Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 33

इस्राएलचा मिसरपासूनचा प्रवासs

33 मोशे आणि अहरोन यांनी इस्राएल लोकांना मिसरामधून लहान लहान टोव्व्यांनी बाहेर काढले. त्यांनी ज्या ज्या देशांतून प्रवास केला ते या प्रमाणे: त्यांनी जेथे जेथे प्रवास केला त्याबद्दल मोशेने लिहिले आहे. परमेश्वराला जे हवे होते तेच मोशेने लिहिले. ते ज्या ठिकाणी गेले ती ठिकाणे आणि तेथून ते कधी गेले त्या वेळा या प्रमाणे:

पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करुन बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले. मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.

इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथला गेले. ते सुक्कोथहून एथामला गेले. लोकांनी तेथे वाळवंटाच्या काठावर तंबू ठोकले. त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बाल-सफोन जवळ होते. लोकांनी मिगदोलसमोर तंबू ठोकले.

लोकांनी पीहहीरोथ सोडले आणि ते समुद्रामधून चालत गेले. ते वाळवंटाकडे गेले. नंतर ते तीन दिवस वाळवंटातून चालत होते. लोकांनी मारा येथे तळ दिला.

लोकांनी मारा सोडले व ते एलिमला जाऊन राहिले. तिथे 12 पाण्याचे झरे होते आणि 70 खजुराची झाडे होती.

10 लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू ठोकले.

11 त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि त्सीन वाळवंटात तळ दिला.

12 त्सीन वाळवंट सोडून ते दफकाला आले.

13 लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.

14 लोकांनी आलूश सोडले व रफिदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.

15 लोकांनी रफिदिम सोडले व त्यांनी सीनाय वाळवंटात तळ दिला.

16 त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.

17 किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले.

18 हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू ठोकले.

19 रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.

20 रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.

21 लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला.

22 रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला.

23 लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले.

24 शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.

25 लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.

26 मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.

27 लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले.

28 तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला.

29 लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू ठोकले.

30 हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.

31 त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानला तळ दिला.

32 बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले.

33 होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले.

34 याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.

35 अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.

36 लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन वाळवंटात कादेश येथे तंबू ठोकले.

37 लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता. 38 याजक अहरोनने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता. 39 अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो 123 वर्षाचा होता.

40 कनान देशातील नेगब जवळ अराद शहर होते. अर्द येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले. 41 लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू ठोकले.

42 त्यांनी सलमोना सोडले व ते पुनोनला आले.

43 पूनोन सोडून त्यांनी ओबोथला तळ दिला.

44 लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारिमला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.

45 मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.

46 लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन दिबलाथाईमला आले.

47 अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू ठोकले.

48 लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते. 49 त्यांनी यार्देन नदीच्या यार्देन खोऱ्यात तंबू ठोकले. त्यांचे तंबू बेथ-यारीमोथापासून अकाशीयाच्या शेतापर्यंत होते.

50 त्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 51 “इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग: तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल. 52 तिथे जे लोक तुम्हाला आढळतील त्यांच्यापासून तुम्ही तो प्रदेश घ्याल. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा. 53 तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा प्रदेश तुम्हाला देत आहे. तो तुमच्या कुटुंबाचा होईल. 54 तुमच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीचा काही भाग मिळेल. तुम्ही चिठ्ठया टाकून कोणाला कुठली जमीन मिळते ते ठरवाल. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. चिठ्यां कुठल्या कुळाला कुठली जमीन मिळाली ते कळेल. प्रत्येक कुळाला त्याचा स्वतःचा जमिनीचा तुकडा मिळेल.

55 “तुम्ही त्या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढा, जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुमच्यावर अनेक संकटे आणतील. ते तुमच्या डोव्व्यातील कुसळासारखे आणि शरीरातल्या काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील. 56 मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.”

