Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 29

कर्ण्याचा सण

29 “सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी खास सभा असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करणार नाही. हा कर्णा [a] वाजवण्याचा दिवस आहे. तुम्ही होमार्पणे द्याल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, एक मेंढा आणि एक वर्षांची सात कोकरे अर्पण करा. ती सर्व दोषरहित असावीत. तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून बैलाबरोबर, 16 कप पीठ मेंढ्याबरोबर व आठ कप पीठ प्रत्येक कोकराबरोबर अर्पण कराल. एक बकरासुद्धा पापार्पण म्हणून द्या. त्यामुळे तुम्ही शुद्ध व्हाल. अमावास्याचे होमार्पण आणि धान्यार्पण ही नेहमीच्या अर्पणांव्यरिरिक्त असतील. आणि ही रोजच्या धान्यार्पणे व पेयार्पणे यांच्या व्यतिरीक्त असतील. हे सर्व नियमाप्रमाणे केले पाहिजे. ही सर्व अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील.

प्रायश्चित्ताचा दिवस

“सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक खास सभा बोलावण्यात येईल. त्या दिवशी तुम्ही अन्न घ्यायचे नाही आणि काही कामही करायचे नाही. तुम्ही होमार्पणे द्यायची. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, एक मेंढा आणि एक वर्ष वयाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असले पाहिजेत. त्याबरोबर तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून बैलाबरोबर, 16 कप पीठ 10 मेंढ्या बरोबर आणि आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर अर्पण केले पाहिजे. 11 पापार्पण म्हणून तुम्ही एक बकराही अर्पण कराल. प्रायश्चित्ताच्यादिवशी करावयाच्या पापार्पणाबरोबरच ही अर्पणे द्यायची. तसेच रोजच्या बळीच्या, धान्याच्या व पेयाच्या अर्पणाबरोबर ही अर्पणे करावीत.

मंडपाचा सण

12 “सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एक खास सभा असेल. तो मंडपाचा सण असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही आणि परमेश्वरासाठी सात दिवसांची खास सुट्टी साजरी करायची. 13 तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही 13 बैल, 2 मेंढे, 14 कोकरे अर्पण कराल. ते सर्व दोषरहित असले पाहिजेत. 14 तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून प्रत्येक बैलाबरोबर, 16 कप पीठ प्रत्येक मेंढ्याबरोबर व 15 आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर अर्पण करावे. 16 तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. रोजच्या अर्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यातिरिक्त ही अर्पणे असतील.

17 “या सुट्ठीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही 12 बैल, 2 मेंढे आणि 1 वर्षाचे 14 कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी. 18 बैल, मेंढे आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात धान्यार्पण आणि पेयार्पण केले पाहिजे. 19 एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. ही सर्व रोजच्या बळीच्या व धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असली पाहिजे.

20 “या सुट्ठीच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही 11 बैल, 2 मेंढे आणि एक वर्षाचे 14 कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असले पाहिजेत. 21 बैल, मेंढे आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण केले पाहिजे. 22 पापार्पण म्हणून एक बकराही द्यावा. हे सर्व रोजच्या बळीच्या व धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

23 “सुट्ठीच्या चौथ्या दिवशी तुम्ही 10 बैल, 2 मेंढे व 1 वर्षाचे 14 कोकरे अर्पण करवेत. ते निर्दोष असले पाहिजेत. 24 बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पणही केले पाहिजे. 25 एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

26 “सुट्ठीच्या पाचव्या दिवशी तुम्ही 9 बैल, 2 मेंढे व एक वर्षाचे 14 कोकरे अर्पण केले पाहिजे. ते दोषरहित असावेत 27 बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण ही केले पाहिजे. 28 एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणा व्यतिरिक्त असले पाहिजे.

