M’Cheyne Bible Reading Plan
यज्ञासंबंधीचे नियम
15 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग.” मी तुम्हाला एक प्रदेश वस्ती करण्यासाठी देत आहे. तुम्ही जेव्हा तिथे प्रवेश कराल तेव्हा 3 तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्या. त्याच्या सुवासाने परमेश्वरास आनंद होईल. तुम्ही तुमच्या गायी, मेंढ्या आणि बकऱ्या यांचा उपयोग होमार्पण यज्ञ नवस स्वखुशीने द्यावयाच्या देणाग्या किंवा नेहमीच्या यज्ञातला भाग म्हणून उपयोग कराल.
4 “एखादा माणूस जेव्हा त्याची अर्पणे आणतो तेव्हा त्याने परमेश्वराला धान्यसुध्दा अर्पण केले पाहिजे. हे धान्यार्पण आठ कप [a] सपीठ 1/4 हिंनभर [b] तेलात मिसळून केलेले असले पाहिजे. 5 प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही छोटी बकरी/कोकरु अर्पण कराल तेव्हा त्याच्याबरोबर 1/4 कप द्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे.
6 “जर तुम्ही मेंढा अर्पण करणार असाल तर त्याच्या बरोबर धान्यार्पणही केले पाहिजे. हे धान्यार्पण सोळा कप [c] सपीठ 1/3 हिन [d] तेलात मिसळून दिले पाहिजे. 7 आणि तुम्ही 1/4 कप द्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे. त्याच्या सुवास परमेश्वराला आनंदित करेल.
8 “जेव्हा तुम्ही लहान बैल होमार्पण म्हणून अर्पण कराल किंवा शांत्यार्पण म्हणून द्याल किंवा परमेश्वराला दिलेले खास वचन म्हणून अर्पण कराल. 9 तेव्हा त्या गोऱ्ह्या बरोबर तुम्ही धान्यार्पणसुध्दा आणले पाहिजे. हे धान्यार्पण 24 कप [e] सपीठ 2 कप तेलात मिसळलेले असले पाहिजे. 10 त्याच्याबरोबर 2 कप [f] द्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे. हे अर्पण होमार्पण असेल त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. 11 तुम्ही परमेश्वराला जो बैल, मेंढा, मेंढी किंवा बकरी यांचे अर्पण कराल ते याप्रमाणे तयार करायला पाहिजे. 12 तुम्ही जो प्राणी अर्पण कराल त्या प्रत्येका बरोबर हे ही अर्पण करा.
13 “अशाप्रकारे इस्राएलच्या प्रत्येक नागरिकाने परमेश्वराला आनंदित करण्यासाठी होमार्पण केले पाहिजे. 14 परदेशी लोक तुमच्यातच राहतील. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीही या प्रमाणेच होमार्पण केले पाहिजे. 15 हेच नियम सर्वाना लागू आहेत. इस्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात. 16 याचा अर्थ असा की तुम्ही सारख्याच नियमाचे व विधींचे पालन केले पाहिजे. हे नियम व विधी इस्राएल लोकांसाठी आणि तुमच्यात राहणाऱ्या इतर लोकांसाठी आहेत.”
17 परमेश्वर मोशेला म्हणाला, 18 “इस्राएल लोकांना या गोष्टी सांग: मी तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात नेत आहे. 19 जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला थोडा भाग परमेश्वराला अर्पण करा. 20 तुम्ही धान्य गोळा करुन ते दळाल आणि त्याचे भाकरीसाठी पीठ कराल. त्या पिठाचा पहिला भाग तुम्ही नेहमी परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. हे मळणीच्या वेळी धान्यार्पण करतात त्याप्रमाणे हे अर्पण केले पाहिजे. 21 हा नियम सर्वकाळ राहील. त्या पीठाचा पहिला भाग तुम्ही नेहमी परमेश्वराला अर्पण केला पाहिजे.