स्तोत्रसंहिता 78:1-37

आसाफाचे मास्कील.

78 लोकहो! माझी शिकवण ऐका,
    मी काय सांगतो ते ऐका!
मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन.
    मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन.
आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे.
    आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
आणि आम्ही ती विसरणार नाही.
    आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील.
आम्ही परमेश्वराची स्तुती करु
    आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू.
परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला.
    देवाने इस्राएलला कायदा दिला.
    देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या.
    त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला.
नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील
    या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल.
म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील.
    देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत.
    ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील.
जर लोकांनी त्यांच्या देवाच्या आज्ञा त्यांच्या मुलांना शिकविल्या तर ती मुले त्यांच्या पूर्वजांसारखी होणार नाहीत.
    त्यांचे पूर्वज देवाविरुध्द गेले.
त्यानी देवाच्या आज्ञा पाळायचे नाकारले.
    ते लोक फार हट्टी होते ते देवाच्या आत्म्याशी प्रामाणिक नव्हते.

एफ्राइमच्या लोकांजवळ शस्त्रे होती.
    परंतु ते रणांगणावरुन पळून गेले.
10 त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही.
    त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला.
11 एफ्राईमचे लोक देवाने केलेल्या महान गोष्टी विसरले.
    देवाने दाखवलेल्या अद्भुत गोष्टी ते विसरले.
12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात देवाने
    त्यांच्या वाडवडिलांना त्याची महान शक्ती दाखवली.
13 देवाने लाल समुद्र दुभंगला आणि लोकांना पलिकडे नेले.
    पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते.
14 देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा
    व रात्री अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
15 देवाने वाळवंटात पाषाण फोडला
    त्याने लोकांना पृथ्वीच्या गर्भातून पाणी दिले.
16 देवाने खडकातून नदीसारखे
    खळखळणारे पाणी बाहेर आणले.
17 परंतु लोकांनी देवाविरुध्द पाप करणे चालूच ठेवले.
    ते वाळवंटात सुध्दा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या विरुध्द गेले.
18 नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले.
    त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.
19 त्यांनी देवाविरुध्द तक्रारी केल्या.
    ते म्हणाले, “देव आम्हांला वाळवंटात अन्न देऊ शकेल का?
20 त्याने दगडाला प्रहार केला आणि त्यातून पुरासारखे पाणी बाहेर येऊ लागले
    तो आम्हांला भाकरी आणि मांस नक्कीच देईल.”
21 त्या लोकांनी म्हटलेले परमेश्वराने ऐकले.
    देव याकोबावर फार रागावला देव इस्राएलवर फार रागावला.
22     का? कारण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
देव त्यांना वाचवील यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
23-24 पण नंतर देवाने ढग बाजूला केले
    आणि त्यातून त्याने त्यांच्यावर अन्नासाठी मान्नाचा वर्षाव केला.
आकाशाचे दरवाजे उघडावेत तसा हा प्रकार होता
    आणि आकाशातील गोदामातून धान्याचा वर्षाव होत राहिला.
25 लोकांनी देवदूताचे अन्न खाल्ले.
    देवाने त्यांचे समाधान करण्यासाठी भरपूर अन्न पाठवले.
26-27 देवाने पूर्वेकडचा घोंगावणारा वारा पाठवला
    आणि त्यांच्यावर लावे पक्षी पावसाप्रमाणे कोसळले
देवाने दक्षिणेकडून वारा वाहायला लावला
    आणि निळे आकाश काळे झाले कारण आकाशात खूप पक्षी होते.
28 ते पक्षी छावणीच्या अगदी मध्य भागी,
    त्या लोकांच्या तंबूच्या अवती भोवती पडले.
29 त्यांच्याकडे भरपूर खायला होते
    परंतु त्यांनी त्यांच्या भुकेलाच पाप करायला लावले.
30 त्यांना त्यांची भूक आवरली नाही,
    म्हणून त्यांनी ते पक्षी रक्त काढल्याशिवायच खाल्ले.
31 देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांतल्या अनेकांना मारुन टाकले.
    त्यातल्या अनेक निरोगी तरुण माणसांना देवाने मारले.
32 परंतु लोकांनी पुन्हा पाप केले.
    देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांवर ते अवलंबून राहिले नाहीत.
33 म्हणून देवाने त्यांचे कवडी मोलाचे
    आयुष्य भयानक संकटात संपवले.
34 देवाने जेव्हा जेव्हा त्यातल्या काहींना ठार मारले तेव्हा तेव्हा उरलेले लोक पुन्हा त्याच्याकडे वळले.
    ते देवाकडे धावत परतले.
35 देव त्यांचा खडक आहे याची आठवण त्यांना आली.
    सर्वशक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली.
36 आपण देवावर प्रेम करतो असे ते म्हणाले परंतु ते खोटे बोलले,
    ते मनापासून बोलत नव्हते.
37 त्यांचे मन खरोखरच देवाजवळ नव्हते.
    ते कराराशी प्रामाणिक नव्हते.