29 “सुट्ठीच्या सहाव्या दिवशी तुम्ही 8 बैल, 2 मेंढे व एक वर्षांचे 14 कोकरे अर्पण केले पाहिजेत. ते दोषरहित असावेत. 30 बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण, व पेयार्पणही केले पाहिजे. 31 एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

32 “सुट्ठीच्या सातव्या दिवशी तुम्ही 7 बैल, 2 मेंढे व एक वर्षांचे 14 कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत. 33 बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पणही केले पाहिजे. 34 एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

35 “या सुट्ठीच्या आठव्या दिवशी तुमच्यासाठी एक खास सभा भरवावी. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये. 36 तुम्ही होमार्पण करावे. ते अग्नीबरोबर करायचे अर्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, 1 मेंढा व एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत. 37 प्रत्येक बैल, मेंढा व कोकरा यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण दिले पाहिजे. 38 एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

39 “या खास सुट्टीत तुम्ही होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणाची अर्पणे म्हणून आणली पाहिजेत. ही सर्व अर्पणे तुम्ही परमेश्वराला करावीत. ही सर्व अर्पणे तुम्हाला परमेश्वराला खास भेट द्यायची असेल किंवा परमेश्वराला काही खास वचन दिले आहे म्हणून द्यावयाच्या अर्पणाव्यतिरिक्त असतील.”

40 मोशेने परमेश्वराच्या या सर्व आज्ञा इस्राएल लोकांना सांगितल्या.

स्तोत्रसंहिता 73

भाग दुसरा

(स्तोत्रसंहिता 73-89)

आसाफाचे स्तोत्र

73 देव इस्राएल बरोबर खरोखरच चांगला वागला.
    शुध्द ह्रदय असलेल्या लोकांशी देव चांगला वागतो.
मी जवळ जवळ घसरलो
    आणि पाप करायला लागलो.
दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले
    आणि मी त्या गर्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.
ते लोक आरोग्य संपन्न आहेत.
    त्यांना जीवन जगण्यासाठी लढा द्यावा लागत नाही. [a]
त्या गर्विष्ट लोकांना आपल्यासारखे दु:खभोगावे लागत नाही.
    दुसऱ्या लोकांवर येतात तशी संकटे त्यांच्यावर येत नाहीत.
म्हणून ते अतिशय गर्विष्ठ आणि तिरस्करणीय लोक आहेत.
    ते ज्या प्रकारची आभूषणे आणि भपकेदार कपडे घालतात त्या वरुन हे कळून येते.
जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात.
    त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात.
ते दुसऱ्यांविषयी दुष्ट आणि वाईट गोष्टी बोलतात ते गर्विष्ठ आणि दुराग्रही आहेत.
    आणि दुसऱ्या लोकांचा कसा फायदा उठवायचा याचा ते सतत विचार करीत असतात व त्याप्रमाणे योजना आखतात.
आपण म्हणजेच देव असे त्या गर्विष्ठ लोकांना वाटते
    आपण पृथ्वीचे राज्यकर्ते आहोत असे त्या लोकांना वाटते.
10 म्हणून देवाची माणसे सुध्दा त्यांच्याकडे वळतात
    आणि त्यांनी सांगितलेली कामे करतात.
11 ते दुष्ट लोक म्हणतात, “आम्ही काय करतो ते देवाला माहीत नाही,
    सर्वशक्तिमान देवाला ते माहीत नाही.”

12 ते गर्विष्ठ लोक दुष्ट आहेत, पण ते श्रीमंत आहेत
    आणि अधिक श्रीमंत होत आहेत.
13 मग मी माझेच मन शुध्द का करु?
    मी माझे हात स्वच्छ का करु.
14 देवा, मी दिवसभर त्रास भोगतो
    आणि तू मला रोज सकाळी शिक्षा देतोस.