22 “जर तुम्ही काही चूक केली आणि परमेश्वराने मोशेला दिलेल्या एखाद्या आज्ञेचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल? 23 परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हाला मोशे मार्फत दिल्या आहेत ज्या दिवसापासून त्या दिल्या तेव्हापासून त्या लागू आहेत. आणि त्या सदैव राहतील. 24 तेव्हा जर तुम्ही चूक केलीत आणि या आज्ञांचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल? जर इस्राएलच्या सर्व लोकांनी मिळून चूक केली तर त्यानी सर्वांनी मिळून एक गोऱ्हा परमेश्वराला होमार्पण केला पाहिजे. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. गोऱ्ह्याबरोबर धान्यार्पण आणि पेयार्पण करायला पाहिजे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण केला पाहिजे.
25 “म्हणून याजकाने लोकांना शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्याने या गोष्टी इस्राएलच्या सर्व लोकांसाठी केल्या पाहिजेत. ते पाप करीत आहेत हे लोकांना माहित नव्हते. पण जेव्हा ते त्यांना समजेल तेव्हा त्यांनी परमेश्वरासाठी भेट आणली. त्यांनी होमार्पण आणि पापार्पण आणले म्हणून लोकांना क्षमा केली जाईल. 26 इस्राएलाच्या सर्व लोकांना आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांना क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.
27 “पण जर फकत एकाच माणसाने चूक केली तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल. 28 याजक त्या माणसाला शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी करील. त्या माणसाने चूक केली आणि परमेश्वरापुढे पाप केले. पण याजकाने त्याला शुद्ध केले तर त्याला क्षमा केली जाईल. 29 जो माणूस चूक करतो आणि पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्या घरात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.
30 “पण जर एखाद्याने पाप केले आणि आपण चूक करीत आहो हे त्याला कळत असले, तर तो माणूस परमेश्वराविरुद्ध आहे. त्या माणसाला त्याच्या लोकांपासून वेगळे काढून टाकले पाहिजे. इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या माणसासाठी किंवा तुमच्यात राहणाऱ्या परदेशी माणसासाठी सारखाच नियम आहे. 31 परमेश्वराचा शब्द महत्वाचा आहे असा विचार त्या माणसाने केला नाही आणि त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली. तर त्या माणसाला तुमच्या समूहापासून वेगळे केलेच पाहिजे. तो माणूस अपराधी आहे आणि त्याला शिक्षा झालीच [g] पाहिजे.”
माणूस विश्रांतीच्या दिवशी काम करतो
32 या वेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात रहात होते. एका माणसाला जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथचा दिवस होता. इतरांनी त्याला ते करताना पाहिले. 33 ज्या लोकांनी त्याला लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्याला मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले. 34 त्यांनी त्या माणसाला तिथेच ठेवले कारण त्याला काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.
35 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तो माणूस मेला पाहिजे. तेव्हा सर्व लोकांनी त्याच्यावर छावणीबाहेर दगडमार करावा.” 36 म्हणून लोक त्याला छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्याला दगडमार करुन मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.
नियम लक्षात ठेवण्यासाठी परमेश्वर त्याच्या लोकांना मदत करतो
37 परमेश्वर मोशेला म्हणाला, 38 “इस्राएल लोकांशी बोल. त्यांना या गोष्टी सांग: माझ्या आज्ञा तुमच्या लक्षात राहाण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी देईन. दोऱ्याचे खूपसे तुकडे एकत्र बांधा आणि ते तुमच्या कपड्याच्या एका टोकाला बांधून ठेवा. त्या प्रत्येक गोंड्याला एक निळा दोरा बांधा. या गोष्टी तुम्ही नेहमी अंगावर बाळगा. 39 तुम्ही या गोंड्याकडे बघून परमेश्वराने दिलेल्या सगव्व्या आज्ञा लक्षात ठेवू शकाल. म्हणजे तुम्ही आज्ञा पाळाल. तुम्ही आज्ञा विसरुन काहीही चूक करणार नाही आणि तुमच्या शरीराला व डोव्व्यांना हव्या असलेल्या गोष्टी करणार नाही. 40 माझ्या सगव्व्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवाल. म्हणजे तुम्ही परमेश्वराचे खास लोक व्हाल. 41 मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हाला मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र दावीदाने बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर भविष्यवेता नाथान त्याच्याकडे आला तेव्हाचे स्तोत्र
51 देवा, माझ्यावर दया कर,
तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने
आणि तुझ्या महान कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देवा माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक.
माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे.
ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत
असे सांगतोस त्याच मी केल्या.
देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले.
मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास.
तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या
आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल
तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर.
मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग.
तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस,
ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्रदय निर्माण कर.
माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि
तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो,
मला पुन्हा तुझा आनंद दे,
माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
13 पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन.
आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस.
14 देवा, तूच माझा त्राता आहेस.
तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे.
15 प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन.
16 तुला बळी नको आहेत.
तुला नको असणारे बळी मी देणार नाही.
17 देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय.
देवा,तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्रदयाकडे पाठ फिरवणार नाहीस.
18 देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा.
यरुशलेमच्या भिंती बांध.
19 नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील
आणि होमार्पणे ही तू उपभोगशील.
आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील.
इस्राएल देवाचे नंदनवन
5 मी माझ्या मित्रासाठी (देवासाठी) गाणे गाईन. हे गाणे, माझ्या मित्राच्या द्राक्षमळ्याच्या (इस्राएलच्या) प्रेमासंबंधी असेल.
माझ्या मित्राचा द्राक्षमळा अतिशय
सुपीक जमिनीत होता.
2 माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली.
तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली.
त्याने मळ्याच्या मध्यभागी
एक मनोरा बांधला.
द्राक्षाचे उत्तम पीक येईल अशी त्याला आशा होती
पण त्यातून निकृष्ट प्रतीचीच फळे आली.
3 म्हणून देव म्हणाला, “यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनो व यहूदात राहणाऱ्या लोकांनो,
माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा जरा विचार करा.
4 माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी आणखी काय करू शकलो असतो?
मला जे करणे शक्य होते ते सर्व मी केले
मी चांगल्या पिकाची आशा केली
पण पीक वाईट आले.
असे का झाले?
5 “आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे
ते तुम्हाला सांगतो.
मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढून
मी जाळून टाकीन.
त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून
दगड पायाने तुडवीन.
6 मी माझा द्राक्षमळा उजाड करीन.
कोणीही वेलीची काळजी घेणार नाही.
कोणीही त्या मळ्यात काम करणार नाही.
त्यात तण व काटेकुटे माजतील.
तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
7 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मालकीचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल हा देश होय. ज्या द्राक्षवेली परमेश्वराला प्रिय आहेत त्या म्हणजे यहुदी लोक होत.
परमेश्वराने न्यायाची आशा केली
पण तेथे फक्त हत्याच घडली.
परमेश्वराने प्रामाणिकपणाची आशा धरली
पण तेथे फक्त वाईट रितीने वागविलेल्या लोकांचे आक्रोश होते.
8 अजिबात जागा शिल्लक राहणार नाही अशारीतीने घराला घर व शेताला शेत जोडणाऱ्यांनो तुमचा धिक्कार असो. परन्तु परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील. असे हे तुम्हाला देशात एकाकी राहण्यास भाग पाडेपर्यंत चालू राहील. [a] 9 सर्वशक्तिमान परमेश्वराने मला हे सांगितले व मी ऐकले, “आता तेथे खूप घरे आहेत पण मी नक्की सांगतो की ती सर्व उध्वस्त होतील. मोठी व सुंदर घरे तेथे आहेत पण ती सर्व रिकामी पडतील. 10 तेव्हा दहा एकराच्या द्राक्षाच्या मळ्यातून अगदी थोडा द्राक्षरस मिळेल आणि खूप पोती बियाणे वापरले तरी अगदी थोडे पीक येईल.”
11 लवकर उठून नशा आणणाऱ्या पेयाच्या शोधास लागणाऱ्यांनो तुमचा धिक्कार असो. तुम्ही मद्यपानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता. 12 मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता आणि परमेश्वराची करणी तुम्हाला दिसत नाही. परमेश्वराने आपल्या हाताने अनेक गोष्टी घडवल्या आहेत पण त्या तुमच्या लक्षात येत नाहीत. हे तुमच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही.
