विधवा कर.
10 त्यांना त्यांचे घर गमावू दे
    आणि त्यांना भिकारी होऊ दे.
11 माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे
    आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.
12 माझ्या शत्रूंशी कुणीही दयाळू असू नये असे मला वाटते.
    त्याच्या मुलांना कुणी दया दाखवू नये असे मला वाटते.
13 माझ्या शत्रूचा संपूर्ण नाश कर.
    पुढच्या पिढीला त्याचे नाव सर्व गोष्टीवरुन काढून टाकू दे.
14 परमेश्वराला माझ्या शत्रूच्या वडिलांच्या पापांची आठवण करुन दिली जाईल असे मला वाटते,
    त्याच्या आईची पापे कधीही पुसली जाऊ नयेत असे मला वाटते.
15 परमेश्वराला त्या पापांची सदैव आठवण राहील अशी मी आशा करतो.
    आणि तो लोकांवर माझ्या शत्रूला पूर्णपणे विसरुन जायची शक्ती देईल अशी मी आशा करतो.
16 का? कारण त्या दुष्ट माणसाने कधीही काहीही चांगले केले नाही,
    त्याने कधीच कुणावर प्रेम केले नाही.
    त्याने गरीब, असहाय्य लोकांचे आयुष्य कष्टी केले.
17 त्या दुष्ट माणसाला दुसऱ्या लोकांचे वाईट कर
    असे सांगायला आवडायचे म्हणून त्या वाईट गोष्टी त्या माणसालाच होऊ दे.
तो दुष्ट माणूस लोकांचे भले होवो
    असे कधीही म्हणाला नाही, म्हणून त्याचेही भले होऊ देऊ नकोस.
18 शाप हेच त्याचे कपडे असू दे.
शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे.
    शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.
19 शाप त्या दुष्ट माणसांच्या शरीराभोवती गुंडाळण्याचे वस्त्र असू दे,
    आणि शापच त्यांच्या कमरे भोवतीचा पट्टा असू दे.”

20 परमेश्वर या सगळ्या गोष्टी माझ्या शत्रूंच्या बाबतीत करील अशी मी आशा करतो.
    जे लोक मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत,
    त्या सर्वांना परमेश्वर या गोष्टी करेल अशी मी आशा करतो.
21 परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस म्हणून
    तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल अशा रीतीने मला वागव.
माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे म्हणून मला वाचव.
22 मी फक्त एक गरीब, असहाय्य माणूस आहे.
    मी खरोखरच दुखी: आहे आणि माझे ह्रदयविदीर्ण झाले आहे.
23 दिवसाच्या शेवटी येणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य संपले आहे असे मला वाटते.
    कुणीतरी झटकून टाकलेल्या किड्याप्राणे मी आहे असे मला वाटते.
24 मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडघ्यातली शक्ती क्षीण झाली आहे.
    माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे.
25 वाईट लोक माझा अपमान करतात.
    ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.
26 परमेश्वरा, देवा, मला मदत कर.
    तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर.
27 नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल.
    तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल.
28 ते वाईट लोक मला शाप देतात.
    परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस.
    त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईन.
29 माझ्या शत्रूंना लाज आण.
    त्यांना त्यांची लाजच अंगरख्या प्रमाणे घालायला लाव.
30 मी परमेश्वराला धन्यवाद दिले.
    खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली.
31 का? कारण परमेश्वर असहाय्य लोकांच्या मदतीसाठी उभा राहातो
    जे लोक त्यांना ठार मारायची शिक्षा देतात त्यांच्यापासून देव त्यांना वाचवतो.

यशया 48

देव त्याच्या जगावर अधिपत्य करतो

48 परमेश्वर म्हणतो, “याकोबाच्या वंशजांनो, माझे ऐका.
    तुम्ही, जे ‘इस्राएलच्या’ नावाने ओळखले जाता.
    तुम्ही यहुदाच्या वंशातील आहात.
तुम्ही वचने देताना परमेश्वराचे नाव घेता.
    तुम्ही इस्राएलच्या देवाची स्तुती करता.
    पण हे तुम्ही सच्चे पणाने आणि खरेपणाने करीत नाही.”