15 देवा, मला इतर लोकांशी याबद्दल बोलायची इच्छा होती.
    परंतु त्यामुळे तुझ्या माणसांचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते हे मला माहीत होते.
16 या गोष्टी समजण्याचा मी खूप प्रयत्न केला
    पण तुझ्या मंदिरात येण्यापूर्वी ते माझ्यासाठी फारच कठीण होते.
17 मी देवाच्या मंदिरात गेलो
    आणि नंतर मला कळले.
18 देवा, तू त्या लोकांना खरोखरच एका धोकादायक परिस्थितीत टाकले आहेस.
    खाली पडून सर्वनाश ओढवून घेणे त्यांना फारच सोपे झाले आहे.
19 अचानक संकटे येऊ शकतात
    आणि नंतर त्या गर्विष्ठ माणसांचा नाश होतो.
भयंकर गोष्टी घडू शकतात
    आणि मग त्यांचा सर्वनाश होतो.
20 परमेश्वरा, ते लोक म्हणजे झोपून
    उठल्यावर विसर पडणाऱ्या स्वप्नासारखे आहेत.
आपल्या स्वप्नात येणाऱ्या राक्षसाप्रमाणे
    तू त्या लोकांना अदृष्य करशील.

21-22 मी फार मूर्ख होतो.
    मी श्रीमंत आणि दुष्ट माणसांचा विचार केला आणि मी गोंधळून गेलो.
देवा, मी गोंधळलो होतो आणि तुझ्यावर रागावलो होतो.
    मी एखाद्या मूर्ख आणि अज्ञानी प्राण्यासारखा वागलो.
23 मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे.
    मी नेहमी तुझ्या जवळ असतो.
    देवा, तू नेहमी माझा हात धरतोस.
24 देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर
    आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील.
25 देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील
    तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार?
26 कदाचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल
    परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे.
    देव सदैव माझ्याजवळ असतो.
27 देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील.
    जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.
28 मी मात्र देवाकडे आलो आहे.
    आणि ती माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.
    मी परमेश्वराला माझा प्रभु आणि माझी सुरक्षित जागा बनवले.
देवा, तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यास त्याबद्दल सांगण्यासाठी मी आलो आहे.

यशया 21

देवाचा बाबेलोनला संदेश

21 बाबेलोनबद्दल (“समुद्राजवळचे वाळवंट”) देवाचा शोक संदेश.

वाळवंटातून काहीतरी येत आहे.
    नेगेबच्या वाळवंटातून येणाऱ्या वादळाप्रमाणे ते आहे.
    भयंकर देशातून ते येत आहे.
काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे.
    विश्वासघातकी तुझ्याविरूध्द् जाताना मला दिसत आहे.
    लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय.

एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर.
    मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर.
    त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.

भयंकर गोष्टी पाहून मी घाबरलो आहे.
    भीतीने माझ्या पोटात गोळा उठतो त्या भीतीच्या वेदना प्रसूतिवेदनेप्रमाणे आहेत.
जे मी ऐकतो त्याने भयभीत होतो,
    जे पाहतो त्यामुळे भीतीने माझा थरकाप होतो.
मी चिंताग्रस्त आहे आणि भीतीने थरथर कापत आहे.
    माझी प्रसन्न संध्याकाळ काळरात्र बनली आहे.

लोकांना वाटते सारे काही ठीक चालले आहे.
    “लोक म्हणत आहेत
    जेवणाची तयारी करा.
    खा. प्या.
त्याच वेळी तिकडे सैनिक म्हणत आहेत
    टेहळणीदार ठेवा.
    सेनाधिकाऱ्यांनो, उठा व ढाली सज्ज करा.”

माझा प्रभू मला म्हणाला, “जा आणि ह्या शहराचे रक्षण करण्यासाठी पहारेकऱ्याची नेमणूक कर. तो जे जे पाहील त्याची त्याने वर्दी द्यावयास हवी. जर त्या रखवालदाराने घोडेस्वारांच्या रांगा, गाढवे किंवा उंट पाहिले तर त्याने अतिशय काळजीपूर्वक चाहूल घेतली पाहिजे.”