13 परमेश्वर म्हणतो, “माझ्या लोकांना पकडून नेले जाईल. का? कारण ते समजदार नाहीत. त्यांच्यातील उच्चपदस्थांची उपासमार होईल. त्यांतील बहुसंख्य तहानेने तळमळतील. 14 पण ती सर्व मोठी माणसे मरतील व (शिओल) अधोलोकात अधिक भर पडेल. मृत्यु आपला अजस्त्र जबडा पसरेल आणि ते सर्व लोक खाली अधोलोकात जातील.”
15 लोक हीनदीन होतील. गर्विष्ठ माणसांच्या माना खाली जातील. 16 सर्वशक्तिमान परमेश्वर प्रामाणिकपणाने योग्य न्याय करील आणि लोकांना त्याची महानता कळेल. पवित्र देव योग्य त्याच गोष्टी करेल आणि लोक त्याचा आदर करतील. 17 देव इस्राएल लोकांना त्यांचा देश सोडून जाण्यास भाग पाडेल. सर्व भूमी ओसाड होईल. शेळ्या-मेंढ्यांना मोकळे कुरण मिळेल. एकेकाळी श्रीमंतांची मालकी असलेल्या जमिनीवर कोकरे चरतील.
18 त्या लोकांकडे पाहा लोक दोरांनी गाड्या खेचून नेतात तसे ते आपले गुन्हे व पापे वाहून नेत आहेत. 19 ते लोक म्हणतात, “देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे जे करायचे ते लवकरात लवकर करावे, म्हणजे आम्हाला काय घडणार आहे ते तरी कळेल. परमेश्वराची इच्छा लवकर पूर्ण व्हावी म्हणजे आम्हांला त्याची योजना कळेल.”
20 ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत व वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते व गोड आंबट लागते. 21 ते स्वतःला फार चलाख समजतात. त्यांना वाटते आपण फार बुध्दिमान आहोत. 22 मद्य पिण्यात त्यांची प्रसिध्दी आहे आणि मद्याचे मिश्रण करण्यात ते तरबेज आहेत. 23 जर त्यांना पैसे चारले तर गुन्हेगारालाही ते माफ करतील पण ते सज्जनांना प्रामणिकपणे न्याय मिळू देणार नाहीत. 24 अशा लोकांचे वाईट होईल. ज्याप्रमाणे आगीमध्ये पाने आणि गवत जळून भस्मसात होते त्याप्रमाणे त्यांच्या वंशजांचा पूर्णपणे नाश होईल. अंकुर मरून धुळीला मिळावा अथवा आगीत फूल जळून त्याची राख वाऱ्यावर कोठल्या कोठे उडून जावी तसाच त्यांच्या वंशजांचा समूळ नाश होईल.
त्या लोकांनी, सर्वशक्तिमान परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला. इस्राएलच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला. 25 म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. तो आपला हात त्यांच्यावर उगारेल आणि त्यांना शिक्षा करील. मग डोंगरसुध्दा भीतीने कापतील. मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडतील. पण तरीही देवाचा राग शांत होणार नाही. त्याचा हात लोकांना शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
इस्राएलला शिक्षा करण्यासाठी देव सैन्ये आणील
26 पाहा! दूरच्या राष्ट्रांना देव खूण करीत आहे, झेंडा उभारून तो त्या राष्ट्रांना आवाहन करीत आहे. दूरवरून शत्रू येत आहे.
लवकरच तो या देशात प्रवेश करील. तो फार वेगाने येत आहे. 27 शत्रू कधीच थकत नाहीत वा खाली पडत नाहीत. ते कधीच पेंगुळत नाहीत अथवा गाढ झोपून राहत नाहीत. ते नेहमीच शस्त्रसज्ज असतात. त्यांच्या पादत्राणांचे बंद कधीच तुटत नाहीत. 28 त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत. त्यांची धनुष्ये सज्ज आहेत. त्यांच्या घोड्यांचे खूर दगडासारखे कठीण आहेत. त्यांच्या रथांच्या मागे धुळीचे लोट उठतात.
29 ते गर्जना करतात आणि त्या गर्जना एखाद्या तरूण सिंहाच्या गर्जनेइतक्या मोठ्या असतात. जे लोक त्यांच्याशी लढतात त्यांना ते गुरगुरत पकडतात. लोक झगडतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना वाचविणारा तेथे कोणीही नसतो. 30 मग ते “सिंह” समुद्रगर्जना करतात. बंदिवासातील लोकांची नजर खाली वळते. त्यांच्या डोळ्यांपुढे अंधकार पसरतो. अंधकाराशिवाय तेथे काहीच असत नाही. सर्व प्रकाश या अंधकारातच लुप्त होतो.