“हो ते पवित्र नगराचे नागरिक आहेत.
    ते इस्राएलच्या देवावर अवलंबून राहतात.
सर्वशक्तिमान परमेश्वर अशी त्याची ख्याती आहे.

“मी तुम्हाला फार पूर्वीच भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितले.
    मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितले
    आणि अचानक त्या गोष्टी घडवून आणल्या
मी तसे केले, कारण तुम्ही हट्टी होतात व ते मला माहीत होते.
    मी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तुम्ही नकार दिलात.
    जस्ताप्रमाणे कठीण आणि लोखंडाप्रमाणे न वाकणारा असा तुमचा हट्ट होता.
म्हणूनच गोष्टी घडायच्या कितीतरी आधी मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगितले,
    असे सांगण्याचे कारण हेच की आम्ही आमच्या सामर्थ्यावर
हे सर्व केले असे तुम्ही म्हणू नये.
    ‘आमच्या मूर्तींनी हे सर्व घडवून आणले’
    असे तुम्ही म्हणू नये म्हणून मी हे केले.”

इस्राएलला शुध्द् करण्यासाठी देव त्याला शिक्षा करतो

“तुम्ही काय घडले ते पाहिलेत व ऐकलेत.
    म्हणून तुम्ही ही वार्ता इतरांना सांगावी.
    आता मी तुम्हांला माहीत नसलेल्या नवीन गोष्टी सांगीन.
ह्या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत.
    ह्या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत.
या आधी तुम्ही कधी या गोष्टींबद्दल ऐकले नसेल.
    त्यामुळे ‘आम्हांला हे अगोदरच माहीत होते’
    असे तुम्ही म्हणू शकणार नाही.
पण जरी मी तुम्हाला भविष्यात काय घडणार आहे हे सांगितले तरी ते ऐकून घ्यायला
    तुम्ही अजूनही नकार द्याल.
    तुम्ही काहीही शिकणार नाही.
मी सांगितलेली कोणतीही गोष्ट तुम्ही केव्हाही ऐकली नाही.
    तुम्ही माझ्याविरूध्द् जाल हे मला सुरवातीपासूनच माहीत होते.
    तुम्ही जन्मल्यापासून माझ्याविरूध्द् बंड पुकारले आहे.

“पण मी सहन करीन.
    हे मी माझ्यासाठी करीन.
तुमच्यावर रागावून तुमचा नाश करीत नाही म्हणून लोक माझी स्तुती करतील.
    मी केलेल्या प्रतीक्षेबद्दल तुम्ही माझे स्तवन कराल.

10 “पाहा! मी तुम्हांला शुध्द् करीन.
    लोक चांदी शुध्द् करण्यासाठी गरम भट्टीचा उपयोग करतात.
    मी तुम्हांला संकटात टाकून शुध्द् करीन.
11 हे मी माझ्यासाठी करीन.
    मला कमी लेखून तुम्हांला चालणार नाही.
माझे वैभव आणि प्रशंसा मी खोट्या देवांच्या वाट्याला जाऊ देणार नाही.
    माझे नाव मी दूषित का होऊ द्यावे?

12 “याकोबा, माझे ऐक,
    इस्राएल, मी तुला माझे होण्यासाठी बोलाविले,
    तेव्हा माझे ऐक.
मीच आरंभ आहे
    आणि मीच अंत आहे.
13 मी माझ्या हाताने पृथ्वी निर्माण केली.
    माझ्या उजव्या हाताने आकाश निर्माण केले
आणि मी जर त्यांना हाक मारली
    तर ती माझ्यासमोर गोळा होतील.

14 “तुम्ही सगळे इकडे या आणि माझे ऐका.
    कोणत्याही खोट्या देवाने असे कसे होईल म्हणून तुम्हाला सांगितले का? नाही.
देव इस्राएलवर प्रेम करतो बाबेलबाबत
    आणि खास्द्यांबाबत देव त्याला पाहिजे ते करील.”