मग एके दिवशी रखवालदाराने इशारा दिला. सिहंनाद करून रखवालदार म्हणाला,

“हे प्रभु! रोज मी टेहळणी बुरूजावरून टेहळणी करीत असतो.
    रोज रात्री माझा खडा पहारा असतो.
पण पाहा! ते येत आहेत! लोकांच्या
    व घोडेस्वारांच्या रांगा मला दिसत आहेत!”

नंतर दूत म्हणाला,
    “बाबेलोनचा पराभव झाला.
    ते जमीनदोस्त झाले,
बाबेलोनच्या खोट्या देवांच्या सर्व मूर्तींची मोडतोड होऊन
    त्या धुळीला मिळाल्या आहेत.”

10 यशया म्हणाला, “माझ्या लोकांनो, सर्वशक्तिमान परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने जे मला ऐकवले, ते मी तुम्हाला सांगितले. खळ्यातील धान्याप्रमाणे तुम्ही झोडपले जाल.”

देवाचा एदोमला संदेश

11 दुमाविषयीचा शोक संदेश.

सेईराहून (एदोमहून) मला एकजण भेटायला आला.
    तो म्हणाला, “रखवालदारा, रात्र किती राहिली?
    अंधार सरायला अजून किती वेळ आहे?”

12 रखवालदार उत्तरला,
    “सकाळ होत आहे पण परत रात्र होईल.
तुम्हाला काही विचारायचे
    असल्यास परत या [a] व मग विचारा.”

देवाचा अरेबियाला संदेश

13 अरेबियाविषयी शोक संदेश

ददार्नीच्या काफल्याने अरेबियाच्या वाळवंटातील
    काही झाडांखाली रात्र काढली.
14 त्यांनी तहानेलेल्या प्रवाशांना पाणी दिले
    तेमा देशातील लोकांनी प्रवाशांना अन्न दिले.
15 ते प्रवासी, त्यांना ठार मारायला
    उठलेल्या तलवारीपासून
व युध्द करायला सज्ज
    असलेल्या धनुष्यांपासून दूर पळत होते.
ते घनघोर युध्दापासून दूर पळत होते.

16 ह्या गोष्टी घडून येतील असे माझ्या प्रभु परमेश्वराने मला सांगितले. परमेश्वर म्हणाला, “एक वर्षात (सालदाराच्या मोजणीप्रमाणे) केदारचे वैभव लयाला जाईल. 17 त्या वेळी अगदी थोडे धनुर्धारी, केदारचे महान योध्दे, मागे उरतील.” इस्राएलच्या परमेश्वर देवाने सांगितले आहे.

2 पेत्र 2

खोटे शिक्षक

तरीही देवाच्या लोकांमध्ये खोटे होऊन गेले तसे तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असणार. ते लोकांमध्ये विध्वंसक विचार पसरवतील. आणि ज्या प्रभूने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेतले त्याचा ते स्वीकार करणार नाहीत. असे करण्याने ते स्वतःवर ताबडतोब नाश ओढवून घेतील. तसेच पुष्कळ लोक प्रखर लैंगिक वासनांच्या आहारी जाऊन अनैसर्गिक शरीर व्यवहारात गुरफटतील. त्यांच्यामुळे खऱ्या मार्गाची निंदा होईल. त्यांच्या अधाशीपणामुळे त्यांनी तयार केलेल्या शिकवणुकीने पैशांसाठी तुमची पिळवणूक करतील. फार पूर्वी देवाने त्यांना दिलेली शिक्षा ही पोकळ धमकी नाही तर त्यांचा नाश त्यांची वाट पाहत आहे.

कारण देवाने, ज्या देवदूतांनी पाप केले त्यांनादेखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडद अंधारात टाकले.

देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही; तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीने राहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावर पाण्याचा महापूर आणाला.