येशूचे उदाहरण आपणसुध्दा अनुसरावे
12 म्हणून, विश्वास धरणारे पुष्कळ ढगांसारखे साक्षीदार सभोवती असल्याने आपल्याला अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टी तसेच सहजासहजी गुंतविणारे पाप आपण दूर फेकू या व जी शर्यत आपल्यासमोर आहे ती शर्यत आपण चिकाटीने पूर्ण करू. 2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे. 3 तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून पापी लोकांचा मोठ्या प्रमाणातील विरोध सहन कला. त्याचा विचार करा.
God Is Like a Father
4 पापाविरुद्धच्या तुमच्या युद्धात तुम्ही रक्त सांडेपर्यंत अजून झगडा दिला नाही. 5 ज्याच्याकडून तुम्हांला उत्तेजन मिळेल असा जो शब्द (मुले) तुम्हाला उद्देशून वापरण्यात आला आहे त्याचा कदाचित तुम्हाला विसर पडलेला दिसतो:
“माइया मुला, प्रभूच्या शिस्तीचा अनादर करू नको,
आणि जेव्हा तो तुला ताळ्यावर आणतो, तेव्हा तू धीर सोडू नको.
6 कारण ज्याच्यावर प्रभु प्रेम करतो, त्यांना तो शिस्त लावतो आणि
ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्यांना तो शिक्षा करतो.” (A)
7 हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन कर. ते असे दर्शविते की, देव तुम्हांला मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? 8 जर तुम्हांला शिस्त लावलेली नाही तर जसा इतर सर्व मुलांचा अनुभव असतो तसे तुम्ही अनौरस मुले आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही. 9 याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे? 10 आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे. 11 शिक्षेने शिस्त लावण्याच्या वेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, तर दु:खाची वाटते पण नंतर ज्या लोकांना शिस्तीचे धडे शिकायला मिळाले आहेत, त्यांना धार्मिकपणाच्या आणि शांतीच्या जीवनाची फळे चाखण्याची संधि मिळते.
आपण कसे जगतो याविषयी जागरुक राहा
12 म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे अशक्त गुडघे बळकट करा! 13 तुमच्या पावलांकरीता सरळ रस्ता तयार करा यासाठी की, लंगडे पाय निकामी होऊ नयेत, तर उलट ते बरे व्हावेत.
14 सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही. 15 कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊ नये व इतर लोकांची मने कलुषित करू नये, म्हणून जपा. 16 कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणापायी आपला वडीलकीचा हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या. 17 नंतर तुम्हाला माहीत आहे जेव्हा त्याला वारसहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.
18 ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दु:ख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नविन ठिकाणी आला आहात. 19 कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यानी ऐकला त्यानी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये. 20 कारण ते जी आज्ञा केली होती सहन करू शकले नाहीत. “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा.” [a] 21 खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.” [b]
22 परंतु तुम्ही सीनाय पर्वताजवळ जिवंत देवाच्या नगराजवळ आणि स्वर्गीय यरुशलेम येथे आलेले आहात आणि तुम्ही आनंदाने जमा झालेल्या हजारो देवदूतांजवळ आलेले आहात. 23 आणि तुम्ही प्रथम जन्मलेल्या मुलांच्या मंडळीकडे, ज्यांची नावे स्वर्गात लिहिली आहेत अशांकडे आला आहात, आणि तुम्ही देव जो सर्वांचा न्यायाधीश आहे त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही नीतिमान लोकांच्या आत्म्यांकडे जे पूर्ण आहेत त्यांच्याकडे आला आहात. 24 आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी सांगते.
25 जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरविले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे? 26 त्यावेळेस त्याच्या आवाजाने भूमि हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हादरवून टाकीन.” [c] 27 “पुन्हा एकदा” हे शब्द हेच दर्शवितात की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलविता येत नाहीत त्या तशाच राहतील.
28 म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या, आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची उपासना करू. 29 कारण आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.
2006 by World Bible Translation Center