15 परमेश्वर म्हणतो, “मी त्याला बोलवीन, असे मी तुम्हाला सांगितले आहे,
    मी त्याला आणीन
    आणि मी त्याला यशस्वी करीन.
16 इकडे या आणि माझे ऐका.
    बाबेल राष्ट्र म्हणून जगायला लागले तेव्हा मी तेथे होतो
आणि आरंभापासून मी स्पष्टपणे बोललो का
    तर लोकांना मी काय म्हणालो ते समजावे.”

नंतर यशया म्हणाला, आता परमेश्वर माझा देव, मला आणि त्याच्या आत्म्याला पुढील गोष्टी सांगायला तुमच्याकडे पाठवितो. 17 मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो,

“मीच परमेश्वर तुमचा देव आहे.
    मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो.
    तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो.
18 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या
    तर पूर्ण भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे शांती
    तुमच्याकडे आली असती,
समुद्राच्या परत परत येणाऱ्या लाटांप्रमाणे चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा
    तुमच्याकडे आल्या असत्या.
19 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या
    तर वाळूच्या कणांप्रमाणे खूप संतती तुम्हाला झाली असती
आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले
    गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते.”

20 माझ्या लोकांनो, बाबेल सोडा,
    खास्दयापांसून पळा, ही वार्ता लोकांना आनंदाने सांगा.
जगातील दूरदूरच्या ठिकाणी
    ही बातमी पोहोचवा.
लोकांना सांगा,
    “परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याची सुटका केली.
21 परमेश्वराने त्याच्या लोकांना वाळवंटातून पार नेले
    पण ते तहानलेले राहिले नाहीत का?
    कारण देवाने आपल्या माणसांसाठी खडकातून पाणी वाहायला लावले.
त्याने खडक फोडला
    आणि पाणी बाहेर वाहू लागले.”

22 पण परमेश्वर म्हणतो,
    “पाप्यांना शांती मिळणार नाही.”

प्रकटीकरण 18

बाबेलचा नाश होतो

18 यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला आकाशातून खाली येताना पाहिले. त्याच्याकडे मोठे अधिकार होते. आणि त्याच्या गौरवाने पृथ्वी झळाळत होती. प्रचंड आवाजात तो ओरडला:

“पडली!
    महान बाबेल पडली!
ती दुष्ट आत्म्यांचे घर बनली आहे.
    आणि प्रत्येक दुष्ट आत्म्याचा आश्रय
आणि प्रत्येक अशुद्ध,
    धिक्कारलेल्या पक्षांचा
    आश्रय झाली आहे.
कारण तिच्या व्याभिचाराचा द्राक्षारस जो वेड लावणारा आहे
    तो सर्व राष्ट्रांनी प्याली आहेत.
पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आहे
    आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अति संपत्तीने व ऐषारामाने श्रीमंत झाले आहेत.”

मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला:

“माइया लोकांनो, तिच्यातून बाहेर
    या यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये यासाठी
    की तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत.
कारण तिची पापे स्वर्गाला भिडली आहेत.
    आणि देवाला तिच्या अपराधांची आठवण झाली आहे.
तिने ज्याप्रमाणे तुम्हाला दिले आहे, तसे तुम्ही तिचे परत करा.
    तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा
तिने दुसऱ्यांना दिले त्याच्या दुप्पट प्रमाणात
    तेच मद्य तिच्या प्याल्यात भरा.
तिने स्वतःला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात
    तुम्ही तिला छळ व दु:ख द्या.
ती तिच्या अंतःकरणात गर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते,
    मी विधवा नाही.’
    आणि ‘मी केव्हाच शोक करणार नाही.’
म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील.
    (त्या पीडा म्हणजे): मृत्यू, शोक आणि दुष्काळ ती
आगीत भस्म होऊन जाईल
    कारण सामर्थ्यशाली प्रभु देव तिचा न्याय करील.

“पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळत असताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील. 10 तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूर उभे राहतील, आणि ओरडतील:

‘भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल,
    सामर्थ्याच्या शहरा!
एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!’