यशया 25

देवाचे स्तुतिस्तोत्र

25 प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस.
    मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो.
तू आश्चर्य घडवली आहेस.
    तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे.
    तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.
तू ज्या शहराचा नाश केलास, ते शहर मजबूत तटबंदीने सुरक्षित केलेले होते.
    पण आता तेथे फक्त दगडांचा खच पडला आहे
परकीयांचा राजवाडा जमीनदोस्त केला गेला आहे.
    तो परत कधीच बांधला जाणार नाही.
बलाढ्य राष्ट्रातील लोक तुला मान देतील.
    क्रूर राष्ट्रांतील शहरे तुला घाबरतील.
परमेश्वरा, तू गरजू गरीब लोकांचा आसरा आहेस.
    त्यांच्यापुढील अनेक समस्या त्यांना खच्ची करू पाहतात
    पण तू त्यांचे रक्षण करतोस.
परमेश्वरा, तू उन्हापावसापासून रक्षण करणाऱ्या निवाऱ्यासारखा आहेस.
    पीडा या तुफान वादळ व पावसासारख्या असतात.
पण पावसाची झड भिंतीवर आपटून खाली पडते.
    घरातल्या लोकांना तिचा त्रास होत नाही.
शत्रू आरडाओरडा करून गोंगाट करतो.
    भयंकर शत्रू आव्हाने देतो.
पण देवा तू त्यांचा बंदोबस्त करतोस.
    ज्याप्रमाणे उन्हाळ्यात वाळवंटातील झाडेझुडपे सुकून जमिनीवर गळून पडतात,
त्याप्रमाणे तू शत्रूचा पराभव करून
    त्यांना तुझ्यापुढे गुडघे टेकायला लावतोस.
ज्याप्रमाणे मोठे ढग उष्णतेचा ताप कमी करतात,
    त्याप्रमाणे तू भयंकर शत्रूच्या गर्जना थांबवतोस.

देवाची त्याच्या भक्तांना मेजवानी

त्या वेळेस, सर्वशक्तिमान परमेश्वर, डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंची मद्य असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल. सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत. हा बुरखा म्हणजेच “मृत्यू” होय. पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दुख: भोगले पण देव पृथ्वीवरचे दुख: दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल.

तेव्हा लोक म्हणतील,
    “हा आपला देव आहे.
आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा.
    तो आपले रक्षण करायला आला आहे.
आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत,
    म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.”
10 परमेश्वराचे सामर्थ्य ह्या डोंगरावर
    असल्याने मवाबचा पराभव होईल.
परमेश्वर कचऱ्याच्या ढिगातील
    गवताच्या काडीप्रमाणे शत्रूला पायाखाली तुडवील.
11 पोहणाऱ्या माणसाच्या हाताप्रमाणे परमेश्वर स्वतःचा हात लांब करील
    आणि लोकांना ज्यांचा अभिमान आहे अशा सर्व गोष्टी तो जमा करील.
लोकांनी घडविलेल्या सर्व सुंदर वस्तू
    परमेश्वर गोळा करील आणि दूर फेकून देईल.
12 लोकांनी बांधलेल्या उंच भिंती व सुरक्षित जागा
    परमेश्वर पाडून टाकून धुळीला मिळवील.