देवाने सदोम व गमोरा या शहरांना जाळून बेचिराख करण्याची शिक्षा दिली व भविष्यकाळात अनैतिक लोकांचे काय होईल हे या उदाहरणाने दाखवून दिले. आपल्या अनीतिच्या वागण्याने ज्या बेबंद लोकांनी लोटासारख्या चांगल्या माणसाला कष्टविले, त्याची देवाने सुटका केली. दिवसेंदिवस त्या लोकांमध्ये राहत असताना, त्या नियमविरहीत लोकांमुळे जे तो पाहत व ऐकत होता त्यामुळे त्या चांगल्या मनुष्याला आपले धार्मिक ह्रदय, फाटून जाते की काय असे त्याला वाटत होते.

अशा प्रकारे, प्रभुला, धार्मिक लोकांची त्यांच्या दु:खापासून सुटका कशी करायची हे माहीत आहे आणि त्याला माहीत आहे की न्यायाच्या दिवसापर्यंत दुष्ट लोकांना शिक्षेसाठी कसे ठेवायचे. 10 विशेषतः

जे पापमय वासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोक गौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत. 11 याउलट देवदूत जे या लोकांपेक्षा सामर्थ्याने व बळाने महान आहेत, ते देवासमोर या लोकांविरुद्ध अपमानास्पद गैर काही बोलत नाहीत. 12 परंतु हे लोक ज्यांना पकडून मारुन टाकावे अशा देहस्वभावानुसार चालणाऱ्या बुद्धीहीन पशूंसारखे आहेत. ज्या गोष्टींबद्दल ते अज्ञानी आहेत, त्याविरुद्ध हे लोक बोलतात. ज्याप्रमाणे प्राण्यांचा नाश केला जातो, त्याचप्रमाणे (खोट्या शिक्षकांचाही) नाश केला जाईल. 13 आणि त्यांनी इतरांना दुखावल्याचे आणि अन्यायाचे फळ म्हणून त्यांनाही दुखाविण्यात येईल.

भर दिवसा वाईट गोष्ट करण्यात आनंद आहे असे ते लोक मानतात. ते डाग आणि कलंक असे आहेत. ते तुमच्याबरोबर मेजवानीत सामील होताना आपल्या कपटाच्या आनंदात बेभान होतात. 14 त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडे कामूकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापात ओढतात त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत.

15 सरळ वाट सोडून ते भलतीकडे भरकटत गेले आहेत. बौराचा पुत्र बलाम याच्यासारखी वाट त्यांनी धरली आहे. बलामाला अयोग गोष्टी करण्याकरिता लाच घेणे आवडत असे. 16 परंतु त्याच्या दोषामुळे त्याची कानउघडणी करण्यात आली. कधीही बोलू न शकणाऱ्या गाढवाने माणसासारखे बोलून संदेष्ट्याच्या वेडगळपणास आवर घातला.

17 हे खोटे शिक्षक पाणी नसलेले कोरडे झरे व वादळाने पांगविलेले ढग आहेत. खोल अंधारात त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली आहे. 18 ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या संगतीपासून सुटकेचा प्रयत्न करु लागले आहेत, अशांची फसवणूक करुन देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात. 19 हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांना मोकळीक देण्याचे वचन देतात परंतु ते स्वतःच नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडा बसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो.

20 म्हणून आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त यांची ज्या लोकांना ओळख होते, त्यांची जगाच्या दूषित वातावरणापासून सुटका होते. परंतु नंतर पुन्हा एकदा जगाचे अशुद्ध वातावरण या लोकांवर आपला पगडा बसविते. मग त्यांची शेवटची स्थिती अगोदरच्या स्थितीहून जास्तच वाईट होते. 21 त्यांना जर चांगला मार्ग माहीत झाला नसता तर चांगले झाले असते कारण चांगला मार्ग माहीत होणे आणि त्या लोकांना दिलेल्या पवित्र शिक्षणापासून त्यांनी वळणे, यापेक्षा (अगोदरची स्थिती चांगली होती.) 22 त्यांच्या बाबतीत जे घडले ते या खऱ्या म्हणीत सांगितले आहे: “आपल्याच ओकीकडे परतणारा कुत्रा” आणि दुसऱ्या म्हणीतः “स्वच्छ केले तरी चिखलात लोळणारे डुक्कर.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center