11 “पृथ्वीचे व्यापारी तिच्यासाठी रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणीही घेणार नाही. 12 तो माल असा: सोने, चांदी, मौल्यावान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, किरमिजी, रेशमी व जांभळे कापड, निरनिराळ्या प्रकारचे सुगंधी लाकूड, सर्व प्रकारची हस्तीदंती पात्रे, मोलवान लाकडे, तांब्याची, लोखंडाची हस्तीदंती पात्रे, मोलवान लाकडे, तांब्याची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे. 13 दालचिनी, उटणे ऊद, धूप, द्राक्षारस व जैतुनाचे तेल, मैदा व गहू, गुरेढोरे व मेंढरे, घोडे व रथ, दासदासी, मानवी जीव.

14 ‘बाबेल, ज्या उत्तम गोष्टींची तुला अपेक्षा होती,
त्या गोष्टी आता तुझ्यापासून गेल्या आहेत तुझी सर्व श्रीमंती व वैभव नाहीसे झाले आहे.
    त्याची तुला परत कधी भरपाई होणार नाही.’

15 “ज्या व्यापाऱ्यांनी असा माल विकला, आणि त्यांची संपत्ति तिच्यापासून मिळविली ते तिच्या पिडेच्या भितीमुळे दूर उभे राहतील, ते रडतील व शोक करतील. 16 आणि ओरडतील:

‘भयंकर! भयंकर, हे महानगरी, तलम तागाचे,
    किरमीजी व जांभळे पोशाख
    नेसून जी नगरी सजली होती सोने,
    मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती झगमगत होती!
17 एका तासात अशा प्रकारची प्रचंड संपत्ति नष्ट झाली!’

“प्रत्येक तांडेल, जलप्रवासी तसेच खलाशी आणि समुद्रावर पोट भरणारे सर्व लोक त्या नगरीपासून दूर राहतील. 18 आणि ती जळत असताना तिचा धूर ते पाहतील तेव्हा ते ओरडून म्हणतील, ‘या नगरीसारखी दुसरी एवढी महान नगरी झाली नाही.’ 19 मग ते आपल्या डोक्यात धूळ घालतील आणि शोक करतील.

‘भयंकर! भयंकर! हे महान नगरी,
    ज्या सर्वांकडे समुद्रात जहाजे आहेत ते तिच्या संपत्तीमुळे
    श्रीमंत झाले एका तासात तिचा सर्वनाश झाला.
20 हे स्वर्गा, तिच्याबद्दल आनंद कर!
    संतानो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो आनंद करा!
तिने ज्या प्रकारे तुम्हाला नागविले त्याबद्दल देवाने तिचा न्याय केला आहे.’”

21 मग एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलून तो समुद्रात टाकून दिला. आणि म्हणाला:

“अगदी अशीच महान बाबेल नगरी जोराने खाली फेकण्यात येईल
    आणि परत ती कधीही कोणाला सापडणार नाही.
22 वीणा वाजविणाऱ्यांचा, संगीत वाजविणाऱ्यांचा, बासरी वाजविणाऱ्यांचा
    आणि कर्णा वाजविणाऱ्यांचा आवाज परत कधी तुझ्या येथे ऐकू येणार नाही.
कोणताही कारागिरीचा व्यापारी
    तुझ्यामध्ये आढळणार नाही
तुझ्या येथे जात्याचा आवाज
    कधी ऐकू येणार नाही.
23 दिव्याचा प्रकाश तुझ्यामध्ये
    पुन्हा कधी प्रकाशणार नाही
तुझ्या येथे वधूवरांचा आवाज
    पुन्हा कधी ऐकू येणार नाही
तुझे व्यापारी जगातील मोठी माणसे होती
    तुझ्या जादूटोण्यामुळे सर्व राष्ट्रे बहकली गेली
24 त्या नगरीमध्ये संदेष्ट्यांचे देवाच्या पवित्र लोकांचे
    आणि जगात ज्यांची हत्या करण्यात आली अशांचे रक्त सांडल्याचे दिसून आले.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center