1 योहान 3

आपण देवाची मुले आहोत

पित्याने आपल्यावर जे महान प्रेम केले आहे त्याविषयी विचार करा. आम्हांला देवाची मुले म्हणण्यापर्यंत त्याने प्रेम केले! आणि आम्ही खरोखरच (देवाची मुले) आहोत! या कारणामुळे जग आम्हाला ओळखत नाही, कारण त्यांनी (जगाने) ख्रिस्ताला ओळखले नाही. प्रिय मित्रांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात कसे असेल ते अजून माहीत करुन देण्यात आले नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू. आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, तो स्वतःला शुद्ध करतो, जसा ख्रिस्त शुद्ध आहे.

प्रत्येकजण जो पाप करतो तो देवाचा नियम मोडतो. कारण पाप हे नियमभंग आहे. लोकांचे पाप घेऊन जाण्यासाठी ख्रिस्त प्रकट झाला हे तुम्हांस माहीत आहे, आणि त्याच्यामध्ये कोणतेही पाप नाही. प्रत्येकजण जो ख्रिस्तामध्ये राहतो तो पाप करीत राहात नाही. प्रत्येकजण जो पाप करीत राहतो त्याने त्याला पाहिले नाही, आणि त्याला तो ओळखत सुद्धा नाही.

प्रिय मुलांनो, तुम्हांला कोणी फसवू नये. जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे. जो पापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला.

जो देवाचा पुत्र झाला आहे तो कोणीही पाप करीत नाही. कारण खुद्द देवाची बी त्या व्यक्तीमध्ये असते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही. कारण तो देवाचे मूल बनला आहे. 10 जी देवाची मुले आहेत व जी सैतानाची मुले आहेत, त्यांना तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता: प्रत्येकजण जे योग्य ते करीत नाही आणि जो त्याच्या भावावर प्रेम करीत नाही तो देवाचा नाही.

आम्ही एकमेकांवर प्रीति केली पाहिजे

11 आपण एकमेकांवर प्रीति करावी, ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे. 12 काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा) होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसे केले कारण त्याची स्वतःची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती.

13 बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीति करतो. जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो. 15 जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेले अनंतकाळचे जीवन मिळत नाही.

16 अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. 17 जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते असे आपण कसे म्हणू शकतो? 18 प्रिय मुलांनो, आपली प्रीति केवळ शब्दांनी बोलण्याएवढीच मर्यादित नसावी तर ती कृती सहीत व खरीखुरी असावी.

19 आम्ही सत्याचे आहोत ते यावरुन आम्हांस कळेल आणि अशाप्रकारे देवासमोर आमच्या अंतःकरणाची खात्री पटेल 20 जेव्हा जेव्हा आमचे अंतःकरण आम्हांला दोष देईल, हे यासाठी की आमच्या अंतःकरणापेक्षा देव महान आहे, आणि सर्व काही (तो) जाणतो.

21 प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हांला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हांला खात्री आहे. 22 आणि देवाकडे आम्ही जे मागतो ते आम्हाला प्राप्त होते. कारण आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो, आणि त्याला जे संतोषकारक आहे ते आम्ही करीत आहोत. 23 तो आम्हांला अशी आज्ञा करतो की येशू ख्रिस्ताच्या नावावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे, जशी येशूने आम्हांला आज्ञा केली आहे. 24 जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. देव आमच्यामध्ये राहतो हे आम्हांला यावरुन समजते, त्याने दिलेल्या आत्म्यामुळे आम्हाला हे समजते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center